Monday, November 2, 2009

रविवारी सकाळी आरामात उठून ब्रेक फास्ट केला.आणि आवरून बाहेर पडलो.ट्राम,बस,मेट्रो ट्रेन,बस असा प्रवास करत एका मोठ्या दुकानात गेलो.नाव त्याचे 'आइय्किया'तिकडे फक्त घरासाठी उपयोगी वस्तु मीलतात.पण किती मोठे ते एकच अखंड दुकान.बाप रे!!!!!!!!!!!!!गाड्या पार्किंग ची जागा पाहीली एका मजल्यावर ३५० गाड्या उभ्या होत्या.आपल्याला दुकानात शिरताना दुकानाचा नकाशा आणि एक तक्ता,पेन्सिल दिली जाते.पिशव्या,ट्रोली हे तर आहेतच.आपण त्या नकाशा प्रमाणे दुकानात फिरायचे,म्हणजे सर्व विभाग नीट पाहिले जातात.ते पण शिस्तीने
उगीच आपल्या मॉल प्रमाणे लोक इकडे तिकडे फिरत नव्हते. सोफा सेट कपाट सुसज्ज किचन.मुलांची खोली.खेलनी.भांडी,काचेच्या वस्तु,विविध प्रकारचे स्टैंड झाडे फुले खरी खोटी सर्व.तुलसी बागेतील सर्व वस्तु इथे विकायला होत्याच,नॉन स्टिक भांडी,काचेच्या बरन्या तर विविध प्रकार दिवे ,लैंप शेअड किती सांगू?????तुम्ही पहायलाच हवे,आता नाताल सण जवळ आला आहे ते जाणवत होते सजवातिचे भरपूर सामान होते.आपल्या कडील एट होम च्या २० पट तरी हे दुकान मोठे होते.नाताल  त्यांचा मुख्य सण ना तो,त्यामुले लोक घरासाठी खुप खरेदी करत होते.
       ते सर्व पाहून झाल्यावर दुसर्या विभागात गेलो.बाप रे !!!!!या सर्व वस्तुचे ते गोदावुन.वस्तु वर लिहिलेला कोड नंबर आपण त्या तक्त्यात लिहायचा आणि इकडे येवून ती वस्तु घ्यायची.इतके अप्रतिम सुट्सुतित पैकिंग की काही विचारच करू शकत नाही.मोठ मोठी कपाट,किचन मधील वस्तु आपण सहज गाडीच्या डिकित ठेवून घरी नेवू शकतो.घरी फक्त सुटे भाग जोडायचे,त्याचे माहिती पत्रक पण त्याच्यात .अगदी स्क्रू ,सकट सर्व प्लास्टिक मधे पैक .लोक रविवार असल्याने प्रचंड खरेदी करत होते.ते सर्व पाहून विचार आला ,आपल्याकडे असे सोयीचे कधी होणार????माणुस बल कमी ,कामगार नाही,हमाल तर नाहीतच.सर्व काही स्वतः.एक खुप मोठा माणुस मोठा टीवी [एल सी डी]गाडीत नेवून ठेवत होता.मी पाहिले अणि अवाक् झाले.दुकानदार काहीही घरी पाठवत नाही.पैसे वाला श्रीमंत गरीब इकडे काही फरक दिसत नाही.बाहेर पडलो,बघून आणि चालून मी फारच थकले होते,त्यात पाउस पडत होता.परत टैक्सी बोलावली आणि घरी आलो.इकडे फ़ोन केला की ५ मिनिटात टैक्सी हजर होते ते बरे वाटले.टैक्सी मधे आपला पत्ता सांगितला की लगेच स्क्रिन् वर नकाशा दिसतो.त्यामुले रस्ता शोधने,चूकने काही भानगड नाही.त्यांची भाषा येत नाही ही मोठी अड़चन आहे मात्र.
   घरी आलो,गरम चहा घेतला.बाहेर आज पोट पूजा झाली होती,रात्रि फक्त भेल खाल्ली [चापली].दमलो होतो .रात्रि लवकर झोपलो.
   शनिवारी सकाळी ब्रेक फास्ट नाही ब्रंच करून आम्ही बाहेर पडलो.खायला खुस खुस केले होते.आपल्याकडे लापसी रवा मिलतो त्याचाच एक प्रकार.त्याला इकडे खुस खुस म्हणतात.तिखट शीरा करतात तसा करता येतो.विशेष म्हणजे तो लो कैलरी असतो.
         प्रथम 'लुँर्ड्स'म्हणुन मोठा शोपिंग मॉल आहे तिकडे गेलो.अनेक दुकाने,पण सौन्दर्य प्रसाधनाची जास्त दुकाने होती.इकडे अगदी आज्या सुद्धा मेक अप केल्या शिवाय बाहेर पडत नाहीत.आता घरी परत जायला एक महिना राहिला .त्यामुले शोपिंगला  सुरवात.सर्वाना शक्य नाही पण खास मैत्रिणीला,व्यक्तिना ,लेकीलाआणि इतर जनाना काहीतरी टोकन घेउन जावे ठरवले.मला त्या सौन्दर्य प्रसधनातिल खरच काही कळत नाही.मी आपली जरा बाजुलाच होते.पण आकर्षक भेट वस्तु छान पैक केलेल्या बघत होते.आमचे तिघांचे एक मत झाले की खरेदी.काही गोष्टी खरेदी केल्या.नंतर मात्र लहान मुलांच्या गिफ्ट आणि गेम बघण्यात खुप वेळ गेला.खेळ छान पण वजनदार ,नेताना वजनाचे बंधन आहे त्यामुले आवडले तरी काही घेता आले नाही.त्यात ल्या त्यात दोन तिन खेळ घेतले माझ्या नातवंडा साठी.
          नंतर आम्ही 'अलबर्ट हैएन' या मोठ्या सुपर मार्केट मधे गेलो.अबब!!!!!एका मागुन एक विभाग बघताना आणि खरेदी करताना पायाचे तुकडे पडले.दूध,दही,भाज्या,फले,बिस्किटे ,साबण.कितीतरी सामान घेतले.वेलची,जायफल,दालचीनी याची  पुड इकडे छान मिलते.खास घरी न्यायला त्या पण घेतल्या.सामानाचे २ मोठे झोले [पिशव्या]भरल्या.ते सुपर मार्केट बघताना ब्रेड चीज़ चिकन फिश चे शेकडो प्रकार पाहून मी थक्क झाले.तयार खाद्य पदार्थ ,भाज्या फले.सलाड पाहून मला काय घ्यावे सुचत नव्हते,अनिकेत मात्र सवय असल्याने भरा भर घेत सुटला होता.तिकडे सामान नेयला प्लास्टिक पिशव्या ठेवल्या होत्या.हलके थोड़े सामान आपण घेऊ या ,या विचाराने मी एक पिशवी घेतली.नंतर मला समजले त्या पिशवी ची २० सेंट[पैसे] कीमत असते.माझ्यावर मी फुकट ढापली,असा शिक्का बसला.सर्व सामान घेउन बस ट्राम करत घरी परतलो.फिरून फिरून दमलो होतो.गरम कड़क चहा केला ,ती घेतला,जरा बरे वाटले.आता जरा वेळ आराम.रात्रि जेवायला खास मालवणी पद्धतीचे चिकन केले.मस्त ताव मारून जेवलो.उद्या रविवार .सुट्टीचा दिवस ,खुप वेळ झोपायचे हे नक्की.म्हणुन रात्रि निवांत पणे पत्ते खेळत बसलो.रम्मी साठी आज नविन पत्ते पण आणले होते.नविन कैट[पत्ते]मधील चित्रे ओलखने जरा कठिन जात होते,पण मिशिवाला राजा,चिकना दिसती तो गोटू आणि गोरीपान राणी अशी नावे ठेवत टाइमपास केला.उशिरा खेळ संपला आणि मग झोपलो.