Friday, January 8, 2010


सांगू कशी ग मनाची व्यथा मी?????????????
                               परदेशात गेल्यावर मुले आपली राहत नाहीत हि प्रत्येक भारतीय माता पित्याची खंत असते.खरे आहे.इकडे परदेशात त्यांना सुखकर जीवन,पैसा आणि स्वतंत्रता मुबलक मिळते.त्यांना माणसांची गरज वाटत नाही.वाटते तेव्हा त्यांच्या सारखेच आलेले मित्र चार घटका वेळ घालवायला असतात.हे सर्वे ठीक आहे,पण त्यात प्रेम,आपुलकी,किती असते?काही जणाशी आपली चांगली मैत्री होते.आपले विचार जुळतात,पण इतर अगदी तेवढ्या पुरते फक्त एक सोपस्कार,भेटणे,बोलणे,खाणे पिणे.हाय हेल्लो पुरते.
                              अशा या दुनियेतील मुलांना मागचे दिवस आठवत नाहीत का??आठवत असतील नक्कीच.पण त्यांना आता पाठी फिरून बघायचे नसते.तसे त्यांनी मनाशी पक्के ठरवलेले असते.मुले विचार करतात,आई वडिलांना गरजेपुरते पैसे पाठवले कि झाले.आपली जवाबदारी कर्तव्य आपण केले,पण तसे होते का?का यात फक्त व्यवहार उरतो.दुसरे ते काही करू पण शकत नाहीत.वर्षातून एकदा वीस दिवस सुट्टी मिळते त्यांना.तेव्हा ते स्वदेशात तरी येतात,किवा आई वडिलांना बोलावतात.किवा बायको मुलांना घेऊन दुसर्या देशात फिरायला जातात.तसे करणे योग्य आहे,कारण वर्ष भर नोकरी ,घर,यात अगदी पार गुरफटून गेलेले असतात.
                            प्रत्येक आई वडिलांना विशेषतः आईला आपले मुल लहान वाटत असते.पण परदेशात मुले जेव्हा स्वतंत्र पणे आपले घरकुल मांडून राहू  लागतात.तेव्हा ती अकाली प्रौढ समंजस होतात,नव्हे त्यांना तसे व्हायला लागते.कारण प्रत्येक जवाबदारी त्यांच्यावर आलेली असते.कामाच्या बद्घल बोलायचे झाले तर,नोकरी टिकवणे त्यांच्या पुढील आव्हान असते.ते आव्हान पेलताना त्यांना खूप कष्ट करावे लागतात.पण पैसा थोडा जास्त मिळतो,म्हणून ते करायची मानसिकता होते.आणि घराच्या बाबतीत सांगायचे तर बायको आणि मुले यांच्या गरजा पूर्ण करणे हे त्यांचे ध्येय होते.आणि अशा या कात्रीत सापडलेली मुले अकाली प्रौढ होतात.
                            कुठे तरी वेळ घालवून आपले मन रमवणे सुरु होते.अशा वेळी त्यांच्या हातातील खेळणे म्हणजे संगणक .तो तर त्यांच्या जीवनातील एक घटक बनतो.सतत त्यावर काहीतरी शोधत राहणे,ते मनोरंजनाचे उत्तम साधन आहे नक्की.पण त्यातून स्वतःची आवड किती राहते????वेळ घालवण्या साठी हि मुले कोणतेही चित्रपट पाहतात.,खेळ खेळतात,मित्रांशी कोरड्या गप्पा मारतात.एका जागी बसून ,संगणक आणि ते हेच त्यांचे विश्व बनते.काही दिवसांनी पाठ दुखू लागते,डोळे दगा देतात,बोटे पण दुखतात.पण अशा वेळी घाटी काही पर्याय नसतो.ते संगणकाच्या आधीन झालेले असतात.व्यसनच ते एक,प्रकार वेगळा.
                         फिटनेस साठी जिम ला जातात.पण ते काही जास्त वेळा जास्त दिवस जायला जमत नाही.त्यामुळे परत आपला संगणक आणि ते चिकटून बसतात.
                         परदेशात हवा चांगली,वाहतुकीची सोय छान,वीज ,पाणी याची काळजी नाही,सर्वे काही तयार वस्तू छान मिळतात.यात शंका नाही.पण त्याच गोष्टी साठी आपली मुले किती पैसा मोजतात ते अनुभवल्या शिवाय समजत नाही.पैसा खर्च करणे गैर नाही,पण पगार आणि खर्च याचा ताळमेळ जुळवताना त्रेधा तीर्पित  उडते ,असे होता कामा नये असे वाटते.नाहीतर आपली म्हण आहे ना...'तेल गेले,तूप गेले,हाती राहिले धुपाटणे!!!!!!!!!!!!!!!!!'
      

No comments:

Post a Comment