Wednesday, July 27, 2011

टूर निघाली स्कॉटलंडला-5

१६/७ ला परत सकाळी खोली सोडायची होती. दिवसभर गाडीतून भटकायचे आणि रात्री झोपायला रोज नव्या ठिकाणी लॉज वर जायचे. असा आमचा ४ दिवस कार्यक्रम सुरु होता.इकडे बरेच जण असेच करतात. त्यामुळे लॉज सुद्धा फक्त बेड आणि ब्रेकफास्ट असे मिळतात. सकाळी उठून परत सर्व सामान गाडीत भरले. तिकडेच नाश्ता केला. जरा असा-तसा होता त्यामुळे कोणीच पोटभर खाल्ले नाही, आज प्रथम "एलीन डोनान" किल्ला बघायला जायचे होते.एक तासाच्या अंतरावर हा किल्ला होता. 

तो ४०० वर्षापूर्वीचा होता. भक्कम दगडी बांधकाम. खूप लोक पाहायला आले होते. आम्हाला तो किल्ला पाहण्याचे विशेष आकर्षण म्हणजे त्या ठिकाणी शाहरुख खानच्या एका सिनेमाचे शुटींग [कुछ कुछ होता है चे टायटल साँग] झाले होते. किल्ल्यावर जाण्यापूर्वी मोबाईल वर ते गाणे सर्वांनी पाहिले. नक्की कोणती ती जागा समजण्यासाठी. आहेत कि नाही हुशार! मी आणि मंजिरी ने थोडाच किल्ला पाहीला.व खाली येवून निवांत बसलो.कारण आता ४ दिवस सतत फिरून पाय खूपच दुखत होते.बाकी हे सर्व किल्ल्यावर निवांतपणे फिरत होते.किल्ल्याच्या ३ बाजूला पाणी होते.थोडीफार खरेदी करून आम्ही निघालो.

आता एका बोटीवर जायचे होते [डॉल्फिन सफारी]. या बोटीचे वैशिष्ठ म्हणजे ही बोट खूप दूरवर पाण्यात आत घेऊन जातात. सील मासे, डॉल्फिन, इतर मोठे मासे दिसतात.पण त्या दिवशी हवा खूपच खराब असल्याने आम्हाला फक्त सील मासेच दिसले. कसले ते गब्दुल असतात? मी म्हणू नये खर तर.....मधेच खडकावर शेवाल्यावर येवून बसले होते. चाहूल लागली आवाज झाला कि लगेच दुबकन पाण्यात जात होते.

डॉल्फिन मला बघायचा होता तो मात्र काही दिसला नाही.परत येताना बोटीचा जेवढा भाग वर दिसत होता तेवढाच खाली होता.खालच्या भागात बसून काचेतून खोलवर असलेल्या पाण वनस्पती, शेवाळ, छोटे मोठे मासे, खेकडे  सर्व काही दिसत होते.मी या आधी समुद्राचा तळ फक्त डिस्कव्हरी चॅनेल वरच पाहीला होता. आता मात्र प्रत्यक्ष बघताना गम्मत वाटत होती. मला ते बघताना "जीवो जीवस्य जीवनम" या संस्कृत सुभाशिताची आठवण झाली. 

खोल पाण्यात किती तरी वेळ बोट शांत उभी होती.पाणी अगदी रंगाने हिरवेगार पण शुद्ध दिसत होते.खूप मोठमोठ्या आकाराच्या आम्ही पाण वनस्पती पहिल्या,समुद्राचा तळ पाहीला. अगदी कायम लक्षात राहण्यासारखी ही बोट ट्रिप होती.




कुछ कुछ होता है चे टायटल साँग जे एलीन डोनानला शूट झाले:


Tuesday, July 26, 2011

टूर निघाली स्कॉटलंडला-4


आज १५/७!

सकाळीच नाश्ता करताना आज स्ट्रॉबेरी फार्मवर जायचे ठरले.जवळच रस्त्यात येताना लागलेल्या फार्म कडे मोर्चा वळवला.पण आता त्या ठिकाणी आता फार्म नाही हे समजले. त्यांच्याकडूनच दुसर्या ठिकाणी असलेल्या या फार्मचा पत्ता [आपल्या भाषेत, आपण पत्ता म्हणू], म्हणजेच इकडच्या भाषेत पोस्ट कोड घेतला. ७-८ मैल अंतरावर असलेल्या फार्मवर आम्ही पोचलो. गाडी अगदी आत पर्यंत नेता आली.आणि बघतो तर काय! स्ट्रॉबेरी,रासबेरी! आणि इकडचे समर फळ, जे द्राक्षासारखे दिसत होते...त्यांना समरबेरीज म्हणतात.त्यांनी सर्व झाडे लगडली होती.तिकडे गेल्यावर त्या फार्मच्या मालकाने आमच्या हातात २/३ पुठ्याच्या परड्या [बास्केट] स्ट्रॉबेरी गोळा करण्यासाठी दिल्या. 

मी प्रथमच स्ट्रॉबेरीचे झाड पाहत होते. अगदी एक फुट उंचीचे.पूर्ण मळ्यात रोपांना स्त्राव्बेरी भरपूर आल्या होत्या.लहान मोठ्या आकाराच्या, आणि अगदी लालबुंद! आपण आपल्या हाताने किती,कोणत्या हव्या त्या तोडून घ्यायच्या, खरच मजा वाटत होती. आम्ही सर्व जण त्या गोळा करण्यात दंग झालो होतो. आपल्याकडे खोक्यात पानात ठेवलेल्या डझन २ डझन विकत घेणे हेच माहित होते.त्यामुळे या झाडावरील कढून घेण्याचा आनंद वेगळाच होता.

त्या फार्म वर जरा वेळ फिरलो.फोटो काढले.आणि त्या स्ट्रॉबेरी वजन करून घेतल्या.आणि लगेचच अगदी लहान मुलांप्रमाणे आम्ही सर्वांनी त्यावर ताव मारला.ताज्या आणि लाल लाल मस्त होत्या.छोट्या अक्षराने पण अगदी मन लावून त्या खाल्या.आमची गोरीपान बाहुली लालेलाल झाली होती.प्रवासात २ दिवस पुरातील इतक्या बरोबर घेतल्या होत्या.त्या फार्म वरून बाहेर पडवत नव्हते.बरेच लोक तिकडे हा आनंद लुटत होते.विकेंड ला खर्या अर्थाने युरोपियन लोक घराबाहेर पडून मजा करत असतात,हे सतत बघायला मिळत होते. फार्म वरून निघताना मुंबईत कशा आहेत?काय भावाने स्ट्रॉबेरी मिळतात? याची चर्चा साहजिकच झाली. आता आम्ही मह्त्वाच्या ठिकाणी जाणार होतो. 

अनिकेत-अमोल अगदी उत्सुक होते त्या डिस्टीलरी  मध्ये जायला. ग्लेन ऑर्थ ही विस्की बनवणारी कंपनी आम्हाला जाताना वाटेत दिसली होती. त्यामुळे येताना सहज तिकडे पोचलो.लहान अक्षराला घेऊन अश्विनी बाहेर थांबली होती. आम्ही सर्वांनी आत प्रवेश केला.सगळीकडे अगदी मजबूत तिकीट असते बर का इकडे? पण मला काही त्याची कधी चिंता नव्हती. अनिकेत होता ते सर्व बघयला समर्थ! तो युरोपियन माणूस आम्हाला माहिती देवू लागला.अगदी प्रथम बारली दाखवली. ती भिजत घालून ठेवावी लागते. त्याला मोड आले कि सुकवून ठेवतात.मग बारीक करून योग्य प्रमाणात पाणी घालून किती दिवस कशी ठेवतात. ते सर्व दाखवले. आंबवणे ही क्रिया केली जाते. किती तरी फुट उंचीचे लाकडी मोठे मोठे कंटेनर होते. मला सतत आश्चर्य याचे वाटत होते कि कुठेही कामगार दिसला नाही. आणि परत सर्व अगदी चकचकीत. संपूर्ण कंपनीत ३-४ माणसे फक्त होती. हीच माणसे सर्व विभाग पाहतात. सर्व यंत्राच्या साह्यानेच होत होते. मोठ्या मोठ्या लाकडी पिंपातून [कास्क] वेगवेगळ्या चवीची विस्की भरून ठेवली होती.इकडे बाटल्या भरल्या जात नाहीत तर असेच कंटेनर इतर देशात पाठवले जातात. स्कॉटलॅंडची स्कॉच विस्की प्रसिद्ध आहे हे ऐकून होते.पण त्या सर्व प्रवासात आम्हाला इतक्या दिस्तालारी दिसल्या कि काय सांगू?सर्व देशात यांच्याकडूनच पुरवठा होत असेल.सर्व विभाग फिरून झाल्यावर सर्व लोकांना तो युरोपियन अगदी अगत्याने चव बघायला सर्व चवीच्या व्हिस्की देत होता.इतके प्रकार पाहून साड्या,कपडे यांच्या दुकानात बायकांचे जे होते ना तसे अगदी अनिकेत-अमोल चे झाले होते! अखेर किती तरी वेळाने ठरवून चव घेऊन बाटल्या खरेदी झाल्या. अगदी महत्वाचे काम झाल्यासारखे वाटले,कारण तीच गोष्ट त्यांच्या आवडीची होती. आता  जेवणात कुठेही वेळ घालवायचा नाही."आईल  ऑफ  स्काय" बरेच दूर आहे .वेळेवर जाऊ या ठरले.वाटेत काहीतरी घेऊन गाडीतच खाऊ या असे बोलणे झाले.परत सर्व गाडीत बसलो,निघालो.आता चर्चा फक्त व्हिस्कीचीच होती.

आजूबाजूला अफलातून निसर्ग सौंदर्य होते.रस्ता खरोखर प्रेक्षणीय होता. २ तास प्रवासात मस्त मजा करत जात होतो.अगदी निर्जन रस्ता होता.काही वेळात अचानक काय झाले आधी कळले नाही.पण गाडी पंक्चर झाली.इतका वेळ सर्व जण मस्त मूडमध्ये होतो.पण आता काय करायचे विचार सुरु झाला.कशीबशी गाडी एका बाजूला घेतली.आम्ही सर्व  खाली उतरलो.ही गाडी.भाड्याची होती.अनिकेत ने प्रथम कागद पत्र शोधून त्याला आधी फोन लावला.आम्ही एका बेटावर जात होतो त्या मुळे मोबाईलला नेटवर्क मिळत नव्हते. अखेर खूप प्रयत्नांनी फोन लागला.पण आम्ही नेमक्या कोणत्या ठिकाणी आहोत हे त्याला कसे सांगायचे प्रश्न पडला. 

जवळच काही अंतरावर २ घरे होती. अनिकेतने तिकडे जाऊन त्यांना विचारून त्या जागेचा पोस्ट कोड लिहून आणला.परत फोनाफोनी सुरु झाली. अखेर २ तासाने एक मेकॅनिक, एक भला मोठा ट्रक घेऊन आला.आपल्याकडे टायर काढून त्याचे पंक्चर काढून काम झाले असते,पण इकडे तसे नाही.त्याने आम्ही ७ माणसे आणि आमचे खूप सामान पाहिले.तो हैराण झाला! त्याने आमची सोय मात्र केली लगेच एक गाडी मागवली. त्याने आम्ही पुढे गेलो. त्या ट्रक वर गाडी चढवली आणि अनिकेत-नंदिनी ट्रक मध्ये बसून  त्याच्या बरोबर  गेले. 

जातानाचा रस्ता खूप सुरेख होता.पण कोणाचेच बाहेर लक्ष नव्हते.अनिकेत-नंदिनी गाडी घेऊन परत येईस्तोवर मी तर काळजीत वेळ घालवला. एकतर खूप वळणे असलेला रस्ता होता, त्यात मुसळधार पाऊस पडत होता. भरीला रस्त्यावर खूप हरणे येतात समजले होते. इकडे जंगली जनावरांना माणसांपेक्षा महत्व अधिक आहे.जिकडे तिकडे सुरक्षेसाठी बोर्ड लावलेले मी येताना वाचत आले होते.अखेर गाडीचे सर्व सोपस्कार करून ४ तासाने अनिकेत-नंदिनी आईल  ऑफ  स्कायला "डनोली हॉटेल" वर सुखरूप पोचले. 

येतानाच त्यांनी थांबून भारतीय जेवण आणले होते. दिवसभर सर्व तसे उपाशीच होते. आमच्या खोलीत बसून सर्व पोटभर जेवले. गप्पा तोच विषय सुरु होता.वारा पाऊस याचे बाहेर तांडव सुरु होते. आम्ही अगदी हौशीने उत्तर महा सागराच्या किनार्यावरील जागेत आरक्षण केले होते.एकतर रात्र खूप झाली होती त्या मुळे तो खवळलेला समुद्र खोलीतून बघणे पसंद केले.सर्व जण आज खुच थकलो होतो.लवकर झोपी गेलो.पण खरच सांगते सर्व अर्थाने दिवस लक्षात राहिला.

मला सतत नवल वाटत होते,कि आम्ही जेव्हा पंक्चरमूळे थांबलो होतो तेव्हा त्या रस्त्यावरून वार्याच्या वेगाने इतक्या गाड्या जात होत्या. पण कोणीसुद्धा थांबले नाही कि विचारले नाही. अगदी आमच्या जवळ लहान मुल होते, आम्ही ४ बायका होतो तरीसुद्धा....नाही म्हणायला जिथे गाडी उभी केली होती. तिकडे जवळच एक घर होते. त्या युरोपियन बाई ने आम्हाला निदान बाथरूम वापरायला दिले. नाहीतर थंड हवेत इतका वेळ बाहेर थांबणे, पंचाईत होती. निघताना त्यांनी अक्षरा साठी गरम पाणी ,बेबी फूड आहे का विचारले त्यातच आम्ही धन्य मानले.ही इकडची संस्कृती

टूर निघाली स्कॉटलंडला-3

आज १४/७!


आज अनिकेत, नंदिनी आणि अमोल व्हाईट वॉटर रॅफटिंगला जाणार होते. सकाळी ठीक ११.३० वाजता. आम्ही सर्व जणही  निघालो. पोचायला २ तास लागले. संपूर्ण प्रवासात एका बाजूला दाट हिरवीगार झाडी आणि एका बाजूला निळेशार खळाळते पाणी. अशा निसर्ग रम्य रस्त्यावरून आम्ही जात होतो. मधेच सुंदरशा जागेवर थांबून उतरत होतो, फोटो काढत होतो.या सर्व भागावर निसर्ग्ची अगदी प्रचंड कृपा आहे. आम्ही तिकडे अगदी वेळेवर म्हणजे ११ वाजता पोचलो. या तिघांना तो विशिष्ठ पोशाख [वेट सूट आणि लाईफजॅकेट] घालायला दिला व त्यांना ते घेऊन दुसर्या ठिकाणी गेले.

मी मंजिरी,अश्विनी आणि अक्षरा मस्त तलावाच्या बाजूला हिरवळीवर बसून गप्पा मारत होतो. इकडे हवा पटकन बदलते.चांगले उन होते, क्षणात पाऊस सुरु झाला, गार वारा, सारें थंड गार झाले.तिकडे एकमेव हॉटेल होते.तिकडे जाऊन बसलो.गरम चहा घेतला. ते पण २.३० ला बंद होणार होते आणि तिघांना यायला अजून खूप वेळ होता. पाण्यातून जाऊन आल्यावर सपाटून भूक लागेल म्हणून अश्विनी ने आधीच खायला सॅंडविच घेऊन ठेवले. मस्त थरार अनुभव घेऊन परतले हे तिघे. खाऊन नंतर इंग्लिश टी घेऊन आम्ही निघालो.

आता ६ वाजताच्या बोटीचे बुकिंग आधीच केले होते.अगदी वेळेत पोचलो.जवळच्या ठिकाणी गुलाबाची आणि इतर फुलझाडे बहरलेली होती. त्याची मी जाऊन लगेच फोटो काढले. इतकी फुले बघून पण मन भरत नव्हते.लगेच फोटोचा  मोह होत होता. आपल्या कडे खरच अशी फुले झाडावर बघायला मिळत नाहीत. बोटीत बसायला जाण्यासाठी त्यांच्या छोट्या बस मध्ये बसलो.या बोटीच्या फेरीत फक्त आम्हीच ७ जण होतो.मग काय आणखीनच मज्जा.अगदी खास आमच्या साठीच बोट ठरवल्या सारखे योगायोगाने झाले होते.बस चालवणारा तो युरोपियन तोच बोट चालवणारा.सर्व एक हाती कारभार होता.

आम्ही बोटीत चढलो. थंडगार वारा आणि भोवताली खळाळते पाणी.जवळ जवळ एक तासाची फेरी होती.बोटीचा चालक आम्हाला एकीकडे माहिती देत होता.पडद्यावर पण माहिती चित्रे दिसत होती.नदी आणि इतकी मोठी पाण्याने दुथडी भरून वाहणारी,नवल वाटत होते.नदीचे पात्र इतके विशाल होते कि या टोकावरून दुसर्या टोकावर बोटीने जायला दीड दिवस लागतो.

पाण्याची खोली पण खूप होती.जाताना एक ४०० वर्षा पूर्वीचा किल्ला पण बघितला.पाणी शुद्ध स्वच्छ नितळ होते.काठावरून पाहिले तर तळ दिसत होता.सुखद बोट फेरी करून आम्ही परतलो.अक्षराने इतक्या थंड पण्यात पण हात घातला.पाण्यात तिला अजून खेळायचे होते पण आम्ही दोघी आज्या ओरडलो.बोट फेरी झाल्यावर रात्री ११ वाजता लोज वर पोचलो.

टूर निघाली स्कॉटलंडला-2


बुधवार सकाळ १३ तारीख!

आम्ही दोघींनी लवकर उठून आवरून घेतले. किटलीत पाणी गरम करून घेऊन चहा करून घेतला. सवय चहा ची. तोवर आवरून एकेक जण तयार झाले. अक्षरा सर्वात लहान म्हणजे १० महिन्याची.पण ती लवकर उठून आवरून फिरायला तय्यार. इकडच्या पद्धतीप्रमाणे आम्ही पोटभर नाश्ता करायला त्या लॉजच्याच हॉटेल [लिटील शेफ नावाचे] मध्ये गेलो. तिकडच्या पद्धती शिष्टाचार सांगते....खूप खुर्च्या खाली होत्या पण आपण लगेच आत जाऊन बसायचे नाही.गेट वर उभे राहायचे, मग तिकडचा वेटर कमशेफ येणार विचारणार, सांगणार त्या ठिकाणीच आपण बसायचे. सर्व अगदी निवांत..इतक्या वेळात आपल्या कडे हॉटेल मध्ये माणूस खाऊन बिल देवून बाहेर पडेल. नंतर तो शांतपणे त्याच्या मर्जीनुसार येवून आपल्याला विचारणार. मगच आपण ऑर्डर करायचे. तोच जाऊन तयार करणार त्या मुळे परत निवांत गप्पा मारत बसायचे. इकडे माणूस बळ एकदम कमी. कामगार नाहीतच. त्या मुळे कितीही घाई असली, भूक लागली असली तरी शांतपणे थांबायची मनाची तयारी ठेवावी लागते.

पोटभर खाऊन अनिकेत आणि अमोल दुसरी गाडी बदलून आणायला गेले. गाडीत परत सर्व सामान भरले आणि आम्ही तिकडून "इंव्हुर्नेस" ला जायला निघालो, पण अॅबर्दीनच्या मार्गाने. अंतर जवळ जवळ ४ तास होते. मध्ये थांबत जात होतो. गाडीत गप्पा गाणी ऐकणे, अक्षराशी खेळणे सुरु होते.त्याही पेक्षा बाहेरचे निसर्ग सौंदर्य पाहण्यात सर्व मग्न होते.तिकडे जाताना रस्त्यावर खूप डिस्टीलरीज   दिस्त्लारी लागत होत्या. इतके दिवस आपण ज्या  ब्रॅन्डची व्हिस्की पितो, ती इकडे बनते वा तयार होते, हे बघून दोघेही-अनिकेत  अमोल-खूप खुश होते. खूप उत्सुक होते व्हिस्की टूर करायला. टॉम टॉम, म्हणजे आमचा बोलका बाहुला, आम्हाला रस्ता दाखवत होता. आम्ही जात होतो. 

आम्ही आधी अॅबर्दीनला पोचलो. जवळ-जवळ २ वजता. प्रथम कार पार्किंगची सोय पहिली. नंतर हॉटेलमध्ये जेवायला गेलो.त्याच वेळी आम्हाला मोबाईल बरून मुंबईत बॉम्ब स्फोट झाल्याची खबर मिळाली. काळजीला सुरवात झाली. पण तितक्यात भाग्यश्रीचा मेसेज आला कि आम्ही सर्व सुखरूप आहोत. लगेच सुशीलचा पण फोन आला. जरा हायसे वाटले. मोबाईल आणि इंटरनेटने खरच जग जवळ आले आहे. नाहीतर आम्ही एका टोकावर इकडचे......काहीच लगेच कळले नसते. मागील बॉम्ब स्फोटची आठवण लगेच झाली. अतिरेकी कारवाया करत आहेत. आणि आपण सामान्य माणसे तसेच जीवन जगत आहोत..याची खंत वाटत होती पण काय करणार?????????

जेवताना समोर विशाल दक्षिण महासागर दिसत होता. त्या मुळे लहान मुलांप्रमाणे माझे जेवणाकडे लक्ष नव्हते. अखेर जेवून आम्ही किनार्यावर गेलो फिरायला.पाणी बर्फासारखे थंड होते. पण मी थोडा वेळ तरी पाय बुडवून पाण्यात उभी राहिलेच.पाणी निळेशार स्वच्छ आणि नितळ होते पण कमालीचे थंड. इकडची युरोपियन माणसे आणि मुले मात्र बिनधास्त पाण्यात खेळत होती.जरा वेळ किनार्यावर बसलो,फोटो काढले आणि पुढच्या प्रवासाला निघालो. आता आम्हाला इकडून "बिउलीला" [इंव्हुर्नेस, या सिटी जवळचे एक खेडेगाव] जायचे होते. तिकडचे २ दिवसाचे बी अॅन्ड बी, म्हणजे बेड अॅन्ड ब्रेकफास्ट चे आरक्षण केलेले होते. ते अगदी छोटेसे टुमदार खेडे गाव होते. जाताना वाटेत एक स्ट्रॉबेरी फार्म लागला. उद्या सकाळी तो बघायला जायचे लगेच ठरवून टाकले.

बिउलीला जातांना 
बिउलीलचं बी अॅन्ड बी म्हणजे एका युरोपियन माणसाचे घर,त्यांनी घरातच लोजिंग सुरु केले होते. बाहेरून आम्हाला आत इतके मोठे व सुसज्ज असेल असा अंदाज आला नाही.पण आत जाऊन तो अनुभव घेतला.या बी अॅन्ड बी मध्ये आमचा २ दिवस मुक्काम होता. खोल्यातून सामान नेऊन ठेवले. शेजारीच एक "बिउली तंदुरी" हे भारतीय हॉटेल होते. तिकडे गेलो. रात्रीचे १० वाजायला आले होते.तो मालक हॉटेल बंद करण्याच्या तयारीत होता. त्या मुळे आम्हाला अगदी कसे बसे जेवायला मिळाले. जेवून रात्री ११.३० वाजता लॉज वर परतलो. तोवर सूर्यास्त झाला नव्हता. आणि परत सकाळी ३.३०लाच सूर्योदय झाला. बाप रे! किती मोठा दिवस......

बिउली गाव
सकाळी आवरल्यावर त्या ठिकाणी राहणाऱ्या युरोपियन जोडप्यांनी आमची नाश्ताची सोय छान ठेवली होती. दोघेही बोलायला खूप चांगले होते. त्याचे नाव इयान होते. भक्कम शरीरयष्टी असलेले,गोरापान इयान होता. तोच काय हवे ते विचारणार आणून देणार. त्याची बायको आत नाश्ता बनवून देत असे. इकडे हा बरेच जण व्यवसाय करतात. खूप ठिकाणी बेड आणि ब्रेकफास्टचे बोर्ड पाहिले. फक्त समर मध्ये ४ महिने हा व्यवसाय. विंटर मध्ये खूप इकडे बर्फ पडतो त्या मुळे सर्व बंद...दोघेही खूप अगत्याने सर्वांशी बोलायचे, त्यांनी २ दिवस घरगुती वातावरणात मजेत गेले. गम्मत सांगते सकाळी नाश्ता देण्यापासून बिल देणे ते रात्री बार मध्ये ग्लास भरून देणे सर्व काम तो एकटा इयान करत असे अंदाजे वय ६५ ते ७०. काय कमाल आहे ना!आणि ती सर्व कामे ती अगदी मजेत  हौशीने.

टूर निघाली स्कॉटलंडला-1

ज मंगळवार १२.७ २०११! 


आज आम्ही सहलीला जायचे ठरले होते. २ दिवस माझी तयारी सुरु होती. नेहमी प्रमाणे वाटेत खायला काहीतरी हवे म्हणून मका आणि पोहे यांचा चिवडा करून घेतला. गोड काहीतरी हवे म्हणून नंदिनीच्या आवडीची गुळ पापडीची वडी करून घेतली.कपडे आणि इतर सामान खूप बॅगेत भरले होते.आम्ही रात्री ७.३० च्या विमानाने [इझी जेट]जाणार होतो. या लोकल विमान सेवेत सामानाचे वेगळे पैसे भरावे लागतात. एका २० किलोच्या बॅगेत आमचे तिघांचे कपडे राहणे शक्य नव्हते. अखेर केबिन बेग  स्वतंत्र भरली. सर्व तयारी करून निघालो. अनिकेतने घरी टॅक्सी  मागवली होतीच. त्यामुळे सुखाने विमान तळावर पोचलो. तिकडे मंजिरी,अश्विनी,अमोल आणि अक्षरा आधीच आले होते. आम्ही सर्व सोपस्कार करून आरामात जरा वेळ गप्पा मारत बसलो. ठीक ७.३० वाजता विमानाने उड्डाण केले.एकच तासाचा प्रवास होता.पण सहलीत लगेच खायला हवेच हा अलिखित नियम.....प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार खायला प्यायला घेतले. सर्व पैसे भरून. [पैसे नाही पौंड भरून]या प्रवासात विमान कंपनी कडून काहीच फुकट मिळत नाही.

अक्षराचा हा पहिलाच विमान प्रवास होता. सर्वांचे लक्ष त्या मुळे तिच्याकडे जास्त होते.तिचे मात्र इतरांकडे जास्त होते.खूप लोक दिसत होते ती खुश होती. प्रवासाचा तिने खरच लहान वयात आनंद लुटला.विमानातून उतरल्यावर सामान घेतले,आणि बाहेर पडलो. तिकडे जवळच "एंटरप्राइस कार रेंटल", या कंपनीचे कार्यालय होते. अनिकेतने आधीच ऑन लाईन ७ जागा असलेली गाडी आरक्षित करून ठेवली होती. 


इकडे भाडे तत्वावर गाड्या मिळतात. त्या ठिकाणी गेल्यावर गाडी बघून आम्ही सर्व विचारात पडलो. करण आमचे सामान खूप होते. गाडीत राहणे शक्य नव्हते.सुमारे एक तास सामान आणि लोक कसे बसवायचे ते ठरत नव्हते. अखेर अनिकेत ने २ ट्रिप करून आम्हाला लॉज वर नेले. एडिनबराचं [आपलं एडिनबर्घ]  लॉज पण प्रशस्त होतं. खोल्या छान नीटनेटक्या होत्या. स्वच्छ तर खूपच. तिकडे पण एक भारतीय काम करत होता.

या ठिकणी पण रात्री १० नंतर काही मिळत नाही,म्हणून अश्विनीने लगेच पिझ्झा मागवून ठेवला. जरा असा तसाच होता. पण भूक लागली होती त्यामुळे सर्वांनी मुकाट्याने खाल्ला. आता सर्वांनाच नामांकित कंपनीचा पिझ्झा खायची सवय झाली आहे.रात्री खाऊन गप्पा मारून, उद्या कुठे, किती वाजता जायचे ते ठरवून प्रत्येक जण आपापल्या खोलीत झोपायला गेले.मी आणि मंजिरी खूप दिवसांनी असे बाहेर एकत्र राहायला होतो.खूप वेळ गप्पा मारून खूप उशिरा झोपलो.

Monday, June 20, 2011

विंडसर आणि रोमन बाथ--रोमन बाथ ते इंडियन चायनिझ

प्रथम अनिकेतने त्या गाडीच्या एजन्सिला फोन केला आणि थोड्याच वेळात तिकडचा एक मेकॅनिक हजर झाला. गाडी बघून दुरुस्ती थोडीशी करून गेला. आवाज येणे बंद झाले. त्या मुळे परतीच्या प्रवासात टेन्शन नव्हते.

रोमन बाथ मध्ये जुन्या पुरातन वस्तू खूप आहेत. अजूनही इतक्या थंड हवेत त्या ठिकाणी कुंडाचे पाणी कोमट आहे.पण त्या ठिकाणी जे गार पाण्याचे कुंड आहे ते मात्र नीट नव्हते. म्हणजे पाणी सर्व हिरवेगार झाले होते. नाव ठेवायला तेवढेच.....पण त्या बाथ च्या ३ माजली इमारतीमध्ये जागोजागी पडद्यावर त्या काळचा इतिहास दाखवला जात होता. कथा चित्रित केल्या होत्या.

एक जागा अशी होती कि तिथे मोठे पाण्याचे कुंड होते, त्यात लोकांनी खूप नाणी टाकली होती. आपल्याकडे गंगेत टाकतात तशी. पण या वरून ते पण श्रद्धाळू आहेत हे जाणवले. आपल्या मनातील इच्छा बोलून नाणे पाण्यात टाकतात.हे प्रत्यक्ष पाहिले. आपल्याकडचा नवस किंवा कौल ....पण कोणीही इतकी नाणी समोर पडलेली दिसत असताना पाण्यात उतरत नव्हते. हे विशेष दिसले. खरच इकडे गरिबी बेकारीनाहीच का? प्रश्न पडला.

बाथ संपूर्ण फिरून आम्ही बाहेर पडलो, आता मत्र थकायला झाले होते. मस्त एक कॅटबरी घेतली. गाडीत बसलो. कॅटबरी खाल्ल्यावर जरा एनर्जी वाटली. त्या नंतर परतीचा प्रवास सुरु. आता गाडी ओके होती. घरी परत जाताना अजून एक ठिकाण बघायचे होते ते म्हणजे हाउन्सलो. हाउन्सलो म्हणजे लंडन मधील एक भाग. अनिकेतचे जुने घर आणि त्या ठिकाणी असलेली सर्व इंडियन वस्ती. दुकाने हॉटेल. रात्री जेवायचं इंडियन हॉटेल मध्ये हे नक्की होते.

आम्ही हाउन्सलो मध्ये पोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. बरीच दुकाने बंद झाली होती. पार्किंग मध्ये गाडी लावली.समोर अॅस्डा होते. अॅस्डा म्हणजे आपल्या कडील बिग बझार.पण मोठ्या प्रमाणात.त्या ठिकाणी गेलो.

दुध, भाज्या, फळे व इतर सामान घेतले,गाडीत टाकले.त्या नंतर चालत चालत फिरायला सुरवात. त्या भागाची माहिती दोघे मला देत होते त्यांच्या पद्धतीने. म्हणजे अनिकेतच्या भाषेत हा रोड म्हणजे आई इकडचा लक्ष्मी रोड.

नंतर एका खास मराठी मुलाचे हॉटेल, श्री कृष्ण वडा पाव सेंटर, या ठिकाणी मोर्चा वळवला.पण त्या जागी ते दुकान नव्हतेच. शोध सुरु. फिरत फिरता सापडले. धन्य झालो! त्या दुकानात जाऊन अगदी आपल्या पद्धतीचा चहा आणि वडा पाव घेतला. मस्त कडक चहा पिऊन तरतरी आली आणि चक्क तो मुलगा मराठीत बोलत होता! खरच त्या मुळे इतके बरे वाटले. बाहेर गेलो कि आपल्या भाषेची किंमत कळते.त्याच्या कडे आपल्या सणानुसार पदार्थ मिळतात,लगेच नंदिनी ने माहिती दिली.सांगितले आई,संक्रांतीला आम्ही गुळाची पोळी याच्या कडेच खाल्ली.खरच लंडन सारख्या ठिकाणी एका मराठी मुलाने असे दुकान[हॉटेल]चालवायचे,कौतुक वाटले.

त्या नंतर परत चालत चालत आम्ही फ्लेवर्स ऑफ इंडिया, या इंडियन हॉटेल मध्ये गेलो. जरा विसावलो. ते हॉटेल म्हणजे आपल्या कडील अर्बन तडका...तसेच आतील डेकोरेशन होते. इकडे मात्र खास पंजाबी चायनीज चमचमीत मिळत होते. इकडे युरोपात हॉटेल मध्ये गेलो तर काहीच मसालेदार मिळत नाही.गोरे लोक अगदी फिके जेवण जेवतात.वडा पाव खाल्याने भूक थोडीच होती.पण बिअरच्या बरोबर चिकन लोलीपोप विथ शेझवॉन सॉस [आपल्याकडची लाल जर्द शेझवॉन चटणी] आणि व्हेज क्रिस्पी वर आम्ही ताव मारला. खूप टेस्टी होते सर्व! नंतर न जेवता कुल्फी, गुलाबजाम घेतला. मस्त पोटभर जेवून बाहेर पडलो.

बाहेर गारठा चांगलाच वाढला होता. मी तर कुडकुडत गाडीत जाऊन बसले. आता मात्र गाडीत मागील सीटवर पाय वर घेऊन बसले,कारण पाय आता बोलू लागले होते.एक तासाने आम्ही घरी पोचलो.मी लगेच आवरून झोपणे पसंद केले.तिने लगेच फोटो अपलोड केले. सकाळी उठ्ल्यावर लगेच मी फोटो पाहिले, आणि मैत्रिणिंना पाठवले.

आज रविवार सुट्टी. आराम करायचे कालच नक्की झाले.माझा आज चतुर्थीचा उपास .थोडे फराळाचे केले,आणि दिवसभर आराम व ऑनलाईन गप्पा मारल्या. सुशील चा आज वाढदिवस असल्याने त्याला फोन केला.आरामात दिवस घालवला......

विंडसर आणि रोमन बाथ--राजवाडा, स्टोनहेंजची झलक आणि बाथ

त्या नंतर राजवाड्यातील एकेक खोली म्हणजे प्रशस्त दालने बघायला सुरवात केली. मला स्वतःला सर्व राजवाडा आवडला पण विशेष आवडली ती सर्व हत्यारे ठेवलेली दालने. त्या काळची सर्व शस्त्रस्त्रे इतकी सुबक मांडणी करून ठेवली आहेत.ते बघून थक्क झाले.प्रत्यक्षात किती हत्यारे त्या काळी त्यांच्या कडे होती,याची ती एक झलक होती.

राणीचा दरबार, शयन गृह, सल्ला मसलत करायची खोली त्या ठिकाणी प्रत्येक वस्तू वर केलेली कलाकुसर पाहून मन प्रसन्न झाले. राणीला कलेची किती कदर होती हे जाणवले. प्रत्येक वेळी खरच तिची निवड अप्रतिम आहे हे जाणवत होते. इतकी वर्ष झाली तरी त्या सरकारने त्या सर्व गोष्टी इतक्या छान जतन करून ठेवल्या आहेत याचे खूप कौतुक वाटले. प्रशस्त डायनिंग रूम आणि टेबल पाहून त्या काळी एकत्र कुटुंब पद्धती किती सुखद होती, हे जाणवले. तिकडे जे सिक्युरिटी गार्ड [सुरक्षा रक्षक] आहेत त्यांची ड्युटी बदलतानाची [चेंज ऑफ गार्ड] परेड पाहिली.

किती तरी वर्ष झाली, सुरक्षेची नवीन साधने आली.पण त्यांची ती शिस्त, कवायत, त्यांचे ते त्या काळचे पोशाख, सतत दक्ष राहणारे ते गार्ड बघून थक्क झाले. हे सर्व आहे तसे सुरक्षित त्यांच्या मुळेच टिकून आहे याची खात्री पटली.संपूर्ण राजवाड्याभोवती संरक्षक भिंत आहे,मोठमोठे बुरुज आहेत.आणि ते सर्व सुस्थितीत आहे हे विशेष..हे सर्व टिकवायला त्यांनी प्रवेश फी हजार रुपयाच्या वर प्रत्येकी घेतली त्याचे काही वाटले नाही.आपल्या कडे फंड [पैसा] कमी पडतो हे नक्की.....

परतताना आम्ही जॉर्ज चापेल बघायला शिरलो. ते म्हणजे त्यांचे प्रार्थना स्थळ [मंदिर]. त्या ठिकाणी काही विशिष्ट लोकांच्या कबर आहेत.विशेष म्हणजे नुसते कबरीवर [थडग्यावर] नाव नाही तर त्यांचा संगमरवरी आडवा पुतळा आहे.त्या ठिकाणी कमालीची शांतता होती. खरच मला सुद्धा ५ मिनिटे शांत मन एकाग्र करून तिकडे बसावेसे वाटले.आसन व्यवस्था पण उत्तम.

युरोपियन लोकांच्या प्रेक्षणीय ठिकाणाची खासियत म्हणजे आपण ज्या दालनातून बाहेर पडतो तो मार्ग चक्क दुकानात जातो.तुम्ही त्या ठिकाणी जाऊन वस्तू बघून खरेदी करूनच बाहेर पडता. दुसरी खासियत म्हणजे खायला हॉटेल शिवाय बाहेर काही मिळणार नाही. आणि कमालीचे क्लीन. राजवाडा मी प्रथमच पाहीला होता त्याने मी खूप खुश होते. बाहेर पडल्यावर फोटो काढले. जरा फ्रेश झालो. आणि मग गाडीत बसलो.

आता मात्र भूक चांगलीच लागली होती.अनिकेत ने मॅक डोनाल्डचे पार्सल घेतले होते आणि घरातील खाऊ [लाडू,पराठे] पण पॅक केला होता. गाडी गावातून बाहेर पडल्यावर लगेच गाडीत खायला सुरवात केली. इकडे वाहतूक अगदी शिस्तीत असल्याने अनिकेतला गाडी चालवताना डाव्या हाताने खाता येत होते. युरोपियन पद्धती प्रमाणे आम्ही पण खाताना कोक घेणे पसंद केले. रस्त्यात दोन्ही बाजूला हिरवीगार शेती, निसर्ग सौंदर्य छान दिसत होते. इकडे कुठेच उजाड माळरान नाही, कि झोपड्या, नाले, घाण नाही. खात पीत गप्पा मारत आम्ही एक तासाने स्टोनहेंजला पोचलो.पोस्ट कोड टाकल्याने आमचा बोलका बाहुला रस्ता अचूक दाखवत होता.

अनिकेतच्या मित्रांनी आधीच सांगून ठेवले होते त्या मुळे आम्ही ते एकावर एक ठेवलेले दगड बाहेरून बघणे पसंद केले, नंदिनी ने जाऊन बाहेरून फोटो अगदी सर्व दिशेने काढले. मी अनिकेत ने गाडीतूनच बघितले. मला अजून त्या दगडचा इतिहास समजला नाही पण गूगल वर शोधून नक्की सांगेन. तसे आम्ही तेथून लगेच निघालो.

पुढे बाथ ला जायचे होते. बाथ म्हणजे रोमन काळातील गरम व गार पाण्याची कुंडे. बाथला जायला २ तास लागणार होते. वाटेत मुसळधार पाऊस पडत होता. मी मागे बसून अनिकेतला सतत सूचना देत होते. सर्वच वाहने कमी वेगात जात होती. तिकडे एक चांगले असते कोणी कुणाला ओवर टेक करत नाहीत. जाताना मधेच आमच्या गाडीतून आवाज येवू लागला.आम्ही तिघे थोडेसे काळजी करू लागलो.वाटेत कुठेही एकही दुरुस्ती चे दुकान नाही.पण आम्ही सुखरूप बाथला पोचलो.

विंडसर आणि रोमन बाथ--क्वीन मेरीचे डॉल हाउस

शनिवार सकाळ लवकरच उजाडली.आम्हाला आज फिरायला बाहेर जायचे होते.सकाळी लवकर म्हणजे ८.३० वाजता बाहेर पडायचे असा बेत ठरला होता.मी सकाळी लवकर उठून माझे आवरून घेतले.चहा करून अनिकेतला उठवले. मग त्यांची आवराआवर सुरु झाली.माझी कामे मी उरकून घेतली.आज हवा खूपच खराब होती,मधेच मळभ येत होते,वारा खूप होता,पाऊस पडत होता.पण अरी आम्ही तसे बरेच वेळेवर निघालो.

गाडीत खायला प्यायला भरपूर घेतले होते.प्रथम निघालो विंडसर कासलला जायला. गाडीत बसल्या बसल्या Tomtom सुरु केलं. त्यात पोस्ट कोड टाकल्यावर त्या मेडम [Tomtom ] रस्ता दाखवू लागल्या.खरचं गम्मत वाटते कि हायवे अगर शहरातील रस्ता नाही तर अगदी छोट्या छोट्या गावातील रस्ता सुद्धा अचूक दाखवला जात होता.आम्ही गाणी ऐकत खात पीत विंडसरला पोचलो साधारण १० वाजता. पार्किंग ची समस्या सर्व ठिकाणी सारखीच आहे. पे पार्किंग शोधून त्यात गाडी लावून अनिकेत आला.तोवर आम्ही तिकिटाच्या रांगेत शिरलो. १० वाजताच हा राजवाडा उघडतो पण प्रवासी आधीच येवून पोचलेले होते. रांग खूप मोठी होती.पण सर्व शांत शिस्तीत उभे होते.सर्वच कामे इकडे संगणकावर .तिकिटे काढली त्य नंतर सिक्यूरिटी चेकिंग झाले. आमचे आणि आमच्या पर्स, सामानाचे. नंतर प्रवेश. एका युरोपियन सुरेख बाईने आमचे स्वागत केले.

एका भल्या मोठ्या दरवाजातून आम्ही प्रवेश केला.समोर विशाल किल्ला दिसत होता.हा राजवाडा किल्ल्यात आहे.या ठिकाणी वर्षातील काही दिवस म्हणजे समर मध्ये राणी अजूनही इकडे येवून राहते.त्यामुळे त्याचे महत्व अधिक होते.त्या दिवशी पण तिकडे काहीतरी कार्यक्रम होताच.आम्ही तयारी बाहेरून पाहिली.काही दालने म्हणून बंद होती.पण जी दालने प्रवाशांना बघयला उपलब्ध होती ती बघायला सुरवात केली.

प्रथम त्याचा नकाशा घेतला [पथदर्शक मार्ग]. तो भव्य राजवाडा बाहेरून बघत फिरायला सुरवात केली. इतक्या उंचावरून सर्व परिसर न्याहाळत प्रथम आम्ही क्वीन मेरीचे डॉल हॉउस बघायला गेलो. खेळातली बाहुली आणि भातुकली!
पण ती आपल्या सारख्या सामान्य माणसाची नाही......तर खुद्ध क्वीन मेरीचे! 
विचार करा........

चक्क राजवाड्याची प्रतिकृतीच म्हणा, असे ते बाहुली घर. प्रत्येक दालनात छोट्या छोट्या पण सुबक वस्तू मांडल्या होत्या. प्रशस्त हॉल पासून राणीची बेड रूम, डायनिंग रूम, देवघर, दरबार, कपाटे, बाथरूम, एक ना अनेक सर्व हुबेहूब वस्तू होत्या. त्या नंतर अगदी ३/४ वर्षाच्या मुलीच्या इतकी बाहुली आणि तिचे सर्व प्रकारचे कपडे, दागिने, अगदी चप्पल बूट पासून सर्व काही जतन करून ठेवलेले होते.

त्या ठिकाणाहून बाहेर पडलो.दुसर्या दालनात गेलो,त्या ठिकाणी १६०० सालापासूनचे काचेचे डिनर सेट, टी सेट मांडून ठेवले होते. इतके अप्रतिम कि बघतच राहावे. आश्चर्य म्हणजे अजूनही ते जसे च्या तसे आहेत. आत्ताही ते काही विशेष कार्यक्रमाला ते वापरले जातात.[हातून पडत फुटत कसे नाहीत,याची शंका मनात आली] उच्च प्रतीचे काचेचे सेट पाहून धन्य झाले.

Monday, June 6, 2011

लंडन मध्ये फेर-फटका आणि कोहिनूर हिरा

गुरुवारी सकाळीच लवकर आवरून मी आणि नंदिनी लंडन शहर पाहायला निघालो.आज ट्रेन चा अनुभव घ्यायचा होता.इकडे ट्यूब रेल वे प्रसिद्ध आहे.आम्हाला लंडन ब्रिज स्टेशन ला जायचे होते.त्या साठी आम्ही फास्ट ट्रेन ने निघालो.त्या स्टेशन पासून जवळ जवळ ४० मिनिटे चालत टॉवर ऑफ  लंडन या प्रसिध्द ठिकाणी पोचलो.

खूप प्रवासी आले होते. इकडचे रहिवासी पण आले होते.  इथे एक चांगली गोष्ट आहे कि प्रत्येक ठिकाणी नकाशा आणि माहिती पुस्तक मोफत ठेवलेले असते.त्या मुळे आपणच आपले गाईड. टॉवर बघायला सुरवात केली. एक युरोपियन गाईड तिकडचा इतिहास सांगत होता,मला कळणे कठीणच.पुढे काही अंतरावर एक जादुगार अगदी साधे खेळ करून दाखवत होता.आम्ही नकाशा बघून प्रथम कोहिनूर बघणे पसंद केले.याचे टॉवर मधील ठिकाण शोधले.टॉवर म्हणजे आपल्याकडचा शनिवार वाडा,पण सुस्थितीत, आणि ४ ते ५ पट मोठा.

कोहिनूर पहायला टूरिस्टची गर्दी
कोहिनूर बघण्यासाठी सर्वात मोठी रांग होती.आम्ही पण रांगेत उभे राहिलो.तशी रांग भर भर पुढे सरकत होती.आत गेल्यावर अगदी पूर्वी पासूनची त्या काळची पदके लावलेली होती.त्या नंतर आत मात्र अगदी सिद्धी विनायकासारखी गोल गोल फिरत जाणारी मोठी रांग.पण पडद्या वर सर्व दागिने आणि इतिहास दाखवला जात होता.त्या मुळे रांगेत उभे राहून फार कंटाळा आला नाही.अखेर आम्ही त्या कडक सुरक्षा असलेल्या खोलीत शिरलो. तिकडे काचेच्या बंद पेट्यातून सर्व दागिने,कोहिनूर हिरा,आणि त्या अल्ची सोन्याची कलाकुसर अप्रतिम केलेली अप्रतिम भांडी छान मांडून ठेवली होती.सर्व बघून अगदी डोळे दिपून गेले.माझे एकदा पाहून समाधान झाले नाही परत एकदा जाऊन तो कोहिनूर हिरा पाहून आले.प्रगत देशात सर्व प्रगत.तो हिरा पाहायला पण सरकता रस्ता.कोणी जास्त वेळ थांबूच शकत नाही,पण आश्चर्य म्हणजे तिकडे आत एकही पहारेकरी नही,कोणी कुणाला ढकलत नाही.शिस्तीने सर्व बघत पुढे पुढे जात होते.त्या काळातील राज घराण्यातील ती सर्व सोन्याची [शुद्ध]भांडी,दागिने बघून धन्य झाले. डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय ते मला तेव्हा  कळले.

कोहिनूर जेव्हा बाजूबंध होता तेव्हा असा दिसायचा













आपल्यावर या इंग्रजांनी राज्य केले,आणि आपले सर्व लुटून नेले.आणि आता ते वैभवात आहेत आणि आपला देश मात्र कर्जबाजारी झाला आहे.या विचाराने माझे मन फार खिन्न झाले.खर सांगू मला पुढे त्या टॉवर मध्ये फिरावे पण वाटले नाही.तिकडे तो कोहिनूर सुरक्षित आहे हे मात्र नक्की.

स्पिनेकर टॉवर


गेट  वर सर्व जण जमलो. दुपारी ३.३० वाजताच्या फेरी चे आरक्षण केलेले होते. पण आम्ही जरा लवकरच पोचलो त्या मुळे ३च्या फेरीत जागा मिळाली.परत तोच सुखद अनुभव. आमच्या एका मागून एक ४ गाड्या बोटीवर चढल्या.परत येताना भरपूर गाड्या आणि प्रवासी घेऊन बोट निघाली.या वेळी पण डेक वर गेलो फोटो काढले.विशाल सागराचे डोळे भरून दर्शन घेतले.आता उतरल्यावर पुढचा बेत तयार होताच...

आम्ही सर्व स्पिनेकर टॉवर बघायला गेलो. अगदी फेरी बोटीपासून दहा ते पंधरा मिनिटे अंतरावर होता. त्या ठिकाणी खाली प्रचंड मोठा मॉल आहे.सर्व नामांकित कंपन्याची दुकाने आहेत.तिकडे खरेदीला येणारी लोकांची खूप गर्दी होती.पण मला आवडले ते रोड वर सिग्नल च्या बाजूलाच प्रत्येक ठिकाणी किती व कोठे पार्किंग शिल्लक आहे ते कळत होते.पार्किंग चार्ज तासावर होता.पण सोय छान होती.ते बघून त्या प्रमाणे लोक गाड्या प्रक करत होते. 

आम्ही आता तिकीट काढून स्पिनेकर टॉवर बघायला गेलो.अबब !!!
बाप रे !!!!!!!!!!!!!!!!!किती उंच टॉवर.लिफ्ट ने १०० व्या मजल्यावर. लिफ्ट ला वेग इतका होता कि आम्ही झुमकन वर गेलो.तिकडे गेल्यावर विचार करा ,१०० व्या मजल्यावरून लंडन शहराचे दृष्य किती विहंगम दिसत होते.चारही बाजूने फिरत लंडन लंडन शहराचे दर्शन घेतले.त्या ठिकाणी मधोमध पारदर्शक काच बसवली आहे,त्यातून खाली खोलवर म्हणजे १०० मजले खोल स्पष्ट दिसते.बघवत नव्हते इतके खोल.पण एक वेगळा अनुभव.अजून आणखी एक जिना चढून पण वर जाता येत होते.काही हौशी लोक [त्यात आम्ही पण]वर जाऊन पण खाली बघत होते.वरून सर्व अगदी चिमुकले चिमुकले दिसत होते पण गम्मत वाटत होती.उंच टॉवर बघण्याचा ह माझा पहिलाच अनुभव.लगेच मी अनिकेतला "आपण Paris ला आयफेल टॉवर बघयला जाऊ या" सांगून टाकले.

स्पिनेकर टॉवर बघून झुमकन खाली आलो. आता सर्व खरेदीच्या मूड मध्ये होते.मी थोडी दुकाने फिरले आणि नंतर एका बाकावर विसावले.आता मात्र आमची बच्चे कंपनी कंटाळली होती.त्यांनी सूर लावायला सुरवात केली त्या मुळे जरा वेळेवरच मॉल मधून सर्व लवकर बाहेर पडले.रात्रीच्या जेवणासाठी क्रोयडन मधील इंडियन हॉटेल मधून मागवायचे ,हे एकमताने ८ दिवस आधीच ठरले होते.त्याचे नाव "फुशिया".ते सर्वांचे आवडते हॉटेल आहे.गाडीतून येतानाच फोनवरून ऑर्डर दिली होती.त्या मुळे लवकर जेवण आले.आता सर्व मंजिरी कडे उतरलो होतो.जेवून खाऊन सर्वांनी निरोप घेतला.पुढील विक एंड ला भेटायचे ठरवून सर्व घरी परतलो.४ दिवस कुठे गेले समजले नाही.पण एकंदर खूप मजा केली.रात्री घरी आलो.


सकाळी उठून अनिकेत ला ४ दिवस टर्की ला जायचे होते. परत bag मध्ये सामान भरणे सुरु झाले. मंगळवारी म्हणजे दुसर्या दिवशी मी आणि नंदिनी ने मस्त आराम केला.

Saturday, June 4, 2011

थोर्नेस बे चे तीन दिवस-II

रविवारी सकाळी सर्वांनी लवकर उठून आवरून नाश्ता करून १० वाजता तयार राहायचे ठरले.पण काय! नेहमीप्रमाणे निवांत पणे ११.३० वाजता बाहेर पडलो. परत तसच गाड्या भरल्या पोस्ट कोड दिले, आणि निघालो. जवळ जवळ एक तासांनी आम्ही नीडल्सला पोचलो. सगळीकडे वनश्री नटली सजली होती. वाहने खूप होती रोडवर. सुंदर टुमदार घरे,घरासमोर छान फुललेली फुलझाडे बघत बघत मी जात होते.मधेच वाटेत २ ठिकाणी खूप तंबू ठोकले होते.खूप युरोपियन लोक तंबूत उतरले होते.आम्ही अशा भोसलेची गाणी ऐकत गाडीतून जात होतो.

तिकडे पोचलो अगदी आपल्या चौपाटी सारखी जत्रा होती. खूप देशी माणसे होती.खूप लहान मोठ्यांसाठी खेळ होते.खरेदी खाणे पिणे साठी भरपूर काही होते.विशेष म्हणजे त्या समुद्रातून नीडल्सला जायला फेरी बोट होती पण त्या दिवशी खराब हवामानामुळे ती बंद होती. नीडल्स म्हणजे भर समुद्रात बर्फाचे सुईच्या आकाराचे सुळके.
ते कायम तसेच दिसतात म्हणून बघयला गर्दी. तिकडे बोट फेरी नसली तरी रोप वे सुरु होता. खूप रांग होती पण आम्ही सर्व आळीपाळीने जाऊन आलोच. त्या रोप वे चा अनुभव पण छान आहे,काहीही बेल्ट वगेरे नाही.खाली आल्यावर पटकन बसायचे, समोर धरायला व आपल्याला अडकवायला एक लोखंडी बार,पण अगदी वेग कमी होता,त्या मुले उंच गेल्यावर मजा वाटत होती. खूपच गार हात पाय बोटे गार पडले होते.उतरताना खाली खूप खोल बघवत नव्हते.पण समोर विशाल महासागर दिसत होता.आम्ही दोघी खाली उतरलो नाही.पाण्यात गेलो नाही.तसेच परत रोप वे मध्ये बसून वर आलो.

मागील Amsterdamच्या वेळी वाटणारी रोप वे ची भीती संपली होती. आमच्या जवळ बच्चे कंपनीला सोडून सर्व रोप वे मध्ये गेले.३ जणांना सांभाळताना धमाल येत होती. एकंदर मजा करून हॉंगकॉंग चायनीज खाऊन घरी म्हणजे केराव्हान मध्ये परतलो.घरी येताना रात्र झाली.गारठा खूपच वाढला होता. रात्री पिझ्झा खायचे ठरले होते.सर्व प्रकारचा पिझ्झा व्हेज ,नॉन.व्हेज गारालिक ब्रेंड कोक वर सर्वांनी ताव मारला.लहान मुलांना झोपवून परत पत्ते खेळायला बसलो.अगदी रात्री उशिरा पर्यंत खेळ सुरु होता. उद्या आरामात उठायचे ठरले होते.

घरी जायचा दिवस आला. भराभर सर्वांनी आवरून केराव्हान साफसूफ केले गाड्यातून सामान भरले,येतायेता गारालिक फार्म बघायला गेलो. अजून मी लसुणाची शेती पहिली नव्हती. व्हायळेत रंगाचे लसुनाच्या रोपाची फुले छान दिसत होती. त्या ठिकाणच्या दुकानात रोपापासून ते लोणचे सॉस.तेल लसून भाजायची मातीची भांडी सारें काही विकायला होते. तसेच मागील बाजूस हे सर्व कसे तयार करतात त्याचा माहितीपट सुरु होता.एका मोठ्या त्रेअक्तर मध्ये बसून एक तासाची शेतातून फेरी होती.पण या मुलांनी तुम्ही शेती करणार आहात का?काय करायचे बघून?असे बोलून विषय संपवला. मग आम्ही सर्व त्या गारालिक केंफे मध्ये शिरलो.खरच सांगते कधी न खाल्यासारखा सर्वांनी गारालिक ब्रेंड व टोमेटो सूप वर ताव मारला. इकडे सूप आपल्या कडील भाजीच्या ग्रेव्ही सारखे दाट असते.नंतर परतीच्या मार्गाला लागलो.

खूप युरोपियन लोक फार्म वर आले होते.वृद्ध ,तरुण सर्व काही आरामात मजा करत होते.आता परत एक तास प्रवास करून आम्ही फेरी च्या दिशेने आलो. 

थोर्नेस बे चे तीन दिवस-I

थोर्नेस बे या ठिकाणी पोचलो. रिसेप्शन मध्ये जाऊन या मुलांनी चाव्या आणल्या.५३,६१,६८ हे तीन केअर्व्हान आम्ही आरक्षित केले होते.प्रत्येक केराव्हान मध्ये २/३ बेडरूम होत्या.प्रथम सर्व एका ठिकाणी जमलो,रात्र झाली होती.बच्चे कंपनी बरोबर होती त्यांना प्रथम खाऊ पिऊ घातले शांत केले.त्या नंतर आम्ही बायकांनी बरोबर करून घेतलेले मेथीचे ठेपले खायला सुरवात केली.इकडे मंजिरी पानसे कडे एक नूतन बेन म्हणून जेवण बनवायला बाई येतात.त्यांना ऑर्डर दिली होती.आमच्या घरी सकाळी त्यांनी ताजे ४० ठेपले आणून दिले.त्याचे १५ पौंड घेतले.माझा मनात हिशोब सुरु झाला.४० ठेपल्यान १०५० रुपये.पण ठीक आहे ते लंडन आहे.असे मंशीच म्हणत गप्प बसले.

ही ५ मुले [अनिरुद्ध, अनिकेत,अमोल,रोहित,आणि शाम] बाहेर जेवण आण्याला गेली होती. ते बर्गर sandwich, फ्रेंच फ़्रेइज घेऊन आले. काहीच चवीला ठीक नव्हते. पण पोटाला आधार .मग कोणत्या केर्वाहन मध्ये कोणी राहायचे ते ठरले. मी आणि मंजिरी एकत्र. आमच्या केर्व्हान मध्ये ३ बेडरूम होत्या.अगदी आपल्या रेल्वे च्या बर्थ एवढी झोपायला जागा.त्या मध्ये एक छोटे किचन, हॉलबेडरूम टोयलेट-बाथरूम फ्रीज टी.व्ही, मायक्रोवेव, कटलरी हीटर सर्व काही सुसज्ज होते.एका छोट्या काड्यापेटी च्या आकाराची पण सुसज्ज. बघून मी थक्क झाले. आपण घरी किती पसारा घालतो हे जाणवले. बाहेर च्या बाजूला २ गेंस सिलेंडर हीटर साठी लावलेले होते. रात्री खूप वेळ मी आणि मंजिरी मुलुंड च्या गप्पा मारत बसलो होतो.

सकाळ लवकरच झाली तिकडे पण ४ वाजता उजाडले.कसे तरी करत वेळ घालवत सकाळी ७ वाजता उठलो.बाकीचे सर्व गाढ झोपले होते.उठल्यावर दोघींना प्रथम चहा लागतो.अनिकेत च्या मिराणी म्हणजे शाम ने सकाळीच दुध आणून दिले,चहा साखर बरोबर आणले होतेच.चहा घेत दोघी निवांत गप्पा मारत बसलो,तो वेळ खास होता कोणीच बरोबर नव्हते.त्या मुळे सुख दुःख वाटून घेतली.

जाग आल्यावर प्रत्येक जण आमच्या केराव्हान मध्ये चहा साठी आले,त्यांना खात्री होती इकडे आई काकू चहा करून देणार....चहा नाश्ता ला सर्व एकत्र जमले.आज सर्वांनी केलोग्स खायचे ठरले होते.प्लास्टिक च्या डीश ग्लास चमचे सर्व काही आणले होते.प्रत्येकांनी आपल्या आवडीनुसार केलोग्स घेतले.खाताना पुढचे बेत आखले.

मंजिरी चे गेल्या वेळी राहून गेले होते त्या मुळे या वेळी प्रथम पर्ल म्युझियमला भेट देणे नक्की ठरले. ड्राईव्हर म्हणून कोणीतरी एकानी आम्हा सर्व बायकांना घेऊन जा असे फर्मान काढले.पण बच्चे कंपनीला सांभाळायची तयारी नव्हती.आणि खिशाला किती कात्री लागेल याचा अंदाज नव्हता.अखेर सर्वानीच आवरून तिकडे जायचे ठरले.परत सर्व छान आवरून म्हणजे नवीन नवीन कपडे घालून तयार झाले.गाड्या भरल्या एकमेकांना पोस्ट कोड दिले.निघाले.साधारण गाडीने एक तास लागला असेल.

त्या ठिकाणी गेल्यावर सार्थक झाले असे वाटले.खास एलिझाबेथ राणी साठी मोत्यांनी गुंफून तयार केलेला अंगरखा ,आणि तिचे सर्व मोत्याचे दागिने पाहिले.खरे मोती ,खोटे मोती यांचे विविध प्रकार आणि दागिने विकायला तयार होते.पण खिशाला काहीच परवडणारे नव्हते.त्या ठिकाणी एक सिनेमा दाखवला जात होता,अगदी सर्व मोत्याचा इतिहास...........शिमपल्यातून मोती काढण्यापासून ते दागिने तयार करेपर्यंत सर्व--कोणत्या देशात कोणत्या प्रकारचे मोती बनतात सर्व छान माहिती मिळत होती.विशेष म्हणजे तिकडे शिंपल्यातून मोती कसा काढला जातो त्यावर काय प्रक्रिया करतात ते फक्त एकेकाला १५ पौंड घेऊन दाखवत होते, आम्ही १२ मोठे २ लहान यांनी प्रत्येकांनी १५ पौंड देऊन बघणे काही योग्य वाटले नाही आणि इतकेच काय मुलांच्या मते तो काढलेला एक मोती पण आपल्याला देणार नाहीत. मग बघायचे कशाला?असे म्हणत नाहेर पडलो.बाहेर सुसाट वारा आणि पाऊस.सगळेजण हॉट चोकलेट पीत गाडीत बसलो. कोणाच्याच खिशाला कात्री लागली नाही त्या मुळे मुले खुश होती.परत मोर्चा हॉटेल कडे वळवला

काउनटर वरील त्या युरोपियन माणसाला या सर्वांनी वेडे करून सोडले. प्रत्येकाची खायची आवड वेगळी त्या प्रमाणे डीश आल्या.त्या हॉटेल मध्ये फक्त एक कूक आणि एकच वेटर बाई होती.एकच ऑर्डर घेणार तोच सर्व्ह करणार त्या मुळे सारें कसे निवांत सुरु होते.आम्हाला पण काही घाई नव्हती.गप्पा मारत जेवत होतो.तितक्यात फायर अलार्म वाजला. त्या बरोबर सर्व खायचे सोडून पटापट बाहेर पडलो. इकडे हा प्रकार खूप आहे. मला तर काय झाले कळले नाही. कारण कुठे आग लागलेली दिसली नाही, कि धूर ...पण एक मात्र नक्की कोणीही कटकट न करता बाहेर पडून थांबले होते. काही वेळाने परत आत सोडले अर्धवट जेवण पूर्ण केले.आईस क्रीम खाऊन सर्व जण बाहेर पडलो.आता मात्र सर्व जण केर्व्हान मध्ये जाऊन आराम करू असे एक मताने ठरले. ते पसंद केले.

संध्याकाळी परत सर्व बाहेर पडलो. बीचवर गेलो,फिरलो,कोणी स्विमिंग केले,बागेत थोडा वेळ गेला. रात्री १० वाजता परतलो. रात्री जेवायला मागवले, आज आगदी इंडियन जेवण. जेवून लगेच पत्ते खेळायला बसलो. मी आणि मंजिरी जरा वेळच बसलो. मुले मात्र रात्रभर पत्ते खेळण्यात रंगली होती, बरेच दिवसांनी ते सर्व एकत्र भेटले होते. आणि त्यांना तो निवांत वेळ होता. मुले मस्त खात पीत गप्पा मारत पत्ते कुटत होती. शनिवारचा दिवस संपला.

Wednesday, June 1, 2011

पोर्टसमथ ते आयल ऑफ वाईट

शुक्रवारी सर्वानि४ वाजता सहलीला जायला निघायचे ठरले ,तयारी ला सुरवात झाली.तशी गेल्या विक एंड पासून. Costco मधून खूप सामान घेतले होते,पण ते सर्वासाठी...आता प्रत्येकाची स्वतंत्र तयारी सुरु.

बुधवारी मी मंजिरी अश्विनी बरोबर त्यांच्या खरेदीला गेले होते,तेव्हा मी काही घेतले नाही.पण आता baget कपडे ठेवायला घेणे तयारी सुरु.अनिकेत [एका बेसावध क्षणी] मला म्हणाला तु आणि नंदिनी जाऊन शॉपिंग करून या.लगेच आम्ही त्या दिवशी [मोके पे चौका]दोघी खरेदीला त्या मूड मध्ये बाहेर पडलो. इकडच्या मॉल [विटगिफ्ट सेनटर] मध्ये गेलो. न्यू लूक, इवान्स आणिमार्क्स and स्पेन्सर मध्ये धाड टाकली.माझ्या आवडीनुसार मी नंदिनीला कपडे निवडून देत होते,ती घालून बघत होती,मग घेत होती.तिची खरेदी झाली मग मला पण वाटले आपण पण वेस्टर्न कपडे घ्यावे.घालून बघावे.माझ्या मापाची चक्क जीनची pant मला सहज मिळाली..मग त्या वर कुडते बघयला सुरवात झाली.योगायोगाने अगदी मापाचे कपडे मिळाले.किमत बघत होते,पण तरी घेतले.नंदिनी चा तर मला पूर्ण पाठींबा होता.

ती पण मला एवढ्या भल्या मोठ्या दुकानातून शोधून कपडे आणत होती.खरेदी झाली.आता मात्र माझे पाय दुखू लागले.या देशात मॉल मध्ये बसायला चक्क लाकडी बाके मध्ये मध्ये आहेत.मी विसावले.नंदिनी इतर किरकोळ खरेदी करून आली तोवर बाहेर पाऊस,वारा याने सगळीकडे गारेगार झाले होते.घरी जाताना अनिकेत भेटणार होता,कारण त्याला Tomtom खरेदी करायचा होता. Tomtom म्हणजे गाडी चालवताना रस्ता दाखवणारा बोलका बाहुला.........

मॉल मधून बाहेर पडलो पाव भाजीचे सामान घेतले,व मी ट्राम ने पुढे घरी आले.घरी येताना जरा पंचाईत झाली कारण मी ट्राम stop विचारायला विसरले.मधेच एका stop वर उतरले ओळखीचा भाग दिसत नाही परत वर चढले.ट्राम मधील एक देशी माणूस माझी गम्मत बघत होता पण काही बोलला नाही.अखेर मला stop कळला.मी उतरले.परत प्रश्न आता कोणत्या बाजूला घर?जरा इकडे तिकडे बघून घराचा रस्ता धरला.किल्ली घेऊन दारे उघडली,जमली इकडची सर्व नाटके पण..........

उशीर झाला होता पाय दुखत होते,पण लागले पावभाजीच्या तयारीला.अनिकेत नंदिनी येईस्तोवर करून पण झाली.अनिकेत ला खरेदी दाखवली,आई ने जीन घेतली बघून जरा धक्का बसला पण तो सुखद......

खूप भूक लागली होती थंडी खूप वाढली होती,मस्त गरमागरम पावभाजी खाल्ली.आणि मग baega भरायला सुरवात.तोवर रात्रीचे १२ वाजले होते.मला पटकन झोप लागली,थंडी खूपच होती.

शुक्रवार सकाळी काहीच काम नव्हते.मस्त timepass सुरु होता अनिकेत मात्र ऑफिस चे काम संपवत होता.विशेष म्हणजे बाहेर जायचे ट्रिप ला म्हणून गाडी रेंट वर घेतली होती,ती तो सकाळीच घेऊन आला.खूप दिवसांनी तो गाडी चालवणार होता,खुश होता खूप.४ वाजता सर्व आमच्या घरी जमले,आणि गाडी च्या डिकीत सामान ठेवायला नव्हे कोंबायला सुरवात झाली,कारण सर्व सामान इकडेच होते.१३५ पाणी बाटल्या, १०० वेफर्स पाकिटे, केलोग्स ची पाकिटे,आणि इतर बरेच काही....

अनिकेत ला गाडीची रोज ची सवय नसल्याने त्याची गाडी मध्ये आणि इतर मागे पुढे .असे आम्ही निघालो.गाडी सुरु करताना मी सवयी ने मनातच गणपती बाप्पा मोरया म्हणाले.गाडी सुरु झाली तसा तो tomtom म्हणजे बोलका बाहुला बोलू लागला.इंग्लिश भाषेत बोलणारा पण आवाज मात्र बाईचा...अनिकेत एकटा आणि मी मंजिरी नंदिनी आणि तो बोलका बाहुला,बडबड सुरु.गाणी ऐकणे ,खाणे लगेच सुरु झले.गाडी हाय वे ला लागली.

आपल्या सारखी इकडे रस्त्याला नावे नाहीत.उदा,आम्ही A3 वरून M25 ला आलो.tomtom रस्ता दाखवेल तसे जात होतो.पण गम्मत सांगू का?प्रत्येकाला वेगळा रस्ता तो दाखवत होता.मी आपली अनिकेत ला सतत प्रश्न विचारत होते.प्रत्येकाने पोस्ट कोड एकमेकांना देवून निघायचे असे सुरु झाले होते,पण मध्ये फोन सुरु होते.पोस्ट कोड म्हणजे जायच्या ठिकाणचा पत्ता म्हणजे नंबर.जाताना एका ठिकाणी आम्ही जरा वेळ थांबलो. [टी ब्रेक ]

शुक्रवार आणि इकडच्या भाषेत सांगायचे तर लॉंग विक एंड .त्या मुळे रस्त्यावर खूप रहदारी होती.असंख्य प्रकारच्या गाड्या जाताना दिसल्या,पण एकदाही कोणी कोणाला ओवरटेक केले नाही,कि होर्न वाजवला नाही.कोणीही लेन बदलत नव्हते अगदी शिस्तीने सर्व जात होते,मला आपल्या रोड ची आठवण झाली.एक ही ट्राफिक पोलीस दिसला नाही.कि कुठे अपघात झालेला दिसला नाही,हा बदल आपल्या कडे झाला तर किती बरे होईल ना?

रस्त्याच्या दोन्ही बाजूला छान दाट हिरवीगार झाडी,वेली,आणि रंगी बेरंगी फुले पाहून मन अगदी प्रसन्न झाले.रस्त्यावर जागोजागी केंमेरे लावलेले आहेत.स्पीड साठी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक जण पाळत आहेत,हे फार जाणवले.नियम मोडला तर दंड खूप आहे याचा परिणाम.आणि मुख्य म्हणजे खाबुगिरी नाही.हाय वे वर ४ पदरी रस्ता पण गावातून अगदी छोटे रस्ते पण कुठे अडचण नाही.शांत पणे एक दुसर्याला पुढे जाऊन देतो. फारच समजूतदार आहेत.आणि संस्कार तर खुच आहेत.

अनिकेत खूप वर्षांनी गाडी चालवत होता पण मला एकदाही तसे काही जाणवले नाही तो अगदी confident होता,पण आम्ही च बायका त्याला सतत सूचना देत होता हे मात्र नंतर जाणवले.अखेर प्रवास करून आम्ही २.३० तासाने पोर्टसमथला पोचलो.तिकडे मात्र फेरी बोट चा मार्ग शोधायला जरा फिरावे लागले.कारण इकडे आपल्या सारखे रस्ता चुकला तर गाडी मागे पुढे घेता येत नाही,वळवता येत नाही.त्या मुळे खूप फिरावे लागते,पण तो पण एक अनुभव.अखेर फेरी बोट चा रस्ता सापडला,पण आम्ही ज्या चुकीच्या रोड वर गेलो होतो तो मार्ग Franceला जाणार्या बोटींचा होता,त्यामुळे खप मोठ्या बोटी जवळून बघितल्या.

आम्ही योग्य त्या गेट वर सर्व जमलो.खरच खूप गम्मत वाटत होती. अटलांटिक समुद्रातून आपण बोटीने दुसर्या बेटावर जायचे,मी मस्त मूड मध्ये होते.बघते तर काय समोर वाईटलिंकची प्रचंड मोठी बोट.....या बोटीवर एका वेंळी अंदाजे ८० ते ९० गाड्या चढवल्या. मी अवाक होऊन बघत होते.गाड्या खाली २ मजल्यावर ठेवून आम्ही सर्व प्रवासी वर गेलो.मला सर्व नवीन होते म्हणून मी कुतुहुलाने सर्व बघत होते तिसर्या मजल्यावर हॉटेल आणि आगदी सुसज्ज.
 
सर्व जण खायचा प्यायचा आनंद घेत होते, आम्हीही त्यात मागे नाही हे सांगायला नकोच.किती प्रशस्त सांगू अंदाजे ३०० लोक तर बसतील इतक्या सीट .आणि छान टेबले त्यावर छान फुले आणि भरगच्च मेनू कार्ड.डेक वर गेलो.प्रचंड वारा आणि थंडी होती.तो विशाल महासागर बघताना मी भान विसरून गेले होते.त्या फेसाळणारा लाटा.अनेक होड्या बघतच राहिले.या अथांग महासागरातून बेटावर पोचायला आम्हाला फक्त ३० मिनिटे लागली,पण तो अनुभव खरच विलक्षण होता.जहाजे,बोटी,गलबते बघत जाताना मला स्वातंत्र्य वीर सावरकरांची आठवण झाली.सागरावर आधारित किती तरी गाणी आठवली.मंजिरी एकदा येवून गेली होती त्या मुळे ती मला माहिती देत होतीच.
 
आम्ही फोटो पण खूप काढले.डेक वर थंडी ने गारठलो तोवर बोट लागली कि धक्याला.....मुंबईत इतकी वर्ष राहून अजून मी प्रसिद्ध भाऊ चा धक्का पहिला नाही,पण हा मात्र अगदी जवळून बघत होते.याचे सर्व श्रेय अनिकेतला.....मी बघतच होते एकेका मोटारीत सर्व प्रवासी पटापट बसले.आणि अगदी शिस्तीने एकेक मोटारी बोटीतून बेटावर बाहेर पडल्या.खरच किती छान अनुभव होता.छोटेसे बेत किती सुंदर दिसत होते.परत सर्व एकत्र भेटलो.आणि ज्या ठिकाणचे केंर्वान बुक केले होते तो पोस्ट कोड घेऊन मार्गस्थ झालो.

Thursday, May 26, 2011

दुसरा वीकएंड

शुक्रवार सकाळी ठरले,आज टेस्को ला जायचे.टेस्को एक्स्प्रेस म्हणजे सर्वात मोठा मॉल .म्हणजे अनिकेत च्या भाषेत आपले मस्जिद बंदर.अनिकेत ने ऑफिस चे काम लवकर संपवले.इकडे एक सोय चांगली आहे घरी बसून पण काम करता येते.त्या मुळे रोज प्रवासाची दगदग नाही.आणि जास्त वेळ थांबावे पण लागत नाही.

आम्ही ४ वाजता निघालो.आज माझी चतुर्थी होती,त्यामुळे ते दोघेही साबुदाणा खिचडी वर होते.डबल डेकर बस ने जाताना अनिकेत मला त्या भागाची महिती देत होता.जुने पुणे तसे हे जुने लंडन.तिकडची घरे खरच सुरेख होती.सर्व घर्समोर फुलझाडे गुलाबाला तर सध्या जास्त बहर आला आहे.उंच ५ फुट चांगली गुलाबाची झाडे आहेत.पणे दिसत नाहीत,फुलांनी डवरलेली झाडे बघून अगदी दिल खुश.

टेस्को ला बस ने पोचलो.एक भली मोठी trolly घेतली.व प्रवेश केला.मी इकडे बिग बझार ,डी मार्ट मध्ये कधी सामान आणायला जात नाही.रिक्षाने जायचे,आपण सामान उचलून आणायचे,आणि महत्वाचे म्हणजे आवश्यक सोडून इतरच खूप घेतले जाते.त्या पेक्षा आपला वाणी बारा.....असे माझे मत झाले आहे.पण परदेशात छोटी दुकाने नाहीतच,पर्याय नाही.ती दोघे भराभर सामान घेत सुटली.मला योगर्ट आवडले कळल्यावर अनिकेत ने वेगवेगळ्या चवीचे ४ डबे घेतले.बाप रे!!एवढे कशाला???म्हणालेच ....खा,ग आई....तु भी क्या याद करेगी? झालाच dialog .पार्टी साठी पनीर,मायक्रोनी,चीज ,पुडिंग, icecream ,कोक ज्यूस, दारू पासून सर्व काही घेतले.जवळ जवळ ३ तास फिरत होतो.इतके मोठे टेस्को आणि तेथे अगणित नवीन उत्पादने मी पहिली..

गंमत म्हणून सांगते भाजीपाला विभागात गेले मी,आणि अनिकेत साठी आवडीची कोबी भाजी छान हिरवीगार दिसते म्हणून घेतली,चष्मा नही लावला.नाव नाही वाचले,आणि लेट्युस घेऊन आले.अनिकेत ला बघून शंका आलीच,त्याने मला लगेच माझी चूक सांगितली.आणि लगेच पांढराशुभ्र दगडासारखा वजनाचा कोबी दाखवला,घेतला नाही मी ते खरे सांगायला नकोच......

ब्रोकली ,सालेडची अजब रंगही पहिले.सर्व खरेदी करताना trolly तुडुंब भरली.आता रात्रीचे आठ वाजले होते,पोटात कावळे ओरडू लागले,उपास होता ना माझा....नाहीतर तिकडे खायची पण चंगळ होती.सोमवार ते शनिवार इकडे मॉल रात्री ९ पर्यंत सुरु असतात.रविवारी मात्र २ वाजता सर्व बंद.....घरी येताना taxi मागवली,२ मिनिटात हजर.घरी सुखात परतलो.उपास सोडायला वरण भात,अळूची भाजी,पोळी.असा बेत केला.हापूस चे आंबे होतेच.अगदी उत्तम प्रतीचे आंबे इथे मिळाले.घेतले.पण खरच सांगते मनातून राग आला.आपल्या देशात पिकून आपल्याला मिळत नाही आणि या युरोपियन लोकाना............

भूक खूप लागली होती,पोटभर गप्पा मारत जेवलो.या हवेला भूक जरा जास्त लागते,हे नक्की.

शनिवारी सकाळी आरामात उठून नाश्ता केला,त्या नंतर लगेच रात्रीच्या पार्टी ची तयारी सुरु.मी मात्र या वेळी नंदिनी ची हेल्पर होते.माझ्या कडे कामाला असलेल्या शीला ची मला त्या वेळी आठवण आली.शेवटी मी गरमागरम पोळ्या करत होते,तितक्यात फलटण हजर झाली.ते पण असेच सर्व [पानसे]दिवसभर फिरून आले होते.त्यांना आधी चहा केला,गप्पा चेष्टा मस्करी ला काय लगेच सुरवात झाली.शेव पुरी ने सुरवात आणि डेझर्ट ने पार्टी ची सांगता झाली.किती वेळ ते काही सांगत नाही..........

भांडी घासायला जास्त नको म्हणून पेपर प्लेट ग्लास वापरले.या पार्टी ला खास मंदार देशपांडे पण आला होता.त्याने मैफलीला आणि रंग चढला.भाग्यश्री नाही हे मात्र सतत सर्वाना जाणवत होते.अक्षरा ,माही,आयुष बच्चे त्यांच्या दुनियेत होते आणि मोठे त्यांच्या दुनियेत.एकंदर धमाल सुरु होती.माझ्या साठी खूप छान फुलांचा बुके पानसे सर्व घेऊन आले होते,त्याने घराची शोभा आणखी वाढली.फुले नेणे,किवा वाईन नेणे ही इकडची पद्धत.आहे.शेवटी पत्ते खेळताना सकाळी नाश्ता करायला परत चेन्नई डोसा मध्ये जायचे बेत ठरला.आता या वेळी मंदार साठी जायचे होते,नवीन जागा काही समजली कि तिकडे सर्वांनी गेलेच पाहिजे हा या मुलांचा अलिखित नियम आहे.सर्व वेळेवर उठून १०.३० ला चेन्नई डोसा ला हाजर. इकडे ही मुले कधीही उडपी हॉटेल मध्ये गेली नाहीत,पण इकडे मेदू वडा,इडली डोसा यावर ताव मारताना मी पहिले.मला वाटले आता घरी जायचे असेल,कसले काय?लगेच बेत ठरला costco ला जायचे.गाड्या काढून सर्व फलटण निघालो.

मंदार च्या गाडीत मी मंजिरी आयुष आणि नंदिनी होतो.आता मंजिरी इकडे चांगलीच रुळली आहे जाणवले.समधान वाटले.मंदारला रस्ता ती दाखवत होती.वाटेत गप्पा सुरु होत्या,आयुष चे प्रश्न सुरु होते.या मुलांचे जनरल शिक्षण जास्त होते हे जाणवले.तिकडे पोचलो तर काय भरपूर गाड्या आल्या होत्या.त्या costco मध्ये सभासदांनाच प्रवेश मिळतो.अनिरुद्ध पानसे एकटा सभासद आणि आम्ही त्याच्या बरोबर किती माहित आहे का????????दहा मोठे,३ लहान .

परत खरेदी ला सुरवात.आता इकडे मात्र म आणि मंजिरी जरा वेळ स्वतंत्र फिरलो,जरा खास गप्पा मारल्या.घाऊक दरात इकडे सर्व वस्तू मिळतात.त्या मुळे किमती बघून चर्चा करून या मुलांचे घेणे सुरु होते.पुढील विक एंड ला सर्व ट्रिप ला जाणार आहोत त्याची खरेदी केली.अगदी चोकलेट पासून टिशू पेपर पर्यंत..अक्षरा trolly मध्ये बसून मस्त इकडे तिकडे बघत हसत होती.सर्व काही एका ठिकाणी मिळते त्या मुळे भरपूर लोक होते.स्वस्त मिळते म्हणून खरेदी पण खूप केली.या सर्वांनी मिळून ४/५ trolley भरून सामान घेतले.ट्रिप ची जय्यत तयारी.

अखेर येताना परत एक सामान खूप झाले म्हणून taxi केली.सर्व आमच्या घरी आलो.आता मात्र मी खूप फिरून दमले होते.मंजिरी ने सर्वाना मस्त कडक चहा केला.येताना क्रोझान [ब्रेंड चा एक प्रकार]आणले होते.सर्वांनी मिळून फस्त केले.जरा वेळ timepass करून सर्व आपल्या आपल्या घरी गेले.तोवर माझी हलत खराब झाली होती खूप पाय दुखत होते,विश्रांती घेतली.रात्री कालचे पार्टी चे राहिलेले गरम करून खाल्ले आणि लवकरच झोपलो,असा फुल बिझी हा विक एंड गेला.

सरे मार्केट

पहिला वीकेन्द संपल्यावर लगेच दुसर्या वीकेन्द चे बेत झाले या शनिवारी रात्री सर्व जण आमच्या कडे जेवायला येणार ठरले.मी आणि नंदिनी रोज कुठेतरी फिरायला जात होतो.पण खास गुरुवारी सरे मार्केट ला गेलो.पहिले काम म्हणजे माझा मोबाईल सुरु करायचा.आपल्या सारखी तिकडे जिकडे तिकडे मोबाईल ची दुकाने नाहीत.भल्या मोठ्या रस्त्यावरील एका दुकानात गेलो.इकडे अजून orange आणि vodaphone स्वतंत्र आहेत.त्या दुकानात निग्रो माणूस होता.त्याच्याशी नंदिनी बोलत होती,मला मात्र त्याचे बोलणे अगम्य होते.मी दुकानात handset बघत फिरत होते.नंतर sare मार्केट मध्ये गेलो.अगदी आपल्या कडे रस्त्यावर असतात तसे भाजी ,फळे विकणारे लोक होते.सर्व भारतीय आणि युरोपियन भाज्या फळे मुबलक प्रमाणात विकायला होती.इकडे केळी वजनावारच मिळतात.तीआम्ही प्रथम घेतली. कारण अनिकेत ला शिकरण [माझ्या हातची]खूप आवडते.आपल्या कडे मार्गशीर्ष गुरुवार च्या दिवशी असतात तशी फळे लहान टोपली तून विकायला होती.सर्व फळे ताजी तजेलदार आणि रसरशीत.आम्ही चेरी खूप छान होत्या त्या घेतल्या.इतर फळे घरी होतीच.आता नेहमीच्या भाजी वाल्याकडे गेलो.तो म्हणे भांडूप चा आहे..त्यांनी लगेच आम्हाला संजय पाटील[खासदार]पुढच्या आठवड्यात इकडे येणार ही बातमी दिली.जसे काही आम्ही त्याचे शेजारीच.

थोड्या आवडीच्या भाज्या घेऊन निघालो.चालताना सहज वर्जिन gym दिसले.लगेच शिरलो तिकडे.नंदिनी ला चौकशी करायची होतीच.तिकडची गोरीपान जेरी [शिकवणारी स्त्री]आली आणि तिने आम्हाला सर्व विभाग दाखवले.माहिती दिली.इकडे पुरुष स्त्रिया यांना स्वतंत्र पण जागा आहे,हे सांगितले.नाहीतर इकडे एकत्रच असते.[परदेशात]खूप छान महिती दिली.तिचे बोलणे सर्व नाही पण बरेच समजत होते.प्रतिसाद देणे इतके.आता मात्र फिरून खूप झाले होते.आम्ही दोघी kfc मध्ये आलो.नंदिनी ला मला popcorn चिकन खायला घालायचे होतेच.चोकलेट मिल्क शेक पण घेतला.निवांत गप्पा मारत बसलो.जाताना तिकडे ट्राम ने गेलो पण येताना चालत येणे पसंद केले.

Thursday, May 19, 2011

पहिला वीकएंड

अश्विनी आल्यावर परत आम्ही सर्व एकत्र जेवलो.त्या नंतर अनिकेत अमोल कामावर गेले.मी नंदिनी आणि अश्विनी कटी तरी तास सोफ्यावर बसून गप्पा मारत होतो.एकदाच्या सर्व लोकांना या मुलीच्या भाषेत कुटून काढले.एकीकडे अश्विनी अक्षराची काळजी घेत हती.तिला खाऊ पिऊ घालत होती.एकट्या मुली रहिल्या कि त्यांना लहान मुलांचे संगोपन चांगले जमते,याची परत एकदा जाणीव झाली.

नंतर आम्ही बाहेर पडलो. अचानक मंजिरी कडे जायचा बेत ठरला.त्यावेळी मी लगेच खाऊ आणि खरेदी केलेल्या वस्तू पिशवीत भरल्या,सर्व गिफ्ट पण मंजिरी कडे जाताना बस stop पासून थोडे अंतर चालत जावे लागते.इकडचे विशेष म्हणजे सरळ सपाट भाग नाही. रस्त्यावरून थोडेसे चढावावर चढून जावे लागते.उंच सकाळ भाग खूप आहे.मंजिरी च्या घरची बेल वाजवली.गेट उघडून दारापर्यंत १०/१५ पायर्या उतरून जावे लागते.दोन्ही बाजूला छान वेळी फुलझाडे बघून बंगल्याची कल्पना आली.मंजिरी चे घर किती प्रशस्त आहे सांगू?तळ मजल्यावर मोठे २ hall, किचन,डायनिंग रूम,व पाठीमागे डेक खाली मस्त गवत हिरवेगार,फुलझाडे,फळझाडे मस्त,पाठीमागे मोठे गेरेज आणि स्टोर रूम.

पहिल्या मजल्यावर ३ बेडरूम.आयुष ची रूम मला जास्त आवडली.किती पुस्तके इतक्या लहान मुलाकडे गोष्टीची.बाप रे!तो रोज वाचत झोपतो.सवय छान ना लहान पानापासून वाचनाची.त्या नंतर मंजिरी च्या बेडरूम मध्ये बसून आम्ही दोघींनी हितगुज केले.लवकरच ४ दिवस तरी एकत्र राहायचा बेत केला.त्य नंतर दुसर्या मजल्यावर भली मोठी गेस्ट रूम.१० पाहुणे आले तरी काही अडचण नाही.असे छानसे घर पाहून मला अनिरुद्ध चे खूप कौतुक वाटले,आणि समाधान....माही,अक्षरा,आयुष यांच्याशी खेळण्यात कुठे वेळ गेला कळले नाही.

रात्री तिकडे जेवून यायचे ठरले,अनिकेत अनिरुद्ध घरी आल्यावर गप्पा ना अधिक रंग चढला.खूप दिवसांनी पानसे छत्रे एकत्र जेवताना भाग्यश्री ची कमी जाणवली,पण मजा आली.रात्री घरी यायला माझा पाय निघत नव्हता .पण उद्या भेटू ठरवून निघाले.आता रात्री मात्र मला खूप झोप आली होती,आणि दमले पण खूप होते.बडबड न करता,टी.व्ही न पाहता झोपून गेले.

सकाळी उठयावर छान ताजे तवाने वाटत होते.इकडे समर मध्ये सकाळी ४ वाजता उजाडते,समर कसला ??दिवसा १५ ते १७ degree तापमान आणि रात्री १०.मला तर थंडीच वाटते.मुंबई चा उकाडा त्यातून मी इकडे आलेली.सकाळी आम्ही युरोपियन पद्धतीचा चांगला तगडा नाश्ता केला,[sandvich], अंडी,चीज,salaed सर्व शरीरासाठी वजनदार गोष्टी] अनिकेत mittingला आम्ही दोघी mall मध्ये जायला बाहेर पडलो.तिथे आपल्यासारखीच जत्रा होती.असंख्य दुकाने,वेगवेगळे सेल लागलेले,सर्व दुकानात फोरून पायाचे तुकडे पडले.मग जरा mcdonald मध्ये विसावलो.मग पुन्हा फिरस्ती सुरु,अखेर एका दुकानात नंदिनी ने खरेदी केली.त्या नंतर parlour मध्ये गेलो.

इकडे गुजराथी आणि पंजाबी लोक खूप व्यवसाय करतात नंदिनी ने माहिती दिली.इकडे ३ पौंड मध्ये आयब्रो करून मिळतात.मी आपले भारतीय रुपयात २१० रुपये असे मनाशीच म्हटले.पण इकडे एक गोष्ट लक्षात आली,सर्व जण एकत्र भेटले कि कुठे काय केवढ्याला मिळते याची चर्चा करतात.आपल्यकडे तसे होत नाही.भाव इकडे सर्वा ठिकाणी सारखे नसतात.आपल्याकडे फरक असतो पण फारसा नाही.असो.खूप फिरून पाय दुखू लागले.घरी परतलो.विश्रांती घेतली.आम्हला परत रात्री अनिकेत च्या मित्राकडे पार्टी ला जायचे होते.

आता मात्र बाहेर गारठा वाढला होता.झोंबरा वारा खूप होता,पण आवरून निघालो.मला न्यायला अनिरुद्ध आला इतके बरे वाटले.आता चालायची खरच ताकद नव्हती. सर्व एकत्र जमून timepass सुरु.पंजाबी सामोसे,आणि ज्यूस ने सुरवात झाली.इकडच्या पद्धती प्रमाणे आम्ही बायकांनी आधी जेवून घेतले.नंतर पुरुष,खरच बरे वाटले.नाहीतर आपल्याकडे बायकांचे जेवण चुलीत!!या म्हणी प्रमाणे होते.खरच प्रगत देशातील बदल चांगला वाटला.जेवून खाऊन गप्पा मारून रात्री उशिरा घरी परतलो.मुंबई सारखी रहदारी होती.

पार्टी कसली ते सांगायचे राहिलेच कि....मित्राचा मुलगा एक वर्षाचा झाला त्याची पार्टी.आपल्या मुलुंड च्या ४ पटमोठे इकडे एक खेळण्याचे दुकान आहे.० ते १४ वयाच्या मुलामुलींची खेळणी पाहून वेड लागायची वेळ आली होती.एक वर्षाच्या मुलाला काय घ्यावे या बद्धल एक मत झाले आणि आम्ही एक सोफा ची असते तशी खुर्ची घेतली.मस्त pack केलेली.पण त्याला गिफ्ट pack करून देत नाहीत.म्हणून एक भला मोठा पेपर घेतला.मला तिकडे वाल्स ice क्रीम दिसले.अरे आपल्या कडचे इकडे असे वाटले,पण तेव्हा कळले कि ते मूळ इकडचे..

रविवार सकाळ सर्वांनी नाश्ता आणि जेवण या मधील म्हणजे ब्रंच करायचे ठरले,ते सुद्धा चेन्नई डोसा मध्ये.सर्व म्हणजे १२ जण .फोनाफोनी झाली.अनिकेत चा मित्र तिकडे १०.३० ला पोचला.त्या वेळी पानसे छत्रे घरी निवांत होते,तिकडे गेल्यावर समजले त्याला कि आज दुकान उघडणार नाही,परत फोनाफोनी सुरु.मग tutin [एक भाग]ला जायचे ठरले.परत श्याम मला घ्यायला आला.अनिरुद्ध चा तो खरा मित्र,त्याच्या सारखाच शांत,समंजस.आम्ही तिकडे पोचलो.पण तिकडे पण दुकान बंद..मला एकदाची आठवण आली,शिव सेना /म.न.से.कोणीतरी बंद पुकारला कि कसे होते तसे वातावरण होते.इकडे पण सर्व दुकाने दुपारी २ वाजता रविवारी बंद होतात.काही ठराविक बार,पब,दुकाने असतात सुरु.जसे आपल्याकडील २४ तास मेडिकल स्टोर सारखे.अखेर एका चेन्नई डोसा मध्ये गेलो.उडपी पदार्थ सर्वांनी आवडीने खाल्ले.सोबत mango लस्सी ,कॉफ्फी .

आता पेटपूजा झाल्यावर खरेदी ,भाजीपाला किराणा,आंबे,फळे सर्व....आंबे तर सर्वांनी घेतलेच.इकडे सर्व भाज्या फळे मिळतात,अगदी भाजीचे आळु पण.नारळ वड्या करायला नारळ,चिवडा चे सामान मी लगेच घेतले,कारण या वेळी करून आणले नव्हते.सर्व आमच्या घरी आले,परत चहा पाणी गप्पा,आणि पुढील बेत सुरु.शनिवार रविवार स्कॉट लंड ला जायचं बेत ठरला.आरक्षण सुरु.तिकडे पण सर्व १२ मोठे आणि बच्चे कंपनी .

बाकी सर्व घरी गेले,अश्विनी अमोल अक्षरा थांबले होते.मी गरमगरम पोळ्या केल्या,नंदिनी ने भाजी केली.सर्वांनी ताव मारला.त्या विकतच्या पोळ्या खाऊन खरच ही मुळे कंटाळली आहेत,gas शेगडी नाही इकडे हॉट प्लेट वर थोड्या पोळ्या कडक होत आहेत,जमेल हळू हळू.तो पण एक अनुभव.