Monday, November 2, 2009

रविवारी सकाळी आरामात उठून ब्रेक फास्ट केला.आणि आवरून बाहेर पडलो.ट्राम,बस,मेट्रो ट्रेन,बस असा प्रवास करत एका मोठ्या दुकानात गेलो.नाव त्याचे 'आइय्किया'तिकडे फक्त घरासाठी उपयोगी वस्तु मीलतात.पण किती मोठे ते एकच अखंड दुकान.बाप रे!!!!!!!!!!!!!गाड्या पार्किंग ची जागा पाहीली एका मजल्यावर ३५० गाड्या उभ्या होत्या.आपल्याला दुकानात शिरताना दुकानाचा नकाशा आणि एक तक्ता,पेन्सिल दिली जाते.पिशव्या,ट्रोली हे तर आहेतच.आपण त्या नकाशा प्रमाणे दुकानात फिरायचे,म्हणजे सर्व विभाग नीट पाहिले जातात.ते पण शिस्तीने
उगीच आपल्या मॉल प्रमाणे लोक इकडे तिकडे फिरत नव्हते. सोफा सेट कपाट सुसज्ज किचन.मुलांची खोली.खेलनी.भांडी,काचेच्या वस्तु,विविध प्रकारचे स्टैंड झाडे फुले खरी खोटी सर्व.तुलसी बागेतील सर्व वस्तु इथे विकायला होत्याच,नॉन स्टिक भांडी,काचेच्या बरन्या तर विविध प्रकार दिवे ,लैंप शेअड किती सांगू?????तुम्ही पहायलाच हवे,आता नाताल सण जवळ आला आहे ते जाणवत होते सजवातिचे भरपूर सामान होते.आपल्या कडील एट होम च्या २० पट तरी हे दुकान मोठे होते.नाताल  त्यांचा मुख्य सण ना तो,त्यामुले लोक घरासाठी खुप खरेदी करत होते.
       ते सर्व पाहून झाल्यावर दुसर्या विभागात गेलो.बाप रे !!!!!या सर्व वस्तुचे ते गोदावुन.वस्तु वर लिहिलेला कोड नंबर आपण त्या तक्त्यात लिहायचा आणि इकडे येवून ती वस्तु घ्यायची.इतके अप्रतिम सुट्सुतित पैकिंग की काही विचारच करू शकत नाही.मोठ मोठी कपाट,किचन मधील वस्तु आपण सहज गाडीच्या डिकित ठेवून घरी नेवू शकतो.घरी फक्त सुटे भाग जोडायचे,त्याचे माहिती पत्रक पण त्याच्यात .अगदी स्क्रू ,सकट सर्व प्लास्टिक मधे पैक .लोक रविवार असल्याने प्रचंड खरेदी करत होते.ते सर्व पाहून विचार आला ,आपल्याकडे असे सोयीचे कधी होणार????माणुस बल कमी ,कामगार नाही,हमाल तर नाहीतच.सर्व काही स्वतः.एक खुप मोठा माणुस मोठा टीवी [एल सी डी]गाडीत नेवून ठेवत होता.मी पाहिले अणि अवाक् झाले.दुकानदार काहीही घरी पाठवत नाही.पैसे वाला श्रीमंत गरीब इकडे काही फरक दिसत नाही.बाहेर पडलो,बघून आणि चालून मी फारच थकले होते,त्यात पाउस पडत होता.परत टैक्सी बोलावली आणि घरी आलो.इकडे फ़ोन केला की ५ मिनिटात टैक्सी हजर होते ते बरे वाटले.टैक्सी मधे आपला पत्ता सांगितला की लगेच स्क्रिन् वर नकाशा दिसतो.त्यामुले रस्ता शोधने,चूकने काही भानगड नाही.त्यांची भाषा येत नाही ही मोठी अड़चन आहे मात्र.
   घरी आलो,गरम चहा घेतला.बाहेर आज पोट पूजा झाली होती,रात्रि फक्त भेल खाल्ली [चापली].दमलो होतो .रात्रि लवकर झोपलो.
   शनिवारी सकाळी ब्रेक फास्ट नाही ब्रंच करून आम्ही बाहेर पडलो.खायला खुस खुस केले होते.आपल्याकडे लापसी रवा मिलतो त्याचाच एक प्रकार.त्याला इकडे खुस खुस म्हणतात.तिखट शीरा करतात तसा करता येतो.विशेष म्हणजे तो लो कैलरी असतो.
         प्रथम 'लुँर्ड्स'म्हणुन मोठा शोपिंग मॉल आहे तिकडे गेलो.अनेक दुकाने,पण सौन्दर्य प्रसाधनाची जास्त दुकाने होती.इकडे अगदी आज्या सुद्धा मेक अप केल्या शिवाय बाहेर पडत नाहीत.आता घरी परत जायला एक महिना राहिला .त्यामुले शोपिंगला  सुरवात.सर्वाना शक्य नाही पण खास मैत्रिणीला,व्यक्तिना ,लेकीलाआणि इतर जनाना काहीतरी टोकन घेउन जावे ठरवले.मला त्या सौन्दर्य प्रसधनातिल खरच काही कळत नाही.मी आपली जरा बाजुलाच होते.पण आकर्षक भेट वस्तु छान पैक केलेल्या बघत होते.आमचे तिघांचे एक मत झाले की खरेदी.काही गोष्टी खरेदी केल्या.नंतर मात्र लहान मुलांच्या गिफ्ट आणि गेम बघण्यात खुप वेळ गेला.खेळ छान पण वजनदार ,नेताना वजनाचे बंधन आहे त्यामुले आवडले तरी काही घेता आले नाही.त्यात ल्या त्यात दोन तिन खेळ घेतले माझ्या नातवंडा साठी.
          नंतर आम्ही 'अलबर्ट हैएन' या मोठ्या सुपर मार्केट मधे गेलो.अबब!!!!!एका मागुन एक विभाग बघताना आणि खरेदी करताना पायाचे तुकडे पडले.दूध,दही,भाज्या,फले,बिस्किटे ,साबण.कितीतरी सामान घेतले.वेलची,जायफल,दालचीनी याची  पुड इकडे छान मिलते.खास घरी न्यायला त्या पण घेतल्या.सामानाचे २ मोठे झोले [पिशव्या]भरल्या.ते सुपर मार्केट बघताना ब्रेड चीज़ चिकन फिश चे शेकडो प्रकार पाहून मी थक्क झाले.तयार खाद्य पदार्थ ,भाज्या फले.सलाड पाहून मला काय घ्यावे सुचत नव्हते,अनिकेत मात्र सवय असल्याने भरा भर घेत सुटला होता.तिकडे सामान नेयला प्लास्टिक पिशव्या ठेवल्या होत्या.हलके थोड़े सामान आपण घेऊ या ,या विचाराने मी एक पिशवी घेतली.नंतर मला समजले त्या पिशवी ची २० सेंट[पैसे] कीमत असते.माझ्यावर मी फुकट ढापली,असा शिक्का बसला.सर्व सामान घेउन बस ट्राम करत घरी परतलो.फिरून फिरून दमलो होतो.गरम कड़क चहा केला ,ती घेतला,जरा बरे वाटले.आता जरा वेळ आराम.रात्रि जेवायला खास मालवणी पद्धतीचे चिकन केले.मस्त ताव मारून जेवलो.उद्या रविवार .सुट्टीचा दिवस ,खुप वेळ झोपायचे हे नक्की.म्हणुन रात्रि निवांत पणे पत्ते खेळत बसलो.रम्मी साठी आज नविन पत्ते पण आणले होते.नविन कैट[पत्ते]मधील चित्रे ओलखने जरा कठिन जात होते,पण मिशिवाला राजा,चिकना दिसती तो गोटू आणि गोरीपान राणी अशी नावे ठेवत टाइमपास केला.उशिरा खेळ संपला आणि मग झोपलो.

Tuesday, October 27, 2009

day light saveing.......

   दिनांक २५.१०.२००९ रोजी इकडे डे लाइट सेविंग सुरु झाले.म्हणजे काय?आधी मला जरा प्रश्न पडला होता.
           या दिवशी मध्य रात्रि ३ वाजता घडयालात एक तासाने वेळ  बदलतात.म्हणजे २ वाजले दर्शवतात .त्या प्रमाणे त्यांचे सर्व व्यवहार सुरु होतात.वेळापत्रक २ वाजता जे असेल ते त्या प्रमाणे व्यवहारात उपयोग करतात.एक तास जास्त झोपायला मिलनार हा आनंद त्या दिवशी असतो.आणि तो सुट्टीचा दिवस असतो हे महत्वाचे!!!!!!!आपल्या कड़े आणि इकडे आधी ३.३० तासाचा फरक होता,आता तो ४.३० तास झाला आहे.खुप वाटतो लगेच ना????मला कसे जाणवले ते सांगते,मी ६ वाजता छान फिरत होते आणि त्या वेळी आपल्या कड़े भारतात १०.३० वाजले होते.भाग्यश्रीचा तेव्हा फ़ोन आला ,''आई माझे सर्व आवरले ,आता मी झोपते.गुड नाईट .उद्या बोलू.''तेव्हा मला वेलेतील फरक खुप जाणवला.आत्ताची इकडची वेळ ग्रीनिज वेळेनुसार नियोजित केलेली आहे.हा फरक हिवाल्यात[विंटर]करतात.कारण तेव्हा रात्र मोठी दिवस लहान असतो.या विरूद्व उन्हाळ्यात[समर ]परत एक तास घड्याळ पुढे करतात.कारण तेव्हा दिवस मोठा आणि रात्र लहान होते.हा बदल काही देशात केला जातो,उदा.यूरोप,अमेरिका...त्याची पार्श्व भूमि अशी की सूर्य प्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे.विजेची आपोआप बचत होते.विचार करा ना?.....एक तास सर्व मॉल,कार्यालय ,शाला ,घरे,दुकाने इकडचे एक तास लाइट बंद राहिले तर विजेची किती बचत होइल???सूर्य प्रकाश आपल्याला फुकट मिळत आहे.त्याचा वापर करणे,हेच काम.इकडे डोक्याचा वापर योग्य केला जातो हे खरे!!!!!!!!   

Monday, October 26, 2009

saphar

                     एका रविवारची सफर.
सकाळी आरामात उठून चहा  नाश्ता केला.आज आम्ही झान्सेशन ला जाणार होतो.भर भर आवरले आणि निघालो.ते एक छोटेसे खेडे आहे.तिकडे पवन चक्की आहेत.त्या बघायला जाणार .ट्राम ने आम्ही सेंट्रल स्टेशन ला गेलो.तिकडून ९१ नुम्बर ची बस थेट झान्सेशन ला जाते.बस अगदी वेळेवर सुटली.साधारण अर्धा तास प्रवास होता.शहरातून जाताना मला अनिकेत ने एक चायनीज होटल दाखवले.ते इतके प्रशस्त होते की एका वेळी ७५० लोक बसू शकतात.ते होटल कालवा च्या मधोमध् आहे.बोटीने होटेलात जायचे,किती छान ना?
            पुढे गेल्यावर एक बोगदा लागला.पण तो बोगदा नसून भुयारी मार्ग होता.वरती विस्तीर्ण कलावा,आणि त्या खालून हा रस्ता.अंदाजे ३ किलोमीटर लांब होता.आधुनिक तंत्र शिक्षण कमाल आहे इकडे!!!!!!!बस मधून जाताना घरे,सृष्टि सौन्दर्य बघत होते.घराचा प्रकार सर्व साधारण सगलीकडे सारखा होता.फक्त शहरा बाहेर एक मजली घरे दिसली.मोठ मोठ्या कंपनी होत्या.आम्ही झूल झूल वाहणारे पाणी,शेती,गाई गुरे बदके बघत बघत त्या फार्म हाउस वर पोचलो.सोसाट्याचा वारा सुटला होता,त्या ठिकाणी ४ पवन चक्या आहेत.त्याचे वैशिष्ठ्य म्हणजे जुन्या कालातिल जतन केल्या आहेत इतकेच नाही तर वापरात आहेत. आज ही तिथे रंगाचे मोठमोठे खड़े [दगड ]बारीक़ केले जात होते.पूर्वी मका पण पीठ केले जात असे.३ मोठी दगडी चाके [जाती]होती.पवन चक्कीत लाकडी चाके दाते असलेली होती.सर्व लाकडी होते.या ठिकाणी वार्याचाइतका चांगला उपयोग करून घेतला जातो.किती तरी किलो रंग पावडर केली जाते रोज.ती पण इंधन न वापरता.हे विशेष.
             या ठिकाणी पवन चक्की बघायला ३ लाकडी शिड्या चढून जायचे होते,मी एकच चढले,उतरले.पण वर जाऊँन मला पवन चक्की ची विशाल पाती जवळून बघता आली.त्या तिथे हॉट चोकलेट होते.ते घेतले त्या बरोबर कुकीज फ्री होत्या.खर सांगते,हॉट चोकलेट इतके सही होते.!!!!!मला लहान पनी कल्याण ला माहेरी कोको पीत असो त्याची आठवण झाली.ते कड़क गरम छान होते.चहा इथे इतका फुल्कवनी मिलतो त्या पेक्षा शतपट सुरेख होते.गार वार्याने मी कुड कुड्ले होते,ते पिउन बरे वाटले.तितक्यात रिम झिम पाउस सुरु झाला.इकडे ना कधी ही वेडया सारखा पाउस येतो पण रिम झिम.नंतर आम्ही लाकडी बुट कसे तयार करतात ते बघायला गेलो.तेथे बुटाचे विविध प्रकार पाहिले.खास लग्नासाठी कोरीव काम केलेले बुट,मुलीचे हल्ली च्या स्टाइल चे उंच टाचाचे बुट चपल.बाहेर एक भला मोठा लाकडी बुटाचा जोड़ ठेवला होता,त्यात उभे राहून लहान मुला सारखा फोटो पण काढला.तिथे एक बुट बसता येइल इतका मोठा पण केला होता.तेथील वैशिष्ठ्य म्हणुन लहान मोठे आकाराचे बुट विक्रीस ठेवले होते.आता आम्ही चीझ तयार करतात तो वर्क शॉप बघितला ,चीझ चा भयंकर वास येत होता.विविध प्रकार चे रंगाचे चीझ तेथे विक्री केले जात होते.बागेत फार्म मधे एक फेरी मारली.या ठिकाणी आम्हाला चांगल्या पोसलेल्या मेंढ्या चरताना दिसल्या.,गाई म्हशी तर होत्याच.घोडे पण फिरायला होते.फार्म मधे आत शिरताना एक फोटो ग्राफर फोटो काढत होता,जाताना आवडला तर विकत घेणे .पण ख़रच फोटो अप्रतिम काढला होता त्या मुले जास्त किम्मत देऊन पण विकत घेतला.कैलेंडर मधे लावलेला तो फोटो मी मुलुंड ला घरी घेउन जाणार सांगुन टाकले.त्यावर एक किचेन फ्री होती अगदी लहान मुलासारखा आनंद झाला.लगेच बस ने सेंट्रल स्टेशन ला आलो.पोटात कावले ओरडत होते.खायला घेतले.खात खात आम्ही बोटी च्या इथे आलो.एका भल्या मोठ्या बोटी तुन आम्ही शहराचा फेर फटका मारला.बोटीत बसायला छान सोय होती.काचेने बंद बोट होती त्यामुले थंडी त्रास झाला नाही.शहराची वैशिष्ठे सांगणारे निवेदन सुरु होते.इंग्लिश मधे पण होते त्याने ते समजले.किती तरी बोटी,कालवे पुल बघून मन थक्क झाले.एक वेगला अनुभव घेत होते.सेंट्रल स्टेशन बाहेर चा कालवा दक्षिण महा सागराला मिलतो ते पाहिले.अथांग महा सागर बघत राहिले.दोन्ही तीरावर गाव वसले आहे त्यामुले जा ये करायला बोटी खुपच आहेत.सुमारे २०० हाउस बोटी आहेत सर्व सुसज्ज .त्या बोटी चा पण अनुभव घ्यावा असे वाटू लागले.इकडे मुलाना शाळेत पोहने सक्तीचे आहे.बरीच मुले,लोक बोटी वल्व्हत होते.श्रीमंत लोक स्वताच्या बोटी तुन मौज करत होते.सफर संपली,परत ट्राम ने घरी आलो.

Tuesday, October 20, 2009

diwali....

          आली माझ्या घरी ही दिवाली.........
                   परदेशातील दिवाली.फरालाचे काय काय करावे असा विचार करत होते?इकडे कोणत्या वस्तु मिलातिल?असे विचार सुरु होते.पण पाहिले तर सर्व मिलते.सुखाचे म्हणजे नारळ खर्वद्लेला सफेद खोबरे.ते शाहाल्याचे असते.सुके खोबरे पण बारीक़ रव्यासारखे.फरालाला रवा नारळ लाडू,चिवडा.करंजी,खरी पूरी,नारळ वडी केले होते..
चकली करता आली नाही कारण सोर्या अणि भाजणी नेली नव्हती.
                  सकाळी आरामात अभ्यंग स्नान केले.नंतर प्रसादाला गोड शीरा केला.अनिकेत ने देवाची पूजा केली.मग आम्ही फराल. केला.तिघे फिरायला शोपिंग ला बाहेर पडलो.अनेक दुकाने हिंडून आम्ही २ नॉन स्टिक ची भांडी घेतली,म्हणजे ती अनिकेत ने मला भेट दिली खास दिवाली.दुपारी घरी आलो.पोटात कावले ओरडत होते.मी खास पंजाबी सामोसे केले.ताव मारला सर्वानी
                 लक्ष्मी पुजनाची तयारी केली.पणत्या मधे मेनबत्या लावल्या.मी लक्ष्मी नेली होती.सर्व घरी करतो [भारतात ]तशी तयारी केली.नविन कपडे घातले.साडीला हवा लागली.नंतर पूजन केले.फोटो काढले. भाग्यश्री सुशिल सर्वांची आठवण येत होती पण......
              अनिकेत चा मित्र दिनेश कड़े जेवायला जायचे होते.दिवाली स्वीट म्हणुन घरी खास गुलाब जाम केले,इकडे पर्याय नाही कारण बाहेर स्वीट पदार्थ काही मिळत नाहीत.सर्व मित्र जमले होते.गप्पा गोष्टी टाइम पास सुरु होता.जेवना पूर्वी ड्रिंक्स होतेच.थंडी खुप होती.शाकाहारी जेवण जेवलो.आणि जरा वेळाने टैक्सी करून घरी आलो.थंडीने हैरान झालो होतो.रात्रि उशीर झाला होता.फार नाही साडेआकरा वाजले होते.पण रोअड्वर सामसूम झाली होती.दुसर्या दिवशी रविवार .विश्रांतीचा दिवस.उशिरा उठलो.चहा पिताना गप्पा मारत बसलो.फ़ोन केले खुप.चहा पोहे ब्रेक फास्ट केला.भाग्यश्री ऑनलाइन आली.तिच्याशी गप्पा मारल्या.संध्याकाळी रवि कड़े [मित्राकडे]जायचे होते.आम्ही उपमा करून नेला.रिचा ने घरी ढोकला भजी केली.वैजयंती ने लाइम रईस करून आणला होता.भात नाही हं शेवया वापरल्या होत्या.मला त्यांचे घर फार आवडले.सजावट छान आणि स्वच्छ नीट नेटके.गुलाबाची फुले तर इतकी छान होती मन अगदी प्रसन्न झाले.खाणे पिणे ,गप्पा टाइम पास करून रात्रि वेळेवर घरी आलो.
             अशी झाली मित्र मैत्रिणी मधे दिवाली साजरी.एक वेगला अनुभव.

Tuesday, October 13, 2009

             दिवाली पुर्वीच शनिवारी इकडे एका मॉल मधे दिवाली कार्यक्रम झाला.मी अगदी उत्सुकतेने पहायला गेले होते.शालेच्या सा.कार्यक्रमा प्रमाणे फक्त नाच होते विविध प्रकारचे.काही छान पोशाखात तर काही नेहमीचे कपडे घालून.हे विशेषतः जीन्सची पेंट अणि टी शर्ट घालून भांगडा करताना जाणवले.तिकडे बरेच स्टाल होते.खायचे अणि इतर वस्तुचे.आपल्याकडील फन-फेअर सारखे वातावरण होते.बहुतांशी लोक खाणे आणि गप्पा मारत टाइमपास करणे यात मग्न होते.काही लोक खरेदी करत होते,पण प्रमाण कमी.छान कापडी आकाश कंदील मला तेथे दिसले,आवडले.
          महत्वाचे काय तर बाजु च्या तंबूत को़क टेल पार्टी सुरु होती.आपल्याकडे जशी थंड पाणी ,सरबत ची गाड़ी असते ना तशी बियर ची गाड़ी तेथे होती.कारण पान्यासारखी प्यायची ना?तरुण मुले अगदी धुंद होती,बियर पीत .सर्व भारतीय बर का?
        महाराष्ट्रियन लोक कमी दिसले.ब्राह्मण तर नाहीच.पण दक्षिण भारतीय,गुजराथी ,पंजाबी भरपूर होते.शहरात फिरताना फारसे कुठे दिसत नाहीत.इथे मात्र खुप भारतीय होते.काही यूरोपियन पण या कार्यक्रमाला आले होते.आनंद घेत होते.ठेका धरून नाचत होते.आपल्या मुलाना भारतीय संस्कृतीची ओळख करून देत होते.
      शेवटी फटाक्यांची आतशबाजी होती.
             स्विस ट्रिप छान झाली.आता परत रोजचे जीवन सुरु.संध्याकाळी खुपच बोअर झाले म्हणुन एकटीच फिरायला बाहेर पडले.आज एका लहान मुलांच्या पार्क मधे गेले.छोटी छोटी गोरी गोमटी यूरोपियन मुले मस्त बागेत खेलत होती.घसरगुंडी,झोपाले ही साधने होतीच.काही मुले सायकल [३ चाकी],तर काही विंटर मधे बर्फावर चालायचे स्लाय्डिंग पैड घेउन आले होते.मातीत तर अगदी छान खेलत होती.हे साम्य दिसले.मुलाना घेउन आलेल्या त्यांच्या माता मैत्रिनिशी गप्पा मारत आरामात बसल्या होत्या.अगदी ४/५ वयाच्या २ मुली सायकल घेउन चक्क गेट च्या बाहेर गेल्या.मी हे सारे एकटक बघत होते.वाटत होते,त्या मुलीना परत बागेत घेउन यावे.पण माझी भाषा त्याना कशी समजणार?रस्ता चुकल्या तर ?हरवल्या तर?मनात विचार सुरु झाले.काही वेळाने एक पॉश [टकाटक]माता उठली.तिने अगम्य भाषेत त्या मुलीना बोलावले,[आधी शोधले मग]रागावने ,ओराड़ने.काहीही नाही.धपाटा तर दुरच.!!!!!!!शांतपणे बोलावले आणि ते परत गप्पा मारत बसली.मुलांचे मानस शास्त्र असे जपतात का या माता???इकडची मुले रडत का नाही??हट्टी पणे का वागत नाहीत??????या प्रश्नाची उत्तरे मला मिळाली.मला इकडे येवून एक महिना झाला.रोज ठराविक रोड वरून ये जा मी करते.झाडे जी आधी हिरवी गार दिसत होती.त्या झाडांची पाने रंग बदल झाला आहे तर काही झाडांची पाने गलून खाली पडत आहेत.विंटर ची सुरवात आहे.