Friday, January 8, 2010


 किती सांगू मी सांगू कुणाला???
                           आज आनंदी आनद झाला!!!!!!!!!!!!
         आजकाल प्रत्येक आई वडिलांना वाटत असते,आपल्या मुलाने प्रत्येक क्षेत्रात नाव कमवावे.शिक्षण तर हवेच.शालेय शिक्षणातच स्पर्धा सुरु होते.भारतात आपल्याकडे अजून तरी शालान्त परीक्षा माघ्त्वाची समजली जाते.त्याच्या गुणावरच पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेणे शक्य होते.चांगले कॉलेज मिळावे यासाठी चांगले गुण आवश्यक आहेत.याची जाणीव पालकांना आणि मुलांना झाली आहे.हे भाग्याचे आहे.त्यासाठी दहावीला इतर सर्व उद्घ्योग बंद करून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले जाते.एकदा का चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळाला कि मुलांच्या प्रगतीला खरी सुरवात होते.मुलगा असो वा मुलगी.आपल्याला नेमके कोणते शिक्षण घेऊन नोकरी,व्यवसाय करायचा आहे ते ठरवण्या इतके सक्षम होतात.पदवी हाती आली कि काही जण नोकरी करतात तर काही उच्य शिक्षण घेतात.त्यासाठी त्यांना परदेशी जावे लागते.परदेशात शिक्षणासाठी पाठवायला पालकाची मानसिक तयारी असते.शिक्षणासाठी खर्च खूप येतो पण तेही करतात आनदाने.आजकाल शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज पण मिळते.त्यामुळे शिक्षण घेणे सोपे होते.
          परदेशात मुले शिक्षणासाठी राहू लागली कि सुरवातीला त्यांना जरा जड जाते पण काही दिवसात तेथे छान रुळतात.त्यांना तिकडचे तेच खरे आपले जीवन वाटू लागते.आपल्या पेक्षा तेथील रोजचे जीवन नक्कीच सुखकर आहे.दगदग त्रास नसतो,हवा शुद्ध.प्रदूषण नाही.आवाज,गोंगाट नाही.आणि छान सुसज्ज घरे आलिशान गाडी सर्वे सुखसोयी तशा सहज मिळतात.त्यामुळे आपण घर सोडून बाहेर राहतो याचे काही फारसे वाटत नाही.संगणक फोन याने सतत संपर्क तर राहतो.मला वाटते मुले परदेशात असताना अधिक सुसंवाद होतो.शिक्षण घेताना परदेशात नोकरी पण मिळते त्यामुळे आर्थिक स्वतंत्रता मिळते.एकटे राहू लागले कि जवाबदारी येते.घरची पैशाची किंमत कळू लागते,शिक्षणासाठी केलेला खर्च परत मिलावनेसाठी परदेशात नोकरी करणे फायदेशीर ठरते.सुखद जीवन जगून काही रक्कम तरी शिल्लक राहते.एकदा हे गणित मुलांना जमले कि ती नक्कीच तसे वागू लागतात.
       आपल्या कडे नोकरी करताना प्रवासाचा त्रास होतो त्याने अर्धे आयुष्य कमी होते.त्यामानाने रोजचा खर्च आणि पगार याचे गणित जुळत नाही.सामान्य वर्ग तर त्याने बेजार होतो.आयकर वाचवणे साठी पण पैसे बाजूला टाकणे कठीण जाते,अशा वेळी परदेशात नोकरी करणारे सुखद निश्चिंत जीवन जगत असतात.आपल्या घराला सुस्थिती यायला तेच दावेदार असतात.हे मी अनुभवाने सांगते.आपल्या आणि परदेशी चलनात असणारी तफावत मुलांना डॉलर पौंड युरो मध्ये मिळणारा पगार ,यामुळे त्यांचे राहणीमान खूप बदलते.सुसज्ज घर,गाडी,दागदागिने  सर्वे हौस मौज ते करू शकतात.भारतात नोकरी करणाऱ्या मुलांना मर्यादा येतात.सरळ मार्गाने भरारी झेप सहज घेऊ शकत नाही.माझा अनुभव बघा ना.........
अनिकेतला परदेशात जाण्याची संधी मिळाली म्हणून तो मला नोकरी सोड,निवृत्ती घे सांगू शकला,तसेच घरासाठी लागणारा पैसा एकही रुपयाचे कर्ज न घेता देवू शकला,भाग्यश्री चे लग्न थाटात केले,आणि आता माझा परदेश दौरा ,स्वप्न नगरीची सफर या गोष्टी परदेशात राहिल्याने झाल्या हे नक्कीच!!!!!!!!!!!!
       आपण आपल्या विचाराच्या चौकटीतून बाहेर पडलो तरच मुलाचे व्यक्तिमत्व चांगले घडू शकते.घरची परिस्थिती चटकन बदलते.स्थिरता लवकर येते.पण हे सर्व होण्यासाठी मुलांकडे सकारात्मक नजरेतून पहिले पाहिले पाहिजे.त्यांना आपण मानसिक पाठींबा तरी नक्की देऊ शकतो.घरातील एकाची प्रगती झाली कि इतर अनुकरण करतात,कुटुंब प्रगती करते.त्याने देशाची प्रगती पण होते.
                                                                                                                                                                                                  मयुरा छत्रे.
-----------------------------------------------------०------------------------------------------०००

No comments:

Post a Comment