Tuesday, November 24, 2009

sankalp

                        मी इकडे येताना 'गुरु चरित्र' संक्षिप्त ही पोथी बरोबर आणली होती.येतानाच संकल्प केला होता.इकडे आपण या पोथीचे १०० वेळा वाचन करायचे.काही मनात धरून हा संकल्प.त्याप्रमाणे पोथीचे वाचन १७/११/०९ रोजी पूर्ण झाले.नंदिनी शी सहजच बोलले आपण इकडे एक म्हणून मेहुंन जेवायला बोलवू  या.लगेच तिने बेत आखला.आणि अनिकेत चा मित्र रवि घारपुरे आणि रिचा याना जेवायला बोलावले.परदेशात त्याना असे मेहुंन जेवायला बोलावले,याची गम्मत वाटली.आनंदाने आले.पोटभर जेवले,खुप गप्पा मारल्या.मसाले भात,सार कोशिंबीर,पोली दम आलू भाजी आणि पूरण पोली असा बेत केला होता.पूरण यंत्र नव्हते त्या मुले पुरनाचे पराठे झाले.अनिकेत ने त्याना ११ यूरो दक्षिणा पण दिली.मला समाधान वाटले,आणि माझा सम्पूर्ण दिवस पण छान गेला.

Wednesday, November 18, 2009

एका ठिकाणी लाकडी बुट बनवायची फैक्ट्री आहे,त्यात आपण एक यूरो चे नाणे टाकले की ट्रक आत जातो काचेचे बुट घेतो आणि येतो,आपण ते उचलून घ्यायचे .मजेशीर वाटले.इकडे एका कालव्याच्या वर असा एक पुल आहे की तो दोन्ही बाजूने उचलला जातो,तो मी प्रत्यक्ष पाहिला त्याची पण प्रतिकृति तेथे आहे,तसेच पाणी अडवले जाते ते लोखंडी दरवाजे पण केले आहेत,आपोआप उघड बंद होतात.सर्व रेल वे चे प्रकार माल गाड्या छोट्या रुलावारून फिरत होत्या,लहान मुलाप्रमाने मी गाड़ी आली गाड़ी आली करत थाम्बत होते आणि बघत होते.चर्च आणि चर्च मधील सुरेल प्रार्थना तिकडे ऐकली .ट्यूलिप गार्डन ची प्रतिकृति लाजवाब होती.यूरोपियन पद्धतीची घरे दुकाने सर्व बारकावे सहित केली आहेत,प्राणी संग्रहालय ,शोपिंग सेंटर ,राजवाडा ,एक ना अनेक प्रतिकृति आहेत.एकंदरीत काय मला ते ठिकाण खुप आवडले,४ तास फिरताना पाय दुखतो हे जाणवले नाही.थोड़ी खरेदी केली.मग खायला गेलो.केक आणि सूप असे घेतले कारण बाकीचे पदार्थ खाणे मला शक्य नव्हते.येताना एक सुन्दर कृष्णन धवल फोटो काढला.ट्राम ट्रेन पकडून घरी आलो,प्रवास सुखकर झाला.

Friday, November 13, 2009

मदुर डैम या ठिकाणी जायचे किती तरी दिवस ठरत नव्हते.कारण थंडी,पाउस आणि वेळ.पण आज सकाळी मात्र जायचे नंदिनी ने पक्के ठरवले.वेळेवर निघणे गरजेचे होते,म्हणुन भरा भर आवरले.हे ठिकाण तसे अनिकेत च्या घरापासून दूर आहे,पण इकडे वाहतुकीची सोय अप्रतिम आहे,त्यामुले जायला काही वाटत नाही,हवामान चांगले,घाम येत नाही,गर्दी नाही.त्यामुले प्रवास केला तरी थकवा येत नाही.
        आम्ही प्रथम ट्राम ने सेंट्रल स्टेशन ला गेलो.आता मला तो स्टेशन परिसर जरा माहितीचा झाला आहे.ट्राम मधे २ भारतीय होते,ते आपसात हिंदीत बोलत होते,आम्ही बोललो नाही पण एइकुन पण बरे वाटले कारण आपले लोक होते ना ते!!!!!!!!!!थोड्या वेळाने काय झाले मला समजले नाही मी आणि नंदिनी आरामात ट्राम मधे बसलो होतो.तितक्यात एका स्टॉप नंतर ट्राम चालक अचानक आला आणि मला काहीतरी बोलून बाहेर पडला.त्याची ती अगम्य डच  भाषा !!!!!!!!मी आणि इतर प्रवासी बघत राहिलो पण कोणी काही बोलले नाही.ट्राम चालक बाहेर गेला ,दरवाजा ठोकला,परत आत आला आणि ट्राम चालवू लागला.मी काही जास्त त्यावर विचार केला नाही,कारण तो काय बोलला ,मला समजले कुठे होते????????असो असा भाषेचा प्रोब्लम[अड़चन ].
       स्टेशन वर सरल गेलो परतीचे टिकिट काढले.आम्ही निघालो.या स्टेशन वर पण खुप प्लेटफोर्म.आणि रचना काही औरच !!!!मला आपल्या ट्राफिक पोलीस ची तिकडे आठवण झाली.कारण डाव्या  बाजूला ५ ते १५ फलाट मागे १ते४ ,आणि समोर १६ ते २० फलाट.आपल्या कड़े एका सरल रेषेत फलाट पहायची सवय,त्यामुले हे सर्व अजब वाटते.
     आमची डैन हॉग एच ला जाणारी गाड़ी १४ व्या प्लेटफोर्म वर येणार होती.आम्ही तिकडे पोचलो एक दोन लोकाना विचारले पण काही समजले नाही.सुदैवाने एक टि.सी .दिसला.तो देशी होता हे विशेष.त्याला सर्व विचारून घेतले.अखेर त्यानी सांगितले,मीच या गाडीचा टि सी आहे,तुम्ही आरामात बसा,मी बोलतो नंतर.थोडासा सुखद अनुभव आला.आम्ही त्याचे टोपण नाव 'बंड्या' ठेवले.
      एकाच फलाटावर २ गाड्या उभ्या असतात इकडे.एक एका दिशेला जाते तर दूसरी दुसर्या दिशेला.गाड़ी डबल डेकर पण डबे मात्र सहाच !!गाड़ी सुरु झाल्यावर 'बंड्या'आला आणि आमच्याशी निवांत पणे हिन्दी तुन चक्क १० मिनिटे बोलला,खुशाली विचारली,प्रवासाच्या सूचना दिल्या आणि टिकिट न बघताच निघून गेला.या लोकाना मुंबई चे कलले की काय वाटते सांगू शकत नाही पण त्याना मुंबई म्हणजे एक ग्रेट शहर असे वाटते हे नक्की,आणि आहे ही!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!आम्ही एक गाड़ी बदलून दुसर्या गाडीत बसलो .प्रवासाचा मार्ग छान होता.दोन्ही बाजूला छान टुमदार घरे आणि विस्तीर्ण शेती दिसत होती.स्टेशन च्या जवळ वस्ती जास्त दिसत होती.बाकी फलाट मात्र ओस पडलेले दिसले.शिपोल सारखे स्टेशन.जे विमान तलाला जोडलेले पण १० सुद्धा लोक कोणत्याही फलाटावर नव्हते.गाडीत प्रथमच एक यूरोपियन पुरुष मला गळ्यात सोन्याची साखली हातात ब्रेस्स्लेट ,बोटात अंगठी आणि कानात डा य मंड घातलेला दिसला,नाहीतर इकडे कोणी दागिने घालताना दिसत नाही.आम्ही डैन हग  एच स्टेशन वर उतरलो.९ नंबर ची ट्राम पकडून मदुर डामला गेलो.ट्राम स्टॉप अगदी त्याच्या दारात,काय सोय आहे ना!!!!!!
           प्रेक्षनीय ठिकाण पण बाहेर गर्दी नाही,लोक नाहीत,विक्रेते तर नाहीच......आधी आम्हाला दोघिना बंद आहे की काय अशीच शंका आली.पण चौकशी केल्यावर सुरु आहे समजले.सुट्टीचा दिवस नाही आणि थंडी ने कोणी प्रवासी जास्त येत नाही आता तिकडे अशी माहिती मिळाली.टिकिट घेउन आता प्रवेश केला इकडे मात्र सिक्यूरिटी चेकिंग नव्हते.आत गेल्यावर मी अगदी हरखून गेले.अनिकेत चे फोटो पाहिले होते पण आज मी प्रत्यक्ष पाहणार याचा मला आनंद झाला होता.हे ठिकाण म्हणजे होलैंड ची प्रतिकृति...आता माझे एम्सटर्डम जवळ जवळ सर्व पाहून झाले आहे त्याची वैशिष्ठे माहित झाली आहेत.त्यामुले त्या सर्व ठिकाणच्या प्रतिकृति पहाताना गम्मत वाटत होती.
              प्रथम समोर दिसले ते मोठे लाकडी बुट.आणि पाण्यात खरोखर चालणार्या बोटी.एकेक पहायला सुरवात 
केली.हातात माहितीचे पुस्तक होतेच.इकडे एकून १९८ प्रतिकृति आहेत.मला सर्वच खुप आवडल्या.पण परत परत पहाव्या अशा काही आहेत,त्यातील सर्वात बेस्ट म्हणजे शिपोल विमानतल.अगदी जसे च्या तसे.कॉन्सर्ट हॉल ची प्रतिकृति पाहून मी थक्क झाले.आपण बटन दाबुन गाणे निवडून झाले की त्या मैदानात असलेले काही लोक नाचू लागतात.बाहुल्या
             

Monday, November 9, 2009

काल पाहिलेल्या म्युझियम जवळ आणखी एक म्युझियम आहे,त्याचे नाव राईक्स.परिसरात छान बाग आहे फुलझाडे आहेत.अनेक झाडाना कापून वेगवेगले आकर दिले आहेत.दिव्यांच्या माला सोडून रोशनाई केली होती.याच म्युझियम च्या बाहेर मला खाद्य पदार्थाच्या २ गाड्या दिसल्या.एका गाडीवरअमेरिकन बर्गर वगैरे होते,तर दूसरी गाड़ी कॉफी ,शीत पेय याची होती.ते गाड़ी म्हणजे आपल्या कडील लहान टेंपो.टेम्पोत सामान ठेवतो त्या जागेत सर्व आधुनिक सोईची साधने होती,कॉफी ,कोल्ड ड्रिक साठी.सजावट तर इतकी छान होती की मला फोटो काढावा वाटत होता.पण आज कैमरा नव्हता.म्युझियम मधे नेता येत नाही.म्युझियम मधील आणखी एक सोय म्हणजे आपले वजनदार कोट प्रथम काढून जमा करायचे.अगदी पद्धत शिरपने हेंगर ला लावून ठेवले जातात.आपण सुट सुटीत पणे फिरू शकतो.हीटर आत आहेत त्यामुले थंडीचा प्रश्न नाही.या म्युझियम मधे २मजले आहेत.चित्रे जास्त होती.युधाच्या वेळी वापरली जाणारी सर्व हत्यारे बन्दुकी तेथे आहेत.काचेची भांडी सुवर्ण पदके,चांदीच्या कोरीव काम केलेल्या वस्तुयांचा पण संग्रह केलेला आहे.विशेष म्हणजे एका खोलीच्या आकाराची जहाजाची प्रतिकृति ठेवली आहे.होलैंड चा इतिहास माहित नाही पण सर्व चित्रे प्रसंगानुसार चित्रित केली आहेत.सर्व चित्रे कैनवास वर काढलेली आहेत खुप पूर्वीची आहेत.इथे अनेक चित्रकारांची चित्रे आहेत.

Sunday, November 8, 2009

आज एम्सटर्डम मधील व्हेंन गोंअग म्युझियम पहायला गेलो होतो.हे प्रसिद्द चित्रकार १८५३ ते १८९० या काळात होउन गेले.त्यांची डायरी ,पत्रे,तसेच त्यानी काढलेली चित्रे याचा संग्रह म्हणजे हा म्युझियम.अतिशय सुसज्ज असे ३ मजली हे म्युझियम आहे.पण आश्चर्य वाटले याचे,की इथे सरकते जीने नाहीत!कारण इथे कोंत्य्ही दुकानात सुधा तसे जीने असतात.मोठी लिफ्ट आहे,पण जीने चढून जाताना अनेक छान चित्रे पाहता येतात.निसर्ग चित्रे मला आधिक आवडली.तसेच त्या कालातील स्त्रिया,पुरुष लहान मुले यांची चित्रे बघताना गम्मत वाटली.इथे ऊँची वस्त्रे अलंकार परिधान केलेली अनेक चित्रे आहेत.सर्व चित्रे कैनवास वर काढलेली आहेत.म्युझियम ची दालने[खोल्या]प्रशस्त आहेत.इथे एकेक भिंती च्या आकाराच्या पण काही फ्रेम्स आहेत.चित्रातिल व्यक्तीचे हावभाव ,डोळे अगदी बोलके आहेत.विशेष म्हणजे इतकी वर्ष झाली असून सर्व चित्रे सु स्थितीत आहेत.चित्राचे रंग तर अगदी आता रंगवाल्या सारखे आहेत.शिसवी लाकडाच्या ,आणि कोरीव काम केलेल्या सर्व फ्रेम्स आहेत.कलाकुसर उत्तम आहे.प्रत्येक चित्राचे वैशिष्ट्य [माहिती]तेथे दिली जाते.त्या साठी मोबाईल सारखे एक साधन दिले जाते.चित्राचा नंबर टाकुन आपण भाषा निवड केली की माहिती एइकू येते.अनेक देशातील लोक अगदी चौकस पणे माहिती समजुन घेत होते.इंग्लिश मधे माहिती चित्राच्या बाजुलाच लिहिली होती.प्रत्येक प्रशस्त दालनात मधे बसायला सोय केली होती.वयस्कर लोकांसाठी खास कंप्यूटर वर एका जागी बसून म्युझियम बघायची सोय आहे.अनेक चित्राच्या फोटो कॉपी विक्रीस आहेत,तसेच अनेक भेट वस्तु.३/४ तास फिरून झाल्यावर इथे खाण्याची पण सोय छान आहे.

Monday, November 2, 2009

रविवारी सकाळी आरामात उठून ब्रेक फास्ट केला.आणि आवरून बाहेर पडलो.ट्राम,बस,मेट्रो ट्रेन,बस असा प्रवास करत एका मोठ्या दुकानात गेलो.नाव त्याचे 'आइय्किया'तिकडे फक्त घरासाठी उपयोगी वस्तु मीलतात.पण किती मोठे ते एकच अखंड दुकान.बाप रे!!!!!!!!!!!!!गाड्या पार्किंग ची जागा पाहीली एका मजल्यावर ३५० गाड्या उभ्या होत्या.आपल्याला दुकानात शिरताना दुकानाचा नकाशा आणि एक तक्ता,पेन्सिल दिली जाते.पिशव्या,ट्रोली हे तर आहेतच.आपण त्या नकाशा प्रमाणे दुकानात फिरायचे,म्हणजे सर्व विभाग नीट पाहिले जातात.ते पण शिस्तीने
उगीच आपल्या मॉल प्रमाणे लोक इकडे तिकडे फिरत नव्हते. सोफा सेट कपाट सुसज्ज किचन.मुलांची खोली.खेलनी.भांडी,काचेच्या वस्तु,विविध प्रकारचे स्टैंड झाडे फुले खरी खोटी सर्व.तुलसी बागेतील सर्व वस्तु इथे विकायला होत्याच,नॉन स्टिक भांडी,काचेच्या बरन्या तर विविध प्रकार दिवे ,लैंप शेअड किती सांगू?????तुम्ही पहायलाच हवे,आता नाताल सण जवळ आला आहे ते जाणवत होते सजवातिचे भरपूर सामान होते.आपल्या कडील एट होम च्या २० पट तरी हे दुकान मोठे होते.नाताल  त्यांचा मुख्य सण ना तो,त्यामुले लोक घरासाठी खुप खरेदी करत होते.
       ते सर्व पाहून झाल्यावर दुसर्या विभागात गेलो.बाप रे !!!!!या सर्व वस्तुचे ते गोदावुन.वस्तु वर लिहिलेला कोड नंबर आपण त्या तक्त्यात लिहायचा आणि इकडे येवून ती वस्तु घ्यायची.इतके अप्रतिम सुट्सुतित पैकिंग की काही विचारच करू शकत नाही.मोठ मोठी कपाट,किचन मधील वस्तु आपण सहज गाडीच्या डिकित ठेवून घरी नेवू शकतो.घरी फक्त सुटे भाग जोडायचे,त्याचे माहिती पत्रक पण त्याच्यात .अगदी स्क्रू ,सकट सर्व प्लास्टिक मधे पैक .लोक रविवार असल्याने प्रचंड खरेदी करत होते.ते सर्व पाहून विचार आला ,आपल्याकडे असे सोयीचे कधी होणार????माणुस बल कमी ,कामगार नाही,हमाल तर नाहीतच.सर्व काही स्वतः.एक खुप मोठा माणुस मोठा टीवी [एल सी डी]गाडीत नेवून ठेवत होता.मी पाहिले अणि अवाक् झाले.दुकानदार काहीही घरी पाठवत नाही.पैसे वाला श्रीमंत गरीब इकडे काही फरक दिसत नाही.बाहेर पडलो,बघून आणि चालून मी फारच थकले होते,त्यात पाउस पडत होता.परत टैक्सी बोलावली आणि घरी आलो.इकडे फ़ोन केला की ५ मिनिटात टैक्सी हजर होते ते बरे वाटले.टैक्सी मधे आपला पत्ता सांगितला की लगेच स्क्रिन् वर नकाशा दिसतो.त्यामुले रस्ता शोधने,चूकने काही भानगड नाही.त्यांची भाषा येत नाही ही मोठी अड़चन आहे मात्र.
   घरी आलो,गरम चहा घेतला.बाहेर आज पोट पूजा झाली होती,रात्रि फक्त भेल खाल्ली [चापली].दमलो होतो .रात्रि लवकर झोपलो.
   शनिवारी सकाळी ब्रेक फास्ट नाही ब्रंच करून आम्ही बाहेर पडलो.खायला खुस खुस केले होते.आपल्याकडे लापसी रवा मिलतो त्याचाच एक प्रकार.त्याला इकडे खुस खुस म्हणतात.तिखट शीरा करतात तसा करता येतो.विशेष म्हणजे तो लो कैलरी असतो.
         प्रथम 'लुँर्ड्स'म्हणुन मोठा शोपिंग मॉल आहे तिकडे गेलो.अनेक दुकाने,पण सौन्दर्य प्रसाधनाची जास्त दुकाने होती.इकडे अगदी आज्या सुद्धा मेक अप केल्या शिवाय बाहेर पडत नाहीत.आता घरी परत जायला एक महिना राहिला .त्यामुले शोपिंगला  सुरवात.सर्वाना शक्य नाही पण खास मैत्रिणीला,व्यक्तिना ,लेकीलाआणि इतर जनाना काहीतरी टोकन घेउन जावे ठरवले.मला त्या सौन्दर्य प्रसधनातिल खरच काही कळत नाही.मी आपली जरा बाजुलाच होते.पण आकर्षक भेट वस्तु छान पैक केलेल्या बघत होते.आमचे तिघांचे एक मत झाले की खरेदी.काही गोष्टी खरेदी केल्या.नंतर मात्र लहान मुलांच्या गिफ्ट आणि गेम बघण्यात खुप वेळ गेला.खेळ छान पण वजनदार ,नेताना वजनाचे बंधन आहे त्यामुले आवडले तरी काही घेता आले नाही.त्यात ल्या त्यात दोन तिन खेळ घेतले माझ्या नातवंडा साठी.
          नंतर आम्ही 'अलबर्ट हैएन' या मोठ्या सुपर मार्केट मधे गेलो.अबब!!!!!एका मागुन एक विभाग बघताना आणि खरेदी करताना पायाचे तुकडे पडले.दूध,दही,भाज्या,फले,बिस्किटे ,साबण.कितीतरी सामान घेतले.वेलची,जायफल,दालचीनी याची  पुड इकडे छान मिलते.खास घरी न्यायला त्या पण घेतल्या.सामानाचे २ मोठे झोले [पिशव्या]भरल्या.ते सुपर मार्केट बघताना ब्रेड चीज़ चिकन फिश चे शेकडो प्रकार पाहून मी थक्क झाले.तयार खाद्य पदार्थ ,भाज्या फले.सलाड पाहून मला काय घ्यावे सुचत नव्हते,अनिकेत मात्र सवय असल्याने भरा भर घेत सुटला होता.तिकडे सामान नेयला प्लास्टिक पिशव्या ठेवल्या होत्या.हलके थोड़े सामान आपण घेऊ या ,या विचाराने मी एक पिशवी घेतली.नंतर मला समजले त्या पिशवी ची २० सेंट[पैसे] कीमत असते.माझ्यावर मी फुकट ढापली,असा शिक्का बसला.सर्व सामान घेउन बस ट्राम करत घरी परतलो.फिरून फिरून दमलो होतो.गरम कड़क चहा केला ,ती घेतला,जरा बरे वाटले.आता जरा वेळ आराम.रात्रि जेवायला खास मालवणी पद्धतीचे चिकन केले.मस्त ताव मारून जेवलो.उद्या रविवार .सुट्टीचा दिवस ,खुप वेळ झोपायचे हे नक्की.म्हणुन रात्रि निवांत पणे पत्ते खेळत बसलो.रम्मी साठी आज नविन पत्ते पण आणले होते.नविन कैट[पत्ते]मधील चित्रे ओलखने जरा कठिन जात होते,पण मिशिवाला राजा,चिकना दिसती तो गोटू आणि गोरीपान राणी अशी नावे ठेवत टाइमपास केला.उशिरा खेळ संपला आणि मग झोपलो.