Tuesday, May 17, 2011

टेक ऑफ

विमानात सूचना सुरु झाल्या.इंग्लिश आणि हिंदी मध्ये त्यामुळे काही अडचण आली नाही.सुरवातीलाच किंगफिशरचे सर्वे सर्वाश्री.विजय मल्या यांनी स्वागत केले.म्हणजे रेकोर्ड टेप लावली होती.पण काही ही म्हणा प्रवाशांचे स्वागत तरी झकास झाले.नंतर थोड्याच वेळात आमच्या सर्व प्रवाशांची खातीर करायला खूप छान नम्र अशा वागणाऱ्या बोलणार्या हवाई सुंदरी येत होत्या. लाल रंगाचा सर्व पोशाख अगदी बूट सुद्धा.पण रुबाबदार!!काय दिले नाही? हाच प्रश्न आहे,अगदी विमांचे उड्डाण झाल्यापासून ते उतरेपर्यंत काही ना काही सतत सुरु होते.

जेवण,नाश्ता,कोल्ड्रिंक चहा,कॉफ्फी अगदी दारू पासून सर्व....या वेळी मी मस्त खात पीत प्रवास केला.घरी कधी बघत नाही पण विमानात दुसरे काहीच काम नव्हते.हातात मोबाईल नव्हता.त्यामुळे थ्री ईदियत ,यमला पगला दिवाना,ओम शांती ओम.हे ३ सिनेमे पहिले.रिमोट माझ्या हातात होता.कोणी बदलणार नवते.नंतर सुरेश वाडकर यांच्या बरसे बरसे अल्बम मधील सुरेल गाणी शांत पणे ऐकताना लंडन कधी आले समजलेच नाही.विमान उतरताना अनिकेत डोळ्या समोर दिसत होता,आता थोड्याच वेळात भेट होणार होती.

अबब!१किति मोठे विमानतळ ......उतरल्यावर इमेग्रेशन ला यायला अर्धा तास चालावे लागते.सर्व सरकते रस्ते,जिने यावरूनच बर का??मी आपली पर्स केबिन बेग घेऊन भराभर चालत होते.सुरवातीला जरा कमी रांग दिसली तिकडे उभी राहिले,अगदी इथे भारतीय उभे आहेत असे बघून....पण काय तिकडे चुकले.ती रांग यु के बोर्डर ची होती.परत दुसर्या भल्या मोठ्या रांगेत,मला तिरुपतीचीचआठवण झली.अरे बाप रे!!!! विमाने उतरली असतील असा विचार करत होते.३००/४०० माणसे अंदाजे रांगेत होती. ५०% भारतीय होते. रांग सरकत होती पुढे पुढे..

आता मोबाईल सुरु केला अनिकेत ला एके पोचले कळवले.त्याचा जीव भांड्यात पडला.रांगेत आहे काम झाले कि येते सांगून शांत उभी होते.अखेर आला नंबर....त्या युरोपियन माणसाने मी किती दिवस राहणार? कोणाकडे आले आहे?अनिकेत काय करतो?सर्व प्रश्न समजेल अशा इंग्लिश मध्ये विचारले.त्यामुळे मी पण त्याला अगदी ठामपणे उत्तरे दिली. मग परत चलते चलते सुरु....अखेर बेग पट्यावर दिसू लगली.बेग जास्ती नाही ३० किलो. बेग खाली उतरवून trolley ठेवणे कठीण गेले. पण काही इलाज नाही, उरापोटी केले. आता मात्र माझी एनर्जी संपत आली होती.पण बाहेर पडते तो काय समोरच अनिकेत उभा होता.नंदिनी आणि मंजिरी पण आली होती,खूप आनंद झाला.

अनिकेत कडे सर्व सामान देवून मी मोकळी झाले.taxi बुक केली होतीच, त्यामुळे लगेच गप्पा सुरु झाल्या.

माझ्या विमानात बोमेण इराणी हा नट होता हे मला बाहेर आल्यावर नंदिनी ने सांगितले. असो मला काही त्याचे फारसे वाटले नाही कारण आधी कळले असते अरी मी कुठे ओळखले असते त्याला?

संध्या काळी साडे सात ला बाहेर पडले होते, उजेड होता त्यामुळे लगेच लंडन दर्शन सुरु.मराठी तून आम्ही बोलत होतो,अखेर त्या taxi drivar ने कोणती भाषा?कोण आई आली आहे का विचारलेच.लगेच मंजू अश्विनी चा फोन आलाच.आयुष शी पण बोलले.मंजिरी ने तोंडात टाकायला आणले होते,ते टाकले लंडन चे पाणी प्यायले .एक तास प्रवास करून अनिकेत च्या घरी पोचले.वॉव काय सुंदर बाहेरचा परिसर ...येताना रस्त्यात गुलाबाचे रंगी बेरंगी ताटवे प्रत्येक घरासमोर दिसत होते.आपल्या सारखे कोणी फुले तोडून नेत नाहीत,हा अजून एक अनुभव.घरात आलो.

हे अनिकेतचे लंडन चे घर मला फारच आवडले.मस्त हवा. उजेड मोकळी जागा सगळीकडे कार्पेट,२ बेडरूम ,hall नवीन एल सी डी.डायनिंग रूम ,किचन सर्व काही प्रशस्त.आणि सुशोभित बघून मला खूप आनंद झाला.

नंदिनी ने गरमागरम चहा केला.त्यामुळे प्रवासाचा शीण गेला,गप्पा तर सुरु होत्या थोड्याच वेळात अश्विनी अक्षराला घेऊन आली.भाग्यश्री च्या लगनानंतर आज तिची भेट झाली.मला तिची त्या दिवसाची surprise भेट आठवली.लहानपणपासून शेजारी त्यामुळे घट्ट मिठी मारली.छोटीशी अश्विनी आता अक्षराची आई होती.अक्षरा ला जरा ओळख नाही त्यांनी रडू येत होते,पण अनिकेत मामा आणि नंदिनी मामी जवळ छान खिदळत होती.
 
जरा वेळ गप्पा मरून मंजिरी अश्विनी सह आम्ही सर्व जेवलो.तेव्हा आपले रात्रीचे २ वाजले होते,माझा दिवस संपतच नव्हता.अगदी निवांत icecream खाऊन tya त्या दोघी घरी गेल्या.त्या नंतर बेग उघडल्या खरेदी दाखवली.मग आपल्या पहाटे झोपलो.अश्विनी जवळ राहते त्या मुळे सकाळीच अमोल मला भेटायला आला.अक्षराला घेऊन.आता मात्र आजीची तिला जरा ओळख पटली होती,म्हणजे माझी.

1 comment:

  1. khup maja ali vachun, tumhi apalya manasat gelat. parat yenar ki nahi ata? koparyavaracha ambewala vicharat hota ambe londonla nenar hota tumhi don petya pathavatoy mhanala. Facebook var alat ka?
    Gupte sahebakadehi tumacha email nahi, bhagyashri hi athavanine phone karnar asa gavavarun alyapasun mhanatey.

    ReplyDelete