Tuesday, October 6, 2009

प्रथम आम्ही आइस पेलेस बघायेचे ठरवले.आणि त्या गुहेत शिरलो,बर्फाची गुहा.पायात बुट होते तरी सुरवातीला पाय सरकत होते.अनिकेत चा आधार घेत चालू लागले.बर्फाची कलाकृति बघत त्या गुहेतून आम्ही जवळ जवळ एक तासभर फिरत होतो.फोटो काढत होतो,आणि अजब अनुभव घेत होतो.कायम लोकाना बघता यावे असा हा पेलेस बनवला आहे.सहप्रवासी बरेच होते पण इंडियन अगदी कमी २/४ जण होते.आइस पेलेस बघून नंतर आम्ही परत त्या लिफ्ट ने आणि उंचावर म्हणजे ज्याला टॉप ऑफ़ यूरोप म्हणतात.त्या जुन्ग्फ्राऊ[युन्ग्फ्रा] या डोंगरावर आलो.आणि ख़रच सांगते तुम्हाला मी तर बर्फाची रास पाहून वेडी झाले.खुप वर्षाची माझी इच्छा पूर्ण झाली.पानढर्या शुभ्र बर्फावर गार वार्यात आम्ही तिघे फिरत होतो.पाय घसरत होते.एकमेकाना धरत चालत होतो.त्यावेळी मला किती आनंद झाला होता सांगू शकत नाही.पण ख़रच माझ्यासाठी तो एक अविस्मणीय अनुभव होता.मी इकडे पर देशात आल्याचे सार्थक झाले असे वाटले.थंडीने हात पाय गारठले होते.पण त्याच ठिकाणी मन प्रसन्न ,शांत वाटत होते.लहान मुलासारखे बर्फा वरच थाम्बावे असे वाटत होते.खुप वेळाने परत गेस्ट रूम मधे हीटर जवळ येवून बसलो.पण माझे काही समाधान झाले नव्हते .मी अनिकेतला पुन्हा एकदा बर्फावर जाऊ या का विचारलेच?? लगेच अनिकेत आणि मी पुन्हा एकदा एक फेर फटका मारून सर्व पॉइंट वर गेलो.लहान मुले कसे करतात तसे मी केले हे मला नंतर जाणवले.पण मन भरून समाधानाने आम्ही तिकडून निघालो.आता पर्यंत मी माझ्या मित्र मैत्रिनिकडून सर्व वर्णन ऐकली होती.आज मी मात्र ते प्रत्यक्ष अनुभवले होते.कधी एकदा सर्वाना सांगते असे मला झाले आहे.आता मात्र पोटात कावले ओरडू लागले होते.आम्ही तिकडे असलेल्या एका गोलाकार रेस्टोरंट मधे गेलो,ते म्हणजे बॉलीवुड रेस्टोरंट .होटल मधे बसल्यावर दमलो पाय बोलू लागले होते.पण रेस्टोरंट सुसज्ज बांधलेले पाहून मी अवाक् झाले.अनिकेत ने आई तू काय खाणार?विचारले.मी बघते तर काय तिकडे इंडियन फ़ूड ची पण छान सोय.मी तेच घेणे पसंद केले.त्या दोघानी वेगवेगले जेवण घेतले.उंचावर अशा थंड वातावर्नात डाल,भात ,छोले गरमा गरम खायला मिलने या सारखे सुख नाही!!!!!!!!!हे जाणवले.खास इंडियन फूड बरोबर पाणी बाटली फ्री.मला नवल वाटले.इतर जेवणाच्या तुलनेत इंडियन फ़ूड तेथे थोड़े महाग होते.पण चविष्ट होते.
            बर्याच ट्रिप तिकडे येत होत्या.प्रवासी साठी सोयी छान होत्या,बूफे पद्धत सर्वत्र होती.जेवण झाल्यावर ताटे[ट्रे]ठेवायला खास कपाट होते.त्यात ट्रे सरकवून ठेवणे काम .ही कपाट चाके असल्याने वेटर मुली सहज हलवू शकत होत्या.थंडीने भूक पण जास्त लागत होती.मस्त जेवलो त्यावर डेझर्ट म्हणुन केक घेतला.फ्रेच फ्राइज ,सलाड तिकडे जास्त खातात.चिकनचे ,फिश चे मटन चे अगम्य प्रकार जेवणात होते.माझे मन मात्र त्याच आनंदात भारावलेले होते.परत येताना ट्रेन मधे चढताना बायबाय करावेसे वाटत नव्हते.त्याचे टॉप ऑफ़ यूरोप हे नाव ख़रच सार्थ आहे हे नक्की.
                 येताना घरे पाहताना काही घरे चक्क तिरकी बांधलेली दिसली.प्रत्येक घरावर ते घर किती वर्षा पूर्वीचे आहे त्याचा उल्लेख होता .घराला ,बंगल्याना आपल्या सारखी नावे कुठेही दिसली नाहीत.पण ६० ते ७० वर्ष जुनी घरे मात्र सुस्थितीत दिसत होती.पुरातन वास्तु जतन करने किती गरजेचे आहे याची जाण त्या लोकाना आपल्या पेक्षा आधिक आहे हे प्रकर्षाने जाणवले आता आपल्याकडे जुने वाडे पडून टॉवर बांधले जात आहेत.घरातील जुनी भांडी ताम्ब्या,पिटालेची काढून नॉन स्टिक वापर केला जात आहे,घरातील जुने शिसवी फर्नीचर काढून नविन तकलादू आनले जात आहे.आणि ही म्हणे आपली सुधारणा,प्रगती.!!!!!!!!!!!!!!!!विसंगत वाटते ना सर्वेच......

No comments:

Post a Comment