Tuesday, October 6, 2009

trip swiss....

                                      स्वप्ननगरिची सफर
          दि .३०.९.२००९ रोजी आम्ही स्विझर्लन्द ला जाण्याच्या खास मूड मधे होतो.सकाळ पासून तयारी आवराआवर करून आम्ही ठीक ११ वाजता निघालो.घरापासून जवळ ट्राम स्टॉप आहे.ट्राम ने आम्ही राइ स्टेशन ला गेलो.राय स्टेशन वरून शिफोल विमान तलावर डायरेक्ट मेट्रो ट्रेन ने गेलो.मला मोठी गंमतच वाटली.विमान तल आणि रेल वे स्टेशन एकमेकाना जोडलेले पाहिले तेव्हा .जाताना आमच्या प्रवासाचा वरून राजाला पण आनंद झाला त्याने रिमझिम बरसात केली आमच्यावर.त्यानी नंदिनी ने खास मला आणलेली नविन छत्री कामा आली.
        शिफोल विमान तल प्रचंड मोठे आहे.तेथे चेकिंग साठी सगलीकडे जाण्यासाठी सरकते जीने आहेत.आमचे स्विस एअरलाइन चे विमान होते.त्या विमानासाठी खुप लांब म्हणजे गेट क्र.२७ वर आम्ही जाऊँन पोचलो.आणि काय सांगू तुम्हाला?सर्व विमान तलावरिल दृश्य मी काचेतून बघू शकत होते.मी माझे वय विसरून अगदी लहान मुलाप्रमाने कितीतरी एअरलाइन ची वेगवेगळी विमाने धावपट्टी,विमानाचे लैंडिंग टेक ऑफ सर्व काही जवळून पाहत होते.प्रथमच विमानाने मुंबई हुन येताना मी हे काही बघू शकले नव्हते .ते आज २ तास बसून आरामात बघत होते.मज्जा वाटली.अगदी वेळेवर आमचे विमान बोर्ड झाले. विमानात गेल्यावर मला खिडकीची जागा.गम्मत आहे ना!दिवसाचा प्रवास असल्याने बाहेर निसर्ग देखावा छान दिसत होता.ढग उंचावर असतात पण त्या ढगाच्या वरून आपले विमान जाताना पहाणे हा अनुभव अगदी विलक्षण होता.१तास २० मिनिटे प्रवास मी अगदी एन्जॉय केला.सर्व डोंगर रांगा,झाडे ,घरे,शहरे सर्व काही खिडकीतुन [विमानाच्या बर का?]पहाणे ख़रच मला चैन वाटत होती.एकीकडे मी अणि अनिकेत गप्पा मारत होतोच.अचानक हवेतून चालणारे विमान स्थिर उ़भे असलेले जाणवले आणि खर सांगू त्यावेळी मला आधुनिक तंत्रविद्यान,प्रगति याची खरी प्रचिती मला आली.आणि लगेच देवाचे आभार मानले कारण हे सर्व मी पुस्तकात न वाचता प्रत्यक्ष अनुभवत होते. विमानात आम्हाला प्रेत्झेल [चीझ,ब्रेड] ज्युस दिले.भूक लागली होती तेव्हा तेहि छान वाटले खायला .आणि अगदी अनिकेत सतत सांगत होता,आई,तिकडे स्विस चोकलेट सॉलिड असतात आपण तिकडे घेऊ या .आणि लगेच ट्रे भर चोकलेट आमच्यासमोर आली. आणि मला लगेच म्हण आठवली "मनी वसे ते स्वप्नी दिसे".इकडे तर आम्ही स्वप्न नगरीला चाललो होतो तेव्हा समोर चोकलेट ."मनी वसे ते समोर दिसे"असे झाले.लगेच त्याचा पण आम्ही आस्वाद घेतला.थोड्याच वेळात बासेल विमान तलावर विमान उतरले.आणखी एक नविन विमान तल मी पाहत होते,त्याचे फक्त काम अजुन सुरु आहे.बाहेर आल्यावर लगेच ५० नम्बर ची बस पकडून आम्ही रेल वे स्टेशन वर गेलो.बासेल मधे पण ट्राम सेवा आहे.रेल वे स्टेशन वर गाडीची वेळ व्हायला ३० मिनिटे होती.इकडे तिकडे जरा टाइमपास केला.वैशिष्ठे म्हणजे मेट्रो ट्रेन आहेत त्यामुले सर्व स्टेशन उंचवर आहेत.पण जायला सरकते जीने.[आणि ते सर्व चालू स्थितीत ]वर गेल्यावर पाहिले तर एक दोन नाही तर चक्क ३० प्लेटफोर्म[फलाट].अबब!!!इकडे लोकवस्ती कमी तरी इतके फलाट.ट्रेन मुबलक .आणि आपल्याकडे मात्र लोक जास्त असून सर्वच तुटवडा.फलाटावर उतरले.२ कंपनी कड़े रेल वे चा सर्व कारभार सोपवलेला आहे .त्यामुले ट्रेन मधे विविधता .सिंगल डेकर आणि तितक्याच डबल डेकर ट्रेन. ट्रेन तर काय सांगू?साफ सुफ ,पॉश,आणि बसण्याची सोय वा !!!!!!!!!!!सिट समोरासमोर ४ जण आरामात पाय लांब करून बसू शकतात.मधे एक छोटे टेबल पेड .त्यावर ट्रेन चा लोकल नकाशा.सेकंड क्लास डब्यात पण कुशन सिट ,खिडकीला छान पडदे.चैन आहे सर्व.गाडीत अगम्य भाषेत घोषणा [सूचना]पण आपले स्टेशन या नंतेर आहे हे मात्र काळात होते तेहि पुरेसे आहे,गाडीत आपल्या हाताशी सिट जवळ कचरा टाकायला सोय.त्यामुले कुठेही कागदाचा कपटा पण नाही,सर्व जन नियमाने वागतात.हे या लोकांचे वैशिष्ठ.इन्तेरलाकन वेस्ट ला जाणारी ट्रेन डबल डेकर होती.अनिकेत च्या आग्रहाने आम्ही वर बसलो.गाड़ी सुरु जाली आणि लगेच बोगद्यात गेली,कितीतरी मीटर लांब बोगदे.शहरात शिरताना जमिनीवर आणि परत लगेच खाली असा गाडीचा प्रवास मार्ग होता.गाडीत पण कमालीची शांतता.कोणी मोठ्या आवाजात बोलतात,गाणी गातात,विक्रेते येतात.भजने,सिट साठी वाद काही काही नाही.सर्व शांतपणे वचन नाहीतर सर्रास बाटली उघडून पिणे सुरु.स्पेन,फ्रेंच,जर्मन या भाषेतून गाडीत सूचना दिल्या जात होत्या.इंग्लिश बोलत नाहीत सर्व व्यवहारत्यांच्याच भाषेतून चालतात,हे लक्षात आले.आपण आपली भाषा जपली पाहिजे ,टिकवली पाहिजे .हे प्रकर्षाने जाणवले.आणि मला तत्काल माननीय राज ठाकरे  डोळ्यासमोर आले.गाडीत टिकिट चेकर स्त्री होती.नम्रपणे बोलत होती,टिकिट बघितल्यावर थान्कू[थैंक्स]म्हणत होती.आपले टिसी आठवले,आणि बिना टिकिट जाणारे लोक.जाताना बर्न स्टेशन लागले.ते तेथील राजधानीचे ठिकान.तो स्टेशन परिसर पाहून मला मुंबई सेंट्रल ची आठवण आली.गाडीतून जाताना उंच डोंगर रांगा,हिरवेगार गवत,दाट झाडी.टुमदार घरे,हिरवेगार तर काही ठिकाणी नीलसर पाणी असलेले विस्तीर्ण तलाव दिसत होते.तलावात सर्व प्रकारच्या होड्या आणि बदके होती.असे विहंगम दृश्य पाहत आमचा प्रवास सुरु होता.सर्व काही शक्य नव्हते पण ही दोघे खटाखट फोटो काढत होती.तेव्हा डिजीटल कैमरा म्हणजे चैन आहे जाणवले.पुर्विसरखे बंधन नाही ठराविक फोटो काढ़ने रोल संपेल ही भीती नाहीच.सहप्रवासी तर आधुनिक २/२ कैमरे  घेउन सतत फोटो काढत होते,उघड्या डोळ्याने निसर्ग बघतात का भींगा तुनच.!!!!!!!!प्रत्येक छोट्या गोष्टीचे पण फोटो काढत होते,त्याचे पण ते मार्केटिंग करतात की काय मला प्रश्न पडला.
      
        

No comments:

Post a Comment