Sunday, January 3, 2010

back to india

           परतीची तयारी सुरु झाली.खरेदी केली खुप,सामान जास्त .बैग भरने कसरत होती.पण अनिकेत अगदी तरबेज .नंदिनी ने सर्व भेट वस्तु वर नावे घालून दिली.ते दोघे सामान भरत  होती,मी शांत बसले होते.थोड़े सामान काढून ठेवावे लागले.माझे घरात घालायचे कपडे ठेवून आले,परत समर मधे जायचे आहे.
           अनिकेत,नंदिनी करता थोड़े खाद्य पदार्थ करून ठेवले.आधीचे दोन दिवस बाहेर खुप फिरलो.दुसर्या दिवशी सकाळी निघायचे होते,रात्रि झोप नाही लागली.आता लवकर ही दोघे भेटणार नाहीत,
             शिपोल विमान तलावर पोचले.तिकडे टिकिट घेताना बैग जमा करताना दोघे बरोबर होतीच.खुपच नियमाने वागनारे लोक आहेत जाणवले.सामान कमी करावे लागले म्हणून जरा त्या लोकांचा मला राग आला होता.हौशीने घेतलेले काढावे लागले.परदेशात आपले काही चालत नाही,तिकडे काही इतर मार्ग पण नाहीत.अखेर मी दोघांचा निरोप घेउन निघाले.समोरच चोकलेट चे दुकान होते.अनिकेत ने मला दिलेले सर्व युरोची मी चोकलेट घेतली.बेधड़क ही पहिलीच खरेदी मी केली.चालत गेट वर पोचले.तिकडे चक्क १५/२० भारतीय लोक बघून मी अवाक् झाले.अरे!मला ३ महिन्यात ही मानसे कुठेच दिसली नाहीत.सिक्यूरिटी चेकिंग करून निवांत बसले.अनिकेत नंदिनी ला आधी फ़ोन केला,ते दोघे बाहेर वाट बघत होती.
          विमानात अगदी शांत पणे येवून बसले.एका ट्रीप ने मला किती आत्मविश्वास आला होता.येताना स्वस्थ बसलेली मी यावेळी कोणाची मदत न घेता सेट झाले,चक्क २ चित्रपट पाहिले.मधून मधून विमानाचा मार्ग अंतर ठिकाने नकाशात पाहत होते.आपण एम्स्तेर्दाम ते मुंबई अंतर ६८५४ किलोमीटर ४२५४ मिनिटात पार करणार आहोत याची नोंद पण करत होते.बाहेरचे सतत कमी आधिक होणारे तापमान पण बघत होते.विमानाचा दिवसाचा प्रवास होता.खाणे पिणे चांगले होते.शेजारी ग्रीन कार्ड होल्डर मद्रासी बाई होती,जरा बोलत पण होते.शेवटचे २ तास राहिले आता मात्र मला घरचे वेध लागु लागले.जाताना पेक्षा येताना प्रवास सुखद झाला.फॉर्म भरून ठेवले.चक्क २० मिनिटे लवकरच विमान उतरले....हुश्य!!!!!!!!!!आले परत....बाहेर येताना आठवणी मनात घोळत होत्या.भल्या मोठ्या रांगेत उभी राहिले,नंबर आला आणि त्यानी दूसरा फॉर्म दिला.परत पासपोर्ट चश्मा काढून फॉर्म भरला.हा फॉर्म तेवाच दिला असता तर......पण काय आपली इंडिया.लोकाना त्रास कसा होइल याचाच आधिक विचार करतात की काय?अखेर सर्व  सोपस्कार आवरून मी एक तासानी बाहेर पडले,अनिकेत चा फ़ोन आलाच.सर्व माझी वाट पाहत होते सामान सुशिल ने घेतले.सर्वाना भेटून मी घरी यायला निघाले.सौरभ खुपच बारीक़ झाला आहे.जिम जोरात आहे.
             घरी येताना फरक जाणवत होता.कर्कश होर्न आमच्याच गाडीचा होता.पण बोलून काही उपयोग नव्हता.
        घरी आले फ्रेश झाले.देवाला नमस्कार केला,ट्रीप छान झाली देवाचे आभार मानले.चहा घेत गप्पा सरू.भाग्यश्री ने खरेदी बघितली.दोघी पोरी खुश झाल्या.[कल्याणी आणि भाग्यश्री]जरा वेळ विश्रांति घेतली.सकाळ पासून माझे काम सुरु झाले.
           असा झाला माझा पाहिला प्रवास.आता परत समर मधे जाणार आहे,तेव्हा परत लिहीनच.पण आता इथेच राम राम!!!!!!!!!!!!!!!!!
 ----------------------------------.-----------------------०------------------------------------०----------------

No comments:

Post a Comment