Friday, January 8, 2010

                                           संगणक एक खजिना
                  आपण आता ज्या काळात वावरतो त्या काळात प्रत्येकाला संगणकाची माहिती असणे
 जरुरीचे झाले आहे.एकदा का आपण त्याचा वापर करू लागलो की आपल्याला त्यातील आणखी आणखी खूबी समजू लागतात.आता तर प्रत्येक कार्यालयात सर्व कामे संगणकावर करतात.इंग्लिश,हिंदी मराठी सर्व भाषा चा वापर केला जातो.पूर्वी सर्व कामे कागद पेनाशी निगडित होती.आता सर्व सोपे झाले आहे.सर्व माहिती पोटात साठवून ठेवणारा हा संगणक आहे,गाई च्या पोटात ३३ कोटि देव आहेत ही पुराण कथा संगणक पाहून त्यातील माहिती पाहून खरी वाटते.आता कार्यालयात फायली रजिस्टरकागदाचे गठ्ठे दिसत नाहीत.पसारा नाही,जागा कमी लागते.आणि मह्तावाचे म्हणजे वालवी[कसर]लागुन दस्तेइवज नष्ट पण होत नाही.संगणकावर जतन केलेली माहिती आपण कुठेही आपल्याला उपलब्ध होते.हा विशेष सोयीचा फायदा मला वाटला.नाहीतर पूर्वी फायालिचे बाढ़ [ओझे ]घेउन जावे लागत असे.सरकारी कामे तर कठिन.इंटरनेट तर आगदी अन्न वस्त्र निवारा या मुलभुत गरजा इतके महत्वाचे झाले आहे. आपण जगातील कोणत्याही कोपर्यात असलेल्या लोकांशी सहज संपर्कात रहू शकतो. मेल ऑनलाइन बोलणे  [चाट]यामूले आपले विचार मनोगत सहज सांगू शकतो.आपला माहितीचा खजिना पण खुप वाढतो.प्रत्येक बारीक़ सरिक गोष्टीची माहिती यच्ययावत मिलते .टी पण चुटकी सरशी ....गम्मत आहे की नाही!!!!!!!!!!!!!घरगुती,सामाजिक,राजकीय  कोणत्याही क्षेत्रातील असो.
                       पूर्वी नाव गाव फल फूल असा एक लहानपणी खेळ सामान्य माहिती वाढावी म्हणून एक खेळ खेलला जात असे,त्या एइवेजी आजकाल मुलेच असे नाही तर कोणीही संगणकावर एखाद्या अक्षर पासून मिलानारी विविध माहिती मिलवू सहज शकतो.मला तर वाटते ते एक शिक्षणाचे द्रुक श्राव्य माध्यम आहे..त्याचे फायदे खुप आहेत तसे तोते पण जाणवले.विशेषतः कुमार वयातील मुले याचा उपयोग कसा करतात हे कालजी पूर्वक पाहिले पाहिजे.मुलाना प्रोजेक्ट साठी खुप माहिती इनटर्नेट ने मिलते हे मान्य आहे त्याचा जरुर उपयोग केला पाहिजे,पण इतर जे वीडियो असतात जे नको टी माहिती सहज देतात .याने त्या मुलांची मानसिकता बिघडू शकते.त्याचा प्रत्यक्ष जीवनात नकळत वापर करतात.  अगदी बाल वयातील मुले संगणक सहज हतालतात.कौतुक वाटते नक्कीच.पण गेम चे त्याना इतके वेड लागते की त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.सतत तासनतास बसून गेम खेळत बसतात त्याने त्यांची शारीरिक वाढ पण खुंटते.डोळे बिघड्तात,लहान वयात चश्मा लागतो ते वेगलेच..कॉलेजातील मुले चाटिंग मुले अनोलखी लोकांशी संपर्कात सहज येतात.नकळत आपली माहिती त्याना देतात ,त्यामुले सामाजिक अडचणी    पण निर्माण होतात.फोटोज पाठवने अगदी
 सहज सोपे झाले आहे.चांगले आहे नक्की,पण काही वेळा याचा गैर वापर कुमार वयातील मुले करतात.तरुण मुली नको त्या लोकांच्या संपर्कात येतात.स्वतंत्रता आहे त्याचा वापर काही मुले चुकीने वाईट संगतीने करतात.वीडियो मित्र मैत्रिनिना दाखवतात.परिणामी शिक्षण कमी वाम मार्गाला अधिक लागतात.जय ठिकाणी पालकांचे  लक्ष नसते तेथे या गोष्टी जास्त घडतात.पूर्वी टी.व्ही ला इदिओत बॉक्स म्हटले जायचे?????????आता संगणकाला काय म्हणतील???ते वेळ येवू नये या साठी त्याचा सुयोग्य वापर करणे  गरज आहे..
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------                                                               

No comments:

Post a Comment