Friday, November 27, 2009

                               माझ्या या इकडच्या वास्तव्यात मी अनिकेत च्या ३ मित्रांकडे पार्टी ला [जेवायला]गेले.दिवाली च्या दिवशी शिल्पा-दिनेश यांच्या कड़े गेलो होतो.शिल्पा आणि नंदिनी एकत्र काम करतात.त्यामुले त्यांची पण चांगली मैत्री झाली आहे.शिल्पा घरी आली होती,पार्क मधे आली होती,त्या मुले ओळख झाली होती.
                             दिवाली म्हणून आम्ही रवि -रिचा,वेकट-वैजू याना घरी बोलावले होते.त्यामुले त्यांची पण छान ओळख झाली.वेंकट चे नाव मी अनिकेत कडून खुप वेळा एइकले होते.आधी तो डोम्बिवली ला राहणारा.जुन्या आठवणी काढून गप्पा मारल्या.
                               वैजू ने सर्व मित्र मैत्रिणी ना घरी वडा-पाव पार्टी ला बोलावले होते.नविन मित्र आले होते,ओळख झाली.गप्पा मारल्या वेळ छान गेला.
                                रवि-रिचा शेजारी असल्याने माझे अगदी पहिल्या दिवसापासून माझे जाणे येणे सुरु झाले होते. त्याना  पण घरी मेहुंन  म्हणून बोलावले होते.रिचा कड़े मी २/३ वेळा गेले जेवायला.दर वेळी मेनू वेगला ही तिची खासियत.थाय करी भात,पास्ता,तुर्की मिठाई असा वेगला बेत होता.माझी आवडती डीश ओली भेल आणि चहा यानि सुरवात झाली.मस्त गप्पा मारत जेवलो.आशीष ,मिनी पण आले होते.छोटा आरुष मस्त टाइमपास करत होता.रिचा चे घर अगदी टाप टिप ,नीट नेटके असते.कामा वरून घरी येवून सर्व तयार करून ठेवले होते,मला कौतुक वाटले. कोकणस्थ साटप असतात हे मला परदेशात पण जाणवले.    























Wednesday, November 25, 2009

ek anubhav

  •                            मी अनिकेत नंदिनी बरोबर घर पहायला गेले होते.त्यांच्या घराचा करार डिसेम्बर ला संपतो.म्हणून घराची शोधाशोध सुरु आहे.सुधारलेल्या देशात सर्व काही सुधारलेले.इकडे घरावर टी हुर्र अशी पाटीलावलेली असते.टी हुर्र म्हणजे घर भाड्याने देने आहे,तर टी कूप म्हणजे घर विकने आहे.फिरताना खुप घरावर अशा पाट्या दिसल्या.स्थायिक यूरोपियन लोकानी घरे पूर्वी घेउन ठेवली आहेत,आता तेच त्यांचे उत्पन्नाचे साधन झाले आहे.घरे दाखवणारे एजेंट घराचे फोटो माहिती सर्व इन्टरनेट वर देतात.नकाशा वर घर कुठे ते पाहता येते.रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे असतात.[इमारती]पण घरावर जे क्रमांक असतात ते एका बाजूला सम आणि दुसर्या बाजूला विषम असतात.लांबच लाम्ब रस्ता आणि क्रमांक ,गल्या [लेन]शोधत जावे लागते.अगदी पून्याची आठवण येते.
                 घर दाखवणारा एजेंट पण सुटाबुतात गाड़ी घेउन आला होता.आम्ही जे घर पाहिले ते दुसर्या मजल्यावर होते,सरळ एकच जीना.इकडे बरीच घरे अशी आहेत,तळ मजला आणि पाहिला मजला एकाकडे आणि दूसरा तीसरा स्वतंत्र.बहुतांशी घरे फर्निश असतात.४ खोल्या आणि गच्ची .घर सुसज्ज होते.घरे पाहण्याची सुरवात चांगली झाली.घर प्रशस्त हवेशीर होते.आणि भाड़े पण परवडेल असे होते.फक्त त्या घरात डीश वाशर नाही,त्यामुले घेणे योग्य नाही असे ठरले.इकडे सर्व घरात असतो.हे लोक तेलकट तुपकट काही खात नाहीत,विशेष घरी काही शिजवत नाहीत,त्यामुले स्वय पाक घरे अगदी स्वच्छ ,चकचकीत असतात.आपल्यासारखा सतत गैस पेटत नाही.मायक्रोवेव्ह मधे काय ते गरम करून खायचे हीच त्यांची पद्धत.इतर वेळी  ज्यूस ,बीअर पिणे.
  •                नंतर  एक होलैंड चा खुप मोठा कसीनो पाहिला.त्या सर्व भागात फक्त बार आणि रेस्टोरंट होती.बाहेर मेनू लावलेला होता ,कीमती सह .काचेच्या शोकेस मधे छापील मेनू.पाट्या नाहीत.प्रत्येक होटेलची खासियत असलेले पदार्थ असतात,माहिती पाहिजे.
  • मुख्य रोड वर सर्व नामांकित कंपन्यांची दुकाने [शो रूम]होत्या.आपल्या कडील कुलाबा तसा तो भाग.नंदिनी माहिती देत होती दुकानांची.
  • एका ठिकाणी मुले स्केटिंग करत होती,यंत्राने भुर भुर बर्फ पडत होता.मुले मस्त मजा करत होती,पाहून गम्मत वाटली,असे सर्व मुलाना मिळाले की काय खुश राहणार मुले....सर्व ठिकाणी झगमगाट असलेला भाग पाहून घरी आलो.

Tuesday, November 24, 2009

pardesh gaman anjbhav

                                             परदेश गमनाचे वारे वाहू लागले आणि तयारी ला जोर आला.वीसा घरी आल्यावर मात्र हातपाय भरभर हलू लागले.बघता बघता मी पहिला विमान प्रवास करून अनिकेत कड़े आले.८ सप्टेम्बर ला.तेव्हा पासून चे माझे अनुभव मी ब्लॉग मधे लिहायचा प्रयत्न केला आहे.पूर्वी मला परदेशात येण्यात काही स्वारस्य वाटत नव्हते,इतरासरखे आकर्षण पण नव्हते.पण एकदा मनाची तयारी करून अनिकेत कड़े आले.फक्त ३ महीने वास्तव्य आहे ठीक आहे,जातील दिवस पटकन.असे वाटले,आणि सुरवातीला तसे झालेही.नव्याची नवलाई होती,नविन शहर कसे आहे याची माहिती करून घेत होते,खुप वर्षानी मी आणि अनिकेत गप्पा मारत फिरलो,तेव्हा काय वाटले कसे सांगू???अनिकेत मधे खुप चांगला बदल झाला आहे असे जाणवले.लगेच एक महिन्याच्या आत त्याने मला स्वप्न नगरिची सफर घडवली.तेव्हा तर काय मला खुपच आनंद झाला होता.मनात खुप वेळा२ विचार सतत यायचे,अशा या रम्य ठिकाणी आपण एकटेच आलो आहोत,मला ह्यांची उणीव खुप वेळा होत असे.पण काय करणार??आपले नशीब.आपले दुख आपल्याशी ठेवायचे त्याचे भांडवल करायचे नाही हे मनाशी पक्के केलेले आहे.त्यामुले कुणाला जाणीव करून देत नसे.आणि दूसरा विचार ती दोघेच इकडे आली असती तर ,त्यानी आणखी मजा केलि असती,माझ्या मुले त्याना स्वतंत्रता मिळत नाही असे सारखे वाटत होते.पण इतर अनोल्खी लोकान पेक्षा मी मुलासुने बरोबर आले याचा आनंद आधिक होता.
                                  परदेश वास्तव्याचे ३ टप्पे केले तर माझा पहिला महिना पटकन निघून गेला.सतत फिरने गप्पा सुरु होत्या.पण दुसर्या महिन्यात मला घर दिसू लागले.कधीच मी बाहेर इतके दिवस राहिले नाही.त्यानी माझे मन कशातच रमत नव्हते.इकडे ठंडी ची लाट ही तेव्हाच आली.आता ही थंडी कशी सोसणार?घरी बसून वेळ कसा घालवायचा?????या विचाराने मन खुप वेळा उदास होत असे.ही दोघे मला उपाय सांगत असत ,पण मला ते काही पचनी पडत नव्हते.अखेर मी परत यावे या विचाराला आले.तसे अनिकेत भाग्यश्री जवळ बोलले पण.हा माझा विचार काही पट्नारा नव्हता.पण मला खरच काय करावे सुचत नव्हते.अस्वस्थ मनाने रहाणे काही अर्थ नव्हता.भाग्यश्री ने टिकिताची चौकशी केलि.मनात चलबिचल सुरु झाली.पण अखेर या वेळी मला माझ्या गणपतिने [देवाने]सद्विचार दिला.आणि मी लवकर परत न जाता थोड़े दिवस आहेत ते आनंदाने रहायचे हा विचार पक्का केला.विचार करने ,बेत आखाने सोपे असते पण कृतित आनने कठिन जाते.पण तेहि केले.
                                   परत घरी जाताना ची खरेदी मी आणि नंदिनी ने एका दिवशी उरकून टाकली.तेव्हा सामानाचे वजन जास्त होइल हा विचारही दोघिनी केला नाही.पण आता माझे कपडे ठेवून जायचे या विचाराला मी पोचले ,हे ही नसे थोडके!!!
                                    परदेश पहिल्या शिवाय आवडत नाही हे मी अनुभवाने सांगते.मला इकडे शुद्ध हवा,मुबलक पानी,विज ,नयन रम्य निसर्ग सौन्दर्य ,सर्वे सुखसोयी आहेत.फुटपाथ ,रहदारी कमी,जाने येणे प्रवास सुखकर.हे सर्वे अवड्त असे.चालायला फिरायला आवडत असे.बाजारात जाऊ लागले,मनात तुलना करत असे,पण तरी रोजचे जीवन चांगले आहे .हे नक्की.पण   ..........खर सांगू का????????
                      बहु असोत संपन्न की महा ,प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
                                              परदेशात राहणारी मुले आधिक वेळ घरी रहातात,आपल्या सारखा नाका नसतो,आणि खुप खास मित्र पण नसतात.चक्क माझा वेळ जावा म्हणून आम्ही कितीतरी वेळा पत्ते खेलत असो.अनिकेत च्या आवडीचे पदार्थ करण्यात मी पुढाकार घेत असे,माझे पोथी वाचन पूर्ण झाले,त्याचे मेहुंन पण जेवू घातले,परदेशात मला चक्क घारपुरे जोडपे भेटले,[अनिकेत चा मित्र]पूरण पोली चे जेवण केले,रुपयात नाही ,यूरो मधे दक्षिणा पण दिली.सुधारक देशातील ते मेहुंन वेस्टर्न कपडे घातलेले.बुट घालून टेबल वर जेवायला बसले.पण इकडे ठीक आहे.आपण आपले विचार,संस्कार बाजूला ठेवून वागलो तर पुढच्या पीढ़ी बरोबर दिवस चांगले जातात हा विचार केला.शांत राहिले,आपल्या मुलांवर संस्कार असतात,पण परदेशात गेल्यावर त्याचे काय होते ,देव जाणे....
        कालाय तस्मै नम्हा!!!!!!!!!!!!
              आता माझे घरी जायचे दिवस जवळ आले,एकच आठवडा राहिला.आता मात्र माझी स्व देशातील लोकाना भेटण्याची ओढ़ वाढू लागली,पण त्याच वेळी आता अनिकेत नंदिनी दोघे लवकर भेटणार नाहीत,असे सारखे मनात येवू लागले.मग मी मे मधे आंबे खायला तुम्ही तिकडे या,भुन भुन सुरु केलि.पण अनिकेत तो....असा सहज पट्नारा थोडीच.त्याने मला तू समर मधे इकडे ये.तुला घरी तरी काय काम आहे?????असे बोलून माझा ब्रेन वाश सुरु केला.
             बदल इतका की आधी परदेशात स्वारस्य नसलेली मी,आता पुढील समर मधे नक्की येइन असे सांगू लागले.मला देश आवडला,अनिकेत बरोबर,नंदिनी बरोबर राहता आले,म्हनुनच हा बदल माझ्यात झाला.
            पण नंतर येताना मनाची पक्की तयारी करून,वेळ जावा या साठी पुस्तके,सीडीज ,भरतकाम बरोबर घेउन आलो पाहिजे तरच वेळ आनंदात जाइल हे नक्की.
                     आज सकाळी अनिकेत च्या आवडीचा सफेद ढोकला,आणि लसून चटनी.[शिल्पा मामी पद्धत]बनवली.खुप दिवसानी केल्याने पोटभर आवडीने त्यानी खाल्ला.नंतर आवरून आम्ही बाहेर पडलो.खास लोकाची खरेदी!!!कोण ते कलले ना?लाडकी लेक आणि जावई.प्रथम जावयाची की लेकीची प्रश्न होता.प्रथम सौरभ साठी टी शर्ट बघायला सुरवात केली.पण अनेक दुकाने बघून एकमत काही होइना,अखेर शर्ट बघा असे मी सांगुन टाकले.मग शर्ट बघणे मिशन सुरु झाले,तिघांची आवड भिन्न .पण अखेर एक शर्ट फायनल केला.खर सांगायचे तर अजुन मला सौरभ ची आवड काय ?त्याला कसे कपडे आवडतात ते कलले नाही.नंतर मोर्चा भाग्यश्री च्या खरेदी कड़े.मोठा कठिन प्रश्न?पण सुरवात केली "स्वरोस्की"पासून पण पुन्हा तोच प्रश्न.अनिकेत ला आवडेल जरा दिव्य !!!त्याचा बजेट चा प्रश्न नव्हता पण हा दगड च वाटतो वगैरे टिका सुरु होत्या.इकडे तिकडे बघताना हैण्ड पर्स दिसल्या,"ब्राण्डेड बर का?"सर्व पर्स उघडून हातात धरून नंदिनी ने बघितल्या,नंतर ३ पर्स मधून निवड.अनिकेत ची टिका सुरु होतीच.पण अखेर मी एक पर्स फायनल केली.शर्ट आणि पर्स चे पैसे देवून आम्ही जवळ दुसर्या दुकानात गेलो.
                    तो मेघना मोल  होता.सरकत्या जिन्या वरून वर जातो तो समोर स्वरोस्की दुकान.धन्य वाटले!!
सर्व आकर्षक वस्तु,अलंकार छान मांडून ठेवले होते.परत पहाणे सुरु,अनिकेत ने आता माघार घेतली होती,तुम्हाला काय आवडेल ते घ्या सांगुन टाकले.नंदिनी ने २ सेट पसंद केले.त्या पैकी मला जो आवडला तो मी सांगुन टाकला,तो त्या पेक्षा महाग होता.पण माझे मत विचारले मी सांगुन टाकले....लेकिसाठीआई ने आज बिनधास्त पणे सांगितले.अनिकेत ने मला टोमणा पण मारला.पण खास खरेदी ख़रच मस्त झाली,अनिकेत चा खिसा खाली केला हे मात्र नक्क्की ......नंतर इकडे तिकडे वेळ घालवून घरी आलो.येताना टर्किश डोनर घेउन आलो,चहा आणि डोनर याचा आस्वाद घेतला......

sankalp

                        मी इकडे येताना 'गुरु चरित्र' संक्षिप्त ही पोथी बरोबर आणली होती.येतानाच संकल्प केला होता.इकडे आपण या पोथीचे १०० वेळा वाचन करायचे.काही मनात धरून हा संकल्प.त्याप्रमाणे पोथीचे वाचन १७/११/०९ रोजी पूर्ण झाले.नंदिनी शी सहजच बोलले आपण इकडे एक म्हणून मेहुंन जेवायला बोलवू  या.लगेच तिने बेत आखला.आणि अनिकेत चा मित्र रवि घारपुरे आणि रिचा याना जेवायला बोलावले.परदेशात त्याना असे मेहुंन जेवायला बोलावले,याची गम्मत वाटली.आनंदाने आले.पोटभर जेवले,खुप गप्पा मारल्या.मसाले भात,सार कोशिंबीर,पोली दम आलू भाजी आणि पूरण पोली असा बेत केला होता.पूरण यंत्र नव्हते त्या मुले पुरनाचे पराठे झाले.अनिकेत ने त्याना ११ यूरो दक्षिणा पण दिली.मला समाधान वाटले,आणि माझा सम्पूर्ण दिवस पण छान गेला.

Wednesday, November 18, 2009

एका ठिकाणी लाकडी बुट बनवायची फैक्ट्री आहे,त्यात आपण एक यूरो चे नाणे टाकले की ट्रक आत जातो काचेचे बुट घेतो आणि येतो,आपण ते उचलून घ्यायचे .मजेशीर वाटले.इकडे एका कालव्याच्या वर असा एक पुल आहे की तो दोन्ही बाजूने उचलला जातो,तो मी प्रत्यक्ष पाहिला त्याची पण प्रतिकृति तेथे आहे,तसेच पाणी अडवले जाते ते लोखंडी दरवाजे पण केले आहेत,आपोआप उघड बंद होतात.सर्व रेल वे चे प्रकार माल गाड्या छोट्या रुलावारून फिरत होत्या,लहान मुलाप्रमाने मी गाड़ी आली गाड़ी आली करत थाम्बत होते आणि बघत होते.चर्च आणि चर्च मधील सुरेल प्रार्थना तिकडे ऐकली .ट्यूलिप गार्डन ची प्रतिकृति लाजवाब होती.यूरोपियन पद्धतीची घरे दुकाने सर्व बारकावे सहित केली आहेत,प्राणी संग्रहालय ,शोपिंग सेंटर ,राजवाडा ,एक ना अनेक प्रतिकृति आहेत.एकंदरीत काय मला ते ठिकाण खुप आवडले,४ तास फिरताना पाय दुखतो हे जाणवले नाही.थोड़ी खरेदी केली.मग खायला गेलो.केक आणि सूप असे घेतले कारण बाकीचे पदार्थ खाणे मला शक्य नव्हते.येताना एक सुन्दर कृष्णन धवल फोटो काढला.ट्राम ट्रेन पकडून घरी आलो,प्रवास सुखकर झाला.

Friday, November 13, 2009

मदुर डैम या ठिकाणी जायचे किती तरी दिवस ठरत नव्हते.कारण थंडी,पाउस आणि वेळ.पण आज सकाळी मात्र जायचे नंदिनी ने पक्के ठरवले.वेळेवर निघणे गरजेचे होते,म्हणुन भरा भर आवरले.हे ठिकाण तसे अनिकेत च्या घरापासून दूर आहे,पण इकडे वाहतुकीची सोय अप्रतिम आहे,त्यामुले जायला काही वाटत नाही,हवामान चांगले,घाम येत नाही,गर्दी नाही.त्यामुले प्रवास केला तरी थकवा येत नाही.
        आम्ही प्रथम ट्राम ने सेंट्रल स्टेशन ला गेलो.आता मला तो स्टेशन परिसर जरा माहितीचा झाला आहे.ट्राम मधे २ भारतीय होते,ते आपसात हिंदीत बोलत होते,आम्ही बोललो नाही पण एइकुन पण बरे वाटले कारण आपले लोक होते ना ते!!!!!!!!!!थोड्या वेळाने काय झाले मला समजले नाही मी आणि नंदिनी आरामात ट्राम मधे बसलो होतो.तितक्यात एका स्टॉप नंतर ट्राम चालक अचानक आला आणि मला काहीतरी बोलून बाहेर पडला.त्याची ती अगम्य डच  भाषा !!!!!!!!मी आणि इतर प्रवासी बघत राहिलो पण कोणी काही बोलले नाही.ट्राम चालक बाहेर गेला ,दरवाजा ठोकला,परत आत आला आणि ट्राम चालवू लागला.मी काही जास्त त्यावर विचार केला नाही,कारण तो काय बोलला ,मला समजले कुठे होते????????असो असा भाषेचा प्रोब्लम[अड़चन ].
       स्टेशन वर सरल गेलो परतीचे टिकिट काढले.आम्ही निघालो.या स्टेशन वर पण खुप प्लेटफोर्म.आणि रचना काही औरच !!!!मला आपल्या ट्राफिक पोलीस ची तिकडे आठवण झाली.कारण डाव्या  बाजूला ५ ते १५ फलाट मागे १ते४ ,आणि समोर १६ ते २० फलाट.आपल्या कड़े एका सरल रेषेत फलाट पहायची सवय,त्यामुले हे सर्व अजब वाटते.
     आमची डैन हॉग एच ला जाणारी गाड़ी १४ व्या प्लेटफोर्म वर येणार होती.आम्ही तिकडे पोचलो एक दोन लोकाना विचारले पण काही समजले नाही.सुदैवाने एक टि.सी .दिसला.तो देशी होता हे विशेष.त्याला सर्व विचारून घेतले.अखेर त्यानी सांगितले,मीच या गाडीचा टि सी आहे,तुम्ही आरामात बसा,मी बोलतो नंतर.थोडासा सुखद अनुभव आला.आम्ही त्याचे टोपण नाव 'बंड्या' ठेवले.
      एकाच फलाटावर २ गाड्या उभ्या असतात इकडे.एक एका दिशेला जाते तर दूसरी दुसर्या दिशेला.गाड़ी डबल डेकर पण डबे मात्र सहाच !!गाड़ी सुरु झाल्यावर 'बंड्या'आला आणि आमच्याशी निवांत पणे हिन्दी तुन चक्क १० मिनिटे बोलला,खुशाली विचारली,प्रवासाच्या सूचना दिल्या आणि टिकिट न बघताच निघून गेला.या लोकाना मुंबई चे कलले की काय वाटते सांगू शकत नाही पण त्याना मुंबई म्हणजे एक ग्रेट शहर असे वाटते हे नक्की,आणि आहे ही!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!आम्ही एक गाड़ी बदलून दुसर्या गाडीत बसलो .प्रवासाचा मार्ग छान होता.दोन्ही बाजूला छान टुमदार घरे आणि विस्तीर्ण शेती दिसत होती.स्टेशन च्या जवळ वस्ती जास्त दिसत होती.बाकी फलाट मात्र ओस पडलेले दिसले.शिपोल सारखे स्टेशन.जे विमान तलाला जोडलेले पण १० सुद्धा लोक कोणत्याही फलाटावर नव्हते.गाडीत प्रथमच एक यूरोपियन पुरुष मला गळ्यात सोन्याची साखली हातात ब्रेस्स्लेट ,बोटात अंगठी आणि कानात डा य मंड घातलेला दिसला,नाहीतर इकडे कोणी दागिने घालताना दिसत नाही.आम्ही डैन हग  एच स्टेशन वर उतरलो.९ नंबर ची ट्राम पकडून मदुर डामला गेलो.ट्राम स्टॉप अगदी त्याच्या दारात,काय सोय आहे ना!!!!!!
           प्रेक्षनीय ठिकाण पण बाहेर गर्दी नाही,लोक नाहीत,विक्रेते तर नाहीच......आधी आम्हाला दोघिना बंद आहे की काय अशीच शंका आली.पण चौकशी केल्यावर सुरु आहे समजले.सुट्टीचा दिवस नाही आणि थंडी ने कोणी प्रवासी जास्त येत नाही आता तिकडे अशी माहिती मिळाली.टिकिट घेउन आता प्रवेश केला इकडे मात्र सिक्यूरिटी चेकिंग नव्हते.आत गेल्यावर मी अगदी हरखून गेले.अनिकेत चे फोटो पाहिले होते पण आज मी प्रत्यक्ष पाहणार याचा मला आनंद झाला होता.हे ठिकाण म्हणजे होलैंड ची प्रतिकृति...आता माझे एम्सटर्डम जवळ जवळ सर्व पाहून झाले आहे त्याची वैशिष्ठे माहित झाली आहेत.त्यामुले त्या सर्व ठिकाणच्या प्रतिकृति पहाताना गम्मत वाटत होती.
              प्रथम समोर दिसले ते मोठे लाकडी बुट.आणि पाण्यात खरोखर चालणार्या बोटी.एकेक पहायला सुरवात 
केली.हातात माहितीचे पुस्तक होतेच.इकडे एकून १९८ प्रतिकृति आहेत.मला सर्वच खुप आवडल्या.पण परत परत पहाव्या अशा काही आहेत,त्यातील सर्वात बेस्ट म्हणजे शिपोल विमानतल.अगदी जसे च्या तसे.कॉन्सर्ट हॉल ची प्रतिकृति पाहून मी थक्क झाले.आपण बटन दाबुन गाणे निवडून झाले की त्या मैदानात असलेले काही लोक नाचू लागतात.बाहुल्या
             

Monday, November 9, 2009

काल पाहिलेल्या म्युझियम जवळ आणखी एक म्युझियम आहे,त्याचे नाव राईक्स.परिसरात छान बाग आहे फुलझाडे आहेत.अनेक झाडाना कापून वेगवेगले आकर दिले आहेत.दिव्यांच्या माला सोडून रोशनाई केली होती.याच म्युझियम च्या बाहेर मला खाद्य पदार्थाच्या २ गाड्या दिसल्या.एका गाडीवरअमेरिकन बर्गर वगैरे होते,तर दूसरी गाड़ी कॉफी ,शीत पेय याची होती.ते गाड़ी म्हणजे आपल्या कडील लहान टेंपो.टेम्पोत सामान ठेवतो त्या जागेत सर्व आधुनिक सोईची साधने होती,कॉफी ,कोल्ड ड्रिक साठी.सजावट तर इतकी छान होती की मला फोटो काढावा वाटत होता.पण आज कैमरा नव्हता.म्युझियम मधे नेता येत नाही.म्युझियम मधील आणखी एक सोय म्हणजे आपले वजनदार कोट प्रथम काढून जमा करायचे.अगदी पद्धत शिरपने हेंगर ला लावून ठेवले जातात.आपण सुट सुटीत पणे फिरू शकतो.हीटर आत आहेत त्यामुले थंडीचा प्रश्न नाही.या म्युझियम मधे २मजले आहेत.चित्रे जास्त होती.युधाच्या वेळी वापरली जाणारी सर्व हत्यारे बन्दुकी तेथे आहेत.काचेची भांडी सुवर्ण पदके,चांदीच्या कोरीव काम केलेल्या वस्तुयांचा पण संग्रह केलेला आहे.विशेष म्हणजे एका खोलीच्या आकाराची जहाजाची प्रतिकृति ठेवली आहे.होलैंड चा इतिहास माहित नाही पण सर्व चित्रे प्रसंगानुसार चित्रित केली आहेत.सर्व चित्रे कैनवास वर काढलेली आहेत खुप पूर्वीची आहेत.इथे अनेक चित्रकारांची चित्रे आहेत.

Sunday, November 8, 2009

आज एम्सटर्डम मधील व्हेंन गोंअग म्युझियम पहायला गेलो होतो.हे प्रसिद्द चित्रकार १८५३ ते १८९० या काळात होउन गेले.त्यांची डायरी ,पत्रे,तसेच त्यानी काढलेली चित्रे याचा संग्रह म्हणजे हा म्युझियम.अतिशय सुसज्ज असे ३ मजली हे म्युझियम आहे.पण आश्चर्य वाटले याचे,की इथे सरकते जीने नाहीत!कारण इथे कोंत्य्ही दुकानात सुधा तसे जीने असतात.मोठी लिफ्ट आहे,पण जीने चढून जाताना अनेक छान चित्रे पाहता येतात.निसर्ग चित्रे मला आधिक आवडली.तसेच त्या कालातील स्त्रिया,पुरुष लहान मुले यांची चित्रे बघताना गम्मत वाटली.इथे ऊँची वस्त्रे अलंकार परिधान केलेली अनेक चित्रे आहेत.सर्व चित्रे कैनवास वर काढलेली आहेत.म्युझियम ची दालने[खोल्या]प्रशस्त आहेत.इथे एकेक भिंती च्या आकाराच्या पण काही फ्रेम्स आहेत.चित्रातिल व्यक्तीचे हावभाव ,डोळे अगदी बोलके आहेत.विशेष म्हणजे इतकी वर्ष झाली असून सर्व चित्रे सु स्थितीत आहेत.चित्राचे रंग तर अगदी आता रंगवाल्या सारखे आहेत.शिसवी लाकडाच्या ,आणि कोरीव काम केलेल्या सर्व फ्रेम्स आहेत.कलाकुसर उत्तम आहे.प्रत्येक चित्राचे वैशिष्ट्य [माहिती]तेथे दिली जाते.त्या साठी मोबाईल सारखे एक साधन दिले जाते.चित्राचा नंबर टाकुन आपण भाषा निवड केली की माहिती एइकू येते.अनेक देशातील लोक अगदी चौकस पणे माहिती समजुन घेत होते.इंग्लिश मधे माहिती चित्राच्या बाजुलाच लिहिली होती.प्रत्येक प्रशस्त दालनात मधे बसायला सोय केली होती.वयस्कर लोकांसाठी खास कंप्यूटर वर एका जागी बसून म्युझियम बघायची सोय आहे.अनेक चित्राच्या फोटो कॉपी विक्रीस आहेत,तसेच अनेक भेट वस्तु.३/४ तास फिरून झाल्यावर इथे खाण्याची पण सोय छान आहे.

Monday, November 2, 2009

रविवारी सकाळी आरामात उठून ब्रेक फास्ट केला.आणि आवरून बाहेर पडलो.ट्राम,बस,मेट्रो ट्रेन,बस असा प्रवास करत एका मोठ्या दुकानात गेलो.नाव त्याचे 'आइय्किया'तिकडे फक्त घरासाठी उपयोगी वस्तु मीलतात.पण किती मोठे ते एकच अखंड दुकान.बाप रे!!!!!!!!!!!!!गाड्या पार्किंग ची जागा पाहीली एका मजल्यावर ३५० गाड्या उभ्या होत्या.आपल्याला दुकानात शिरताना दुकानाचा नकाशा आणि एक तक्ता,पेन्सिल दिली जाते.पिशव्या,ट्रोली हे तर आहेतच.आपण त्या नकाशा प्रमाणे दुकानात फिरायचे,म्हणजे सर्व विभाग नीट पाहिले जातात.ते पण शिस्तीने
उगीच आपल्या मॉल प्रमाणे लोक इकडे तिकडे फिरत नव्हते. सोफा सेट कपाट सुसज्ज किचन.मुलांची खोली.खेलनी.भांडी,काचेच्या वस्तु,विविध प्रकारचे स्टैंड झाडे फुले खरी खोटी सर्व.तुलसी बागेतील सर्व वस्तु इथे विकायला होत्याच,नॉन स्टिक भांडी,काचेच्या बरन्या तर विविध प्रकार दिवे ,लैंप शेअड किती सांगू?????तुम्ही पहायलाच हवे,आता नाताल सण जवळ आला आहे ते जाणवत होते सजवातिचे भरपूर सामान होते.आपल्या कडील एट होम च्या २० पट तरी हे दुकान मोठे होते.नाताल  त्यांचा मुख्य सण ना तो,त्यामुले लोक घरासाठी खुप खरेदी करत होते.
       ते सर्व पाहून झाल्यावर दुसर्या विभागात गेलो.बाप रे !!!!!या सर्व वस्तुचे ते गोदावुन.वस्तु वर लिहिलेला कोड नंबर आपण त्या तक्त्यात लिहायचा आणि इकडे येवून ती वस्तु घ्यायची.इतके अप्रतिम सुट्सुतित पैकिंग की काही विचारच करू शकत नाही.मोठ मोठी कपाट,किचन मधील वस्तु आपण सहज गाडीच्या डिकित ठेवून घरी नेवू शकतो.घरी फक्त सुटे भाग जोडायचे,त्याचे माहिती पत्रक पण त्याच्यात .अगदी स्क्रू ,सकट सर्व प्लास्टिक मधे पैक .लोक रविवार असल्याने प्रचंड खरेदी करत होते.ते सर्व पाहून विचार आला ,आपल्याकडे असे सोयीचे कधी होणार????माणुस बल कमी ,कामगार नाही,हमाल तर नाहीतच.सर्व काही स्वतः.एक खुप मोठा माणुस मोठा टीवी [एल सी डी]गाडीत नेवून ठेवत होता.मी पाहिले अणि अवाक् झाले.दुकानदार काहीही घरी पाठवत नाही.पैसे वाला श्रीमंत गरीब इकडे काही फरक दिसत नाही.बाहेर पडलो,बघून आणि चालून मी फारच थकले होते,त्यात पाउस पडत होता.परत टैक्सी बोलावली आणि घरी आलो.इकडे फ़ोन केला की ५ मिनिटात टैक्सी हजर होते ते बरे वाटले.टैक्सी मधे आपला पत्ता सांगितला की लगेच स्क्रिन् वर नकाशा दिसतो.त्यामुले रस्ता शोधने,चूकने काही भानगड नाही.त्यांची भाषा येत नाही ही मोठी अड़चन आहे मात्र.
   घरी आलो,गरम चहा घेतला.बाहेर आज पोट पूजा झाली होती,रात्रि फक्त भेल खाल्ली [चापली].दमलो होतो .रात्रि लवकर झोपलो.
   शनिवारी सकाळी ब्रेक फास्ट नाही ब्रंच करून आम्ही बाहेर पडलो.खायला खुस खुस केले होते.आपल्याकडे लापसी रवा मिलतो त्याचाच एक प्रकार.त्याला इकडे खुस खुस म्हणतात.तिखट शीरा करतात तसा करता येतो.विशेष म्हणजे तो लो कैलरी असतो.
         प्रथम 'लुँर्ड्स'म्हणुन मोठा शोपिंग मॉल आहे तिकडे गेलो.अनेक दुकाने,पण सौन्दर्य प्रसाधनाची जास्त दुकाने होती.इकडे अगदी आज्या सुद्धा मेक अप केल्या शिवाय बाहेर पडत नाहीत.आता घरी परत जायला एक महिना राहिला .त्यामुले शोपिंगला  सुरवात.सर्वाना शक्य नाही पण खास मैत्रिणीला,व्यक्तिना ,लेकीलाआणि इतर जनाना काहीतरी टोकन घेउन जावे ठरवले.मला त्या सौन्दर्य प्रसधनातिल खरच काही कळत नाही.मी आपली जरा बाजुलाच होते.पण आकर्षक भेट वस्तु छान पैक केलेल्या बघत होते.आमचे तिघांचे एक मत झाले की खरेदी.काही गोष्टी खरेदी केल्या.नंतर मात्र लहान मुलांच्या गिफ्ट आणि गेम बघण्यात खुप वेळ गेला.खेळ छान पण वजनदार ,नेताना वजनाचे बंधन आहे त्यामुले आवडले तरी काही घेता आले नाही.त्यात ल्या त्यात दोन तिन खेळ घेतले माझ्या नातवंडा साठी.
          नंतर आम्ही 'अलबर्ट हैएन' या मोठ्या सुपर मार्केट मधे गेलो.अबब!!!!!एका मागुन एक विभाग बघताना आणि खरेदी करताना पायाचे तुकडे पडले.दूध,दही,भाज्या,फले,बिस्किटे ,साबण.कितीतरी सामान घेतले.वेलची,जायफल,दालचीनी याची  पुड इकडे छान मिलते.खास घरी न्यायला त्या पण घेतल्या.सामानाचे २ मोठे झोले [पिशव्या]भरल्या.ते सुपर मार्केट बघताना ब्रेड चीज़ चिकन फिश चे शेकडो प्रकार पाहून मी थक्क झाले.तयार खाद्य पदार्थ ,भाज्या फले.सलाड पाहून मला काय घ्यावे सुचत नव्हते,अनिकेत मात्र सवय असल्याने भरा भर घेत सुटला होता.तिकडे सामान नेयला प्लास्टिक पिशव्या ठेवल्या होत्या.हलके थोड़े सामान आपण घेऊ या ,या विचाराने मी एक पिशवी घेतली.नंतर मला समजले त्या पिशवी ची २० सेंट[पैसे] कीमत असते.माझ्यावर मी फुकट ढापली,असा शिक्का बसला.सर्व सामान घेउन बस ट्राम करत घरी परतलो.फिरून फिरून दमलो होतो.गरम कड़क चहा केला ,ती घेतला,जरा बरे वाटले.आता जरा वेळ आराम.रात्रि जेवायला खास मालवणी पद्धतीचे चिकन केले.मस्त ताव मारून जेवलो.उद्या रविवार .सुट्टीचा दिवस ,खुप वेळ झोपायचे हे नक्की.म्हणुन रात्रि निवांत पणे पत्ते खेळत बसलो.रम्मी साठी आज नविन पत्ते पण आणले होते.नविन कैट[पत्ते]मधील चित्रे ओलखने जरा कठिन जात होते,पण मिशिवाला राजा,चिकना दिसती तो गोटू आणि गोरीपान राणी अशी नावे ठेवत टाइमपास केला.उशिरा खेळ संपला आणि मग झोपलो.

Tuesday, October 27, 2009

day light saveing.......

   दिनांक २५.१०.२००९ रोजी इकडे डे लाइट सेविंग सुरु झाले.म्हणजे काय?आधी मला जरा प्रश्न पडला होता.
           या दिवशी मध्य रात्रि ३ वाजता घडयालात एक तासाने वेळ  बदलतात.म्हणजे २ वाजले दर्शवतात .त्या प्रमाणे त्यांचे सर्व व्यवहार सुरु होतात.वेळापत्रक २ वाजता जे असेल ते त्या प्रमाणे व्यवहारात उपयोग करतात.एक तास जास्त झोपायला मिलनार हा आनंद त्या दिवशी असतो.आणि तो सुट्टीचा दिवस असतो हे महत्वाचे!!!!!!!आपल्या कड़े आणि इकडे आधी ३.३० तासाचा फरक होता,आता तो ४.३० तास झाला आहे.खुप वाटतो लगेच ना????मला कसे जाणवले ते सांगते,मी ६ वाजता छान फिरत होते आणि त्या वेळी आपल्या कड़े भारतात १०.३० वाजले होते.भाग्यश्रीचा तेव्हा फ़ोन आला ,''आई माझे सर्व आवरले ,आता मी झोपते.गुड नाईट .उद्या बोलू.''तेव्हा मला वेलेतील फरक खुप जाणवला.आत्ताची इकडची वेळ ग्रीनिज वेळेनुसार नियोजित केलेली आहे.हा फरक हिवाल्यात[विंटर]करतात.कारण तेव्हा रात्र मोठी दिवस लहान असतो.या विरूद्व उन्हाळ्यात[समर ]परत एक तास घड्याळ पुढे करतात.कारण तेव्हा दिवस मोठा आणि रात्र लहान होते.हा बदल काही देशात केला जातो,उदा.यूरोप,अमेरिका...त्याची पार्श्व भूमि अशी की सूर्य प्रकाशाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे.विजेची आपोआप बचत होते.विचार करा ना?.....एक तास सर्व मॉल,कार्यालय ,शाला ,घरे,दुकाने इकडचे एक तास लाइट बंद राहिले तर विजेची किती बचत होइल???सूर्य प्रकाश आपल्याला फुकट मिळत आहे.त्याचा वापर करणे,हेच काम.इकडे डोक्याचा वापर योग्य केला जातो हे खरे!!!!!!!!   

Monday, October 26, 2009

saphar

                     एका रविवारची सफर.
सकाळी आरामात उठून चहा  नाश्ता केला.आज आम्ही झान्सेशन ला जाणार होतो.भर भर आवरले आणि निघालो.ते एक छोटेसे खेडे आहे.तिकडे पवन चक्की आहेत.त्या बघायला जाणार .ट्राम ने आम्ही सेंट्रल स्टेशन ला गेलो.तिकडून ९१ नुम्बर ची बस थेट झान्सेशन ला जाते.बस अगदी वेळेवर सुटली.साधारण अर्धा तास प्रवास होता.शहरातून जाताना मला अनिकेत ने एक चायनीज होटल दाखवले.ते इतके प्रशस्त होते की एका वेळी ७५० लोक बसू शकतात.ते होटल कालवा च्या मधोमध् आहे.बोटीने होटेलात जायचे,किती छान ना?
            पुढे गेल्यावर एक बोगदा लागला.पण तो बोगदा नसून भुयारी मार्ग होता.वरती विस्तीर्ण कलावा,आणि त्या खालून हा रस्ता.अंदाजे ३ किलोमीटर लांब होता.आधुनिक तंत्र शिक्षण कमाल आहे इकडे!!!!!!!बस मधून जाताना घरे,सृष्टि सौन्दर्य बघत होते.घराचा प्रकार सर्व साधारण सगलीकडे सारखा होता.फक्त शहरा बाहेर एक मजली घरे दिसली.मोठ मोठ्या कंपनी होत्या.आम्ही झूल झूल वाहणारे पाणी,शेती,गाई गुरे बदके बघत बघत त्या फार्म हाउस वर पोचलो.सोसाट्याचा वारा सुटला होता,त्या ठिकाणी ४ पवन चक्या आहेत.त्याचे वैशिष्ठ्य म्हणजे जुन्या कालातिल जतन केल्या आहेत इतकेच नाही तर वापरात आहेत. आज ही तिथे रंगाचे मोठमोठे खड़े [दगड ]बारीक़ केले जात होते.पूर्वी मका पण पीठ केले जात असे.३ मोठी दगडी चाके [जाती]होती.पवन चक्कीत लाकडी चाके दाते असलेली होती.सर्व लाकडी होते.या ठिकाणी वार्याचाइतका चांगला उपयोग करून घेतला जातो.किती तरी किलो रंग पावडर केली जाते रोज.ती पण इंधन न वापरता.हे विशेष.
             या ठिकाणी पवन चक्की बघायला ३ लाकडी शिड्या चढून जायचे होते,मी एकच चढले,उतरले.पण वर जाऊँन मला पवन चक्की ची विशाल पाती जवळून बघता आली.त्या तिथे हॉट चोकलेट होते.ते घेतले त्या बरोबर कुकीज फ्री होत्या.खर सांगते,हॉट चोकलेट इतके सही होते.!!!!!मला लहान पनी कल्याण ला माहेरी कोको पीत असो त्याची आठवण झाली.ते कड़क गरम छान होते.चहा इथे इतका फुल्कवनी मिलतो त्या पेक्षा शतपट सुरेख होते.गार वार्याने मी कुड कुड्ले होते,ते पिउन बरे वाटले.तितक्यात रिम झिम पाउस सुरु झाला.इकडे ना कधी ही वेडया सारखा पाउस येतो पण रिम झिम.नंतर आम्ही लाकडी बुट कसे तयार करतात ते बघायला गेलो.तेथे बुटाचे विविध प्रकार पाहिले.खास लग्नासाठी कोरीव काम केलेले बुट,मुलीचे हल्ली च्या स्टाइल चे उंच टाचाचे बुट चपल.बाहेर एक भला मोठा लाकडी बुटाचा जोड़ ठेवला होता,त्यात उभे राहून लहान मुला सारखा फोटो पण काढला.तिथे एक बुट बसता येइल इतका मोठा पण केला होता.तेथील वैशिष्ठ्य म्हणुन लहान मोठे आकाराचे बुट विक्रीस ठेवले होते.आता आम्ही चीझ तयार करतात तो वर्क शॉप बघितला ,चीझ चा भयंकर वास येत होता.विविध प्रकार चे रंगाचे चीझ तेथे विक्री केले जात होते.बागेत फार्म मधे एक फेरी मारली.या ठिकाणी आम्हाला चांगल्या पोसलेल्या मेंढ्या चरताना दिसल्या.,गाई म्हशी तर होत्याच.घोडे पण फिरायला होते.फार्म मधे आत शिरताना एक फोटो ग्राफर फोटो काढत होता,जाताना आवडला तर विकत घेणे .पण ख़रच फोटो अप्रतिम काढला होता त्या मुले जास्त किम्मत देऊन पण विकत घेतला.कैलेंडर मधे लावलेला तो फोटो मी मुलुंड ला घरी घेउन जाणार सांगुन टाकले.त्यावर एक किचेन फ्री होती अगदी लहान मुलासारखा आनंद झाला.लगेच बस ने सेंट्रल स्टेशन ला आलो.पोटात कावले ओरडत होते.खायला घेतले.खात खात आम्ही बोटी च्या इथे आलो.एका भल्या मोठ्या बोटी तुन आम्ही शहराचा फेर फटका मारला.बोटीत बसायला छान सोय होती.काचेने बंद बोट होती त्यामुले थंडी त्रास झाला नाही.शहराची वैशिष्ठे सांगणारे निवेदन सुरु होते.इंग्लिश मधे पण होते त्याने ते समजले.किती तरी बोटी,कालवे पुल बघून मन थक्क झाले.एक वेगला अनुभव घेत होते.सेंट्रल स्टेशन बाहेर चा कालवा दक्षिण महा सागराला मिलतो ते पाहिले.अथांग महा सागर बघत राहिले.दोन्ही तीरावर गाव वसले आहे त्यामुले जा ये करायला बोटी खुपच आहेत.सुमारे २०० हाउस बोटी आहेत सर्व सुसज्ज .त्या बोटी चा पण अनुभव घ्यावा असे वाटू लागले.इकडे मुलाना शाळेत पोहने सक्तीचे आहे.बरीच मुले,लोक बोटी वल्व्हत होते.श्रीमंत लोक स्वताच्या बोटी तुन मौज करत होते.सफर संपली,परत ट्राम ने घरी आलो.

Tuesday, October 20, 2009

diwali....

          आली माझ्या घरी ही दिवाली.........
                   परदेशातील दिवाली.फरालाचे काय काय करावे असा विचार करत होते?इकडे कोणत्या वस्तु मिलातिल?असे विचार सुरु होते.पण पाहिले तर सर्व मिलते.सुखाचे म्हणजे नारळ खर्वद्लेला सफेद खोबरे.ते शाहाल्याचे असते.सुके खोबरे पण बारीक़ रव्यासारखे.फरालाला रवा नारळ लाडू,चिवडा.करंजी,खरी पूरी,नारळ वडी केले होते..
चकली करता आली नाही कारण सोर्या अणि भाजणी नेली नव्हती.
                  सकाळी आरामात अभ्यंग स्नान केले.नंतर प्रसादाला गोड शीरा केला.अनिकेत ने देवाची पूजा केली.मग आम्ही फराल. केला.तिघे फिरायला शोपिंग ला बाहेर पडलो.अनेक दुकाने हिंडून आम्ही २ नॉन स्टिक ची भांडी घेतली,म्हणजे ती अनिकेत ने मला भेट दिली खास दिवाली.दुपारी घरी आलो.पोटात कावले ओरडत होते.मी खास पंजाबी सामोसे केले.ताव मारला सर्वानी
                 लक्ष्मी पुजनाची तयारी केली.पणत्या मधे मेनबत्या लावल्या.मी लक्ष्मी नेली होती.सर्व घरी करतो [भारतात ]तशी तयारी केली.नविन कपडे घातले.साडीला हवा लागली.नंतर पूजन केले.फोटो काढले. भाग्यश्री सुशिल सर्वांची आठवण येत होती पण......
              अनिकेत चा मित्र दिनेश कड़े जेवायला जायचे होते.दिवाली स्वीट म्हणुन घरी खास गुलाब जाम केले,इकडे पर्याय नाही कारण बाहेर स्वीट पदार्थ काही मिळत नाहीत.सर्व मित्र जमले होते.गप्पा गोष्टी टाइम पास सुरु होता.जेवना पूर्वी ड्रिंक्स होतेच.थंडी खुप होती.शाकाहारी जेवण जेवलो.आणि जरा वेळाने टैक्सी करून घरी आलो.थंडीने हैरान झालो होतो.रात्रि उशीर झाला होता.फार नाही साडेआकरा वाजले होते.पण रोअड्वर सामसूम झाली होती.दुसर्या दिवशी रविवार .विश्रांतीचा दिवस.उशिरा उठलो.चहा पिताना गप्पा मारत बसलो.फ़ोन केले खुप.चहा पोहे ब्रेक फास्ट केला.भाग्यश्री ऑनलाइन आली.तिच्याशी गप्पा मारल्या.संध्याकाळी रवि कड़े [मित्राकडे]जायचे होते.आम्ही उपमा करून नेला.रिचा ने घरी ढोकला भजी केली.वैजयंती ने लाइम रईस करून आणला होता.भात नाही हं शेवया वापरल्या होत्या.मला त्यांचे घर फार आवडले.सजावट छान आणि स्वच्छ नीट नेटके.गुलाबाची फुले तर इतकी छान होती मन अगदी प्रसन्न झाले.खाणे पिणे ,गप्पा टाइम पास करून रात्रि वेळेवर घरी आलो.
             अशी झाली मित्र मैत्रिणी मधे दिवाली साजरी.एक वेगला अनुभव.

Tuesday, October 13, 2009

             दिवाली पुर्वीच शनिवारी इकडे एका मॉल मधे दिवाली कार्यक्रम झाला.मी अगदी उत्सुकतेने पहायला गेले होते.शालेच्या सा.कार्यक्रमा प्रमाणे फक्त नाच होते विविध प्रकारचे.काही छान पोशाखात तर काही नेहमीचे कपडे घालून.हे विशेषतः जीन्सची पेंट अणि टी शर्ट घालून भांगडा करताना जाणवले.तिकडे बरेच स्टाल होते.खायचे अणि इतर वस्तुचे.आपल्याकडील फन-फेअर सारखे वातावरण होते.बहुतांशी लोक खाणे आणि गप्पा मारत टाइमपास करणे यात मग्न होते.काही लोक खरेदी करत होते,पण प्रमाण कमी.छान कापडी आकाश कंदील मला तेथे दिसले,आवडले.
          महत्वाचे काय तर बाजु च्या तंबूत को़क टेल पार्टी सुरु होती.आपल्याकडे जशी थंड पाणी ,सरबत ची गाड़ी असते ना तशी बियर ची गाड़ी तेथे होती.कारण पान्यासारखी प्यायची ना?तरुण मुले अगदी धुंद होती,बियर पीत .सर्व भारतीय बर का?
        महाराष्ट्रियन लोक कमी दिसले.ब्राह्मण तर नाहीच.पण दक्षिण भारतीय,गुजराथी ,पंजाबी भरपूर होते.शहरात फिरताना फारसे कुठे दिसत नाहीत.इथे मात्र खुप भारतीय होते.काही यूरोपियन पण या कार्यक्रमाला आले होते.आनंद घेत होते.ठेका धरून नाचत होते.आपल्या मुलाना भारतीय संस्कृतीची ओळख करून देत होते.
      शेवटी फटाक्यांची आतशबाजी होती.
             स्विस ट्रिप छान झाली.आता परत रोजचे जीवन सुरु.संध्याकाळी खुपच बोअर झाले म्हणुन एकटीच फिरायला बाहेर पडले.आज एका लहान मुलांच्या पार्क मधे गेले.छोटी छोटी गोरी गोमटी यूरोपियन मुले मस्त बागेत खेलत होती.घसरगुंडी,झोपाले ही साधने होतीच.काही मुले सायकल [३ चाकी],तर काही विंटर मधे बर्फावर चालायचे स्लाय्डिंग पैड घेउन आले होते.मातीत तर अगदी छान खेलत होती.हे साम्य दिसले.मुलाना घेउन आलेल्या त्यांच्या माता मैत्रिनिशी गप्पा मारत आरामात बसल्या होत्या.अगदी ४/५ वयाच्या २ मुली सायकल घेउन चक्क गेट च्या बाहेर गेल्या.मी हे सारे एकटक बघत होते.वाटत होते,त्या मुलीना परत बागेत घेउन यावे.पण माझी भाषा त्याना कशी समजणार?रस्ता चुकल्या तर ?हरवल्या तर?मनात विचार सुरु झाले.काही वेळाने एक पॉश [टकाटक]माता उठली.तिने अगम्य भाषेत त्या मुलीना बोलावले,[आधी शोधले मग]रागावने ,ओराड़ने.काहीही नाही.धपाटा तर दुरच.!!!!!!!शांतपणे बोलावले आणि ते परत गप्पा मारत बसली.मुलांचे मानस शास्त्र असे जपतात का या माता???इकडची मुले रडत का नाही??हट्टी पणे का वागत नाहीत??????या प्रश्नाची उत्तरे मला मिळाली.मला इकडे येवून एक महिना झाला.रोज ठराविक रोड वरून ये जा मी करते.झाडे जी आधी हिरवी गार दिसत होती.त्या झाडांची पाने रंग बदल झाला आहे तर काही झाडांची पाने गलून खाली पडत आहेत.विंटर ची सुरवात आहे.

Monday, October 12, 2009

          आपल्याकडे टूर [ट्रिप]ठरवून प्रवासाची सर्व सोय व्यवस्था करणार्या भरपूर ट्रेवल कंपनी असतात.उदा.सचिन,केसरी.पण इकडे अशी सोय नाही.सर्व आपले आपण करायेचे.विमान,रेल वे,होटल बुकिंग.प्लान करणे ,प्रेक्षनीय ठिकाने बघणे जाणे येणे मार्ग बघणे.सर्व काही स्वतः नियोजन करावे लागते.नकाशा आणि टाइम टेबल याचा उपयोग प्रवाशाना सतत करावा लागतो.अनिकेत नंदिनी ने प्लान परफेक्ट केला होता.त्या नुसार आम्ही ४ दिवसात बरेच काही बघू शकलो.सामान किती ?काय ते सर्व शिस्तीत .त्यामुले प्रवास अगदी सुखकर......
         अशी झाली आमची स्विस ट्रिप,तुम्हाला पण  आवडली ना??????????
             आज परतीचा प्रवास होता.स्विस वरून निघावे असे वाटत नव्हते.ब्रेक फास्ट करून निघालो.आधी ग्लेशियर एक्सप्रेस ने जायचे होते.ती गाड़ी ३ ट्रेन बदलून मग होती.स्टेशन वर स्विस एअरलाइन चे सामान घेतले जात होते पण ४० फ्रँक जास्त देवून.दिले कारण त्यामुले सामानाचे ओझे कमी झाले.त्या दोघाना सुट्सुतित चालताआले.नंतर आम्ही ३ गाड्या बदलून त्या ग्लेशियर एक्सप्रेस मधे बसलो.खरे तर दमलो होतो,पण काय विशेष आहे या गाडीत?आतून कशी असेल उत्सुकता होती.गाडीला मोठमोठ्या काचेच्याच खिडक्या,छताला पण काचच.पडदे नाहीत ,निसर्ग सौन्दर्य पाहण्या साठी.टाइमपास करण्या साठी खास गाड़ी.सर्व प्रवास मार्ग डोंगरा मधून.सिट समोर समोर ४ जन आरामात बसता येतील अशा.मधे मोठे छान फोल्डिंग टेबल.टेबल क्लोथ पण ....गाडीत मस्त सुसज्ज रेस्टोरंट.क्रिकेट कॉमेंट्री प्रमाणे गाडीचे ,प्रवासाचे वर्णन सुरु होते.प्रवासी मस्त गप्पा गोष्टी करत,टाइमपास करत,यथेच्छ दारू पीत प्रवास करत होते.इथे पण स्त्रिया मागे नाहीत बर का??????फक्त सर्व गाड्या तुन स्मोकिंग ला बंदी होती.तेवढे तरी बरे!!!नाहीतर इकडे स्त्रियाच जास्त धुम्रपान करताना मी पाहिले.जानूँन घेतले तर कशा साठी??????स्लिम रहायला .त्यानी म्हणे भूक मरते.अजुन बारीक़ होण्यासाठी हा उपाय करताना मी तरी कोणाकडून एइकले नाही.
                   या गाडीतून निसर्ग सौन्दर्य छान दिसत होते,पण ४ दिवस सतत तेच बघून कंताला आला होता.आपली सहज प्रवृति नाही का?सतत काही तरी नवे हवे!!!!!गाडीत आमच्या जेवणाची बोम्ब होती.कारण त्यांचे नॉन.वेज प्रकार भयानक होते.आम्ही बरोबर घेतलेले खात टाइमपास केला.शेवट च्या दिवशी त्या गाडीत तब्बल ४.३० तास बसणे,जरा बोअर होते.पण काही मार्ग नव्हता.या गाडीने आम्ही चूर ला आलो.तिकडे दूसरी गाड़ी पकडून आम्ही झुरिक विमान तलावर आलो.हे विमान तल माझ्या साठी नविन होते.शिपोल पेक्षा ५ पट मोठे होते.सर्व प्रकारची भरपूर दुकाने होती.थोडा वेळ टाइमपास केला.चहा घेउन,चे़किंग करून आत जाऊँन बसलो.आता दिड तास प्रतीक्षा विमानाची..विमान वेळेवर बोर्ड झाले पण प्रवासी आले नव्हते.त्यामुले १५ मिनिटे उशीर झाला पण अखेर आकाशात झेप घेतली.आज मात्र विमानात २ छान गोड मुली एयर होस्टेस होत्या.त्या दिवशी सारखेच चीझ जूस चोकलेट सर्व .कारण तेहि स्विस ऐर्वेज चे विमान होते.अखेर आम्ही १०.४० ला शिपोल विमान तलावर उतरलो.पण सामान मिलायला थोडा उशीर झाला.आता मात्र ट्रेन,बस ने जाण्याची ताकद नव्हती.अनिकेत ने टैक्सी ने जायचे ठरवले,थोड़े खर्चिक होते पण...केली.टैक्सी कोणती?तर मर्सिडीज गाड़ी.अनिकेत ने मला विचारले,''आई तू मर्सिडीज गाडीत बसली आहेस ,कलले का?'लगेच हो तर सांगितले.पण लगेच तू आता अशी गाड़ी घे ,मला आवडेल त्यातून फिरायला असा सल्ला पण दिला.घरी आलो.शेवटी आपले घर ते घरच.......घरी मस्त वरण भात करून जेवलो.फोटो बघत ते दोघे बसली होती,पण मी काही त्यात रस घेतला नाही,दमले होते झोप प्रिय होती.
                      सकाळी उठून आवरून तिघे तयार झालो.आज ब्रेक फास्ट करून बाहेर जायचे ठरले होते.पोटभर ब्रेक फास्ट करून आम्ही स्टेशन वर पोचलो.पिलातुस ला आम्ही २ ट्रेन बदलून गेलो.गाडीत पत्ते खेलत होतो.गोल्या चोकलेट टाइमपास खात होतो.मजा करत होतो.इकडे पण डोंगरावर जायला केबल कार होती.पण खुप वेळ म्हणजे ४० मिनिटे लागणार होती.सीटवर बसून सृष्टि सौन्दर्य बघत होते.आता त्या गाडीची माहिती झाली होती,पण इतका वेळ जरा जास्तच.अवघड वलने घेत गाड़ी जात होती.ट्रेकर बाजूने चालताना दिसत होते.२५ लोक जा ये करू शकत होते त्यातून.डोंगरावर केबल कार हे जणू वाहतुकीचे साधन आहे इकडे.
                   आज मात्र मी खुप दामले होते,पाय सुजला होता,जड़ झाला होता.तरी पण पिलातुस बघायला गेले होते.तेथे उंचावर पायर्या चढून मात्र गेले नाही.बाकावर बसून लोक ये जा करत होते गम्मत बघत बसले होते.परत येताना खरी धमाल होती.येताना गंद्वोला ने यायचे होते,त्यात ते हलू हलू फिरत असताना बसायचे होते,बसले....आम्ही तिघे जन त्यात होतो.ते स्वतंत्र असते केबल ला लटकलेले.सुरु झाल्यावर मला जरा भीती वाटली.वेग जास्त नव्हता.पण तरंगते होते.खोल खाली समोर दाट झाडी दिसत होती.वायर तुटली तर?????शंका मनात येत होत्या,पण शांत बसले.जवळ जवळ ५० मिनिटे त्याला खाली पोचायला लागतात.हा अनुभव पण थ्रिल होते,गम्मत,मजा वाटली.नंतर बस ने आम्ही लुझेन ला आलो.बर्गर किंग मधे गेलो,बर्गर,फ्रेंच फ्रैएस ,कोक युरोपियन  पद्धति चे जेवलो.नंतर शहरात फिरायला सुरवात केली.मोठमोठे तलाव आणि बदके पाहून झाली होती,इकडे बगले,राजहंस पण दिसले.१८६० साली बांधलेला चैपेल ब्रिज पाहिला.सम्पूर्ण लाकडी बांधकाम आणि सजावट करीता आकर्षक चित्रे लावली होती.तलावावर ब्रिज मात्र तिरका का बांधला आहे ?हे समजले नाही.ब्रिज वर या टोकापासून त्या टोकावर लोकानी फक्त चालत जायचे.एकही विक्रेता या ब्रिजवर नाही हे विशेष !!!!!!
                लुझेन मधील आणखी एक ठिकाण....सिंह झोपलेला,आणि शस्त्रास्त्रे बाजूला.ढाल तुटलेली असे शिल्प खुप मोठ्या दगडात कोरलेले आहे.लढाई च्या वेळी अनेक सैनिक मारले गेले,त्यांच्या स्मरणार्थ हे शिल्प आहे.एका अखंड दगडात कोरलेले शिल्प खर्च अप्रतिम आहे.आजुबाजुला छोटी मोठी दुकाने आहेत,पण खायचे पदार्थ ,पानाची चहा ची टपरी असे काही नाही.
                धावत पळत परत जायला गाड़ी पकडली,कारण ते थेट ट्रेन होती.२ तासाने इंतर्लाकन वेस्ट ला पोचलो.होटल जवळ होते.आता मात्र मी फार थकून गेले होते,वेदना खुप होत होत्या गोली घेतली ,आणि फक्त विश्रांति.माझ्या पायाचे तुकडे पडले होते,ते दोघे शोपिंग ला गेली.उद्या सकाळी होटल सोडायचे होते.म्हणुन कपडे भर,पसारा आवर अशी कामे केली.आज पण परत ताज मधेच जेवायला गेलो.या होटल मधे बार कॉर्नर होता.काल ,आज पण साधारण माझ्या वयाची एक यूरोपियन स्त्री एकटी येवून मस्त पीत बसली होती.या देशात काहीही चालते ,केले तरी/आपल्याकडे एकटी बाई असे काही करू शकत नाही.आणि केले तर समाज,घरातील लोक तिला सुखाने आयुष्य जगु देत नाहीत.दारू पिणे असे नाही ,कोणत्याही गोष्टीत तेच  असते असे माझे तरी स्पष्ट मत झाले आहे.असो!
                ताज होटेलची आठवण म्हणुन फोटो काढले आणि रूमवर परत आलो.उद्या सकाळी थोड़े उशिरा निघायचे होते.सर्व आवरून झोपलो....

Sunday, October 11, 2009

             धब धबे पाहून झाल्यावर हाताशी थोडा वेळ होता ,लगेच क्रुझ सफर करू या ठरवले.आणि इन्तेरलाकन ओसत ला आलो,एक बोट नुकतीच गेली होती.त्यामुले ४० मिनिटे गप्पा मारत टाइमपास केला.अनिकेत ने जाऊँन ग्लेशिएअर एक्सप्रेस ची तिकिटे काढली.मोठ्या सुसज्ज बोटीचा अनुभव पण प्रथमच.बोटीत वर बसावे विचार करून चढलो.पण आम्हाला परत खाली यावे लागले,कारण तो फर्स्ट क्लास साठी होता.बोटीत पण सगलीकडे मस्त कारपेट होते.३०० लोक बसू शकतील अशी सोय होती.गार वारा,थंडी याचा त्रास नको म्हणुन बंद रेस्टोरंट होते.काचेतून सृष्टि सौन्दर्य बघता येत होते.इथेही लोक आरामात बियर घेत टाइमपास करत होते..कारण ही फेरी अडीच तासाची होती.प्रथम बाहेर बसलो पण गारठा वाढू लागला तसे आत आलो.अनिकेत बियर अणि आम्ही दोघिनी चहा घेतला.चहा घेणारे आम्ही २/४ भारतीय च होतो.इकडचे सर्व वयाचे लोक आयुष्याचा उपभोग छान घेतात.मस्त एन्जॉय करतात.याना काही चिंता नसतीलच का???????????पण घर घर करत ते अडकून पडत नाही हे मात्र नक्की.आपण त्यात गुंतलेले असतो,उपलब्ध असेल तरी आपण उपभोगु शकत नाही.असे असले तरी आपली संस्कृति उ़त्तम........एकमेकानी एकमेकांच्या भावना समजुन घेतल्या नाही तर काय रुक्ष जीवन जगायेचे???????????
                    बोटी तुन उतरलो.आज ताज मधे जेवायला जायेचे होते.तिकडे अगदी चविष्ट जेवण होते.चिकन मस्त ,पण लस्सी पण मस्त होती.त्या मानाने खिशाला झेपतिल असे दर होते.त्याच एका होटल मधे स्क्रीन वर हिंदी गाणी बघता आली.नाहीतर हिंदी इंग्लिश नाहीच,मराठीचे तर नावच नको!!!!!!!!!!!!!!!!!जेवून परत आलो.दुसर्या दिवशी अजुन एका डोंगरावर जायचे होते.
                         घड़यालाकडे लक्ष देवून उठलो.तेथील दुकाने बघितली.शोपिंग काही केले नाही.कारण प्रचंड महाग होते.परतीच्या तयारीला लागलो.तिकडे खाण्याचे थोड़े हाल झाले पण बरोबर असलेले पराठे,साटोर्या कामी आल्या.परत उतरताना झुमकन उतर नारी ते केबल कार हृदयाचा ठोका चुकवत होती.पण थ्रिल होते !!!!!!!!!!मस्त.परत ट्रेन मधे बसल्यावर ,कसे काय शूटिंग झाले असेल??आता तो पिक्चर बघायला हवा.अशी चर्चा सुरु झाली.आम्ही आता तिकडे धबधबे बघायला जाणार होतो.बस ची वाट पाहत होते.तेथे समोर मैदानावर चक्क एका पाठोपाठ एक हेलिकोप्टर उतरत होती.माझा समज कोणी वरिष्ठ व्यक्ति आल्या असतील.पण तसे नाही तर प्रवाशाना त्यात बसून फेरी मारायची सोय होती तिथे.खिशाला सर्व काही झेपणारे नाही म्हणुन आम्ही बसलो नाही.पण गम्मत मात्र सर्व अगदी नीट पाहीली.तितक्यात बस आली आम्ही बसने निघालो.स्विस पास असल्याने टिकिट नव्हते .बस मधून उतरून काही अंतर चालत जायचे होते.छान खलालनारा झरा बाजूने वाहत होता.रोड च्या बाजूला चक्क सफरचंदाची झाडे होती.ते झाडे बघत आम्ही फोटो काढत पोचलो.एका भल्या मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी पोचलो.तिकडे एकून १० प्रचंड मोठे धब-धबे आहेत.जायेचे कसे असा विचार करतो तर लिफ्ट समोरच दिसली.एकच लिफ्ट मन होता.तिकडे मानुस बल कमी हे जाणवले.त्या लिफ्ट ने वेगाने आम्ही अर्धा डोंगर चढलो.६ धब धबे खाली आणि ४ चढून जायेचे,झेपेल का विचारच केला नाही.डोंगराल गुहेत खोदलेल्या रस्त्याने चालायला सुरवात केली.दम लागला पण चढले.पाण्याचा आवाज भयानक होता.आजू बाजु च्या डोंगरावर जो बर्फ जमतो त्याचे ते पाणी म्हणजे हे धब धबे,हे एइकुन तर मी अवाक् झाले.सतत इतके पाणी???बर्फ पडतो तरी किती????????इकडचे तलाव इतके मोठे अणि काठोकाठ भरलेले म्हनुनच आहेत लक्षात आले.किती तरी दश लक्ष लीटर पाणी खलालत पडताना पाहिले.पाण्याच्या वेगाने दगडाची झीज झालेली होती.पाणी मुबलक त्यामुले विज निर्मिती भरपूर.विजेवर ट्राम,बस ,रेल वे चालतात.प्रदुषण कमी,आणि खर्च पण कमी होतो.लाइट जाणे हा प्रकार नाही,लोड शेडिंग शब्द माहितच नसेल.मला आपले तलाव,पाण्याची स्थिति ,पाणी कपात सर्व आठवले.नशीबवान आहेत हे लोक याना मुलभुत गोष्टीची कमतरता नाही.धब धबे बघताना अनेक असे विचार डोक्यात येत होते.शांत पणे पायर्या उतारत खाली आले.बाकावर १० मिनिटे विश्रांति घेतली.आणि परतीच्या प्रवासाला निघालो.बस स्टॉप समोरील मोठ्या दगडावर बसून पराठे खाल्ले,कारण आज दुसरे काही मिळाले नव्हते.

Thursday, October 8, 2009

                  मोबाइल मधे गज़र झाल्यावर प्रथम मी उठून आवरून घ्यायचे असा नियमच झाला होता.कारण एकच बाथरूम होती .माझ्या नंतर त्या दोघानी आवरले आणि आम्ही लगेच बाहेर पडलो.आज ब्रेक फास्ट नाही की चहा नाही.बस ट्रेन पकडून आज आम्ही शिन्थ्रोवं ला जात होतो.कालचा तोच सुखद अनुभव आज पण,कनेक्टिंग गाड्या आराम शिर प्रवास आजपन.आज गाडीत आपल्याप्रमाने जरा वेळ पत्ते कुटले.रम्मी!गाडीतून उतरून जवळ जवळ अर्धा तास केबल कार साठी चालत जायेचे होते.म्युरेन हे एक छोटेसे गाव .धुक्याची झालर सगालिकडे ,त्यातून चालने मौज होती.समोरचे काहीही दिसत नव्हते,काही अंतराने जरा घरे दिसू लागली.सर्व लाकडी घरे बंगलो टाइप .भाज्या परसात लावलेल्या दिसत होत्या.आणि फूल झाडे तर विविध रंग प्रकार पाहून वेड लागत होते.मला आमच्या फोटो ग्राफर वैभव आणि राम गोपाल वर्मा [टोपण नाव खरे नाव माहित नाही]ची आठवण झाली.खास त्यांच्या साठी फुलांचे फोटो काढून घेतले.नंतर आम्ही गाव बघत केबल कार स्टेशन ला पोचलो.आता जरा केबल कार ची माहिती झाली होती.यात मात्र बसायला सिट नाहीतच.सर्वानी ३० मिनिटे उभे राहून जायचे.एका वेळी ४० प्रवासी जा ये करू शकतात.कार्नर पकडून उभे राहिले.खाली वाकून बघवत नव्हते.धुके दाट होते.आधिक उंचावर गेल्य्वर धुके नाहीसे झाले.काही डोंगर कड्यावर केबल कार आदलनार की काय असे वाटत होते.ही कार ओपरेट  करायेला एक स्त्रीच होती.मला अगदी तिचा अभिमान वाटला.ख़रच स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत बघून समाधान वाटले.आपण आता काहीच करत नाही याची खंत मात्र वाटली.केबल कार ची २ कनेक्शन पूर्ण केली.आणि आम्ही डोंगरावर पोचलो.जरा पुढे चालत गेलो तर गैलरीत जायेला चक्क ३ मजले.पण तिकडे पण सरकते जीने.मला या लोकांची कमाल वाटली,डोंगरावर अशा सोयी करणे सोपे काम नाही.आता मला त्या सरकत्या जिन्याची सवय झाली होती.आम्ही वर पोचलो आणि थक्क झालो.आम्ही वर आणि आमच्या समोर खाली सर्व ढगच ढग.कापुस पिंजुन ठेवल्या सारखे.पांढरे शुभ्र ढग वाहत होते.बघून वेड लागायेची वेळ आली.कल्पनेच्या पलिकडचे मी सत्यात बघत होते.डोंगर रांगा या शब्दाचा खरा अर्थ मला इथेच समजला.डोंगराल भागात पाउस जास्त का पडतो???याचे उत्तर सापडले.त्या भागात फिरताना आम्ही एका होटल मधे गेलो.छोटासा जीना चदुन.......बघते तर काय एक छान सजावट केलेले गोलाकार होटल.त्याचे विशिष्ट म्हणजे जेम्स बोन्ड पिक्चर चे शूटिंग त्यात झाले आहे.ते त्याचे घर दाखवले आहे.सॉलिड ना!!!!!!!!!!!!!
डोंगर माथ्यावर असे होटल सर्व डोक्याच्या पलिकडचे होते.अनिकेत म्हणाला "आई,आपण इथे चहा तरी घेऊ शकतो"मला आधी ती असे का बोलतो कलले नाही.पण ते होटल प्रचंड महाग होते कारण ते गोलाकार फिरते होते.चहा पिताना आपण गोलाकार फिरताना मी अनुभवले.चहा चा आस्वाद घेत ढग पसरलेली झूल आम्ही नजरेत साठवत होतो.परमेश्वर म्हणजे काय ते अनुभवत होतो.चमत्कार वाटत होता.तिकडून निघावे असे वाटतच नव्हते.
                   रात्रीचे ८ वाजून गेले होते आता जेवूनच होटल वर जावे असा विचार आला,पण त्या गरम कपड्याचे दिवस भर वाहून ओझे झाले होते.रूम मधे टाकुन फ्रेश होउन जावे असे ठरले .होटल वर गेलो दमलो होतो पण भुकेमुले लगेच परत निघालो.आज इटालियन फ़ूड खायचे ठरले होते.पिझारिया मधे जाऊँन बसलो पिझा मागवला एक वेग,एक नॉन.वेग.हे सांगायला नकोच.आम्ही तिघात २ पिझा मागवले.शेअर केल्याचे ३ फ्रैंक जास्त भरावे लागले,पण तेच आम्हाला जास्त झाले होते.पिझात फरक खुप होता ,आकाराने मोठा मऊ,त्याच्यावर घातलेले टॉपिंग पडत नव्हते.खास इटालियन!!!!मजेत खाल्ला.प्रत्येक ठिकाणी पिण्याचे पाणी [टैब वाटर]मागावे लागते.कारण यूरोपियन लोक जेवताना दारू/बियर च पितात.पाणी या पेक्षा महाग मिलते इकडे .अजब आहे ना सर्व!!!!!!!!!!!!
                   रात्रि पण प्रवासी रस्त्यावर फिरत होते.पण १/२ तुरलक दुकाने वगलता सर्व दुकाने नियमानुसार ६ वाजता बंद झाली होती.मोठमोठ्या शोरूम ,काचेच्या शोकेस पण कुठेही काचेला बाहेरून लोखंडी शटर्स नाहीत.इकडे चोर्या होतच नाही का ??असा विचार मनात सहज डोकावला.
                 रात्रि झोपन्या आधी उद्या चा प्लान ठरवून झोपी गेलो.
                 घरासमोर छोटीशी बाग,फुलझाडे तर विविध प्रकारची बहरलेली,पण त्याच बरोबर भाज्या मुला,कोबी ,फ्लावर लावलेल्या दिसल्या.घराच्या बाहेरच्या बाजूने घरावर काहीतरी सजावट केली होती.इकडे कोणी कोणाच्या फुलाना,फलाना,हात लावत नाहीत.त्यामुले झाडे फला,फुलानी बहरलेली दिसतात.समाधान वाटते ते सर्व घरे बघून.काश!अपना भी एइसा घर होता???
                रेल वे ट्रेक,[रुल]दगडी खड़ी, लाकडी स्लीपर्स पट्ट्या हेच साम्य मला आपल्या आणि त्यांच्या रेल वे मधे दिसले.गाड्यांचा मार्ग जरा अजबच वाटत होता.कधी गाड़ी सरल पुढे जायेची तर कधी ठराविक स्टेशन पासून उलट्या दिशेने जात असे.पण समोर नकाशा आणि सूचना एइकुन प्रवास सुकर होत असे.
              त्या नयनरम्य निसर्गातुन परत आम्ही साधारण ४ वाजता इन्तेरलाकिन वेस्ट ला आलो.आता लगेच हर्दर कुल्म ला जायेचे ठरले.आम्ही तिथे पोचलो वेळ थोडाच होता.तिथे एक केबल कार होती .प्रथमच केबल कार मधे बसले.काचेतून गाडीचा चिन्चोला मार्ग फक्त दिसत होता,दोन्ही बाजूला दाट झाडी,डोंगर,दरी आणि मधे मधे बोगदे .केबल करने उंच डोंगरावर जाने हा अनुभव प्रथमच.उत्सुकतेने ,थोड्या भीतीने इकडे तिकडे बघत होते,पण काही मिनिटात आम्ही वरती पोचलो.वर गेल्यावर खाली वसलेले शहर चित्रा प्रमाणे सुन्दर दिसत होते.५/१० मिनिटे चालत चालत डोंगर कडेने आम्ही त्या पॉइंट वर पोचलो.वा !!एक सुसज्ज रेस्टोरंट अणि लहान मुलाना खेलायला छान बाग़ होती.घसरगुंडी,झोपाले सर्व साधने होती.अणि बागेत फुले तर खुपच विविध .अगदी बघत रहावे असे ते ठिकाण होते.येताना केबल कार मधे आलेले दडपण,भीती कधीच दूर झाली होती.सवयी प्रमाणे चहाची वेळ झाली म्हणुन चहा घेतला स्त्री वेटर इ़थे पण होती.सहज चहा चा दर विचारला,पण खाली आणि उंच वर दरात काही फरक नाही.आपल्या कड़े हिल स्टेशन ला हे दुकानदार लोकाना किती लुटतात.हे लगेच आठवले.फोटो काढ़ने सुरु होते.शेवटची केबल कार ६.३० ची होती.लगेच परतीचा रस्ता धरला.मनात शंका शेवटची चुकली तर खाली जाणे काही शक्य नाही.तिकडे पायवाटा भरपूर आहेत.अनेक हौशी तरुण ट्रेकर जाताना दिसत होते.मला काही उतरने शक्य नव्हते हे मात्र नक्की.
                 या यूरोपियन लोकाना पालीव प्राणी कुत्रे फार आवडतात हे दिसले.माझ्या तर मनात आले इकडचे कुत्रे ख़रच भाग्यवान आहेत.कारण सर्व ठिकाणी हे लोक कुत्र्याना घेउन जातात.घरी बांधून ठेवून जात नाहीत.त्यामुले त्याना पण निसर्गाची आवड निर्माण झालेली दिसली.केबल कार मधे अगदी अवाक् होउन आम्ही त्या उंच डोंगरावर खाली खोल दरी बघत  कसे वर जात आहोत ते डोळे फाडून बघत होतो.त्याचवेळी बाजुचा कुत्रा पण पूर्ण  वेळ काचेवर पाय लावून एकटक निसर्ग सौन्दर्य पाहत होता.गाडीत [ट्रेन]बस ट्राम होटल मध्ये कुत्र्याना सर्रास घेउन जायला परवानगी.मोठे कुत्रे असतील तर काही ठराविक पैसे भरावे लागतात ,होटल च्या रूम मधे रहायला लहान कुत्र्याना ,पिल्लाना तर फ्री.आमच्याच होटल मधे तशी सोय होती.मग ख़रच आहेत की नाही भाग्यवान इकडचे कुत्रे!!!!!!!!!!!!!!!!!!!!
             चढताना पेक्षा उतरताना रस्ता आधिक खोल समोर दिसत होता.मनावर दडपण येत होते.ड्रायवर कड़े किती गाडीचा कण्ट्रोल आहे सतत जाणवत होते.प्रवासी फोटो काढताना उठून इकडे तिकडे जात होते.माझी मनाची चल-बिचल सुरु होती.कन्या राशीच्या लोकांप्रमाने मला शंका जास्त येत होत्या.निसर्गाची किमया पाहत आम्ही खाली सुखरूप आलो,श्वास टाकला.वेळ जरी अगदी कमी  असला तरी अनुभव रोमांचकारी होता.
            येताना परत जरा टाइमपास करत होतो.२/४ दुकानात  लाकडाच्या कार्विंग केलेल्या वस्तु,चित्रे अप्रतिम होती.पण किमती खिशाला झेपनार्या नव्हत्या.तसेच    कट वर्क केलेले कापडी रुमाल ,टेबल क्लोथ खुप छान होते .आमचे सह प्रवासी घेत होते,वेडया सारखे खरेदी करत होते.इतका पैसा येतो कुठून?हा विचार येत होता.याचे पण हे लोक आपल्या देशात जाऊँन मार्केटिंग करत असतील अशी शंका आली.       

Tuesday, October 6, 2009

प्रथम आम्ही आइस पेलेस बघायेचे ठरवले.आणि त्या गुहेत शिरलो,बर्फाची गुहा.पायात बुट होते तरी सुरवातीला पाय सरकत होते.अनिकेत चा आधार घेत चालू लागले.बर्फाची कलाकृति बघत त्या गुहेतून आम्ही जवळ जवळ एक तासभर फिरत होतो.फोटो काढत होतो,आणि अजब अनुभव घेत होतो.कायम लोकाना बघता यावे असा हा पेलेस बनवला आहे.सहप्रवासी बरेच होते पण इंडियन अगदी कमी २/४ जण होते.आइस पेलेस बघून नंतर आम्ही परत त्या लिफ्ट ने आणि उंचावर म्हणजे ज्याला टॉप ऑफ़ यूरोप म्हणतात.त्या जुन्ग्फ्राऊ[युन्ग्फ्रा] या डोंगरावर आलो.आणि ख़रच सांगते तुम्हाला मी तर बर्फाची रास पाहून वेडी झाले.खुप वर्षाची माझी इच्छा पूर्ण झाली.पानढर्या शुभ्र बर्फावर गार वार्यात आम्ही तिघे फिरत होतो.पाय घसरत होते.एकमेकाना धरत चालत होतो.त्यावेळी मला किती आनंद झाला होता सांगू शकत नाही.पण ख़रच माझ्यासाठी तो एक अविस्मणीय अनुभव होता.मी इकडे पर देशात आल्याचे सार्थक झाले असे वाटले.थंडीने हात पाय गारठले होते.पण त्याच ठिकाणी मन प्रसन्न ,शांत वाटत होते.लहान मुलासारखे बर्फा वरच थाम्बावे असे वाटत होते.खुप वेळाने परत गेस्ट रूम मधे हीटर जवळ येवून बसलो.पण माझे काही समाधान झाले नव्हते .मी अनिकेतला पुन्हा एकदा बर्फावर जाऊ या का विचारलेच?? लगेच अनिकेत आणि मी पुन्हा एकदा एक फेर फटका मारून सर्व पॉइंट वर गेलो.लहान मुले कसे करतात तसे मी केले हे मला नंतर जाणवले.पण मन भरून समाधानाने आम्ही तिकडून निघालो.आता पर्यंत मी माझ्या मित्र मैत्रिनिकडून सर्व वर्णन ऐकली होती.आज मी मात्र ते प्रत्यक्ष अनुभवले होते.कधी एकदा सर्वाना सांगते असे मला झाले आहे.आता मात्र पोटात कावले ओरडू लागले होते.आम्ही तिकडे असलेल्या एका गोलाकार रेस्टोरंट मधे गेलो,ते म्हणजे बॉलीवुड रेस्टोरंट .होटल मधे बसल्यावर दमलो पाय बोलू लागले होते.पण रेस्टोरंट सुसज्ज बांधलेले पाहून मी अवाक् झाले.अनिकेत ने आई तू काय खाणार?विचारले.मी बघते तर काय तिकडे इंडियन फ़ूड ची पण छान सोय.मी तेच घेणे पसंद केले.त्या दोघानी वेगवेगले जेवण घेतले.उंचावर अशा थंड वातावर्नात डाल,भात ,छोले गरमा गरम खायला मिलने या सारखे सुख नाही!!!!!!!!!हे जाणवले.खास इंडियन फूड बरोबर पाणी बाटली फ्री.मला नवल वाटले.इतर जेवणाच्या तुलनेत इंडियन फ़ूड तेथे थोड़े महाग होते.पण चविष्ट होते.
            बर्याच ट्रिप तिकडे येत होत्या.प्रवासी साठी सोयी छान होत्या,बूफे पद्धत सर्वत्र होती.जेवण झाल्यावर ताटे[ट्रे]ठेवायला खास कपाट होते.त्यात ट्रे सरकवून ठेवणे काम .ही कपाट चाके असल्याने वेटर मुली सहज हलवू शकत होत्या.थंडीने भूक पण जास्त लागत होती.मस्त जेवलो त्यावर डेझर्ट म्हणुन केक घेतला.फ्रेच फ्राइज ,सलाड तिकडे जास्त खातात.चिकनचे ,फिश चे मटन चे अगम्य प्रकार जेवणात होते.माझे मन मात्र त्याच आनंदात भारावलेले होते.परत येताना ट्रेन मधे चढताना बायबाय करावेसे वाटत नव्हते.त्याचे टॉप ऑफ़ यूरोप हे नाव ख़रच सार्थ आहे हे नक्की.
                 येताना घरे पाहताना काही घरे चक्क तिरकी बांधलेली दिसली.प्रत्येक घरावर ते घर किती वर्षा पूर्वीचे आहे त्याचा उल्लेख होता .घराला ,बंगल्याना आपल्या सारखी नावे कुठेही दिसली नाहीत.पण ६० ते ७० वर्ष जुनी घरे मात्र सुस्थितीत दिसत होती.पुरातन वास्तु जतन करने किती गरजेचे आहे याची जाण त्या लोकाना आपल्या पेक्षा आधिक आहे हे प्रकर्षाने जाणवले आता आपल्याकडे जुने वाडे पडून टॉवर बांधले जात आहेत.घरातील जुनी भांडी ताम्ब्या,पिटालेची काढून नॉन स्टिक वापर केला जात आहे,घरातील जुने शिसवी फर्नीचर काढून नविन तकलादू आनले जात आहे.आणि ही म्हणे आपली सुधारणा,प्रगती.!!!!!!!!!!!!!!!!विसंगत वाटते ना सर्वेच......
          दाट झाडी,कापलेले हिरवेगार गवत,खलखल वहानारे झरे,डोंगराच्या पाय थ्याशी वसलेली ती गावे बघून मन आनंदित झाले होते.प्रत्येक घराचा प्रकार सारखा लाकडी बांधकाम ,उतरती छपरे बालकनी [सज्जे]खिडक्या सर्व ठिकाणी बहरलेली फूल झाडे,असे ते दृश्य ,प्रत्येक गावात एक तरी चर्च होतेच.गाई-गुरे निवांत पणे चरत होती.चारा पाणी सर्व काही मुबलक ,त्या मुले गुरे पण धष्ट पुष्ट दिसत होती.प्रत्येक गुराच्या गळ्यात लहान मोठी घंटा बांधलेली होती.त्याचा आवाज ख़रच मधुर वाटत होता.
          गाड़ी बदलताना कुठेही गर्दी नाही,धक्का बुक्की चा सवालच नाही.शांत पणे चढ़ने उतरने.अनिकेत नंदिनी माझी खुप कालजी घेत होते प्रवास करताना .खिड़की ची जागा सर्वाना असा सुखद अनुभव होता.नेर्रो गेज ट्रेन ने प्रवास करताना दिसणारे निसर्ग दृश्य शबदात सांगणे शक्य नाही,फोटोत पण नाही,अनुभवले पाहिजे.मला ते सर्व पहाताना अनेक कविता आठवत होत्या.कवीने कल्पनेने वर्णन केलेले मी आज उघड्या डोळ्यानी बघत होते.हिरवे हिरवे गार गालीचे ,खेड्या मधले घर कौलारू ,आल्याड डोंगर पल्याड डोंगर,अशी कितीतरी गाणी मला आठवत होती.शेवटच्या मौन्टन ट्रेन मधे तर डोंगर फोडून रस्ता करनार्याची,आणि आधुनिक तंत्राने प्रवाशाना सुखद रित्या नेणार्या त्या लोकाची मला कमाल वाटली.गाडीत स्क्रीन वर सर्व सूचना दिल्या जात होत्या,हवामान कसे आहे ,टेम्प्रेचर किती आहे सर्व....टिसी पुरुष होता,गमतीदार होता सर्वाशी त्याला बोलायेचे होते,गाड़ी ठराविक ठिकाणी थाम्ब्वुन पॉइंट दाखवले जात होते,अनुभव विचारत होता.डोंगरात इतक्या उंच ठिकाणी पण टॉयलेट बाथरूम ची सोय उत्तम होती.पाणी भरपूर आहे पण त्याचा योग्य वापर होत आहे हे जाणवत होते.अखेरचा स्टॉप आला .थंडीने गारठले होते.डोक्याला टोपी,मफलर ,हातमोजे ,कोट सर्व घालून चलायेला सुरवात केली.५/१०  मिनिटे चालून लिफ्ट ने सरल डोंगर माथ्यावर .लिफ्ट ला वेग खुप,एकावेली २० लोक जा ये करू शकत होते.
डोंगराच्या कुशीत वसलेल्या या छोट्याशा गावात इन्तेरलाकन वेस्ट ला आम्ही पोचलो,फलाट रोअदला लागुनच होता.लगेच बाहेर पडलो.स्टेशन पासून ५ मिनिट अंतरावर होटल होते.चालत जाताना गाव बघयेला सुरवात केली.स्विस वॉच ची सर्वात जास्त दुकाने दिसली.होटल वर पोचलो,मस्त होटल .प्रशस्त खोल्या,सगालिकडे गालीचे,मस्त सजावट.खोलीतून निसर्ग सौन्दर्य अप्रतिम दिसत होते.थंडी होती पण मला झेपत होती.विंटर सुरु होणार याची तयारी सुरु झाली होती.आता तिकडे हल्लो इन फेस्टिवल असते,त्यासाठी लाल भोपले सगलीकडे सजवाटित ठेवलेले दिसले.कोणाचे नशीब कुठे?भोपले ....जरा वेळ बाहेर फेर फटका मारून स्पाइस या इंडियन होटल मधे जेवायला गेलो.अगदी पुण्याच्या तुलसी बागेतून आणलेली ताम्ब्याची भांडी आणि लाकडी बाहुल्या सजावट होती.ते पाहून मला नवल वाटले.सकाळ पासून नीट जेवण झाले नव्हते.गप्पा मारत जेवणावर ताव मारला.आणि होटल वर परत आलो.दुसर्या दिवशीचा प्लान ठरवून झोपलो.दमलो होतो तसे पण दुसर्या दिवशी बाहेर जायेचे डोक्यात होते.
                  सकाळी लवकर उठून एकेक जन तयार झालो.होटल मधेच ब्रेक फास्ट ची सोय होती.इकडे रूम सर्विस नसते.एका प्रशस्त हॉल मधे टेबल खुर्च्या टाकुन होटल सारखी सोय असते.बूफे पद्धत.चहा ची रोज ची सवय असल्याने प्रथम चहा घेतला.इकडे अपल्यासरखा कड़क चहा नाही.गरम पाणी,डिप-डिप चा येल्लो लेबल लिप्टन टी आणि दूध साखर घालून चहा करून घेणे .हीच पद्धत .पण तरी चहा होतो तो यामूले बरे वाटले.नंतर बूफे कड़े गेलो.अरे बाप रे !!!!!!!किती प्रकार ,आणि सकाळी ७ वाजता हे खायेचे?????पण काही नाही दिवस भर बाहेर फिरायेचे तर सकाळी पोट भरून घ्यायचे हा जणू इकडचा नियमच.ब्रेक फास्ट ला ब्रेड चे विविध प्रकार ,पण मला आवडलेला त्यातील क्रोइस्संत [चन्द्र कोरी सारखा दिसणारा नरम पाव ]..चीझ ,बुट्टर,जाम.अंडी कच्ची ठेवलेली ,तुम्हाला कशी हावी तशी खा ,उकडून ओम्लेट करून.जूस २/३ प्रकार चे दूध सिरियलस ,फले कापून ठेवलेली ,चिकनचे विविध प्रकार,आणि बरेच इतर काही .मला नावे सुधा कलली नाहीत,असे प्रकार खुप होते.पण न लाजता सर्वेजन पोटभर खात होते.तयार कापलेली फले मात्र मी रोज खात होते,आवडीने.नाही तर आम्हा बायकाना घरी कोण देणार सकाळी अशी फ्रूट डिश!!!!!!!!
     होटल मधे एक छान गोड मुलगी वेटर चे काम करत होती अगदी आपुलकीने गोड बोलत होती,विचारत होती.मला तिची भाषा समजत नव्हती ती भाग वेगला.पण अनिकेत होता त्याने भाषेची अड़चन नवती तो सांगत असे काय ते.
बस ने आम्ही इन्तेरलाकन ओसत ला आलो.नंतर ३ गाड्या बदलून आम्ही शेवट च्या ग्रिन्देल्वोल्ड गाडीत बसलो.वैशिष्ट्य म्हणजे इतक्या वेळेवर टाइम टेबल नुसार गाड्या चालतात कशा?याचे नवल वाटते.याहून पुढे कमाल म्हणजे कनेक्शन .एका गाडीतून उतरतो तर त्याच फलाटावर समोर दुसर्या बाजूला गाड़ी हजर......प्रवाशाची अशी सोय असल्याने ४ गाड्या बदलायला काही त्रास वाटला नाही,नाही तर कल्याण हुन मुलुंड ला येताना थाना गाड़ी बदलने किती व्याप करावा लागतो.पण यूरोपियन लोकाचे सर्व आराम शिर ,सुखकर करने याकडे विशेष लक्ष .प्रवासात निसर्ग सौन्दर्य बघताना डोल्याना सुखद वाटत होते.

trip swiss....

                                      स्वप्ननगरिची सफर
          दि .३०.९.२००९ रोजी आम्ही स्विझर्लन्द ला जाण्याच्या खास मूड मधे होतो.सकाळ पासून तयारी आवराआवर करून आम्ही ठीक ११ वाजता निघालो.घरापासून जवळ ट्राम स्टॉप आहे.ट्राम ने आम्ही राइ स्टेशन ला गेलो.राय स्टेशन वरून शिफोल विमान तलावर डायरेक्ट मेट्रो ट्रेन ने गेलो.मला मोठी गंमतच वाटली.विमान तल आणि रेल वे स्टेशन एकमेकाना जोडलेले पाहिले तेव्हा .जाताना आमच्या प्रवासाचा वरून राजाला पण आनंद झाला त्याने रिमझिम बरसात केली आमच्यावर.त्यानी नंदिनी ने खास मला आणलेली नविन छत्री कामा आली.
        शिफोल विमान तल प्रचंड मोठे आहे.तेथे चेकिंग साठी सगलीकडे जाण्यासाठी सरकते जीने आहेत.आमचे स्विस एअरलाइन चे विमान होते.त्या विमानासाठी खुप लांब म्हणजे गेट क्र.२७ वर आम्ही जाऊँन पोचलो.आणि काय सांगू तुम्हाला?सर्व विमान तलावरिल दृश्य मी काचेतून बघू शकत होते.मी माझे वय विसरून अगदी लहान मुलाप्रमाने कितीतरी एअरलाइन ची वेगवेगळी विमाने धावपट्टी,विमानाचे लैंडिंग टेक ऑफ सर्व काही जवळून पाहत होते.प्रथमच विमानाने मुंबई हुन येताना मी हे काही बघू शकले नव्हते .ते आज २ तास बसून आरामात बघत होते.मज्जा वाटली.अगदी वेळेवर आमचे विमान बोर्ड झाले. विमानात गेल्यावर मला खिडकीची जागा.गम्मत आहे ना!दिवसाचा प्रवास असल्याने बाहेर निसर्ग देखावा छान दिसत होता.ढग उंचावर असतात पण त्या ढगाच्या वरून आपले विमान जाताना पहाणे हा अनुभव अगदी विलक्षण होता.१तास २० मिनिटे प्रवास मी अगदी एन्जॉय केला.सर्व डोंगर रांगा,झाडे ,घरे,शहरे सर्व काही खिडकीतुन [विमानाच्या बर का?]पहाणे ख़रच मला चैन वाटत होती.एकीकडे मी अणि अनिकेत गप्पा मारत होतोच.अचानक हवेतून चालणारे विमान स्थिर उ़भे असलेले जाणवले आणि खर सांगू त्यावेळी मला आधुनिक तंत्रविद्यान,प्रगति याची खरी प्रचिती मला आली.आणि लगेच देवाचे आभार मानले कारण हे सर्व मी पुस्तकात न वाचता प्रत्यक्ष अनुभवत होते. विमानात आम्हाला प्रेत्झेल [चीझ,ब्रेड] ज्युस दिले.भूक लागली होती तेव्हा तेहि छान वाटले खायला .आणि अगदी अनिकेत सतत सांगत होता,आई,तिकडे स्विस चोकलेट सॉलिड असतात आपण तिकडे घेऊ या .आणि लगेच ट्रे भर चोकलेट आमच्यासमोर आली. आणि मला लगेच म्हण आठवली "मनी वसे ते स्वप्नी दिसे".इकडे तर आम्ही स्वप्न नगरीला चाललो होतो तेव्हा समोर चोकलेट ."मनी वसे ते समोर दिसे"असे झाले.लगेच त्याचा पण आम्ही आस्वाद घेतला.थोड्याच वेळात बासेल विमान तलावर विमान उतरले.आणखी एक नविन विमान तल मी पाहत होते,त्याचे फक्त काम अजुन सुरु आहे.बाहेर आल्यावर लगेच ५० नम्बर ची बस पकडून आम्ही रेल वे स्टेशन वर गेलो.बासेल मधे पण ट्राम सेवा आहे.रेल वे स्टेशन वर गाडीची वेळ व्हायला ३० मिनिटे होती.इकडे तिकडे जरा टाइमपास केला.वैशिष्ठे म्हणजे मेट्रो ट्रेन आहेत त्यामुले सर्व स्टेशन उंचवर आहेत.पण जायला सरकते जीने.[आणि ते सर्व चालू स्थितीत ]वर गेल्यावर पाहिले तर एक दोन नाही तर चक्क ३० प्लेटफोर्म[फलाट].अबब!!!इकडे लोकवस्ती कमी तरी इतके फलाट.ट्रेन मुबलक .आणि आपल्याकडे मात्र लोक जास्त असून सर्वच तुटवडा.फलाटावर उतरले.२ कंपनी कड़े रेल वे चा सर्व कारभार सोपवलेला आहे .त्यामुले ट्रेन मधे विविधता .सिंगल डेकर आणि तितक्याच डबल डेकर ट्रेन. ट्रेन तर काय सांगू?साफ सुफ ,पॉश,आणि बसण्याची सोय वा !!!!!!!!!!!सिट समोरासमोर ४ जण आरामात पाय लांब करून बसू शकतात.मधे एक छोटे टेबल पेड .त्यावर ट्रेन चा लोकल नकाशा.सेकंड क्लास डब्यात पण कुशन सिट ,खिडकीला छान पडदे.चैन आहे सर्व.गाडीत अगम्य भाषेत घोषणा [सूचना]पण आपले स्टेशन या नंतेर आहे हे मात्र काळात होते तेहि पुरेसे आहे,गाडीत आपल्या हाताशी सिट जवळ कचरा टाकायला सोय.त्यामुले कुठेही कागदाचा कपटा पण नाही,सर्व जन नियमाने वागतात.हे या लोकांचे वैशिष्ठ.इन्तेरलाकन वेस्ट ला जाणारी ट्रेन डबल डेकर होती.अनिकेत च्या आग्रहाने आम्ही वर बसलो.गाड़ी सुरु जाली आणि लगेच बोगद्यात गेली,कितीतरी मीटर लांब बोगदे.शहरात शिरताना जमिनीवर आणि परत लगेच खाली असा गाडीचा प्रवास मार्ग होता.गाडीत पण कमालीची शांतता.कोणी मोठ्या आवाजात बोलतात,गाणी गातात,विक्रेते येतात.भजने,सिट साठी वाद काही काही नाही.सर्व शांतपणे वचन नाहीतर सर्रास बाटली उघडून पिणे सुरु.स्पेन,फ्रेंच,जर्मन या भाषेतून गाडीत सूचना दिल्या जात होत्या.इंग्लिश बोलत नाहीत सर्व व्यवहारत्यांच्याच भाषेतून चालतात,हे लक्षात आले.आपण आपली भाषा जपली पाहिजे ,टिकवली पाहिजे .हे प्रकर्षाने जाणवले.आणि मला तत्काल माननीय राज ठाकरे  डोळ्यासमोर आले.गाडीत टिकिट चेकर स्त्री होती.नम्रपणे बोलत होती,टिकिट बघितल्यावर थान्कू[थैंक्स]म्हणत होती.आपले टिसी आठवले,आणि बिना टिकिट जाणारे लोक.जाताना बर्न स्टेशन लागले.ते तेथील राजधानीचे ठिकान.तो स्टेशन परिसर पाहून मला मुंबई सेंट्रल ची आठवण आली.गाडीतून जाताना उंच डोंगर रांगा,हिरवेगार गवत,दाट झाडी.टुमदार घरे,हिरवेगार तर काही ठिकाणी नीलसर पाणी असलेले विस्तीर्ण तलाव दिसत होते.तलावात सर्व प्रकारच्या होड्या आणि बदके होती.असे विहंगम दृश्य पाहत आमचा प्रवास सुरु होता.सर्व काही शक्य नव्हते पण ही दोघे खटाखट फोटो काढत होती.तेव्हा डिजीटल कैमरा म्हणजे चैन आहे जाणवले.पुर्विसरखे बंधन नाही ठराविक फोटो काढ़ने रोल संपेल ही भीती नाहीच.सहप्रवासी तर आधुनिक २/२ कैमरे  घेउन सतत फोटो काढत होते,उघड्या डोळ्याने निसर्ग बघतात का भींगा तुनच.!!!!!!!!प्रत्येक छोट्या गोष्टीचे पण फोटो काढत होते,त्याचे पण ते मार्केटिंग करतात की काय मला प्रश्न पडला.
      
        

Tuesday, September 29, 2009

dasara san sajara.......

           दिनांक  २८-९-२००९    विजयादशमी [दसरा]
                     सीमोल्लंघन
         आज या दसर्याला खरच मी सीमोलंघन केले आहे कधीच घर सोडून सणाला कुठेही आज पर्यंत मी गेले नाही पण आज प्रथमच दसर्याला मी एम्सटर्डम ला आले आहे हे ही घर आपलेच आहे पण देशाची सीमा ओलांडली हे नक्की.
       आज दसरा सण साजरा करण्याकरता अनिकेतने त्याचे मित्र वेंकट-वैजयंती,रवि-रिचा.याना संध्याकाळी जेवायला बोलावले.माझी आणि नंदिनी ची सकाळ पासून तयारी सुरु झाली.कुरमा भाजी ,पोली[चपाती],कोथिम्बीर वड्याआणि आमटी भात असा अस्सल ब्राम्हणी मेनू ठरवला.माझ्या नेहमीच्या सवयिप्रमाने मी सकालीच वड्या करून ठेवल्या.आणि श्रीखंड तयारी सुरु केली.इकडे लो फेअट दही [योगर्ट] मिलते.त्याचा चक्का करून श्रीखंड.अगदी उपद्व्याप करतो असे वाटले करताना.पण इकडे मिळत नाही आणि सणाला गोड हवेच. या विचाराने काम सुरु.दही रूमालात अगदी घट्ट  दाबुन दाबुन चक्का तयार केला .अंदाजाने साखर घातली.वेलची केशर ने स्वाद आला.सर्वानी मिटक्या मारत ताव मारला .त्यानी केल्याचे समाधान वाटले.बाकि सर्व स्वयपांक वेळेवर केला.सर्व वेळेवर आले,आणि पोटभर जेवले तेहि आवडीने.मग जरा वेळ गप्पा टाइमपास केला,सोन्याची पाने जरी वाटली नसली तरी सोन्यासारखा दिवस साजरा केल्याचे समाधान सर्वाना मिळाले.
       मुलाना बाहेरच्या देशात राहिले की घराची ,आईची,आईच्या जेवणाची खरी किम्मत समजते,हे फार जाणवले.
            भाग्यश्री चा दसरा हाच सण साजरा करायेचा राहिला होता,माझे यायेचे ठरले तसे ती जवाबदारी मी सुशिल-नेहा [दिर-जाऊ]वर टाकली.त्यानी पण ती आनंदाने  पार पाडली.
           आज परदेशात असल्याने आठवणीने सर्वाना इ-कार्ड पाठवली.

Monday, September 28, 2009

weekend program.....

शुक्रवार रात्रि आम्ही बाहेर जेवायला जायेचा बेत केला.आधी कुठे जायेचे ?कोणत्या प्रकारचे जेवायचे?थाई,इटालियन,मेक्सिकन,की इंडियन यावर त्या दोघांची चर्चा झाली. नंतर आज तरी मेक्सिकन खाऊ या असे ठरले.आम्ही तिघे छान तयार होउन ट्राम ने निघालो.
      तो परिसर सर्व लोकानी फुललेला होता.शुक्रवार म्हणजे वीकएंड ला सुरवात.तिकडच्या पद्धति प्रमाणे बरेच लोक बियर बार मधे बसले होतेच.आम्ही पण १५/२० मिनिटे थाम्बुन होटेल मधे पोचलो.लहान जागा अणि टेबल जास्त ,चिकटून बसवलेली टेबले.बाहेरच्या भागात खास पिने आणि टाइमपास करणारे ,आणि आतील भागात कुटुम्बिय आणि पार्टी .खुप गडबड गोंधळ आवाज एइकुन मला जरा बरेच वाटले.शांतता मला अगदी नकोशी झाली होती.मला बियर घ्यायची होतीच ,ठरवून टाकले.अनिकेतने ऑर्डर दिली.मला सेफ साइड म्हणून लेमन आइस टी मागवला होता.स्टार्टर म्हणुन 'नेचो'ही डिश मागवली होती.ने़चो म्हणजे मक्याचे वेफर्स आणि सलाड ग्रीन चटनी,चीज ,क्रीम अशी ते मेक्सिकन डिश.आवडली मला
        मक्याचे ते वेफर्स त्रिकोनी आकाराचे होते,कुरकुरीत .ग्रीन चटनी ,सलाड बरोबर टेस्टी लागत होते.गप्पा मारत बीर्ची पण चव घेतली.नंतर मुख्य जेवण ऑर्डर केले.मला विचारले काय खाणार???? मला मेक्सिकन काहीच माहित नाही ,त्यालाच ठरवायला सांगितले.माझ्यासाठी 'बरिटो'ही डिश आणि नंदिनी ला 'फजीता '.आणि अनिकेतने भलतेच काहीतरी मागवले.डिश दिसायला अगदी आकर्षक .पण चव काही मला आवडली नाही.मला तर आधी डाव्या हातात कटा चमचा आणि उजव्या हातात सूरी धरून खायला शिकावे लागले.डाव्या हाताने खायला काही जमेना!!!!!!!अखेर आपल्या सवयिप्रमाने उजव्या हाताने थोड़े खाल्ले बरिटो.नंतर थोड़े फजीता पण टेस्ट केले.पण एकंदरीत आनंद होता सगला जेवणाचा !अनिकेत च्या लक्षात आले आईला काही जेवण आवडले नाही,नीट जेवली नाही.अखेर डेझर्ट मागवले .आणि काय सांगू? चोकलेट केक मी एकटीने मटामत संपवला. भूक भागली माझे जेवण केक वर झाले. असे झाले तरी सर्व टेस्ट करायेचे यापुढेही .असे ठरवून बाहेर पडले.होटल मधे वेटर म्हणजे सर्व मुलीच.छान दिसायला,ड्रेस पण छान,बोलायला गोड.[समजत नवते काही ते सोडून द्या] पण ऑर्डर घेन्यापसून ते डिश देने ,उचलने,टेबल साफ करने,बिल देने सर्व कामे त्याच करतात.आपल्याकडे वेटर ,टेबल पुसायला मुलगा वेगवेगले असतात.हा फरक जाणवला कोणतेही काम करण्यात कमिपना ही लोक मनात नाही,हे महत्वाचे .
     येताना जरा रात्रीची रोड वरील वर्दल बघत होते.चक्क एका टेंपो सारख्या गाडीत तरुण मुले सायकल वर बसून गप्पा मारत बियर पीत होती.[सायकल व्यायामाची बर का?]हा एक नविनच प्रकार पाहिला.कसाही का होइना आनंद घेणे महत्वाचे .
     गप्पा मारत ट्राम ने घरी आलो.इकडे वाहतुकीला ट्राम बस खुप सोयीच्या आहेत.त्या मुले स्वताची गाड़ी असावी लागत नाही.      

Friday, September 25, 2009

asehi prem

            कुत्र्यासाठी राखीव विस्तीर्ण  पार्क ठेवणे ही कल्पनाच आपल्याकडे हास्यास्पद वाटेल.पण इकडे असे बियायात्रिक पार्क आहे.भारतात लोकाना बसायला ,मुलाना खेलायला,प्रेमी विराना भेटायला पुरेशी जागा नाही.आणि इथे एवढा मोठा पार्क कुत्र्याकरता राखीव !आश्चर्य वाटते ना??
           इकडचे कुत्रे तरी काय?आपल्याकडील झोपड़पट्टीत राहणारे जसे हक्क गाजवतात,तसे तिकडे कुत्रे हक्क गाजवताना मला दिसले.त्यानी तिथे लोकाना खाने पिने मजा करने या गोष्टी करायला अटकाव केला आहे.केले तर लगेच येवून हल्ला करतात.कुत्रे स्वतंत्र पणे मस्त पार्क मधे फिरत असतात.आणि त्यांचे मालक तर काय विचारायलाच नको.......
        मुलाना इतके स्वातंत्र्य  मिळावे,खेलायला,मिळावे म्हणून आपल्या इथे आई वडिल तरी विचार करत असतील का?घरातील लोक ,शेजारी ,शिक्षक ,मित्र परिवार सुद्धा इतक्या प्रेमाने एकमेकाशी बोलत नाही .इतक्या प्रेमाने हे यूरोपियन लोक कुत्रे मांजर यांच्याशी बोलतात.प्रेम करतात अगदी लहान मुलाप्रमाने. गम्मत वाटली.
     

Thursday, September 24, 2009

aaj cha divas gamticha.........

        आज नंदिनी च्या २ मैत्रिणी येणार होत्या खुप दिवसानी कोणी घरी येणार म्हणुन मी आनंदात होते,घराची अवरा आवर केली.मिसळ पाव आणि फ्रूट कस्टर्ड असा बेत होता,नंदिनी ला थोडीफार तयारी करून दिली.गम्मत वाटत होती नंदिनी नेटवर रेसिपी शोधून मिसळ चा कट करत होती.पुढील पिढी चा नविन अनुभव,पाक कृतीचा .!
         सर्व आवरून तयार तोच मैत्रिणी आल्या.खास माझ्या साठी मस्त फुले घेउन आल्या होत्या.ती फुले छान सजवून ठेवली.अणि चहा घेत गप्पा सुरु.केक चा आस्वाद पण घेतला.नंतर मिसळ वर ताव मारला.सर्वाना खुप आवडली .परत जरा गप्पा अणि मग थंडगार कस्टर्ड !अहाहा!खुश .
         जाताना चहा घेउन त्यानी निरोप घेतला जरा ओळख झाली ,बोलणेझाले ,वेळ पटकन निघून गेला.मला माझ्या मैत्रिणीची आठवण झाली.

picknik

मी अणि नंदिनी ने बियात्रिकपार्क ला जायेचे ठरवले.अणि बरोबर काय घेउन जाऊ या तयारी सुरु.प्रथमच मी एकटीने प्रवास करून नंदिनिला बाहेर स्टॉप वर भेटायचे ठरले.तिने नेहमी प्रमाने मला माहिती लिहून दिली.
       सकाळी पोहे नाश्ता केला.नंदिनी ऑफिस गेली.मी पेपर वॉच जरा टाइमपास करून कामाला लागले.मस्त कोथिम्बीर पराठा केले.दही,पराठा ,द्राक्ष.केक.पाणी.सर्व आवश्यक तयारी घेतली.प्रथमच एकटीने दार बंद करून जायचेहोते.जास्त कालजीने सर्व केले.अणि निघाले पिक्क्निक ला जायला निघाले होते त्यामुले सांगायला नकोच,मस्त मूड होता.
      ट्राम अगदी वेळेवर आली.सुचनेप्रमानेकार्ड स्टैंप करून घेतले.ट्राम ने विक्टारियास्त्रीत ला आले.रोड क्रॉस करायेचा होता.अठावले लगेच पोल वरचे बटन प्रेस केले.मग रोड क्रॉस केला.आता बस ची वाट पाहत होते.अगदी वेळेवर बस आली,कधीच वर्दल जास्त नसते का लेट कसा कधीच हॉट नाही?????विचार सुरु होते.बस मधे बसल्यापासुन स्टॉप कड़े लक्ष ठेवून होते.स्टॉप आला परत बस थाम्बावी म्हणून बटन दाबले,पण मी जरा तोच स्टॉप का बघत होते तोवर दार परत बंद पण जाले.....पण टेंशन नाही कारन पुढचा स्टॉप लक्षात होता.बस स्टॉप वर उतरले.फ़ोन केला नंदिनी अणि तेची मैत्रिण शिल्पा आली.आम्ही तिघी निघालो पार्क मधे.
        मस्त मोठा पार्क ,खुप वेळ छान जेल.असा विचार येत होताच.जरा थोड़े पर्क्मधे आत गेलो अणि मस्त जागा पाहून आम्ही डबे काढून खायला सुरवात केली,अणि काय सांगू.....एक मोठा कुत्रा तिकडे आला अणि एका सेकंदात त्याने सर्व पदार्थाचा ताबा घेतला.३ मावा केक १ सेकान्दत फस्त.शिल्पा नंदिनी मी घाबरून गेलो.पण मी काही उठलेनाही कारण धावता येणार नाही माहित होते.
       मस्त पराठे टाकुन दिले,मनातून अगदी राग आला होता.पण काय...... दुसर्या जगी गेलो.तिकडे बसणार तोच यूरोपियन बाई ने सांगितले ही जागा कुत्र्याना राखीव आहे इकडे खायला बासु नाका,झाले .पिकनिक चा विचका झाला.परत घरी  निघालो.पोटात भूक होती.स्टेशन वर मस्त कॉफी घेऊ असा प्लान केला .मस्त कॉफी शॉप मधे गेलो
ऑर्डरकेली ,काय ती कॉफी कडू रामारामा.दूध घालून जरा घेतली.पोत भरले नाही खिसा खालीमात्र झाला.
      आता बर्गर वगैरे पार्सल घेतले अणि घरचा रस्ताधरला.आता येताना ट्रेन ने आलो माज़ा ट्रेन चा अनुभव पहिलाच.मेट्रो ट्रेन स्टेशन बघितले,काही गर्दी नाही आरामात.
नंतर ट्राम ने घरी .मस्त चौकट सिनेमा बघत बसलो.
  तुला नाही मला घाल कुत्र्याला ही म्हन कशी पडली असेल ते समजले.अशी झाली पिकनिक.

Friday, September 18, 2009

काल मी अणि अनिकेत खुप दिवसानी चालत बाहेर फिरत होतो.मला एकटीला जायला जमावे म्हणून तो रोड दाखवत होता.जाताना अनेक चौक लागले पण वाहतुक पोलीस कुठेही नाही,मला आता इकडे येवून ८ दिवस जाले  होते,पण एकदाही रोड वर पोलीस दिसले नाहीत.
     एकाद्ची मुले रोड वर क्रिकेट खेलत नाही.घरचा तलमजला खिडक्या काचेच्या ,पण काचा फुटत नाही,या उलट खिडकीतुन छान दिसतील अशाआकर्षक वस्तु ठेवलेल्या असतात.
     रस्त्यात कचरा कुण्डी म्हणजे मोठे ४ बॉक्स पत्र्याचे असतात.एकत कचरा,एकात बाटल्या,अणि एकात न्यूज़ पेपर असे टाकावेलागते.रद्दीवाला नाही.
     कालवे छान आहेत बोटिंग होते.पण बाजूला कुठेही खायेचे पदार्थ गाड़ी नाही.भेल पनिपुरिवाला हवा ना?निदान पिजा तरी.पण काही नाही,शुद्ध हवा खाने फुकट......
     घराच्या बाहेर रोअड्वर सगलीकडे फुलज़डेखुप,सर्व फुलानेबहरलेली.कोणीही फुले ,कल्या तोडत नाही,नाहीतर आपल्याकडे ?
     कोणत्याही गाडीतून धुर येताना मला अजुन दिसला नाही,पर्यावरण चांगले राहीलच ना?
    बाहेर फिरताना सतत मनात अशी तुलना चालू होते पण काय इलाज ........एक दिवस आपल्याकडे होइल असे सारे स्वप्न तरी बघू या.

Wednesday, September 16, 2009

polise station

आज सकालीच पोलीस स्टेशन जायचे ठरले होते.वेळ सकाळी ९ ते ११ होती.मी अणि नंदिनी निघालो,सकाळी थंडी मुले पाय भराभर उचलत नवते.बस स्टॉप वर पोचताना पावसाने गाठले.आधीच गारठा त्यात रिमज़िम पाउस ,मजा होती.आपण लोनावला वर्षा सहलीला जातो तसे हवामान होते.जरा चालताना लेट जाला,बस वेळेवर निघून गेली,बस ची वाट पाहताना नविन परिसर बघत होते.स्टेशन जवळ होते,त्यामुले ट्राम,बस मधे कामावर जाणारे लोक दिसले.जरा गर्दी,पण कोणी उ़भेनाही .आरामात बसून कामावर जात होते.आपली लोकल आठवली,अणि नोकरदार.
       बस आली शंपने चढलो बस मधे जागा होतीच बसायला .त्या परिसरात पोचलो.शोधाशोध सुरु.१,२ लोकाना विचारले.पण पोलीस स्टेशन सापडेना.मग एकाने नीटसांगितले.बस स्टॉप वरून उजव्या दिशेला न जाता डाव्या दिशेला गेलो. त्यानी सर्व घोळ जाला.पायपीटकरून  दोघी थकलो होतो,ब्रेकफास्ट केला नवता.त्यामुले खुप भूक लागली होती.आता पोलीस स्टेशन ला किती वेळ जाणार याचा विचार  मी करत होते.
      पण काय सांगू ?सर्व अजीब .स्वागत कक्षातील पोलीस अधिकार्याने पासपोर्ट घेउन एक फॉर्म दिला.साधा सरल सोपा फॉर्म,अगदी जुजबी माहिती.फोर्म भरून दिला.पासपोर्ट च्या सर्व पानाच्या स्कैन कॉपी त्यानी काढून घेतल्या.नाहीतर आपल्याकडे  कॉपी काढून आणा असे खेकसला असता.तसे काही नाही याचे मला सतत नवल वाटत होते.आमचा नंबर येइतोवर आम्ही बसलो होतो,सहज लक्ष गेले तर तिथे लहान मुलाना टाइमपास साठी स्प्रिंग ची खेलनीहोती.घोड़ा वगैरे ....आई बाबा मुलाला घेउन मस्त तिथे वेळ घालवत होते.पोलीस स्टेशन अणि असले काही?.........मनात विचार आला भोसले साहेबना सांगायेला हवे.ते काहीतरी बदल करतील असे वाटले.
       नंबर आला,आत गेलो.पोलीस स्त्री ने हसून स्वागत केले.हातानेमाहिती भरली.अणि पासपोर्ट वर स्टिक्कर लावला,काम फत्ते.७२ तासात यायचे असते अगदी प्रेमलपनेसांगितले. काही दंड नाही.कटकट नाही.असे आपल्याकडे होइल का? विचार सुरु.
    
      

Tuesday, September 15, 2009

इकडची वैशिष्ठे .........
  १]कोणी कोणाकडे वेळ ठरवून जातात.
२]दारे खिडक्या  कायम बंद.
३]शेजार नाही .
४]सर्व दुकाने ६ वाजता बंद.
५]चक्क रविवारी सुट्टी .
६]बस मधे चिप्कार्ड प्रेस करून प्रवास.कंडक्टर नाही.
७]बस चालक च टिकिट देतो.
८]घरी पेपर दूध काही येत नाही.
९]पोस्टमन बेल वाजवत नाही.
१०]लहान मुले रडत नाही,हट्टाकरत नाही.
११]सर्व जन आपले घर अणि आपण असे राहतात.मुलाना नाका नाही.
१२]घरे छान सजवतात.खिडकित आकर्षक वस्तुठेवतात.
१३]घराचे जीने अरुंद,सामान बाहेर हुक असतो ,त्यानी वर नेतात.

pahila viman pravas.

गम्मत सांगू का मी प्रथम एकटी विमानाने प्रवास करणार याचे दडपण मला सोडून मुलाना,सुनेला जास्त आले होते.सूचना चा वर्षाव होता. कालजी करू नका मी जाणार बरोबर.तसे विमान तलावरआले.लेकीने एक मदतनिस बघून दिला.स्वारी निघाली.काहीच टेंशन नाही.सर्व सोपस्कार केले.अणि शांतपणे बसून राहिले.आधी मुलुंड ची एक जण भेटली होती थप्पामारून देणारी.आता एईरोली  ची गप्पा मारायला.२ तास पटकन गेले.
      अखेर विमानात चढले.जागाशोधली.हाय  फायइंग्लिश  मधे सूचना सुरु.काही कलल्या,काही बम्पर .पण पूनेकर बाजूला होते ,मदत घेतली.......आता सुटेल मग सुटेल.अगदी वाट बघत होते.पण.....काय सांगू तब्बल ४ तासानी सुटले आनंद निघून गेला होता,मुलांची कालजी वाट बघत बसतील,एक सन्देश पाठवून दिला अणि शांत बसले.सकाळी वेळेवर टी ची आठवण आली .मस्त गरम कॉफीमागवली गार होती.पण ठीक आहे वेळ जायेला ...
       नंतर युरोपियोन एयर होस्टेस आली ती ह ...टी .ह...टी बोलत होती काही समजले नाही, नंतर  ती हॉट टी विचारत आहे  समजले.
      चतुर्थी होती पण काही विचार केला नाही खुप भूक लागली होती मस्त नास्ता केला.
      सुचने नुसार लैंडिंग कार्ड देतील वाट पहिली पण काही नाही,अखेर एम्सटर्डम ला पोचले.सारे काही नविन,आधी फ़ोन सुरु केला.अनिकेतला फ़ोन केला ,आणि सोपस्कार सुरु.इमीग्रेशन ला चक्क सांगुन टाकले,यु स्पीक इन इंग्लिश.
तोड़के मोडके बोलले.पण परतीचे टिकिट पाहुनच मला सोडले हे नक्की.....धन्य वाटले.कस्टम ला काहीच अडवले नाही.बाहेर आले  समोर अनिकेत नंदिनी भेटले.........सुटले असे वाटले..

Monday, September 14, 2009

maze anubhav

शनिवारी बाहेर गेलो बरेच अनुभव आले.तिकडे गावात गेलो असे वाटले नाही.मस्त हिरवेगार होते.गुरे सुखाने चरत होती.गवत भरपूर पाणीमुबलक.सशक्त गुरे दिसली.घोडे शेतीसाठी वापरतात.तेपण होते.
    नवरा मुलगा लाकडी बुट नवरी करता करतो.अशी प्रथा आहे.म्हणुन लकडी बुट बनवले जातात.डच पोशाख करून फोटो काढले,गम्मत.फ्री फिश चा वास घमघमाट होता.अनेक प्रकार चे मासे होते.पण सर्वात कोलंबी मस्त होती,सलाड बरोबर ताव मारला.सफर्चंदाच पॅनकेक  घेतला होता.तो आपल्या कणीक घावनासारखा लागतो.पणवेगले जरा खाल्ले.नंतर जरा खरेदी केली,क्रूस वर जाएचेहोते. लगेच तिकडे गेलो.अथांग सागर बघून मन प्रस्सन्न .नजर पोचत नव्हती .खुप होड्या ,गलबते पहिली. नंतर बोटीत चढलो .सर्व परदेसी बाजूला होते.लहान मोठे सर्व मजा करत होते.एक आजी सारखी बाई पण टकाटक होती.२ मोठे कुत्रे बाजुलाच आले.पण काही नाही येत ,भूंकता येत नाही की काय असे वाटले.सर्व जन बिनधास्त हात फिरवत होते कुत्र्याना .इकडे तिकडे बघत फोटो काढत आम्ही बेटावर पोचलो.

To go or not to go..................Is the question!!!!

अनिकेत इतके दिवस परदेशात जातो पण मला कधी वाटले नाही त्याच्या तिथी जावेसे. का?विचार्लत तर, खरच काही कारण नाही.

पण नंदिनीने (माझी सून) माझा पासपोर्ट करून घेतलाच. अन भाग्यश्री सासरी गेल्यावर मला जायला काहीच  अड़चन राहिली नाही. अनिकेत ला होकार दिला आणि कामाला सुरवात झाली.पण मी जरा शांत होते .आजीची (माझी आई) काल्लजी होती. वयोपरत्वे तिची तब्बेत ढासळत होतीच व तिला खुप वेदना ही होत होत्या. आई ठीक नव्हती म्हणून मन तयार होईना. माझी घालमेल बघून आईला रवि (माझ्या भाऊ) कल्याणला, त्याच्याकडे घेऊन गेला आणि काही दिवसातच तीदेवाघरी गेली. सुटली ती.

आता मी जाताना विचार तीचा नव्हता. तयारी करू या ठरवले, आणि मी, माझ्या परदेश गमनाचे पहिले पाऊल उचाल्ले !!!!!!

Sunday, September 13, 2009

इकडची मुले रडत नाहीत जाणवले,मस्त गाडीतबसून फिरत असतात.गोरीपान मुले बाहुलीसारखी दिसतात.गार वारा थंडित पण मस्त बाहेर बघत बघत जा ये करतात.ट्राम मधे पण जास्त कोणी बोलत नाहीत,आपल्याकडे सतत फेरीवाले ओरडारद करत असतात.आता ते कायखातात कसे रोज जीवन जगतात समजुन घेणार आहे. कामे भांडी इस्त्री कपडे साफ सफाई सर्व आपणच .वीकएंड ला जास्त कामे .रोज दूध वाला घरी येत नाही,भाजी,किराणा सामान आनने,कामे वेळेवर करावी लागतात.बरीच दुकाने ६ वाजता बंद होतात.अणि रविवारी तर बंदच .कठिनआहे .इंडिया मधे रविवारी शोपिंग ला बहरअसतो.
    बाहेरफिरने ,बियर पिने आरामातबसने ,अवडिचेआहे .कुठेही थाम्बुन मासे पकडून भाजून खाने अवडिचे आहे.गवतावर आरामात आडवे पडतात. लाइफ एन्जॉय ख़रच करतात. वयाने मोठी मानसे पण मागे नाहीत.कुत्रे आहेत पण भुंकत नाहीत,सहज प्रेमाने जवळ येतात ,ओळख लगत नाही.वाटेत बसले तरी आपण हुनबाजूला करणार नाहीत,शांत असतात.इ़तर पण काहीबोलत नाहीत,मला फार नवल वाटले.
हवा छान आहे ,आराम आहे,भूक खुप लागते.मी सर्व एन्जॉय करायेचे ठरवले आहे.शांततेची सवय नाही.पण... ठीक आहे.लाइफ सुखाचे आहे,आपली मानसेनाहीत.पण बाकि सोयी खुप आहेत,अणि सगळे मिलते .सीज़न नाही,आंबे पण आहेत आता,फले तर सगली अणि ताजी.खा प्या मजा करा,आराम करा.सायकल जास्त वापरतात .कार कमी दिसतात.ट्राम सतत फिरत असतात.जाने येणेसोपे आहे.गर्दी नाही,सारे कसे शांत.रुपयात पाहिले तर सर्व महाग वाटते.पण यूरो मधे ठीक आहे.मला बाहेर जाताना पिशवी नाही ,मनी पर्स नाही,जरा चुकल्यासारखे वाटते .अजुन मोबाईल सुरु केला नाही,तोही बरोबर नाही,सहज फिरायेलाजातो असे असते.ठीक आहे.तयारपदार्थ चांगले मीलतात.घरात सुखसोयी आहेतच.खुप दिवसानी बाहेर पडले त्यामुले गम्मत वाटते.
      सायकल साठीवेगला रोड ,ट्राम करता,कारसाठी.रोड क्रॉस करताना आपणबटन प्रेस करून जायचे .सर्व थाम्बतात.बस चालक वेल ड्रेस मधे.व्हाइट शर्ट टाई .बस आपण स्टॉप ला बटन प्रेस केले तरच थाम्बनर.सर्व स्टॉप वर नाही वेळ वाचतो.आपल्या कड़े कधी असे होइल असा विचार येतो.
आज शहर बघायेला बाहेर पडलो.ट्राम मधील अनुभव पहिला,शांतपणे चढ़ने,उतारने.गाड़ी कही थम्बत नाही.तोच अनुभव.कालवे बघून गम्मत वाटली,बोटीत बसवेसे लगेच वाटले.काश्मीर ची आठवण आली. जाताना दुकाने दिसत होती,पण नावे कही वाचतायेत नवती.पण जास्तबियर बार ,रेडी फ़ूड दुकाने होती.बेकरीफ़ूड जास्त .फूले तर खुप.रंगिबिरंगी.बघत रहत होते.सर्वे इमारती बघून पूने नाशिक कल्याण ची आठवण येत होती.थिएटर ची वास्तु खुपच ग्रेट,मीफोटो चामोह आवरू शकले नाही.
    बार बाहेर बसून बियर पिने सुरु होते.बायका पण  मागे नाहीत,स्मोकिंग पण बिनधास्त पणेकरतात .मजा आहे.सर्वे वेस्टर्न कपडे मीचसलवार कुडता मधे .चाइनीज फ़ूड छान मिळत,पार्सल आणले.मस्त ताव मारला.