Sunday, November 8, 2009

आज एम्सटर्डम मधील व्हेंन गोंअग म्युझियम पहायला गेलो होतो.हे प्रसिद्द चित्रकार १८५३ ते १८९० या काळात होउन गेले.त्यांची डायरी ,पत्रे,तसेच त्यानी काढलेली चित्रे याचा संग्रह म्हणजे हा म्युझियम.अतिशय सुसज्ज असे ३ मजली हे म्युझियम आहे.पण आश्चर्य वाटले याचे,की इथे सरकते जीने नाहीत!कारण इथे कोंत्य्ही दुकानात सुधा तसे जीने असतात.मोठी लिफ्ट आहे,पण जीने चढून जाताना अनेक छान चित्रे पाहता येतात.निसर्ग चित्रे मला आधिक आवडली.तसेच त्या कालातील स्त्रिया,पुरुष लहान मुले यांची चित्रे बघताना गम्मत वाटली.इथे ऊँची वस्त्रे अलंकार परिधान केलेली अनेक चित्रे आहेत.सर्व चित्रे कैनवास वर काढलेली आहेत.म्युझियम ची दालने[खोल्या]प्रशस्त आहेत.इथे एकेक भिंती च्या आकाराच्या पण काही फ्रेम्स आहेत.चित्रातिल व्यक्तीचे हावभाव ,डोळे अगदी बोलके आहेत.विशेष म्हणजे इतकी वर्ष झाली असून सर्व चित्रे सु स्थितीत आहेत.चित्राचे रंग तर अगदी आता रंगवाल्या सारखे आहेत.शिसवी लाकडाच्या ,आणि कोरीव काम केलेल्या सर्व फ्रेम्स आहेत.कलाकुसर उत्तम आहे.प्रत्येक चित्राचे वैशिष्ट्य [माहिती]तेथे दिली जाते.त्या साठी मोबाईल सारखे एक साधन दिले जाते.चित्राचा नंबर टाकुन आपण भाषा निवड केली की माहिती एइकू येते.अनेक देशातील लोक अगदी चौकस पणे माहिती समजुन घेत होते.इंग्लिश मधे माहिती चित्राच्या बाजुलाच लिहिली होती.प्रत्येक प्रशस्त दालनात मधे बसायला सोय केली होती.वयस्कर लोकांसाठी खास कंप्यूटर वर एका जागी बसून म्युझियम बघायची सोय आहे.अनेक चित्राच्या फोटो कॉपी विक्रीस आहेत,तसेच अनेक भेट वस्तु.३/४ तास फिरून झाल्यावर इथे खाण्याची पण सोय छान आहे.

No comments:

Post a Comment