Monday, October 26, 2009

saphar

                     एका रविवारची सफर.
सकाळी आरामात उठून चहा  नाश्ता केला.आज आम्ही झान्सेशन ला जाणार होतो.भर भर आवरले आणि निघालो.ते एक छोटेसे खेडे आहे.तिकडे पवन चक्की आहेत.त्या बघायला जाणार .ट्राम ने आम्ही सेंट्रल स्टेशन ला गेलो.तिकडून ९१ नुम्बर ची बस थेट झान्सेशन ला जाते.बस अगदी वेळेवर सुटली.साधारण अर्धा तास प्रवास होता.शहरातून जाताना मला अनिकेत ने एक चायनीज होटल दाखवले.ते इतके प्रशस्त होते की एका वेळी ७५० लोक बसू शकतात.ते होटल कालवा च्या मधोमध् आहे.बोटीने होटेलात जायचे,किती छान ना?
            पुढे गेल्यावर एक बोगदा लागला.पण तो बोगदा नसून भुयारी मार्ग होता.वरती विस्तीर्ण कलावा,आणि त्या खालून हा रस्ता.अंदाजे ३ किलोमीटर लांब होता.आधुनिक तंत्र शिक्षण कमाल आहे इकडे!!!!!!!बस मधून जाताना घरे,सृष्टि सौन्दर्य बघत होते.घराचा प्रकार सर्व साधारण सगलीकडे सारखा होता.फक्त शहरा बाहेर एक मजली घरे दिसली.मोठ मोठ्या कंपनी होत्या.आम्ही झूल झूल वाहणारे पाणी,शेती,गाई गुरे बदके बघत बघत त्या फार्म हाउस वर पोचलो.सोसाट्याचा वारा सुटला होता,त्या ठिकाणी ४ पवन चक्या आहेत.त्याचे वैशिष्ठ्य म्हणजे जुन्या कालातिल जतन केल्या आहेत इतकेच नाही तर वापरात आहेत. आज ही तिथे रंगाचे मोठमोठे खड़े [दगड ]बारीक़ केले जात होते.पूर्वी मका पण पीठ केले जात असे.३ मोठी दगडी चाके [जाती]होती.पवन चक्कीत लाकडी चाके दाते असलेली होती.सर्व लाकडी होते.या ठिकाणी वार्याचाइतका चांगला उपयोग करून घेतला जातो.किती तरी किलो रंग पावडर केली जाते रोज.ती पण इंधन न वापरता.हे विशेष.
             या ठिकाणी पवन चक्की बघायला ३ लाकडी शिड्या चढून जायचे होते,मी एकच चढले,उतरले.पण वर जाऊँन मला पवन चक्की ची विशाल पाती जवळून बघता आली.त्या तिथे हॉट चोकलेट होते.ते घेतले त्या बरोबर कुकीज फ्री होत्या.खर सांगते,हॉट चोकलेट इतके सही होते.!!!!!मला लहान पनी कल्याण ला माहेरी कोको पीत असो त्याची आठवण झाली.ते कड़क गरम छान होते.चहा इथे इतका फुल्कवनी मिलतो त्या पेक्षा शतपट सुरेख होते.गार वार्याने मी कुड कुड्ले होते,ते पिउन बरे वाटले.तितक्यात रिम झिम पाउस सुरु झाला.इकडे ना कधी ही वेडया सारखा पाउस येतो पण रिम झिम.नंतर आम्ही लाकडी बुट कसे तयार करतात ते बघायला गेलो.तेथे बुटाचे विविध प्रकार पाहिले.खास लग्नासाठी कोरीव काम केलेले बुट,मुलीचे हल्ली च्या स्टाइल चे उंच टाचाचे बुट चपल.बाहेर एक भला मोठा लाकडी बुटाचा जोड़ ठेवला होता,त्यात उभे राहून लहान मुला सारखा फोटो पण काढला.तिथे एक बुट बसता येइल इतका मोठा पण केला होता.तेथील वैशिष्ठ्य म्हणुन लहान मोठे आकाराचे बुट विक्रीस ठेवले होते.आता आम्ही चीझ तयार करतात तो वर्क शॉप बघितला ,चीझ चा भयंकर वास येत होता.विविध प्रकार चे रंगाचे चीझ तेथे विक्री केले जात होते.बागेत फार्म मधे एक फेरी मारली.या ठिकाणी आम्हाला चांगल्या पोसलेल्या मेंढ्या चरताना दिसल्या.,गाई म्हशी तर होत्याच.घोडे पण फिरायला होते.फार्म मधे आत शिरताना एक फोटो ग्राफर फोटो काढत होता,जाताना आवडला तर विकत घेणे .पण ख़रच फोटो अप्रतिम काढला होता त्या मुले जास्त किम्मत देऊन पण विकत घेतला.कैलेंडर मधे लावलेला तो फोटो मी मुलुंड ला घरी घेउन जाणार सांगुन टाकले.त्यावर एक किचेन फ्री होती अगदी लहान मुलासारखा आनंद झाला.लगेच बस ने सेंट्रल स्टेशन ला आलो.पोटात कावले ओरडत होते.खायला घेतले.खात खात आम्ही बोटी च्या इथे आलो.एका भल्या मोठ्या बोटी तुन आम्ही शहराचा फेर फटका मारला.बोटीत बसायला छान सोय होती.काचेने बंद बोट होती त्यामुले थंडी त्रास झाला नाही.शहराची वैशिष्ठे सांगणारे निवेदन सुरु होते.इंग्लिश मधे पण होते त्याने ते समजले.किती तरी बोटी,कालवे पुल बघून मन थक्क झाले.एक वेगला अनुभव घेत होते.सेंट्रल स्टेशन बाहेर चा कालवा दक्षिण महा सागराला मिलतो ते पाहिले.अथांग महा सागर बघत राहिले.दोन्ही तीरावर गाव वसले आहे त्यामुले जा ये करायला बोटी खुपच आहेत.सुमारे २०० हाउस बोटी आहेत सर्व सुसज्ज .त्या बोटी चा पण अनुभव घ्यावा असे वाटू लागले.इकडे मुलाना शाळेत पोहने सक्तीचे आहे.बरीच मुले,लोक बोटी वल्व्हत होते.श्रीमंत लोक स्वताच्या बोटी तुन मौज करत होते.सफर संपली,परत ट्राम ने घरी आलो.

No comments:

Post a Comment