Monday, November 2, 2009

   शनिवारी सकाळी ब्रेक फास्ट नाही ब्रंच करून आम्ही बाहेर पडलो.खायला खुस खुस केले होते.आपल्याकडे लापसी रवा मिलतो त्याचाच एक प्रकार.त्याला इकडे खुस खुस म्हणतात.तिखट शीरा करतात तसा करता येतो.विशेष म्हणजे तो लो कैलरी असतो.
         प्रथम 'लुँर्ड्स'म्हणुन मोठा शोपिंग मॉल आहे तिकडे गेलो.अनेक दुकाने,पण सौन्दर्य प्रसाधनाची जास्त दुकाने होती.इकडे अगदी आज्या सुद्धा मेक अप केल्या शिवाय बाहेर पडत नाहीत.आता घरी परत जायला एक महिना राहिला .त्यामुले शोपिंगला  सुरवात.सर्वाना शक्य नाही पण खास मैत्रिणीला,व्यक्तिना ,लेकीलाआणि इतर जनाना काहीतरी टोकन घेउन जावे ठरवले.मला त्या सौन्दर्य प्रसधनातिल खरच काही कळत नाही.मी आपली जरा बाजुलाच होते.पण आकर्षक भेट वस्तु छान पैक केलेल्या बघत होते.आमचे तिघांचे एक मत झाले की खरेदी.काही गोष्टी खरेदी केल्या.नंतर मात्र लहान मुलांच्या गिफ्ट आणि गेम बघण्यात खुप वेळ गेला.खेळ छान पण वजनदार ,नेताना वजनाचे बंधन आहे त्यामुले आवडले तरी काही घेता आले नाही.त्यात ल्या त्यात दोन तिन खेळ घेतले माझ्या नातवंडा साठी.
          नंतर आम्ही 'अलबर्ट हैएन' या मोठ्या सुपर मार्केट मधे गेलो.अबब!!!!!एका मागुन एक विभाग बघताना आणि खरेदी करताना पायाचे तुकडे पडले.दूध,दही,भाज्या,फले,बिस्किटे ,साबण.कितीतरी सामान घेतले.वेलची,जायफल,दालचीनी याची  पुड इकडे छान मिलते.खास घरी न्यायला त्या पण घेतल्या.सामानाचे २ मोठे झोले [पिशव्या]भरल्या.ते सुपर मार्केट बघताना ब्रेड चीज़ चिकन फिश चे शेकडो प्रकार पाहून मी थक्क झाले.तयार खाद्य पदार्थ ,भाज्या फले.सलाड पाहून मला काय घ्यावे सुचत नव्हते,अनिकेत मात्र सवय असल्याने भरा भर घेत सुटला होता.तिकडे सामान नेयला प्लास्टिक पिशव्या ठेवल्या होत्या.हलके थोड़े सामान आपण घेऊ या ,या विचाराने मी एक पिशवी घेतली.नंतर मला समजले त्या पिशवी ची २० सेंट[पैसे] कीमत असते.माझ्यावर मी फुकट ढापली,असा शिक्का बसला.सर्व सामान घेउन बस ट्राम करत घरी परतलो.फिरून फिरून दमलो होतो.गरम कड़क चहा केला ,ती घेतला,जरा बरे वाटले.आता जरा वेळ आराम.रात्रि जेवायला खास मालवणी पद्धतीचे चिकन केले.मस्त ताव मारून जेवलो.उद्या रविवार .सुट्टीचा दिवस ,खुप वेळ झोपायचे हे नक्की.म्हणुन रात्रि निवांत पणे पत्ते खेळत बसलो.रम्मी साठी आज नविन पत्ते पण आणले होते.नविन कैट[पत्ते]मधील चित्रे ओलखने जरा कठिन जात होते,पण मिशिवाला राजा,चिकना दिसती तो गोटू आणि गोरीपान राणी अशी नावे ठेवत टाइमपास केला.उशिरा खेळ संपला आणि मग झोपलो.

No comments:

Post a Comment