Tuesday, November 24, 2009

pardesh gaman anjbhav

                                             परदेश गमनाचे वारे वाहू लागले आणि तयारी ला जोर आला.वीसा घरी आल्यावर मात्र हातपाय भरभर हलू लागले.बघता बघता मी पहिला विमान प्रवास करून अनिकेत कड़े आले.८ सप्टेम्बर ला.तेव्हा पासून चे माझे अनुभव मी ब्लॉग मधे लिहायचा प्रयत्न केला आहे.पूर्वी मला परदेशात येण्यात काही स्वारस्य वाटत नव्हते,इतरासरखे आकर्षण पण नव्हते.पण एकदा मनाची तयारी करून अनिकेत कड़े आले.फक्त ३ महीने वास्तव्य आहे ठीक आहे,जातील दिवस पटकन.असे वाटले,आणि सुरवातीला तसे झालेही.नव्याची नवलाई होती,नविन शहर कसे आहे याची माहिती करून घेत होते,खुप वर्षानी मी आणि अनिकेत गप्पा मारत फिरलो,तेव्हा काय वाटले कसे सांगू???अनिकेत मधे खुप चांगला बदल झाला आहे असे जाणवले.लगेच एक महिन्याच्या आत त्याने मला स्वप्न नगरिची सफर घडवली.तेव्हा तर काय मला खुपच आनंद झाला होता.मनात खुप वेळा२ विचार सतत यायचे,अशा या रम्य ठिकाणी आपण एकटेच आलो आहोत,मला ह्यांची उणीव खुप वेळा होत असे.पण काय करणार??आपले नशीब.आपले दुख आपल्याशी ठेवायचे त्याचे भांडवल करायचे नाही हे मनाशी पक्के केलेले आहे.त्यामुले कुणाला जाणीव करून देत नसे.आणि दूसरा विचार ती दोघेच इकडे आली असती तर ,त्यानी आणखी मजा केलि असती,माझ्या मुले त्याना स्वतंत्रता मिळत नाही असे सारखे वाटत होते.पण इतर अनोल्खी लोकान पेक्षा मी मुलासुने बरोबर आले याचा आनंद आधिक होता.
                                  परदेश वास्तव्याचे ३ टप्पे केले तर माझा पहिला महिना पटकन निघून गेला.सतत फिरने गप्पा सुरु होत्या.पण दुसर्या महिन्यात मला घर दिसू लागले.कधीच मी बाहेर इतके दिवस राहिले नाही.त्यानी माझे मन कशातच रमत नव्हते.इकडे ठंडी ची लाट ही तेव्हाच आली.आता ही थंडी कशी सोसणार?घरी बसून वेळ कसा घालवायचा?????या विचाराने मन खुप वेळा उदास होत असे.ही दोघे मला उपाय सांगत असत ,पण मला ते काही पचनी पडत नव्हते.अखेर मी परत यावे या विचाराला आले.तसे अनिकेत भाग्यश्री जवळ बोलले पण.हा माझा विचार काही पट्नारा नव्हता.पण मला खरच काय करावे सुचत नव्हते.अस्वस्थ मनाने रहाणे काही अर्थ नव्हता.भाग्यश्री ने टिकिताची चौकशी केलि.मनात चलबिचल सुरु झाली.पण अखेर या वेळी मला माझ्या गणपतिने [देवाने]सद्विचार दिला.आणि मी लवकर परत न जाता थोड़े दिवस आहेत ते आनंदाने रहायचे हा विचार पक्का केला.विचार करने ,बेत आखाने सोपे असते पण कृतित आनने कठिन जाते.पण तेहि केले.
                                   परत घरी जाताना ची खरेदी मी आणि नंदिनी ने एका दिवशी उरकून टाकली.तेव्हा सामानाचे वजन जास्त होइल हा विचारही दोघिनी केला नाही.पण आता माझे कपडे ठेवून जायचे या विचाराला मी पोचले ,हे ही नसे थोडके!!!
                                    परदेश पहिल्या शिवाय आवडत नाही हे मी अनुभवाने सांगते.मला इकडे शुद्ध हवा,मुबलक पानी,विज ,नयन रम्य निसर्ग सौन्दर्य ,सर्वे सुखसोयी आहेत.फुटपाथ ,रहदारी कमी,जाने येणे प्रवास सुखकर.हे सर्वे अवड्त असे.चालायला फिरायला आवडत असे.बाजारात जाऊ लागले,मनात तुलना करत असे,पण तरी रोजचे जीवन चांगले आहे .हे नक्की.पण   ..........खर सांगू का????????
                      बहु असोत संपन्न की महा ,प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
                                              परदेशात राहणारी मुले आधिक वेळ घरी रहातात,आपल्या सारखा नाका नसतो,आणि खुप खास मित्र पण नसतात.चक्क माझा वेळ जावा म्हणून आम्ही कितीतरी वेळा पत्ते खेलत असो.अनिकेत च्या आवडीचे पदार्थ करण्यात मी पुढाकार घेत असे,माझे पोथी वाचन पूर्ण झाले,त्याचे मेहुंन पण जेवू घातले,परदेशात मला चक्क घारपुरे जोडपे भेटले,[अनिकेत चा मित्र]पूरण पोली चे जेवण केले,रुपयात नाही ,यूरो मधे दक्षिणा पण दिली.सुधारक देशातील ते मेहुंन वेस्टर्न कपडे घातलेले.बुट घालून टेबल वर जेवायला बसले.पण इकडे ठीक आहे.आपण आपले विचार,संस्कार बाजूला ठेवून वागलो तर पुढच्या पीढ़ी बरोबर दिवस चांगले जातात हा विचार केला.शांत राहिले,आपल्या मुलांवर संस्कार असतात,पण परदेशात गेल्यावर त्याचे काय होते ,देव जाणे....
        कालाय तस्मै नम्हा!!!!!!!!!!!!
              आता माझे घरी जायचे दिवस जवळ आले,एकच आठवडा राहिला.आता मात्र माझी स्व देशातील लोकाना भेटण्याची ओढ़ वाढू लागली,पण त्याच वेळी आता अनिकेत नंदिनी दोघे लवकर भेटणार नाहीत,असे सारखे मनात येवू लागले.मग मी मे मधे आंबे खायला तुम्ही तिकडे या,भुन भुन सुरु केलि.पण अनिकेत तो....असा सहज पट्नारा थोडीच.त्याने मला तू समर मधे इकडे ये.तुला घरी तरी काय काम आहे?????असे बोलून माझा ब्रेन वाश सुरु केला.
             बदल इतका की आधी परदेशात स्वारस्य नसलेली मी,आता पुढील समर मधे नक्की येइन असे सांगू लागले.मला देश आवडला,अनिकेत बरोबर,नंदिनी बरोबर राहता आले,म्हनुनच हा बदल माझ्यात झाला.
            पण नंतर येताना मनाची पक्की तयारी करून,वेळ जावा या साठी पुस्तके,सीडीज ,भरतकाम बरोबर घेउन आलो पाहिजे तरच वेळ आनंदात जाइल हे नक्की.
                     आज सकाळी अनिकेत च्या आवडीचा सफेद ढोकला,आणि लसून चटनी.[शिल्पा मामी पद्धत]बनवली.खुप दिवसानी केल्याने पोटभर आवडीने त्यानी खाल्ला.नंतर आवरून आम्ही बाहेर पडलो.खास लोकाची खरेदी!!!कोण ते कलले ना?लाडकी लेक आणि जावई.प्रथम जावयाची की लेकीची प्रश्न होता.प्रथम सौरभ साठी टी शर्ट बघायला सुरवात केली.पण अनेक दुकाने बघून एकमत काही होइना,अखेर शर्ट बघा असे मी सांगुन टाकले.मग शर्ट बघणे मिशन सुरु झाले,तिघांची आवड भिन्न .पण अखेर एक शर्ट फायनल केला.खर सांगायचे तर अजुन मला सौरभ ची आवड काय ?त्याला कसे कपडे आवडतात ते कलले नाही.नंतर मोर्चा भाग्यश्री च्या खरेदी कड़े.मोठा कठिन प्रश्न?पण सुरवात केली "स्वरोस्की"पासून पण पुन्हा तोच प्रश्न.अनिकेत ला आवडेल जरा दिव्य !!!त्याचा बजेट चा प्रश्न नव्हता पण हा दगड च वाटतो वगैरे टिका सुरु होत्या.इकडे तिकडे बघताना हैण्ड पर्स दिसल्या,"ब्राण्डेड बर का?"सर्व पर्स उघडून हातात धरून नंदिनी ने बघितल्या,नंतर ३ पर्स मधून निवड.अनिकेत ची टिका सुरु होतीच.पण अखेर मी एक पर्स फायनल केली.शर्ट आणि पर्स चे पैसे देवून आम्ही जवळ दुसर्या दुकानात गेलो.
                    तो मेघना मोल  होता.सरकत्या जिन्या वरून वर जातो तो समोर स्वरोस्की दुकान.धन्य वाटले!!
सर्व आकर्षक वस्तु,अलंकार छान मांडून ठेवले होते.परत पहाणे सुरु,अनिकेत ने आता माघार घेतली होती,तुम्हाला काय आवडेल ते घ्या सांगुन टाकले.नंदिनी ने २ सेट पसंद केले.त्या पैकी मला जो आवडला तो मी सांगुन टाकला,तो त्या पेक्षा महाग होता.पण माझे मत विचारले मी सांगुन टाकले....लेकिसाठीआई ने आज बिनधास्त पणे सांगितले.अनिकेत ने मला टोमणा पण मारला.पण खास खरेदी ख़रच मस्त झाली,अनिकेत चा खिसा खाली केला हे मात्र नक्क्की ......नंतर इकडे तिकडे वेळ घालवून घरी आलो.येताना टर्किश डोनर घेउन आलो,चहा आणि डोनर याचा आस्वाद घेतला......

sankalp

                        मी इकडे येताना 'गुरु चरित्र' संक्षिप्त ही पोथी बरोबर आणली होती.येतानाच संकल्प केला होता.इकडे आपण या पोथीचे १०० वेळा वाचन करायचे.काही मनात धरून हा संकल्प.त्याप्रमाणे पोथीचे वाचन १७/११/०९ रोजी पूर्ण झाले.नंदिनी शी सहजच बोलले आपण इकडे एक म्हणून मेहुंन जेवायला बोलवू  या.लगेच तिने बेत आखला.आणि अनिकेत चा मित्र रवि घारपुरे आणि रिचा याना जेवायला बोलावले.परदेशात त्याना असे मेहुंन जेवायला बोलावले,याची गम्मत वाटली.आनंदाने आले.पोटभर जेवले,खुप गप्पा मारल्या.मसाले भात,सार कोशिंबीर,पोली दम आलू भाजी आणि पूरण पोली असा बेत केला होता.पूरण यंत्र नव्हते त्या मुले पुरनाचे पराठे झाले.अनिकेत ने त्याना ११ यूरो दक्षिणा पण दिली.मला समाधान वाटले,आणि माझा सम्पूर्ण दिवस पण छान गेला.

Wednesday, November 18, 2009

एका ठिकाणी लाकडी बुट बनवायची फैक्ट्री आहे,त्यात आपण एक यूरो चे नाणे टाकले की ट्रक आत जातो काचेचे बुट घेतो आणि येतो,आपण ते उचलून घ्यायचे .मजेशीर वाटले.इकडे एका कालव्याच्या वर असा एक पुल आहे की तो दोन्ही बाजूने उचलला जातो,तो मी प्रत्यक्ष पाहिला त्याची पण प्रतिकृति तेथे आहे,तसेच पाणी अडवले जाते ते लोखंडी दरवाजे पण केले आहेत,आपोआप उघड बंद होतात.सर्व रेल वे चे प्रकार माल गाड्या छोट्या रुलावारून फिरत होत्या,लहान मुलाप्रमाने मी गाड़ी आली गाड़ी आली करत थाम्बत होते आणि बघत होते.चर्च आणि चर्च मधील सुरेल प्रार्थना तिकडे ऐकली .ट्यूलिप गार्डन ची प्रतिकृति लाजवाब होती.यूरोपियन पद्धतीची घरे दुकाने सर्व बारकावे सहित केली आहेत,प्राणी संग्रहालय ,शोपिंग सेंटर ,राजवाडा ,एक ना अनेक प्रतिकृति आहेत.एकंदरीत काय मला ते ठिकाण खुप आवडले,४ तास फिरताना पाय दुखतो हे जाणवले नाही.थोड़ी खरेदी केली.मग खायला गेलो.केक आणि सूप असे घेतले कारण बाकीचे पदार्थ खाणे मला शक्य नव्हते.येताना एक सुन्दर कृष्णन धवल फोटो काढला.ट्राम ट्रेन पकडून घरी आलो,प्रवास सुखकर झाला.

Friday, November 13, 2009

मदुर डैम या ठिकाणी जायचे किती तरी दिवस ठरत नव्हते.कारण थंडी,पाउस आणि वेळ.पण आज सकाळी मात्र जायचे नंदिनी ने पक्के ठरवले.वेळेवर निघणे गरजेचे होते,म्हणुन भरा भर आवरले.हे ठिकाण तसे अनिकेत च्या घरापासून दूर आहे,पण इकडे वाहतुकीची सोय अप्रतिम आहे,त्यामुले जायला काही वाटत नाही,हवामान चांगले,घाम येत नाही,गर्दी नाही.त्यामुले प्रवास केला तरी थकवा येत नाही.
        आम्ही प्रथम ट्राम ने सेंट्रल स्टेशन ला गेलो.आता मला तो स्टेशन परिसर जरा माहितीचा झाला आहे.ट्राम मधे २ भारतीय होते,ते आपसात हिंदीत बोलत होते,आम्ही बोललो नाही पण एइकुन पण बरे वाटले कारण आपले लोक होते ना ते!!!!!!!!!!थोड्या वेळाने काय झाले मला समजले नाही मी आणि नंदिनी आरामात ट्राम मधे बसलो होतो.तितक्यात एका स्टॉप नंतर ट्राम चालक अचानक आला आणि मला काहीतरी बोलून बाहेर पडला.त्याची ती अगम्य डच  भाषा !!!!!!!!मी आणि इतर प्रवासी बघत राहिलो पण कोणी काही बोलले नाही.ट्राम चालक बाहेर गेला ,दरवाजा ठोकला,परत आत आला आणि ट्राम चालवू लागला.मी काही जास्त त्यावर विचार केला नाही,कारण तो काय बोलला ,मला समजले कुठे होते????????असो असा भाषेचा प्रोब्लम[अड़चन ].
       स्टेशन वर सरल गेलो परतीचे टिकिट काढले.आम्ही निघालो.या स्टेशन वर पण खुप प्लेटफोर्म.आणि रचना काही औरच !!!!मला आपल्या ट्राफिक पोलीस ची तिकडे आठवण झाली.कारण डाव्या  बाजूला ५ ते १५ फलाट मागे १ते४ ,आणि समोर १६ ते २० फलाट.आपल्या कड़े एका सरल रेषेत फलाट पहायची सवय,त्यामुले हे सर्व अजब वाटते.
     आमची डैन हॉग एच ला जाणारी गाड़ी १४ व्या प्लेटफोर्म वर येणार होती.आम्ही तिकडे पोचलो एक दोन लोकाना विचारले पण काही समजले नाही.सुदैवाने एक टि.सी .दिसला.तो देशी होता हे विशेष.त्याला सर्व विचारून घेतले.अखेर त्यानी सांगितले,मीच या गाडीचा टि सी आहे,तुम्ही आरामात बसा,मी बोलतो नंतर.थोडासा सुखद अनुभव आला.आम्ही त्याचे टोपण नाव 'बंड्या' ठेवले.
      एकाच फलाटावर २ गाड्या उभ्या असतात इकडे.एक एका दिशेला जाते तर दूसरी दुसर्या दिशेला.गाड़ी डबल डेकर पण डबे मात्र सहाच !!गाड़ी सुरु झाल्यावर 'बंड्या'आला आणि आमच्याशी निवांत पणे हिन्दी तुन चक्क १० मिनिटे बोलला,खुशाली विचारली,प्रवासाच्या सूचना दिल्या आणि टिकिट न बघताच निघून गेला.या लोकाना मुंबई चे कलले की काय वाटते सांगू शकत नाही पण त्याना मुंबई म्हणजे एक ग्रेट शहर असे वाटते हे नक्की,आणि आहे ही!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!आम्ही एक गाड़ी बदलून दुसर्या गाडीत बसलो .प्रवासाचा मार्ग छान होता.दोन्ही बाजूला छान टुमदार घरे आणि विस्तीर्ण शेती दिसत होती.स्टेशन च्या जवळ वस्ती जास्त दिसत होती.बाकी फलाट मात्र ओस पडलेले दिसले.शिपोल सारखे स्टेशन.जे विमान तलाला जोडलेले पण १० सुद्धा लोक कोणत्याही फलाटावर नव्हते.गाडीत प्रथमच एक यूरोपियन पुरुष मला गळ्यात सोन्याची साखली हातात ब्रेस्स्लेट ,बोटात अंगठी आणि कानात डा य मंड घातलेला दिसला,नाहीतर इकडे कोणी दागिने घालताना दिसत नाही.आम्ही डैन हग  एच स्टेशन वर उतरलो.९ नंबर ची ट्राम पकडून मदुर डामला गेलो.ट्राम स्टॉप अगदी त्याच्या दारात,काय सोय आहे ना!!!!!!
           प्रेक्षनीय ठिकाण पण बाहेर गर्दी नाही,लोक नाहीत,विक्रेते तर नाहीच......आधी आम्हाला दोघिना बंद आहे की काय अशीच शंका आली.पण चौकशी केल्यावर सुरु आहे समजले.सुट्टीचा दिवस नाही आणि थंडी ने कोणी प्रवासी जास्त येत नाही आता तिकडे अशी माहिती मिळाली.टिकिट घेउन आता प्रवेश केला इकडे मात्र सिक्यूरिटी चेकिंग नव्हते.आत गेल्यावर मी अगदी हरखून गेले.अनिकेत चे फोटो पाहिले होते पण आज मी प्रत्यक्ष पाहणार याचा मला आनंद झाला होता.हे ठिकाण म्हणजे होलैंड ची प्रतिकृति...आता माझे एम्सटर्डम जवळ जवळ सर्व पाहून झाले आहे त्याची वैशिष्ठे माहित झाली आहेत.त्यामुले त्या सर्व ठिकाणच्या प्रतिकृति पहाताना गम्मत वाटत होती.
              प्रथम समोर दिसले ते मोठे लाकडी बुट.आणि पाण्यात खरोखर चालणार्या बोटी.एकेक पहायला सुरवात 
केली.हातात माहितीचे पुस्तक होतेच.इकडे एकून १९८ प्रतिकृति आहेत.मला सर्वच खुप आवडल्या.पण परत परत पहाव्या अशा काही आहेत,त्यातील सर्वात बेस्ट म्हणजे शिपोल विमानतल.अगदी जसे च्या तसे.कॉन्सर्ट हॉल ची प्रतिकृति पाहून मी थक्क झाले.आपण बटन दाबुन गाणे निवडून झाले की त्या मैदानात असलेले काही लोक नाचू लागतात.बाहुल्या
             

Monday, November 9, 2009

काल पाहिलेल्या म्युझियम जवळ आणखी एक म्युझियम आहे,त्याचे नाव राईक्स.परिसरात छान बाग आहे फुलझाडे आहेत.अनेक झाडाना कापून वेगवेगले आकर दिले आहेत.दिव्यांच्या माला सोडून रोशनाई केली होती.याच म्युझियम च्या बाहेर मला खाद्य पदार्थाच्या २ गाड्या दिसल्या.एका गाडीवरअमेरिकन बर्गर वगैरे होते,तर दूसरी गाड़ी कॉफी ,शीत पेय याची होती.ते गाड़ी म्हणजे आपल्या कडील लहान टेंपो.टेम्पोत सामान ठेवतो त्या जागेत सर्व आधुनिक सोईची साधने होती,कॉफी ,कोल्ड ड्रिक साठी.सजावट तर इतकी छान होती की मला फोटो काढावा वाटत होता.पण आज कैमरा नव्हता.म्युझियम मधे नेता येत नाही.म्युझियम मधील आणखी एक सोय म्हणजे आपले वजनदार कोट प्रथम काढून जमा करायचे.अगदी पद्धत शिरपने हेंगर ला लावून ठेवले जातात.आपण सुट सुटीत पणे फिरू शकतो.हीटर आत आहेत त्यामुले थंडीचा प्रश्न नाही.या म्युझियम मधे २मजले आहेत.चित्रे जास्त होती.युधाच्या वेळी वापरली जाणारी सर्व हत्यारे बन्दुकी तेथे आहेत.काचेची भांडी सुवर्ण पदके,चांदीच्या कोरीव काम केलेल्या वस्तुयांचा पण संग्रह केलेला आहे.विशेष म्हणजे एका खोलीच्या आकाराची जहाजाची प्रतिकृति ठेवली आहे.होलैंड चा इतिहास माहित नाही पण सर्व चित्रे प्रसंगानुसार चित्रित केली आहेत.सर्व चित्रे कैनवास वर काढलेली आहेत खुप पूर्वीची आहेत.इथे अनेक चित्रकारांची चित्रे आहेत.

Sunday, November 8, 2009

आज एम्सटर्डम मधील व्हेंन गोंअग म्युझियम पहायला गेलो होतो.हे प्रसिद्द चित्रकार १८५३ ते १८९० या काळात होउन गेले.त्यांची डायरी ,पत्रे,तसेच त्यानी काढलेली चित्रे याचा संग्रह म्हणजे हा म्युझियम.अतिशय सुसज्ज असे ३ मजली हे म्युझियम आहे.पण आश्चर्य वाटले याचे,की इथे सरकते जीने नाहीत!कारण इथे कोंत्य्ही दुकानात सुधा तसे जीने असतात.मोठी लिफ्ट आहे,पण जीने चढून जाताना अनेक छान चित्रे पाहता येतात.निसर्ग चित्रे मला आधिक आवडली.तसेच त्या कालातील स्त्रिया,पुरुष लहान मुले यांची चित्रे बघताना गम्मत वाटली.इथे ऊँची वस्त्रे अलंकार परिधान केलेली अनेक चित्रे आहेत.सर्व चित्रे कैनवास वर काढलेली आहेत.म्युझियम ची दालने[खोल्या]प्रशस्त आहेत.इथे एकेक भिंती च्या आकाराच्या पण काही फ्रेम्स आहेत.चित्रातिल व्यक्तीचे हावभाव ,डोळे अगदी बोलके आहेत.विशेष म्हणजे इतकी वर्ष झाली असून सर्व चित्रे सु स्थितीत आहेत.चित्राचे रंग तर अगदी आता रंगवाल्या सारखे आहेत.शिसवी लाकडाच्या ,आणि कोरीव काम केलेल्या सर्व फ्रेम्स आहेत.कलाकुसर उत्तम आहे.प्रत्येक चित्राचे वैशिष्ट्य [माहिती]तेथे दिली जाते.त्या साठी मोबाईल सारखे एक साधन दिले जाते.चित्राचा नंबर टाकुन आपण भाषा निवड केली की माहिती एइकू येते.अनेक देशातील लोक अगदी चौकस पणे माहिती समजुन घेत होते.इंग्लिश मधे माहिती चित्राच्या बाजुलाच लिहिली होती.प्रत्येक प्रशस्त दालनात मधे बसायला सोय केली होती.वयस्कर लोकांसाठी खास कंप्यूटर वर एका जागी बसून म्युझियम बघायची सोय आहे.अनेक चित्राच्या फोटो कॉपी विक्रीस आहेत,तसेच अनेक भेट वस्तु.३/४ तास फिरून झाल्यावर इथे खाण्याची पण सोय छान आहे.