Thursday, October 8, 2009

                  मोबाइल मधे गज़र झाल्यावर प्रथम मी उठून आवरून घ्यायचे असा नियमच झाला होता.कारण एकच बाथरूम होती .माझ्या नंतर त्या दोघानी आवरले आणि आम्ही लगेच बाहेर पडलो.आज ब्रेक फास्ट नाही की चहा नाही.बस ट्रेन पकडून आज आम्ही शिन्थ्रोवं ला जात होतो.कालचा तोच सुखद अनुभव आज पण,कनेक्टिंग गाड्या आराम शिर प्रवास आजपन.आज गाडीत आपल्याप्रमाने जरा वेळ पत्ते कुटले.रम्मी!गाडीतून उतरून जवळ जवळ अर्धा तास केबल कार साठी चालत जायेचे होते.म्युरेन हे एक छोटेसे गाव .धुक्याची झालर सगालिकडे ,त्यातून चालने मौज होती.समोरचे काहीही दिसत नव्हते,काही अंतराने जरा घरे दिसू लागली.सर्व लाकडी घरे बंगलो टाइप .भाज्या परसात लावलेल्या दिसत होत्या.आणि फूल झाडे तर विविध रंग प्रकार पाहून वेड लागत होते.मला आमच्या फोटो ग्राफर वैभव आणि राम गोपाल वर्मा [टोपण नाव खरे नाव माहित नाही]ची आठवण झाली.खास त्यांच्या साठी फुलांचे फोटो काढून घेतले.नंतर आम्ही गाव बघत केबल कार स्टेशन ला पोचलो.आता जरा केबल कार ची माहिती झाली होती.यात मात्र बसायला सिट नाहीतच.सर्वानी ३० मिनिटे उभे राहून जायचे.एका वेळी ४० प्रवासी जा ये करू शकतात.कार्नर पकडून उभे राहिले.खाली वाकून बघवत नव्हते.धुके दाट होते.आधिक उंचावर गेल्य्वर धुके नाहीसे झाले.काही डोंगर कड्यावर केबल कार आदलनार की काय असे वाटत होते.ही कार ओपरेट  करायेला एक स्त्रीच होती.मला अगदी तिचा अभिमान वाटला.ख़रच स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत बघून समाधान वाटले.आपण आता काहीच करत नाही याची खंत मात्र वाटली.केबल कार ची २ कनेक्शन पूर्ण केली.आणि आम्ही डोंगरावर पोचलो.जरा पुढे चालत गेलो तर गैलरीत जायेला चक्क ३ मजले.पण तिकडे पण सरकते जीने.मला या लोकांची कमाल वाटली,डोंगरावर अशा सोयी करणे सोपे काम नाही.आता मला त्या सरकत्या जिन्याची सवय झाली होती.आम्ही वर पोचलो आणि थक्क झालो.आम्ही वर आणि आमच्या समोर खाली सर्व ढगच ढग.कापुस पिंजुन ठेवल्या सारखे.पांढरे शुभ्र ढग वाहत होते.बघून वेड लागायेची वेळ आली.कल्पनेच्या पलिकडचे मी सत्यात बघत होते.डोंगर रांगा या शब्दाचा खरा अर्थ मला इथेच समजला.डोंगराल भागात पाउस जास्त का पडतो???याचे उत्तर सापडले.त्या भागात फिरताना आम्ही एका होटल मधे गेलो.छोटासा जीना चदुन.......बघते तर काय एक छान सजावट केलेले गोलाकार होटल.त्याचे विशिष्ट म्हणजे जेम्स बोन्ड पिक्चर चे शूटिंग त्यात झाले आहे.ते त्याचे घर दाखवले आहे.सॉलिड ना!!!!!!!!!!!!!
डोंगर माथ्यावर असे होटल सर्व डोक्याच्या पलिकडचे होते.अनिकेत म्हणाला "आई,आपण इथे चहा तरी घेऊ शकतो"मला आधी ती असे का बोलतो कलले नाही.पण ते होटल प्रचंड महाग होते कारण ते गोलाकार फिरते होते.चहा पिताना आपण गोलाकार फिरताना मी अनुभवले.चहा चा आस्वाद घेत ढग पसरलेली झूल आम्ही नजरेत साठवत होतो.परमेश्वर म्हणजे काय ते अनुभवत होतो.चमत्कार वाटत होता.तिकडून निघावे असे वाटतच नव्हते.

No comments:

Post a Comment