Tuesday, May 17, 2011

छत्रे मेडम निघाल्या लंडनला !

११ मे बुधवार. आज सकाळ जरा लवकरच झाली.मला तर रात्री दुसर्या दिवशी जायचे या विचाराने झोपच लागली नाही.या वेळी सकाळचे विमान होते.त्यामुळे लगेच त्याच दिवशी अनिकेत नंदिनी भेटणार होते.याचा खूप आनंद होता.घरातील सर्व आवराआवर जमेल तेवढी केली.सुप्रिया ने [मैत्रीण]गरमागरम नाश्ता कांदे पोहे आणला होता.ती मला भेटून घरी गेली,कारण रोजची सवय झाली होती,आता लवकर भेट नाही म्हणून जरा हिरमुसली होती.मी सुशील नेहा भाग्यश्रीने पोटभर पोहे खाल्ले.

या वेळी माझा रुबाब काही और होता,लेकीने स्वतः नवीन गाडी आय टेन घेतली आहे,त्यामुळे ती मला विमान तळावर सोडायला स्वतः येणार होती.आहे कि नाही माझा थाट!!!आम्ही सकाळी ठीक ९ वाजता पोचलो.वाटेत नशिबाने रहदारी ने वेळ लागला नाही,सगळीकडे अगदी शुकशुकाट !काहीच लोक होते,नेहमी सारखी जत्रा नव्हती.गेट क्रं.७ वर आलो.किंग फिशर ने मी प्रवास करणार होते.लगेच त्यांच्या कंपनी ची माणसे आलीच विचारपूस करायला....य वेळी मला मदतनिसाची गरज तशी नव्हती.मी एकदाच अनिकेतकडे जाऊन आले होते,पण या वेळी म तयारीत होते.व निश्चिंत पण होते.तरी पण त्या सद गृहस्थाने मला मदत केली.मी आपणहून त्याला धन्यवाद दिले आपल्या भारतीय पद्धतीने ,समजले ना?

सर्व सोपस्कार संपवून मी आता आरामात गेट जवळ येवून बसले.म्हणजे २/२.३०तास तिकडे बसून वेळ घालवला.गेल्या वेळी बावळट सारखी नुसतीच बसले होते.पण या वेळी काय म्हणतात ते युज टु असल्या सारखे जरा सर्व दुकानातून फिरले.मग चक्क ७५ रुपये वाला चहा मागवला.मस्त चहा पीत वेळ घालवला.नंतर विमान बोर्डींगची सूचना सुरु झाली.पण आता सर्व माहित ना?त्या मुळे बिझनेस क्लास वाले आधी गेल्यावर शांतपणे रांगेत गेले.खूप वेळ होता,आपले खूप लोक पण रांगेत होते.चेकिग सर्व झाले.व मी परत विमानात पाय ठेवले.अनिकेत नंदिनी बरोबर तिरुपतीला विमानाने गेले होते,आता परत मी एकटीच होते.पण खरच सांगते सीट शोधताना खी अडचण नाही आली.कारण गेल्या वेळी समजले होते,आपल्या बस प्रमाणेच नंबर असतात.१९ब सीट होती.मग काय?बिनधास्त.

केबिन बेग या वेळी जवळ होती.कारण मोठ्या बेगेत आधीच सामान जास्त झाले होते.[वजन ३० किलो].कशी बशी केबिन बेग उचलून वर टाकली.[८ किलो]आणि आता मात्र खुर्चीत विसावले.......पहिले काम अनिकेत भाग्यश्रीला फोन केला.मला वर्हाड चाललंय लंडन ला.....त्याची आठवण झाली.मी मनाशीच हसले आणि म्हणाले,अखेर छत्रे मेडम निघाल्या लंडन ला.

खरच मागील आयुष्यात १५ वर्ष पूर्वी कधी असा विचार सुद्धा मनात आला नव्हता कि मी परदेश प्रवास करेन.पण खरच परमेश्वर फार ग्रेट आहे,त्याच्या मनात असेल तसेचसर्व घडते.गणपतीची माझ्यावर प्रचंड कृपा आहे हे नक्की!!!!!!!!!!!!!!!

1 comment:

  1. landonchya vharadat samil karun ghetlat danyavad.tumchi khup 8van yete .ajj shila ali hoti.mi malvanla gele hote tyamule contact karta ala nahi. rekhsakaliachi vahini ali aahe tumchi 8van kadhat hoti. roj sakali khup miss karte tumhala.mama kase aahet?aniket nandini khush zali astil aataroj nava khau aamchi potavar matra pay

    ReplyDelete