Tuesday, May 17, 2011

टेक ऑफ

विमानात सूचना सुरु झाल्या.इंग्लिश आणि हिंदी मध्ये त्यामुळे काही अडचण आली नाही.सुरवातीलाच किंगफिशरचे सर्वे सर्वाश्री.विजय मल्या यांनी स्वागत केले.म्हणजे रेकोर्ड टेप लावली होती.पण काही ही म्हणा प्रवाशांचे स्वागत तरी झकास झाले.नंतर थोड्याच वेळात आमच्या सर्व प्रवाशांची खातीर करायला खूप छान नम्र अशा वागणाऱ्या बोलणार्या हवाई सुंदरी येत होत्या. लाल रंगाचा सर्व पोशाख अगदी बूट सुद्धा.पण रुबाबदार!!काय दिले नाही? हाच प्रश्न आहे,अगदी विमांचे उड्डाण झाल्यापासून ते उतरेपर्यंत काही ना काही सतत सुरु होते.

जेवण,नाश्ता,कोल्ड्रिंक चहा,कॉफ्फी अगदी दारू पासून सर्व....या वेळी मी मस्त खात पीत प्रवास केला.घरी कधी बघत नाही पण विमानात दुसरे काहीच काम नव्हते.हातात मोबाईल नव्हता.त्यामुळे थ्री ईदियत ,यमला पगला दिवाना,ओम शांती ओम.हे ३ सिनेमे पहिले.रिमोट माझ्या हातात होता.कोणी बदलणार नवते.नंतर सुरेश वाडकर यांच्या बरसे बरसे अल्बम मधील सुरेल गाणी शांत पणे ऐकताना लंडन कधी आले समजलेच नाही.विमान उतरताना अनिकेत डोळ्या समोर दिसत होता,आता थोड्याच वेळात भेट होणार होती.

अबब!१किति मोठे विमानतळ ......उतरल्यावर इमेग्रेशन ला यायला अर्धा तास चालावे लागते.सर्व सरकते रस्ते,जिने यावरूनच बर का??मी आपली पर्स केबिन बेग घेऊन भराभर चालत होते.सुरवातीला जरा कमी रांग दिसली तिकडे उभी राहिले,अगदी इथे भारतीय उभे आहेत असे बघून....पण काय तिकडे चुकले.ती रांग यु के बोर्डर ची होती.परत दुसर्या भल्या मोठ्या रांगेत,मला तिरुपतीचीचआठवण झली.अरे बाप रे!!!! विमाने उतरली असतील असा विचार करत होते.३००/४०० माणसे अंदाजे रांगेत होती. ५०% भारतीय होते. रांग सरकत होती पुढे पुढे..

आता मोबाईल सुरु केला अनिकेत ला एके पोचले कळवले.त्याचा जीव भांड्यात पडला.रांगेत आहे काम झाले कि येते सांगून शांत उभी होते.अखेर आला नंबर....त्या युरोपियन माणसाने मी किती दिवस राहणार? कोणाकडे आले आहे?अनिकेत काय करतो?सर्व प्रश्न समजेल अशा इंग्लिश मध्ये विचारले.त्यामुळे मी पण त्याला अगदी ठामपणे उत्तरे दिली. मग परत चलते चलते सुरु....अखेर बेग पट्यावर दिसू लगली.बेग जास्ती नाही ३० किलो. बेग खाली उतरवून trolley ठेवणे कठीण गेले. पण काही इलाज नाही, उरापोटी केले. आता मात्र माझी एनर्जी संपत आली होती.पण बाहेर पडते तो काय समोरच अनिकेत उभा होता.नंदिनी आणि मंजिरी पण आली होती,खूप आनंद झाला.

अनिकेत कडे सर्व सामान देवून मी मोकळी झाले.taxi बुक केली होतीच, त्यामुळे लगेच गप्पा सुरु झाल्या.

माझ्या विमानात बोमेण इराणी हा नट होता हे मला बाहेर आल्यावर नंदिनी ने सांगितले. असो मला काही त्याचे फारसे वाटले नाही कारण आधी कळले असते अरी मी कुठे ओळखले असते त्याला?

संध्या काळी साडे सात ला बाहेर पडले होते, उजेड होता त्यामुळे लगेच लंडन दर्शन सुरु.मराठी तून आम्ही बोलत होतो,अखेर त्या taxi drivar ने कोणती भाषा?कोण आई आली आहे का विचारलेच.लगेच मंजू अश्विनी चा फोन आलाच.आयुष शी पण बोलले.मंजिरी ने तोंडात टाकायला आणले होते,ते टाकले लंडन चे पाणी प्यायले .एक तास प्रवास करून अनिकेत च्या घरी पोचले.वॉव काय सुंदर बाहेरचा परिसर ...येताना रस्त्यात गुलाबाचे रंगी बेरंगी ताटवे प्रत्येक घरासमोर दिसत होते.आपल्या सारखे कोणी फुले तोडून नेत नाहीत,हा अजून एक अनुभव.घरात आलो.

हे अनिकेतचे लंडन चे घर मला फारच आवडले.मस्त हवा. उजेड मोकळी जागा सगळीकडे कार्पेट,२ बेडरूम ,hall नवीन एल सी डी.डायनिंग रूम ,किचन सर्व काही प्रशस्त.आणि सुशोभित बघून मला खूप आनंद झाला.

नंदिनी ने गरमागरम चहा केला.त्यामुळे प्रवासाचा शीण गेला,गप्पा तर सुरु होत्या थोड्याच वेळात अश्विनी अक्षराला घेऊन आली.भाग्यश्री च्या लगनानंतर आज तिची भेट झाली.मला तिची त्या दिवसाची surprise भेट आठवली.लहानपणपासून शेजारी त्यामुळे घट्ट मिठी मारली.छोटीशी अश्विनी आता अक्षराची आई होती.अक्षरा ला जरा ओळख नाही त्यांनी रडू येत होते,पण अनिकेत मामा आणि नंदिनी मामी जवळ छान खिदळत होती.
 
जरा वेळ गप्पा मरून मंजिरी अश्विनी सह आम्ही सर्व जेवलो.तेव्हा आपले रात्रीचे २ वाजले होते,माझा दिवस संपतच नव्हता.अगदी निवांत icecream खाऊन tya त्या दोघी घरी गेल्या.त्या नंतर बेग उघडल्या खरेदी दाखवली.मग आपल्या पहाटे झोपलो.अश्विनी जवळ राहते त्या मुळे सकाळीच अमोल मला भेटायला आला.अक्षराला घेऊन.आता मात्र आजीची तिला जरा ओळख पटली होती,म्हणजे माझी.

छत्रे मेडम निघाल्या लंडनला !

११ मे बुधवार. आज सकाळ जरा लवकरच झाली.मला तर रात्री दुसर्या दिवशी जायचे या विचाराने झोपच लागली नाही.या वेळी सकाळचे विमान होते.त्यामुळे लगेच त्याच दिवशी अनिकेत नंदिनी भेटणार होते.याचा खूप आनंद होता.घरातील सर्व आवराआवर जमेल तेवढी केली.सुप्रिया ने [मैत्रीण]गरमागरम नाश्ता कांदे पोहे आणला होता.ती मला भेटून घरी गेली,कारण रोजची सवय झाली होती,आता लवकर भेट नाही म्हणून जरा हिरमुसली होती.मी सुशील नेहा भाग्यश्रीने पोटभर पोहे खाल्ले.

या वेळी माझा रुबाब काही और होता,लेकीने स्वतः नवीन गाडी आय टेन घेतली आहे,त्यामुळे ती मला विमान तळावर सोडायला स्वतः येणार होती.आहे कि नाही माझा थाट!!!आम्ही सकाळी ठीक ९ वाजता पोचलो.वाटेत नशिबाने रहदारी ने वेळ लागला नाही,सगळीकडे अगदी शुकशुकाट !काहीच लोक होते,नेहमी सारखी जत्रा नव्हती.गेट क्रं.७ वर आलो.किंग फिशर ने मी प्रवास करणार होते.लगेच त्यांच्या कंपनी ची माणसे आलीच विचारपूस करायला....य वेळी मला मदतनिसाची गरज तशी नव्हती.मी एकदाच अनिकेतकडे जाऊन आले होते,पण या वेळी म तयारीत होते.व निश्चिंत पण होते.तरी पण त्या सद गृहस्थाने मला मदत केली.मी आपणहून त्याला धन्यवाद दिले आपल्या भारतीय पद्धतीने ,समजले ना?

सर्व सोपस्कार संपवून मी आता आरामात गेट जवळ येवून बसले.म्हणजे २/२.३०तास तिकडे बसून वेळ घालवला.गेल्या वेळी बावळट सारखी नुसतीच बसले होते.पण या वेळी काय म्हणतात ते युज टु असल्या सारखे जरा सर्व दुकानातून फिरले.मग चक्क ७५ रुपये वाला चहा मागवला.मस्त चहा पीत वेळ घालवला.नंतर विमान बोर्डींगची सूचना सुरु झाली.पण आता सर्व माहित ना?त्या मुळे बिझनेस क्लास वाले आधी गेल्यावर शांतपणे रांगेत गेले.खूप वेळ होता,आपले खूप लोक पण रांगेत होते.चेकिग सर्व झाले.व मी परत विमानात पाय ठेवले.अनिकेत नंदिनी बरोबर तिरुपतीला विमानाने गेले होते,आता परत मी एकटीच होते.पण खरच सांगते सीट शोधताना खी अडचण नाही आली.कारण गेल्या वेळी समजले होते,आपल्या बस प्रमाणेच नंबर असतात.१९ब सीट होती.मग काय?बिनधास्त.

केबिन बेग या वेळी जवळ होती.कारण मोठ्या बेगेत आधीच सामान जास्त झाले होते.[वजन ३० किलो].कशी बशी केबिन बेग उचलून वर टाकली.[८ किलो]आणि आता मात्र खुर्चीत विसावले.......पहिले काम अनिकेत भाग्यश्रीला फोन केला.मला वर्हाड चाललंय लंडन ला.....त्याची आठवण झाली.मी मनाशीच हसले आणि म्हणाले,अखेर छत्रे मेडम निघाल्या लंडन ला.

खरच मागील आयुष्यात १५ वर्ष पूर्वी कधी असा विचार सुद्धा मनात आला नव्हता कि मी परदेश प्रवास करेन.पण खरच परमेश्वर फार ग्रेट आहे,त्याच्या मनात असेल तसेचसर्व घडते.गणपतीची माझ्यावर प्रचंड कृपा आहे हे नक्की!!!!!!!!!!!!!!!

Sunday, June 20, 2010

dharmik sahal

             श्री  स्वामी समर्थ !श्री स्वामी समर्थ!......
        कालच कल्याणी चा दहावी चा निकाल लागला.छान ९४ % मार्क मिळाले.खुश होते,तेव्हाच दर्शनाला जायचा योग आला.मग काय दुधात साखर.लगेच हो सांगितले.मी जयश्री[वाहिनी]आणि निवेदिता [भाची]आम्ही जायचे ठरले.नेहमी प्रमाणे रवि नि सर्व तयारी निशि गाड़ी पाठवली.आणि रोह्या[चालक ]बरोबर,काहीच कालजी नाही.
       सकाळी ७ ला जयश्री आली,तिने मला आणि भाग्यश्री ला काश्मीर हुन ड्रेस चे कापड आणले ते दिले.मजा सुरु!!!!!!!आम्ही दोघी पूना जायला निघालो.जाताना मस्त फ़ूड मोल  ला नाश्ता केला.प्रवासात सतत गप्पा सुरु होत्या.ते काश्मीर ला जाऊँन  आल्यापासून निवांत भेटलोच नव्हते.प्रथम पूना पोचलो.निवेदिता ने नंबर लावलाच होता.डॉ.ना भेटलो.ओके सांगितले,खुश.लगेच घरी गेलो,निवेदिता कड़े.मस्त जेवण तयार होते.भेटलो गप्पा मारल्या.जेवलो आणि सोलापुर ला जायला निघालो.पावसाने कृपा केली ,कुठे ही त्रास झाला नाही,म्हणजे पडलाच नाही.पुणे सोलापुर ६ तासाचा प्रवास,ओसाड रस्ता.अगदी सरळ.खायची काही सोय नाही.तसेच सोलापुर ला,पोचलो.
        सर्व होटल फुल...२ तास फिरलो,अखेर एका ठीक ठाक ठीका  नी राहिलो.फ्रेश झालो,जेवायला सावजी मधे गेलो.पोटभर जेवलो.अरिन ला घरीच जायचे होते,कसे तरी समजूत घालून झोपवले.ऐ सी  सुरु केला मी मात्र गारठले .
         सकाळी उठून आवरायला सुरवात केली,पण किती तरी वेळ चहा नाही की गरम पाणी नाही,ठंडा कारभार !!!!प्रवासाचे अनुभव सांगत गप्पा मारत कसे तरी आवरले,चहा घेतला.निघालो,होटल ध्रुव ला राम राम!
      बाहेर पडलो काल समोर एक कामत होटल पाहिले होते,पोटभर नाश्ता करून जायचे बेत केला.पण ते सोलापुर,साडे आठ ला होटल बंद.अखेर एका पॉश सिटी पार्क मधे गेलो नाश्ता केला आणि स्वामी दर्शनाला निघालो.३५ किलोमीटर प्रवास पण रस्ता ठीक नाही,पण पोचलो,दर्शन छान झाले,माझी पोथी वाचून झाली.यथा शक्ति आम्ही दानधर्म केला.आणि लगेच तुलजापुर ला जायला निघालो.अंतर ६५ किलोमीटर पण रस्ता अगदी ख़राब .श्री राज ठाकरे ना पात्र लिहिणार आहोत,महाराष्ट्राची देवी तुलजा भवानी तिकडे तरी सोय चांगली करा,
     दर्शनाला प्रचंड रांग.अखेर एका पुजारी ला ३५० रुपये प्रत्येकी दिले आणि मस्त सुखत दर्शन घेतले,साडी नेसवाली,ओटी भरली आरती पूजा छान केले.तिकडे मात्र अंगात आलेल्या बाई ला पाहून माझी घाबरगुंडी.....नमस्कार जेमतेम केला आणि बाहेर आले.काही ही जेवायची सोय धड नाही,तसेच सोलापुर ला आलो,वाटेत एका जंगली होटल मधे पोटाला आधार म्हणून जेवलो.झोपाले बघून अरिन मात्र खुश झाला.अखेर परतीच्या प्रवासाला लागलो.रस्ता अगदी सरळ कुठेही वलन नाही,६ तास प्रवास ट्रक ची खुप गर्दी लहान रस्ता,मजा होती सर्व.भिगवन ला एका ठिकाणी चहा घेतला,जरा पाय मोकले केले.पूना हडपसर आल्यावर जरा हायसे वाटले.अरिन तर खुपच खुश जाला कारण त्याला घरी जाऊँ खेलायाचे होते,निवेदिता कड़े पोचलो.फ्रेश झालो.लगेच पुणे मुंबई प्रवास सुरु.तिच्या सासुबाई नि मस्त टेस्टी मुगाची धिरडी करून दिली होती.मी जयश्री आणि रोह्यानी गाडीत खाल्ली.दत्त ला चहा घेतला.रात्रि साडे बारा ला मी घरी पोचले.जयश्री त्या नंतर कल्याण ला एक तासाने पोचली,
                     स्वामी समर्थ आणि तुलजा भवानी देवी चे प्रसन्न दर्शन घेउन आम्ही सुखरूप आलो.
-------------------------------------------------०००००-------------------------------------------------------------------------

Friday, April 16, 2010

                             लाल बाग़ परल नविन चित्रपट.
                 गिरण गावावर आधारित नविन चित्रपट रविवारी पाहिला.खुप गोष्टी पटल्या नाहीत.त्या वेळी जे गिरणी कामगार होते त्यांचे विदारक चित्र  मांडले आहे,हे नक्की.पण सर्व कामगार काही दारू पीत आयुष्य घालवत नव्हते.काही घरातील स्त्रिया कामे करून मोल मजूरी करून संसार रथ चालवत होत्या.मुले नकळत समंजस झाली होती. काही नोकरदार लोकानी मिळेल ते काम करून ,नविन काही शिकून आपले कर्तव्य पार पाडले आहे.कुठच एकदाही या चित्रपटात सकारात्मक दाखवले नाही असे जाणवले. मुली बायका वाम मार्गाला सगल्या काही लागल्या नाहीत.मारामार्या आणि गोलीबार जास्त प्रकर्षाने दाखवले आहे.
               मालकाने जमीनी विकून तिकडे  शोपिंग सेंटर सुरु केले.हे सत्य आहे.कामगाराना काहीही फायदा झाला नाही.सरकार ने काहीही केले नाही.हे का दाखवले नाही??????????पक्ष आले गेले,सत्ता आली त्यानी काहीही केले नाही.यातून नक्की काय दाखवले??????/
            श्री.महेश मांज्रेकर यांच्या कडून खुप वेगळ्या अपेक्षा होत्या.
        

Friday, January 8, 2010


 किती सांगू मी सांगू कुणाला???
                           आज आनंदी आनद झाला!!!!!!!!!!!!
         आजकाल प्रत्येक आई वडिलांना वाटत असते,आपल्या मुलाने प्रत्येक क्षेत्रात नाव कमवावे.शिक्षण तर हवेच.शालेय शिक्षणातच स्पर्धा सुरु होते.भारतात आपल्याकडे अजून तरी शालान्त परीक्षा माघ्त्वाची समजली जाते.त्याच्या गुणावरच पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेणे शक्य होते.चांगले कॉलेज मिळावे यासाठी चांगले गुण आवश्यक आहेत.याची जाणीव पालकांना आणि मुलांना झाली आहे.हे भाग्याचे आहे.त्यासाठी दहावीला इतर सर्व उद्घ्योग बंद करून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले जाते.एकदा का चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळाला कि मुलांच्या प्रगतीला खरी सुरवात होते.मुलगा असो वा मुलगी.आपल्याला नेमके कोणते शिक्षण घेऊन नोकरी,व्यवसाय करायचा आहे ते ठरवण्या इतके सक्षम होतात.पदवी हाती आली कि काही जण नोकरी करतात तर काही उच्य शिक्षण घेतात.त्यासाठी त्यांना परदेशी जावे लागते.परदेशात शिक्षणासाठी पाठवायला पालकाची मानसिक तयारी असते.शिक्षणासाठी खर्च खूप येतो पण तेही करतात आनदाने.आजकाल शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज पण मिळते.त्यामुळे शिक्षण घेणे सोपे होते.
          परदेशात मुले शिक्षणासाठी राहू लागली कि सुरवातीला त्यांना जरा जड जाते पण काही दिवसात तेथे छान रुळतात.त्यांना तिकडचे तेच खरे आपले जीवन वाटू लागते.आपल्या पेक्षा तेथील रोजचे जीवन नक्कीच सुखकर आहे.दगदग त्रास नसतो,हवा शुद्ध.प्रदूषण नाही.आवाज,गोंगाट नाही.आणि छान सुसज्ज घरे आलिशान गाडी सर्वे सुखसोयी तशा सहज मिळतात.त्यामुळे आपण घर सोडून बाहेर राहतो याचे काही फारसे वाटत नाही.संगणक फोन याने सतत संपर्क तर राहतो.मला वाटते मुले परदेशात असताना अधिक सुसंवाद होतो.शिक्षण घेताना परदेशात नोकरी पण मिळते त्यामुळे आर्थिक स्वतंत्रता मिळते.एकटे राहू लागले कि जवाबदारी येते.घरची पैशाची किंमत कळू लागते,शिक्षणासाठी केलेला खर्च परत मिलावनेसाठी परदेशात नोकरी करणे फायदेशीर ठरते.सुखद जीवन जगून काही रक्कम तरी शिल्लक राहते.एकदा हे गणित मुलांना जमले कि ती नक्कीच तसे वागू लागतात.
       आपल्या कडे नोकरी करताना प्रवासाचा त्रास होतो त्याने अर्धे आयुष्य कमी होते.त्यामानाने रोजचा खर्च आणि पगार याचे गणित जुळत नाही.सामान्य वर्ग तर त्याने बेजार होतो.आयकर वाचवणे साठी पण पैसे बाजूला टाकणे कठीण जाते,अशा वेळी परदेशात नोकरी करणारे सुखद निश्चिंत जीवन जगत असतात.आपल्या घराला सुस्थिती यायला तेच दावेदार असतात.हे मी अनुभवाने सांगते.आपल्या आणि परदेशी चलनात असणारी तफावत मुलांना डॉलर पौंड युरो मध्ये मिळणारा पगार ,यामुळे त्यांचे राहणीमान खूप बदलते.सुसज्ज घर,गाडी,दागदागिने  सर्वे हौस मौज ते करू शकतात.भारतात नोकरी करणाऱ्या मुलांना मर्यादा येतात.सरळ मार्गाने भरारी झेप सहज घेऊ शकत नाही.माझा अनुभव बघा ना.........
अनिकेतला परदेशात जाण्याची संधी मिळाली म्हणून तो मला नोकरी सोड,निवृत्ती घे सांगू शकला,तसेच घरासाठी लागणारा पैसा एकही रुपयाचे कर्ज न घेता देवू शकला,भाग्यश्री चे लग्न थाटात केले,आणि आता माझा परदेश दौरा ,स्वप्न नगरीची सफर या गोष्टी परदेशात राहिल्याने झाल्या हे नक्कीच!!!!!!!!!!!!
       आपण आपल्या विचाराच्या चौकटीतून बाहेर पडलो तरच मुलाचे व्यक्तिमत्व चांगले घडू शकते.घरची परिस्थिती चटकन बदलते.स्थिरता लवकर येते.पण हे सर्व होण्यासाठी मुलांकडे सकारात्मक नजरेतून पहिले पाहिले पाहिजे.त्यांना आपण मानसिक पाठींबा तरी नक्की देऊ शकतो.घरातील एकाची प्रगती झाली कि इतर अनुकरण करतात,कुटुंब प्रगती करते.त्याने देशाची प्रगती पण होते.
                                                                                                                                                                                                  मयुरा छत्रे.
-----------------------------------------------------०------------------------------------------०००

सांगू कशी ग मनाची व्यथा मी?????????????
                               परदेशात गेल्यावर मुले आपली राहत नाहीत हि प्रत्येक भारतीय माता पित्याची खंत असते.खरे आहे.इकडे परदेशात त्यांना सुखकर जीवन,पैसा आणि स्वतंत्रता मुबलक मिळते.त्यांना माणसांची गरज वाटत नाही.वाटते तेव्हा त्यांच्या सारखेच आलेले मित्र चार घटका वेळ घालवायला असतात.हे सर्वे ठीक आहे,पण त्यात प्रेम,आपुलकी,किती असते?काही जणाशी आपली चांगली मैत्री होते.आपले विचार जुळतात,पण इतर अगदी तेवढ्या पुरते फक्त एक सोपस्कार,भेटणे,बोलणे,खाणे पिणे.हाय हेल्लो पुरते.
                              अशा या दुनियेतील मुलांना मागचे दिवस आठवत नाहीत का??आठवत असतील नक्कीच.पण त्यांना आता पाठी फिरून बघायचे नसते.तसे त्यांनी मनाशी पक्के ठरवलेले असते.मुले विचार करतात,आई वडिलांना गरजेपुरते पैसे पाठवले कि झाले.आपली जवाबदारी कर्तव्य आपण केले,पण तसे होते का?का यात फक्त व्यवहार उरतो.दुसरे ते काही करू पण शकत नाहीत.वर्षातून एकदा वीस दिवस सुट्टी मिळते त्यांना.तेव्हा ते स्वदेशात तरी येतात,किवा आई वडिलांना बोलावतात.किवा बायको मुलांना घेऊन दुसर्या देशात फिरायला जातात.तसे करणे योग्य आहे,कारण वर्ष भर नोकरी ,घर,यात अगदी पार गुरफटून गेलेले असतात.
                            प्रत्येक आई वडिलांना विशेषतः आईला आपले मुल लहान वाटत असते.पण परदेशात मुले जेव्हा स्वतंत्र पणे आपले घरकुल मांडून राहू  लागतात.तेव्हा ती अकाली प्रौढ समंजस होतात,नव्हे त्यांना तसे व्हायला लागते.कारण प्रत्येक जवाबदारी त्यांच्यावर आलेली असते.कामाच्या बद्घल बोलायचे झाले तर,नोकरी टिकवणे त्यांच्या पुढील आव्हान असते.ते आव्हान पेलताना त्यांना खूप कष्ट करावे लागतात.पण पैसा थोडा जास्त मिळतो,म्हणून ते करायची मानसिकता होते.आणि घराच्या बाबतीत सांगायचे तर बायको आणि मुले यांच्या गरजा पूर्ण करणे हे त्यांचे ध्येय होते.आणि अशा या कात्रीत सापडलेली मुले अकाली प्रौढ होतात.
                            कुठे तरी वेळ घालवून आपले मन रमवणे सुरु होते.अशा वेळी त्यांच्या हातातील खेळणे म्हणजे संगणक .तो तर त्यांच्या जीवनातील एक घटक बनतो.सतत त्यावर काहीतरी शोधत राहणे,ते मनोरंजनाचे उत्तम साधन आहे नक्की.पण त्यातून स्वतःची आवड किती राहते????वेळ घालवण्या साठी हि मुले कोणतेही चित्रपट पाहतात.,खेळ खेळतात,मित्रांशी कोरड्या गप्पा मारतात.एका जागी बसून ,संगणक आणि ते हेच त्यांचे विश्व बनते.काही दिवसांनी पाठ दुखू लागते,डोळे दगा देतात,बोटे पण दुखतात.पण अशा वेळी घाटी काही पर्याय नसतो.ते संगणकाच्या आधीन झालेले असतात.व्यसनच ते एक,प्रकार वेगळा.
                         फिटनेस साठी जिम ला जातात.पण ते काही जास्त वेळा जास्त दिवस जायला जमत नाही.त्यामुळे परत आपला संगणक आणि ते चिकटून बसतात.
                         परदेशात हवा चांगली,वाहतुकीची सोय छान,वीज ,पाणी याची काळजी नाही,सर्वे काही तयार वस्तू छान मिळतात.यात शंका नाही.पण त्याच गोष्टी साठी आपली मुले किती पैसा मोजतात ते अनुभवल्या शिवाय समजत नाही.पैसा खर्च करणे गैर नाही,पण पगार आणि खर्च याचा ताळमेळ जुळवताना त्रेधा तीर्पित  उडते ,असे होता कामा नये असे वाटते.नाहीतर आपली म्हण आहे ना...'तेल गेले,तूप गेले,हाती राहिले धुपाटणे!!!!!!!!!!!!!!!!!'
      

एक कथा.........
                       एका मध्यम वर्गीय महिलेची कथा तिच्याच शब्दात.....आज मी सकालीच उठुन काहितरी वेगले करावे असा विचार केला.काय करावे?चाकोरी बाहेरचे काही तर मला करता येणार नव्हते.कारण मी पड्ले मध्यम वर्गीय महिला.तेव्हा जे सर्वे करतात तेच आपण केले पाहिजे....समाजाविरुद्ध जाऊन चालणार नव्हते.बदल हवा वाटणे ,अगदी सहज प्रवृत्ती.पण तो बदल पण पटकन स्विकारता येत नव्हता.पण अखेर एक दिवस मी स्वभावाच्या थोडे वेगळे वागायला सुरवात केली.अर्थात घरातल्याना ,मुलांना ते पटणारे नव्हते.पण एका क्षणी मी पक्का मनाशी विचार केला ,कि मी आता फक्त माझ्यासाठी  जगणार......विचार चांगला पण आमलात आणणे कठीण जात होते.वागायला सुरवात तर केली.झाला तर माझा फायदा च होणार होता.नुकसान नक्की नाही.
                      एक दिवस एक वेळ अशी आली कि मला आपण एकटे आहोत याचे वाईट वाटू लागले.आपल्या मनातील सुख दुख सांगावीशी वाटू लागली.पण कोणाला सांगणार?मुले आपल्या संसारात रमली आहेत.त्यांना सांगून काही फायदा नाही,आणि त्यांच्या संसारात आपण विरजण  घालायचे नाही ,मनाशी पक्का निर्धार केला कि यापुढे आपले दुख अडचणी त्यांना सांगायच्या नाहीत.आणि तसे वागायला सुरवात पण केली.या गोष्टीचा सुरवातीला मला त्रास होऊ लागला.कारण त्या मुळे बोलायला काही विषयच राहत नसे.यातून मला एकटीला गप्प बसून राहायची सवय लागली.समाजप्रिय मी पण आता सरावाशी बोलणे मला जमत नव्हते.सतत मनाशी बोलणे विचार करणे सुरु झाले.यातून एक नको ती उपाधी माझ्या मागे लागली.ती म्हणजे डिप्रेशन ....याचा त्रास पण अनुभवला.जाणीव झाली यातून बाहेर पडायला हवे.झोप न लागणे ,रडू येणे,जेवण नकोसे वाटणे हे सर्वे सुरु झाले.आणि तरी वजन मात्र वाढू लागले.तेव्हा डॉक्टरना गाठले.माहित होते कि ते औषधे देणार ,त्याने झोप लागेल मनाला उत्साह वाटेल.झाले तसेच जोवर औषधे सुरु होतितो पर्यंत ठीक होते.पण परत ये रे माझ्या मागल्या!सव त्रास परत सुरु झाला.मला औषधाच्या आहारी जायचे नव्हते म्हणून थोडा त्रास मी सहन पण केला.औषधे घेतली नाहीत.पण काहीच दिवसांनी मला खूप बेचैन वाटू लागले.थकवा तर कमालीचा आलांनी रडणे तर आवरू शकत नव्हते.अखेर औषधांना शरण आले आणि परत घेणे सुरु केले.२/३ दिवस घेतल्यावर फरक पडला.मनात हाच विचार आला कि आपण असेच सतत औषधावर अवलंबून राहायचे का?पण खरच असे काही जीवनात क्षण असतात कि ते आपल्याला बेचैन करतात,कसे वागावे?काय बोलावे सुचतच नाही.समोरचे आपल्या  बद्धल काय विचार करत असतील?हा विचार करून पण मन अगदी थकून जाते....अखेर आपण आपल्या हाती काही नसल्याचे मान्य करतो.परमेश्वराचे नाव घेतो,पण मन रामातेच असे नाही.तर तो एक उपाय असतो...........!