Tuesday, October 13, 2009

             दिवाली पुर्वीच शनिवारी इकडे एका मॉल मधे दिवाली कार्यक्रम झाला.मी अगदी उत्सुकतेने पहायला गेले होते.शालेच्या सा.कार्यक्रमा प्रमाणे फक्त नाच होते विविध प्रकारचे.काही छान पोशाखात तर काही नेहमीचे कपडे घालून.हे विशेषतः जीन्सची पेंट अणि टी शर्ट घालून भांगडा करताना जाणवले.तिकडे बरेच स्टाल होते.खायचे अणि इतर वस्तुचे.आपल्याकडील फन-फेअर सारखे वातावरण होते.बहुतांशी लोक खाणे आणि गप्पा मारत टाइमपास करणे यात मग्न होते.काही लोक खरेदी करत होते,पण प्रमाण कमी.छान कापडी आकाश कंदील मला तेथे दिसले,आवडले.
          महत्वाचे काय तर बाजु च्या तंबूत को़क टेल पार्टी सुरु होती.आपल्याकडे जशी थंड पाणी ,सरबत ची गाड़ी असते ना तशी बियर ची गाड़ी तेथे होती.कारण पान्यासारखी प्यायची ना?तरुण मुले अगदी धुंद होती,बियर पीत .सर्व भारतीय बर का?
        महाराष्ट्रियन लोक कमी दिसले.ब्राह्मण तर नाहीच.पण दक्षिण भारतीय,गुजराथी ,पंजाबी भरपूर होते.शहरात फिरताना फारसे कुठे दिसत नाहीत.इथे मात्र खुप भारतीय होते.काही यूरोपियन पण या कार्यक्रमाला आले होते.आनंद घेत होते.ठेका धरून नाचत होते.आपल्या मुलाना भारतीय संस्कृतीची ओळख करून देत होते.
      शेवटी फटाक्यांची आतशबाजी होती.
             स्विस ट्रिप छान झाली.आता परत रोजचे जीवन सुरु.संध्याकाळी खुपच बोअर झाले म्हणुन एकटीच फिरायला बाहेर पडले.आज एका लहान मुलांच्या पार्क मधे गेले.छोटी छोटी गोरी गोमटी यूरोपियन मुले मस्त बागेत खेलत होती.घसरगुंडी,झोपाले ही साधने होतीच.काही मुले सायकल [३ चाकी],तर काही विंटर मधे बर्फावर चालायचे स्लाय्डिंग पैड घेउन आले होते.मातीत तर अगदी छान खेलत होती.हे साम्य दिसले.मुलाना घेउन आलेल्या त्यांच्या माता मैत्रिनिशी गप्पा मारत आरामात बसल्या होत्या.अगदी ४/५ वयाच्या २ मुली सायकल घेउन चक्क गेट च्या बाहेर गेल्या.मी हे सारे एकटक बघत होते.वाटत होते,त्या मुलीना परत बागेत घेउन यावे.पण माझी भाषा त्याना कशी समजणार?रस्ता चुकल्या तर ?हरवल्या तर?मनात विचार सुरु झाले.काही वेळाने एक पॉश [टकाटक]माता उठली.तिने अगम्य भाषेत त्या मुलीना बोलावले,[आधी शोधले मग]रागावने ,ओराड़ने.काहीही नाही.धपाटा तर दुरच.!!!!!!!शांतपणे बोलावले आणि ते परत गप्पा मारत बसली.मुलांचे मानस शास्त्र असे जपतात का या माता???इकडची मुले रडत का नाही??हट्टी पणे का वागत नाहीत??????या प्रश्नाची उत्तरे मला मिळाली.मला इकडे येवून एक महिना झाला.रोज ठराविक रोड वरून ये जा मी करते.झाडे जी आधी हिरवी गार दिसत होती.त्या झाडांची पाने रंग बदल झाला आहे तर काही झाडांची पाने गलून खाली पडत आहेत.विंटर ची सुरवात आहे.

Monday, October 12, 2009

          आपल्याकडे टूर [ट्रिप]ठरवून प्रवासाची सर्व सोय व्यवस्था करणार्या भरपूर ट्रेवल कंपनी असतात.उदा.सचिन,केसरी.पण इकडे अशी सोय नाही.सर्व आपले आपण करायेचे.विमान,रेल वे,होटल बुकिंग.प्लान करणे ,प्रेक्षनीय ठिकाने बघणे जाणे येणे मार्ग बघणे.सर्व काही स्वतः नियोजन करावे लागते.नकाशा आणि टाइम टेबल याचा उपयोग प्रवाशाना सतत करावा लागतो.अनिकेत नंदिनी ने प्लान परफेक्ट केला होता.त्या नुसार आम्ही ४ दिवसात बरेच काही बघू शकलो.सामान किती ?काय ते सर्व शिस्तीत .त्यामुले प्रवास अगदी सुखकर......
         अशी झाली आमची स्विस ट्रिप,तुम्हाला पण  आवडली ना??????????
             आज परतीचा प्रवास होता.स्विस वरून निघावे असे वाटत नव्हते.ब्रेक फास्ट करून निघालो.आधी ग्लेशियर एक्सप्रेस ने जायचे होते.ती गाड़ी ३ ट्रेन बदलून मग होती.स्टेशन वर स्विस एअरलाइन चे सामान घेतले जात होते पण ४० फ्रँक जास्त देवून.दिले कारण त्यामुले सामानाचे ओझे कमी झाले.त्या दोघाना सुट्सुतित चालताआले.नंतर आम्ही ३ गाड्या बदलून त्या ग्लेशियर एक्सप्रेस मधे बसलो.खरे तर दमलो होतो,पण काय विशेष आहे या गाडीत?आतून कशी असेल उत्सुकता होती.गाडीला मोठमोठ्या काचेच्याच खिडक्या,छताला पण काचच.पडदे नाहीत ,निसर्ग सौन्दर्य पाहण्या साठी.टाइमपास करण्या साठी खास गाड़ी.सर्व प्रवास मार्ग डोंगरा मधून.सिट समोर समोर ४ जन आरामात बसता येतील अशा.मधे मोठे छान फोल्डिंग टेबल.टेबल क्लोथ पण ....गाडीत मस्त सुसज्ज रेस्टोरंट.क्रिकेट कॉमेंट्री प्रमाणे गाडीचे ,प्रवासाचे वर्णन सुरु होते.प्रवासी मस्त गप्पा गोष्टी करत,टाइमपास करत,यथेच्छ दारू पीत प्रवास करत होते.इथे पण स्त्रिया मागे नाहीत बर का??????फक्त सर्व गाड्या तुन स्मोकिंग ला बंदी होती.तेवढे तरी बरे!!!नाहीतर इकडे स्त्रियाच जास्त धुम्रपान करताना मी पाहिले.जानूँन घेतले तर कशा साठी??????स्लिम रहायला .त्यानी म्हणे भूक मरते.अजुन बारीक़ होण्यासाठी हा उपाय करताना मी तरी कोणाकडून एइकले नाही.
                   या गाडीतून निसर्ग सौन्दर्य छान दिसत होते,पण ४ दिवस सतत तेच बघून कंताला आला होता.आपली सहज प्रवृति नाही का?सतत काही तरी नवे हवे!!!!!गाडीत आमच्या जेवणाची बोम्ब होती.कारण त्यांचे नॉन.वेज प्रकार भयानक होते.आम्ही बरोबर घेतलेले खात टाइमपास केला.शेवट च्या दिवशी त्या गाडीत तब्बल ४.३० तास बसणे,जरा बोअर होते.पण काही मार्ग नव्हता.या गाडीने आम्ही चूर ला आलो.तिकडे दूसरी गाड़ी पकडून आम्ही झुरिक विमान तलावर आलो.हे विमान तल माझ्या साठी नविन होते.शिपोल पेक्षा ५ पट मोठे होते.सर्व प्रकारची भरपूर दुकाने होती.थोडा वेळ टाइमपास केला.चहा घेउन,चे़किंग करून आत जाऊँन बसलो.आता दिड तास प्रतीक्षा विमानाची..विमान वेळेवर बोर्ड झाले पण प्रवासी आले नव्हते.त्यामुले १५ मिनिटे उशीर झाला पण अखेर आकाशात झेप घेतली.आज मात्र विमानात २ छान गोड मुली एयर होस्टेस होत्या.त्या दिवशी सारखेच चीझ जूस चोकलेट सर्व .कारण तेहि स्विस ऐर्वेज चे विमान होते.अखेर आम्ही १०.४० ला शिपोल विमान तलावर उतरलो.पण सामान मिलायला थोडा उशीर झाला.आता मात्र ट्रेन,बस ने जाण्याची ताकद नव्हती.अनिकेत ने टैक्सी ने जायचे ठरवले,थोड़े खर्चिक होते पण...केली.टैक्सी कोणती?तर मर्सिडीज गाड़ी.अनिकेत ने मला विचारले,''आई तू मर्सिडीज गाडीत बसली आहेस ,कलले का?'लगेच हो तर सांगितले.पण लगेच तू आता अशी गाड़ी घे ,मला आवडेल त्यातून फिरायला असा सल्ला पण दिला.घरी आलो.शेवटी आपले घर ते घरच.......घरी मस्त वरण भात करून जेवलो.फोटो बघत ते दोघे बसली होती,पण मी काही त्यात रस घेतला नाही,दमले होते झोप प्रिय होती.
                      सकाळी उठून आवरून तिघे तयार झालो.आज ब्रेक फास्ट करून बाहेर जायचे ठरले होते.पोटभर ब्रेक फास्ट करून आम्ही स्टेशन वर पोचलो.पिलातुस ला आम्ही २ ट्रेन बदलून गेलो.गाडीत पत्ते खेलत होतो.गोल्या चोकलेट टाइमपास खात होतो.मजा करत होतो.इकडे पण डोंगरावर जायला केबल कार होती.पण खुप वेळ म्हणजे ४० मिनिटे लागणार होती.सीटवर बसून सृष्टि सौन्दर्य बघत होते.आता त्या गाडीची माहिती झाली होती,पण इतका वेळ जरा जास्तच.अवघड वलने घेत गाड़ी जात होती.ट्रेकर बाजूने चालताना दिसत होते.२५ लोक जा ये करू शकत होते त्यातून.डोंगरावर केबल कार हे जणू वाहतुकीचे साधन आहे इकडे.
                   आज मात्र मी खुप दामले होते,पाय सुजला होता,जड़ झाला होता.तरी पण पिलातुस बघायला गेले होते.तेथे उंचावर पायर्या चढून मात्र गेले नाही.बाकावर बसून लोक ये जा करत होते गम्मत बघत बसले होते.परत येताना खरी धमाल होती.येताना गंद्वोला ने यायचे होते,त्यात ते हलू हलू फिरत असताना बसायचे होते,बसले....आम्ही तिघे जन त्यात होतो.ते स्वतंत्र असते केबल ला लटकलेले.सुरु झाल्यावर मला जरा भीती वाटली.वेग जास्त नव्हता.पण तरंगते होते.खोल खाली समोर दाट झाडी दिसत होती.वायर तुटली तर?????शंका मनात येत होत्या,पण शांत बसले.जवळ जवळ ५० मिनिटे त्याला खाली पोचायला लागतात.हा अनुभव पण थ्रिल होते,गम्मत,मजा वाटली.नंतर बस ने आम्ही लुझेन ला आलो.बर्गर किंग मधे गेलो,बर्गर,फ्रेंच फ्रैएस ,कोक युरोपियन  पद्धति चे जेवलो.नंतर शहरात फिरायला सुरवात केली.मोठमोठे तलाव आणि बदके पाहून झाली होती,इकडे बगले,राजहंस पण दिसले.१८६० साली बांधलेला चैपेल ब्रिज पाहिला.सम्पूर्ण लाकडी बांधकाम आणि सजावट करीता आकर्षक चित्रे लावली होती.तलावावर ब्रिज मात्र तिरका का बांधला आहे ?हे समजले नाही.ब्रिज वर या टोकापासून त्या टोकावर लोकानी फक्त चालत जायचे.एकही विक्रेता या ब्रिजवर नाही हे विशेष !!!!!!
                लुझेन मधील आणखी एक ठिकाण....सिंह झोपलेला,आणि शस्त्रास्त्रे बाजूला.ढाल तुटलेली असे शिल्प खुप मोठ्या दगडात कोरलेले आहे.लढाई च्या वेळी अनेक सैनिक मारले गेले,त्यांच्या स्मरणार्थ हे शिल्प आहे.एका अखंड दगडात कोरलेले शिल्प खर्च अप्रतिम आहे.आजुबाजुला छोटी मोठी दुकाने आहेत,पण खायचे पदार्थ ,पानाची चहा ची टपरी असे काही नाही.
                धावत पळत परत जायला गाड़ी पकडली,कारण ते थेट ट्रेन होती.२ तासाने इंतर्लाकन वेस्ट ला पोचलो.होटल जवळ होते.आता मात्र मी फार थकून गेले होते,वेदना खुप होत होत्या गोली घेतली ,आणि फक्त विश्रांति.माझ्या पायाचे तुकडे पडले होते,ते दोघे शोपिंग ला गेली.उद्या सकाळी होटल सोडायचे होते.म्हणुन कपडे भर,पसारा आवर अशी कामे केली.आज पण परत ताज मधेच जेवायला गेलो.या होटल मधे बार कॉर्नर होता.काल ,आज पण साधारण माझ्या वयाची एक यूरोपियन स्त्री एकटी येवून मस्त पीत बसली होती.या देशात काहीही चालते ,केले तरी/आपल्याकडे एकटी बाई असे काही करू शकत नाही.आणि केले तर समाज,घरातील लोक तिला सुखाने आयुष्य जगु देत नाहीत.दारू पिणे असे नाही ,कोणत्याही गोष्टीत तेच  असते असे माझे तरी स्पष्ट मत झाले आहे.असो!
                ताज होटेलची आठवण म्हणुन फोटो काढले आणि रूमवर परत आलो.उद्या सकाळी थोड़े उशिरा निघायचे होते.सर्व आवरून झोपलो....

Sunday, October 11, 2009

             धब धबे पाहून झाल्यावर हाताशी थोडा वेळ होता ,लगेच क्रुझ सफर करू या ठरवले.आणि इन्तेरलाकन ओसत ला आलो,एक बोट नुकतीच गेली होती.त्यामुले ४० मिनिटे गप्पा मारत टाइमपास केला.अनिकेत ने जाऊँन ग्लेशिएअर एक्सप्रेस ची तिकिटे काढली.मोठ्या सुसज्ज बोटीचा अनुभव पण प्रथमच.बोटीत वर बसावे विचार करून चढलो.पण आम्हाला परत खाली यावे लागले,कारण तो फर्स्ट क्लास साठी होता.बोटीत पण सगलीकडे मस्त कारपेट होते.३०० लोक बसू शकतील अशी सोय होती.गार वारा,थंडी याचा त्रास नको म्हणुन बंद रेस्टोरंट होते.काचेतून सृष्टि सौन्दर्य बघता येत होते.इथेही लोक आरामात बियर घेत टाइमपास करत होते..कारण ही फेरी अडीच तासाची होती.प्रथम बाहेर बसलो पण गारठा वाढू लागला तसे आत आलो.अनिकेत बियर अणि आम्ही दोघिनी चहा घेतला.चहा घेणारे आम्ही २/४ भारतीय च होतो.इकडचे सर्व वयाचे लोक आयुष्याचा उपभोग छान घेतात.मस्त एन्जॉय करतात.याना काही चिंता नसतीलच का???????????पण घर घर करत ते अडकून पडत नाही हे मात्र नक्की.आपण त्यात गुंतलेले असतो,उपलब्ध असेल तरी आपण उपभोगु शकत नाही.असे असले तरी आपली संस्कृति उ़त्तम........एकमेकानी एकमेकांच्या भावना समजुन घेतल्या नाही तर काय रुक्ष जीवन जगायेचे???????????
                    बोटी तुन उतरलो.आज ताज मधे जेवायला जायेचे होते.तिकडे अगदी चविष्ट जेवण होते.चिकन मस्त ,पण लस्सी पण मस्त होती.त्या मानाने खिशाला झेपतिल असे दर होते.त्याच एका होटल मधे स्क्रीन वर हिंदी गाणी बघता आली.नाहीतर हिंदी इंग्लिश नाहीच,मराठीचे तर नावच नको!!!!!!!!!!!!!!!!!जेवून परत आलो.दुसर्या दिवशी अजुन एका डोंगरावर जायचे होते.
                         घड़यालाकडे लक्ष देवून उठलो.तेथील दुकाने बघितली.शोपिंग काही केले नाही.कारण प्रचंड महाग होते.परतीच्या तयारीला लागलो.तिकडे खाण्याचे थोड़े हाल झाले पण बरोबर असलेले पराठे,साटोर्या कामी आल्या.परत उतरताना झुमकन उतर नारी ते केबल कार हृदयाचा ठोका चुकवत होती.पण थ्रिल होते !!!!!!!!!!मस्त.परत ट्रेन मधे बसल्यावर ,कसे काय शूटिंग झाले असेल??आता तो पिक्चर बघायला हवा.अशी चर्चा सुरु झाली.आम्ही आता तिकडे धबधबे बघायला जाणार होतो.बस ची वाट पाहत होते.तेथे समोर मैदानावर चक्क एका पाठोपाठ एक हेलिकोप्टर उतरत होती.माझा समज कोणी वरिष्ठ व्यक्ति आल्या असतील.पण तसे नाही तर प्रवाशाना त्यात बसून फेरी मारायची सोय होती तिथे.खिशाला सर्व काही झेपणारे नाही म्हणुन आम्ही बसलो नाही.पण गम्मत मात्र सर्व अगदी नीट पाहीली.तितक्यात बस आली आम्ही बसने निघालो.स्विस पास असल्याने टिकिट नव्हते .बस मधून उतरून काही अंतर चालत जायचे होते.छान खलालनारा झरा बाजूने वाहत होता.रोड च्या बाजूला चक्क सफरचंदाची झाडे होती.ते झाडे बघत आम्ही फोटो काढत पोचलो.एका भल्या मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी पोचलो.तिकडे एकून १० प्रचंड मोठे धब-धबे आहेत.जायेचे कसे असा विचार करतो तर लिफ्ट समोरच दिसली.एकच लिफ्ट मन होता.तिकडे मानुस बल कमी हे जाणवले.त्या लिफ्ट ने वेगाने आम्ही अर्धा डोंगर चढलो.६ धब धबे खाली आणि ४ चढून जायेचे,झेपेल का विचारच केला नाही.डोंगराल गुहेत खोदलेल्या रस्त्याने चालायला सुरवात केली.दम लागला पण चढले.पाण्याचा आवाज भयानक होता.आजू बाजु च्या डोंगरावर जो बर्फ जमतो त्याचे ते पाणी म्हणजे हे धब धबे,हे एइकुन तर मी अवाक् झाले.सतत इतके पाणी???बर्फ पडतो तरी किती????????इकडचे तलाव इतके मोठे अणि काठोकाठ भरलेले म्हनुनच आहेत लक्षात आले.किती तरी दश लक्ष लीटर पाणी खलालत पडताना पाहिले.पाण्याच्या वेगाने दगडाची झीज झालेली होती.पाणी मुबलक त्यामुले विज निर्मिती भरपूर.विजेवर ट्राम,बस ,रेल वे चालतात.प्रदुषण कमी,आणि खर्च पण कमी होतो.लाइट जाणे हा प्रकार नाही,लोड शेडिंग शब्द माहितच नसेल.मला आपले तलाव,पाण्याची स्थिति ,पाणी कपात सर्व आठवले.नशीबवान आहेत हे लोक याना मुलभुत गोष्टीची कमतरता नाही.धब धबे बघताना अनेक असे विचार डोक्यात येत होते.शांत पणे पायर्या उतारत खाली आले.बाकावर १० मिनिटे विश्रांति घेतली.आणि परतीच्या प्रवासाला निघालो.बस स्टॉप समोरील मोठ्या दगडावर बसून पराठे खाल्ले,कारण आज दुसरे काही मिळाले नव्हते.